सोने : बघावे, घ्यावे की -----

प्रसाद भागवत's picture
प्रसाद भागवत in काथ्याकूट
20 Dec 2013 - 6:49 pm
गाभा: 

एप्रिल च्या मध्यास लिहिलेला हा पोस्ट अधिक विचारमंथनाच्या अपेक्षेने मिपाच्या वाचकांबरोबर शेअर करतो आहे.-

आमच्या १५ हुन अधिक वर्षांच्या वैवाहिक वाटचालीत काल प्रथमच सौ. ने माझ्या
व्यावसायिक बुद्धीमत्तेवर थोडासा विश्वास दाखवत असल्याचे दाखवुन स्वतःच्या
बुद्धीमत्तेची चुणुक दाखवली. "सोने खुप खाली आले आहे म्हणे, लोकं घेतायत, तुझे
काय मत आहे??" ह्या तिच्या 'लाखामोलाच्या' प्रश्नाने मी गडबडलो. याशिवाय अपेक्षे्प्रमाणे
क्लायंट्सच्या जवळ्पास प्रत्येक फोनमध्येही हा विषय येत् होताच. खरे तर सोने
हा काही माझ्या आकलनाचा प्रांत नाही पण तरीही जागतिक बाजारांत मागणी पुरवठा
तत्वावर मोठ्या प्रमाणांत व्यवहार होणारी ती एक कमॉडिटी असल्याने मुलभुत नव्हे
पण काही तांत्रिक बाबींचा उहापोह करता येतो का ते पहातो.

एकदा सोने ही कमॉडिटी असल्याचे मान्य केले की भावातील चढ-उतार होतच असणार हे
ओघाने आलेच आणि जेथे तेजी आहे तेथे कधी ना कधी मंदी येणारच, खरे तर हा तर्क
अगदी जन्म आहे म्हणजे मृत्यु असणारच या गृहितकाएवढाच स्पष्ट आहे. पण तरीही आपण
अनेकदा विवेकबुद्धी सोडुन वागतो आणि अडचणींत येतो.

सोने कधीच घसरत नाही.-- अशा अज्ञानमुलक गृहितांच्या पार्श्वभुमीवर बाजाराने
दिलेले असे अनपेक्षित झटके ( ते देणे हे बाजाराचे व्यवच्छेदक लक्षणच आहे) ठळक
मथळ्यांचे विषय होतात. अशा परिस्थितीत माझ्यासारख्या किरकोळ गुंतवणुकदाराने काय
करावे ह्या प्रश्नावरील हा माझा व्यक्तीगत दृष्टीकोण मी सांगणार आहे.

असा रामायणाला सुरवात होते ती काही ना काही कारणाने बाजारांत एखाद्या वस्तुकडे पहाण्याचा
गुंतवणुकदारांचा कल बदलल्याने. त्या कारणांची मीमांसा हा आताच्या लेखनाचा विषय नाही मात्र, येथे सोन्याबाबत तो तेजीकडुन मंदीकदे बदलला आहे एवढेच आपण गृहित धरु या,
बाजारांत विक्रीचा जोर वाढुन भावपातळी खाली जावु लागते. परिस्थितीनुसार अशा
विक्रीची तीव्रता कमी अधिक असते.

कधीतरी भावांतील फरक मोठा असुन भाव नुसते घसरण्याऐवजी गड्गड्ल्यास बाजारांत
प्रमुख दोन प्रतिक्रिया पहावयास मिळतात.

(१) भाव खुप खाली गेल्याने सुरवातीस आक्रमकपणे विक्री करणारे थोडीशी उसंत
म्हणुन का होईना थांबतात अणि (२) स्वस्ताईच्या प्रतिक्षेत असलेले किरकोळ
गुंतवणुकदार खरेदी साठी गोळा होतात. यामुळॅ भावपातळीत सुधारणा होते. खुप मोठ्या
घसरणीनंतर आलेल्या भावांतील अशा उसळीला तांत्रिक परिभाषेंत 'Dead Cat Bounce'
असे म्हटले जाते. ( अगदी मेलेला प्राणीही खुप उंचावरुन खाली आपटल्यास उसळु शकतो
या अर्थी.)

या अशा फसव्या तेजीमुळे वर उल्लेखलेले किरकोळ खरेदीदार त्यांच्या फायदेशीर
सौद्याचा आनंद उपभोगणार, तोच बाजारातील आणखी एक वर्ग या धुमश्चक्रींत सामील
होतो, हा असा वर्ग असतो, ज्याने तेजीचा कल असताना असा वस्तुची खरेदी ( अर्थातच
चढ्या दराने) केलेली असते व नंतर आलेल्या मंदीत वेळीच भाग घेता न आल्याने
घुसमटुन तो बाजार सुधारताच 'बाहेर पड्ण्याच्या' मनस्थितींत असतो. पॉज
घेण्यासाठी थांबलेले आधीचे मंदीवाले व हे घायकुतीला आलेले गुंतवणुकदार विक्रीचे
पुढ्चे आवर्तन सुरु करतात व बाजार अधिक खालची पातळी दाखवु शकतो. ----ह्या
खेळाचे प्रयोग अनेकदा होतात.

असे अनुभवास येते की प्रदीर्घ कालावधीनंतर जेंव्हा बाजारात अशी एखादी मोठी घसरण
येते, तेंव्हा प्रकरण एका भागांत संपत नाही, थोड्या थोड्या अंतराने असे
मंदीचे धक्के बसलेले दिसतात. बाजार विश्लेषकांच्या मते बा्जार कधीच एखाद्या
कारणाने , एखाद-दुसरया दिवसासाठी वगैरे आपला दीर्घकालीन कल बदलत नाही. या बाबत
कारण मीमांसा करताना नेहमीच 'cockroach theory' चा मनोरजक दाखला दिला
जातो.म्हणजेच ज्या प्रमाणे if you see one cockroach in your home, there are
likely many more,----- मंदी्ला कारणीभुत असणारया कारणांचेही काहीसे असेच आहे.
ती ही झुरळांप्रमाणेच एक एक करुन दृष्टॉत्पत्तीस येउ लागतात.

आपण लक्षांत ठेवावयास हवे की भावपातळीचा तळ निश्चित होणे ही एक प्रक्रिया आहे,
घटना नाही. ('Bottom formation is a process, not an event') खरे म्हणजे
गुंतवणुकदाराच्या दृष्टीने खरेदी हा भविष्यकाळाशी निगडित व्यवहार आहे, म्हणजेच
वस्तुची भविष्यकालीन किंमत ही आजच्या किंमतीपेक्षा अधिक असावी हे कोणत्याही
गुंतवणुकीमागील सोपे गृहित आहे पण अनेकदा आपण खरेदी चा संबंध भुतकाळाशी जोडतो.
कालच्या पेक्षा आज स्वस्त आहे,--- केवळ हाच खरेदीचा निकष कसा काय असु शकतो
? --- उद्याचे काय ?? हा प्रश्न माझ्या मते अधिक महत्वाचा आहे

तेंव्हा केवळ वृत्तपत्रीय मथळ्यांकडे पाहुन दिवाळी/दसरा साजरा करण्याची अनाठायी
घाई केल्यास कदाचित शिमगा ह्या सणाचे स्मरण ही नंतर होवु शकेल ह्याची जाणीव असो
द्यावी.

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

20 Dec 2013 - 7:11 pm | प्रकाश घाटपांडे

समजा समस्त स्त्री वर्गाला सोन्याविषयी अचानक तिटकारा निर्माण झाला तर काय होईल?

बाबा पाटील's picture

20 Dec 2013 - 7:36 pm | बाबा पाटील

दुनिया बुडेल ,प्रलय होइल्,पण बायका आणी सोन्याचा तिटकारा अशक्य .......!त्रिवार अशक्य.....!

प्रसाद गोडबोले's picture

20 Dec 2013 - 7:42 pm | प्रसाद गोडबोले

सोन्यात कली असतो तस्मात सोने घेवु नये ... चांदी घ्या प्लॅटीनम घ्या ...

सोन्यात गुतंवणुक माझ्यामते ***पणा आहे . शेवटी तो एक धातु आहे . आयातीवर सरकारचे परकीय चलन खर्ची पडते . आणी वेळ आल्सास हि लोक सोन मोडत नाहित . कारण इज्जतीचा सवाल असतो .

मुक्त विहारि's picture

20 Dec 2013 - 9:27 pm | मुक्त विहारि

+१

प्रसाद भागवत's picture

21 Dec 2013 - 2:13 pm | प्रसाद भागवत

धन्यवाद.

मिनेश's picture

23 Dec 2013 - 1:24 pm | मिनेश

इथे तर गळ्यात सोन्याचे साखळदंड आणी सोन्याने मढवलेले शर्ट घालणारे लोक पण गाळात गेलेत.....तर सर्वसामान्य लोकांची काय बात :)

पैसा's picture

24 Dec 2013 - 4:36 pm | पैसा

सोन्याचे दागिने लग्नात एकदा आणि मुलाच्या मुंजीत एकदा सगळे घातले होते. एरवी बँकेच्या लॉकरचं भाडं फुकटचं भरते आहे. त्यामुळे नवीन सोनं कमॉडिटी मार्केटचं सुद्धा घेत नाही! सांगली पुण्यासारख्या शहरात तर ५ ग्रॅमचं मंगळसूत्र सुद्धा घालायची सोय राहिली नाही म्हणे!

सगळ्याच नाही तरी आता बर्‍याच बायका माझ्यासारखा विचार करत असाव्यात अशी आशा आहे!

बाकी मंदी आणि भावनिश्चितीबद्दलचे विवेचन आवडले.

प्रकाश घाटपांडे's picture

24 Dec 2013 - 4:59 pm | प्रकाश घाटपांडे

>>सगळ्याच नाही तरी आता बर्‍याच बायका माझ्यासारखा विचार करत असाव्यात अशी आशा आहे!<<
तस नाही वाटत सोन म्हणल की बायका यड्या होतात. सोनच अस नाही कि खरेदी म्हणल कि बायका यड्या होतात.
आजच गुरुपुष्यामृत मुहुर्तावर सोन खरेदी बाबत य.ना वालावलकर यांचे एक पत्र मटा ला आले आहे.
गुरुपुनर्वसू योगावर सोनेखरेदी
२० डिसेंबरला सकाळी ६ वा. ५९ मिनिटे ते ७ वा. ८ मिनिटे असा केवळ नऊ मिनिटे गुरुपुष्यामृत योग होता. त्या काळात कोणी सोने खरीदण्याचा संभव नाही. म्हणून १९ डिसेंबरच्या गुरुवारी सर्व सुवर्णखरेदी गुरुपुनर्वसू योगावर झाली हे निश्चित. अर्थात मुहूर्त ही एक निरर्थक कल्पना आहे. सोने कधीही घेतले तरी सारखेच. पण कधीच न घेतले तर मात्र फार उत्तम. सराफी दुकानांत काचेआडच्या निर्जीव, निर्बुद्ध पुतळ्यांवर सुवर्णालंकार शोभतात. सजीव, बुद्धीमान व्यक्तीच्या अंगावर ते ओंगळवाणे दिसतात. स्वबुद्धीने विचार करावा.
य.ना.वालावलकर
महाराष्ट्र टाईम्स, २४.१२.१३
( टंकलेखन सौजन्य संजोपराव)

मारकुटे's picture

25 Dec 2013 - 7:22 am | मारकुटे

>>>पण कधीच न घेतले तर मात्र फार उत्तम. सराफी दुकानांत काचेआडच्या निर्जीव, निर्बुद्ध पुतळ्यांवर सुवर्णालंकार शोभतात.

यनावालावरकरांसारख्या मनुष्याने सोन्याची किंमत जाणू नये हे दुर्देव.
सोन्याचा हव्यास नसावा मात्र सोनं हे अत्यंत उपयुक्त तसेच मनाला आधार असणारा धातु आहे.

आजुबाजुला सर्वत्र महागाई वाढत असतांना, शेअर बाजार किंवा तत्सम गुंतवणूक कधीही घाट्यात येण्याची शक्यता असलेल्या वातावरणात सोनं हीच काय ती दिलासा देणारी गुंतवणूक आहे असे सर्वसामान्य लोकांना वाटले आणि त्यांनी मुहूर्ताचा किंवा कसलाही आधार घेऊन ते खरेदी केले तर त्यात त्रागा करण्यासारखे काय आहे?

ज्ञानव's picture

25 Dec 2013 - 7:54 am | ज्ञानव

सोन्याचा भाव जो आज ३२००० आहे तो रुपये १,००,०००/- होईल तेव्हा आता ठरवा काय करावे ते.

आणि जर बँकेत लॉकरमध्ये ठेवायचे तर गहाण ठेवा आणि आलेल्या पैशाचे पुन्हा सोने घ्या.
व्याज जरी गेले तरी बराच काळ गुंतवणूक केल्यास बराच फायदा होतो.
मी ८००० भाव असताना घेतलेले आज ३२000 झाले मधल्या काळात गहाण ठेवलेल्या पैशातून आलेले सोने विकून गहाण ठेवलेले सोने सोडवले
आणि पुन्हा लगेच अगदि त्याक्षणी पुन्हा गहाण ठेवले जास्त पैसे मिळाले कारण भाव वाढला होता त्यातून पुन्हा सोने घेऊन ठेवले हा प्रकार २००८ पासून करतोय. (तेव्हा बाजारभाव होता १२०००/- नंतर २५०००/- आणि आता ३६०००/- झाला कि पुन्हा सोडवून पुन्हा अडकवणार.)

घेतले सोने तेव्हा भाव ८०००/-
कर्जावर हफ्ता (फक्त व्याज भरावे लागत असल्याने) महिना १%
कर्ज ९०% ऑफ द गोल्ड प्राईज in मार्केट

(तज्ञांनी गणित करावे, बुद्धीवतांनी चर्चा आणि माझ्यासारखे अडाणी कृती करून मोकळे होतात.)

मिनेश's picture

25 Dec 2013 - 9:06 am | मिनेश

>>>(तज्ञांनी गणित करावे, बुद्धीवतांनी चर्चा आणि माझ्यासारखे अडाणी कृती करून मोकळे होतात.)
हे भारीच... :)

सुबोध खरे's picture

25 Dec 2013 - 7:45 pm | सुबोध खरे

पटले नाही.
साहेब माझ्या आई वडिलांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी(१९८८ मध्ये) मी आईला २५ ग्राम सोन्याचा हार घेतला होता तेंव्हा सोन्याची किंमत ३२०० रुपये होती. तेंव्हा तेच पैसे जर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत ठेवले असते तर पहिली १० वर्षे १२ टक्क्याने आणि नंतरची १५ वर्षे ९ टक्क्याने व्याज गृहीत धरून किंमत ३९८०० होते. शिवाय माझा ९६० रुपये( प्रती ग्राम कर वाचला असता) म्हणजे २२४० रुपयांचे ३९००० झाले असते. शिवाय हरवणे चोरीला जाणे लॉकरचे भाडे हे त्यात धरलेले नाही.
हौसेला मोल नाही. तोच हार यावर्षी आईने अतिशय समाधानाने लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवशी घातला होता त्याचे मोल कसे करणार.
हौसेसाठी घेतलेले सोने आणि गुंतवणूक या गोष्टी वेगळ्या ठेवाव्या अशी माझी विचारसरणी आहे.
हा वैयक्तिक सत्य अनुभव आहे. तेंव्हा आपले म्हणणे पटले नाही.

ज्ञानव's picture

25 Dec 2013 - 8:39 pm | ज्ञानव

तुम्ही माझा मूळ प्रतिसाद संपूर्ण वाचला नाही.

तसेच ३२०० रुपये (प्रती १० ग्रामप्रमाणे)सोन्याच्या भावाचा २५ ग्रामचा हार रु.२२४० ला कसा ते काही कळले नाही. असो.
पण माझे गणित असे आहे कि

तर....१९८८ साली ३२०० प्रमाणे घेतलेले सोने (रु. ३२०० प्रती १० ग्राम )रु. ८०००/- ला हातात आले.( जे दागिन्याच्या रूपाने म्हणजे सोने कमीच. पण तो मुद्दा नाही.) आज सोने ३०००० प्रती १० ग्राम प्रमाणे जरी विचार केला तरी त्याची किंमत ७५००० रुपये होते. हा झाला ढोबळ गणिताचा भाग.

पण जर मी म्हणतो त्याप्रमाणे त्याकाळी सोने गहाण (लॉकर मध्ये नाही ) ठेवून नवीन सोने ट्रेड केले असते जसे मी वर नमूद केले आहे तर तुमचे किती हार आज तुम्ही विकत घेऊ शकला असता , व्याज देऊनहि , त्याचे गणित जाणकार मांडतीलच.
कारण

(तज्ञांनी गणित करावे, बुद्धीवतांनी चर्चा आणि माझ्यासारखे अडाणी कृती करून मोकळे होतात.)

कदाचित २ वर्षात १ नवीन हार हि आईला घेऊन देऊ शकला असतात म्हणजे ओरिजिनल एक आणि नवीन एक असे दोन हार झाले असते.

मी दिलेला ट्रेड खालीलप्रमाणे : (डॉक्टर साहेब ट्रेड ....ट्रेड अतिशय महत्वाचा भाग आहे इथे.)

मी ८००० भाव असताना घेतलेले आज ३२000 झाले मधल्या काळात गहाण ठेवलेल्या पैशातून आलेले सोने विकून गहाण ठेवलेले सोने सोडवले
आणि पुन्हा लगेच अगदि त्याक्षणी पुन्हा गहाण ठेवले जास्त पैसे मिळाले कारण भाव वाढला होता त्यातून पुन्हा सोने घेऊन ठेवले हा प्रकार २००८ पासून करतोय. (तेव्हा बाजारभाव होता १२०००/- नंतर २५०००/- आणि आता ३६०००/- झाला कि पुन्हा सोडवून पुन्हा अडकवणार.)

पी पी एफ मधील तुमची रुपये ८००० (रु. ३२००/प्रती १० ग्राम ) गुंतवणूक २५ वर्षाने तुम्हाला एकूण ९८६४९/- देते.

आणि

जर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे २२४० रुपयाची तुमची हारातली गुंतवणूक पी पी एफ मध्ये असती तर एकूण 27६२२/- देते.

सोन्यात तुम्हाला एकदाच रु. ८०००/-( किंवा तुम्ही अदा केलेली रक्कम रु. २२४० /- )भांडवल म्हणून गुंतवावे लागले असते.

पी पी एफ ला तुम्हाला दर वर्षी केवळ खाते सुरु राहावे म्हणून किमान १०० रुपये प्रमाणे २५ वर्षासाठी २५०० /- रुपये वाढीव भांडवल गुंतवावे लागले असते.(आता रु ५०० किमान गुंतवणूक करावी लागते असे ऐकून आहे.)

मी एकदाच रु.८००० सोन्यात टाकून ७००० रुपये बँकेकडूनच घेऊन पुन्हा सोने घेतले आणि भाव वाढल्यावर विकले असे ट्रेड केले. (ते मी कितीही वेळा करू शकतो.कारण जितके जास्तवेळा खाते बंद उघड होईल तेव्हढे पैसे मला जास्त मिळतात कारण भाव वाढलेला असतो.)

उपाशी बोका's picture

26 Dec 2013 - 3:58 am | उपाशी बोका

>> मी एकदाच रु.८००० सोन्यात टाकून ७००० रुपये बँकेकडूनच घेऊन पुन्हा सोने घेतले आणि भाव वाढल्यावर विकले असे ट्रेड केले.
हे म्हणजे स्टॉकचे मार्जिन अकाऊंट उघडण्यासारखे झाले.

असो, या बाबतीत मी डॉ. खरे यांच्याशी सहमत आहे.
२०११ च्या रिपोर्टमध्ये वॉरन बफेने सोन्याबद्दल काय म्हटले आहे, ते इच्छुकांनी जरूर वाचावे.

The second major category of investments involves assets that will never produce anything, but that purchased in the buyer’s hope that someone else – who also knows that the assets will be forever unproductive – will pay more for them in the future. Tulips, of all things, briefly became a favorite of such buyers in the 17th century.

This type of investment requires an expanding pool of buyers, who, in turn, are enticed because they believe the buying pool will expand still further. Owners are not inspired by what the asset itself can produce – it will remain lifeless forever – but rather by the belief that others will desire it even more avidly in the future.

The major asset in this category is gold, currently a huge favorite of investors who fear almost all other assets, especially paper money (of whose value, as noted, they are right to be fearful). Gold, however, has two significant shortcomings, being neither of much use nor procreative. True, gold has some industrial and decorative utility, but the demand for these purposes is both limited and incapable of soaking up new production. Meanwhile, if you own one ounce of gold for an eternity, you will still own one ounce at its end.

What motivates most gold purchasers is their belief that the ranks of the fearful will grow. During the past decade that belief has proved correct. Beyond that, the rising price has on its own generated additional buying enthusiasm, attracting purchasers who see the rise as validating an investment thesis. As “bandwagon” investors join any party, they create their own truth – for a while.

Over the past 15 years, both Internet stocks and houses have demonstrated the extraordinary excesses that can be created by combining an initially sensible thesis with well-publicized rising prices. In these bubbles, an army of originally skeptical investors succumbed to the “proof” delivered by the market, and the pool of buyers – for a time – expanded sufficiently to keep the bandwagon rolling. But bubbles blown large enough inevitably pop. And then the old proverb is confirmed once again: “What the wise man does in the beginning, the fool does in the end.”

Today the world’s gold stock is about 170,000 metric tons. If all of this gold were melded together, it would form a cube of about 68 feet per side. (Picture it fitting comfortably within a baseball infield.) At $1,750 per ounce – gold’s price as I write this – its value would be $9.6 trillion. Call this cube pile A.

Let’s now create a pile B costing an equal amount. For that, we could buy all U.S. cropland (400 million acres with output of about $200 billion annually), plus 16 Exxon Mobils (the world’s most profitable company, one earning more than $40 billion annually). After these purchases, we would have about $1 trillion left over for walking-around money (no sense feeling strapped after this buying binge). Can you imagine an investor with $9.6 trillion selecting pile A over pile B?

Beyond the staggering valuation given the existing stock of gold, current prices make today’s annual production of gold command about $160 billion. Buyers – whether jewelry and industrial users, frightened individuals, or speculators – must continually absorb this additional supply to merely maintain an equilibrium at present prices.

A century from now the 400 million acres of farmland will have produced staggering amounts of corn, wheat, cotton, and other crops – and will continue to produce that valuable bounty, whatever the currency may be. Exxon Mobil will probably have delivered trillions of dollars in dividends to its owners and will also hold assets worth many more trillions (and, remember, you get 16 Exxons). The 170,000 tons of gold will be unchanged in size and still incapable of producing anything. You can
fondle the cube, but it will not respond.

Admittedly, when people a century from now are fearful, it’s likely many will still rush to gold. I’m confident, however, that the $9.6 trillion current valuation of pile A will compound over the century at a rate far inferior to that achieved by pile B.

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 11:41 am | ज्ञानव

लिमिटेशन्स आहेत भाव पडला तर लगेच ब्रोकर पैसे मागतो.किंबहुना मार्जिन म्हणजे जुगारच असावा.
इथे नुसते नियमाने व्याज भरले कि झाले सोन्याचा भाव वाढला कि पुन्हा सोने TOP UP करायचे आणि पैसे नाही "युनिट्स" वाढवायचे. पण इथे सर्वजण सोन्याकडे गुंतवणूक म्हणून पाहत आहेत मी ट्रेडिंग म्हणून पाहतो आहे.
तसेच सोने, शेअर्स,सदनिका काहीही खरेदीची वेळ हि आदल्या उच्चतम पातळीखाली जेव्हा येते तेव्हा असते तसे ट्रेड भरपूर मिळतात पण पारंपारिक गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणारे आणि एकदम जुगार म्हणून पाहणारे असे दोन तट मला मिळणाऱ्या प्रतिसादातून दिसून आले ते त्या तत्वांना कन्व्हिन्स आहेत मी माझ्या तत्वाला कन्व्हिन्स आहे.
असो...

ज्ञानव's picture

25 Dec 2013 - 7:56 am | ज्ञानव

(तेव्हा बाजारभाव होता १२०००/- नंतर २५०००/- आणि आता ३६०००/- झाला कि पुन्हा सोडवून पुन्हा अडकवणार.)

हा भाव जेव्हा - जेव्हा सोने सोडवले तेव्हाचा आहे.

सोन हा चांगला गुंतवणूक पर्याय आहे हे मान्यच. गुंतवणुकीच्या अन्य पर्यायांबरोबर सोनेही समाविष्ट असावे. परंतु ही गुंतवणूक सोन्याची बिस्किटे अथवा नाणी घेऊन करता येते. सोन्याच्या दागिन्यांचा सोस अनाकलनीय आहे. दागिने खरेदी करताना तसेच प्रसंगी ते मोडताना घडणावळ, घसारा इत्यादी कारणांसाठी होणारा खर्च निरर्थक ठरत नाही का? दागिन्यांचा हा सोस अकारण संपत्तीच्या प्रदर्शनाकडे आणि त्यातून अहमहमीकेकडे झुकतो आणि त्यातून गुंतवणूकीचा मूळ उद्देश कितपत साध्य होतो?

सुबोध खरे's picture

25 Dec 2013 - 10:57 pm | सुबोध खरे

आपली हिशेबात गल्लत झाली आहे.
१) मी प्रती ग्राम प्रमाणे स्वच्छ हिशेब दिला आहे त्यात ३२००/ रुपये / दहा ग्राम आहे या सर्व हिशेबाला आपण २. ५ ने गुण म्हणजे आपल्याला हिशेब नीट लक्षात येईल
२) आपल्या करपात्र उत्पन्नातून ३० टक्के वजावट मिळते म्हणजे प्रती दहा ग्राम रुपये ९६०/- म्हणजे ८००० पैकी २४०० रुपये वजावट म्हणजे ५६०० रुपये नक्त गुंतवावे लागतात
३) पी पी एफ मधील तुमची रुपये ५६०० (रु. ३२००/प्रती १० ग्राम ) गुंतवणूक २५ वर्षाने तुम्हाला एकूण ९८६४९/- देते.आणि हे २४०० रुपये (कराचे वाचलेले )सुद्धा त्यात गुंतवले तर तीच रक्कम १,५८,०००/ - होतात तीच सोन्यातील गुंतवणूक ८ हजार रुपयावर ७५००० देते. आपणच हिशेब करून पहा काय जास्त फायदेशीर आहे
४) दर वर्षी १०० रुपये आपल्याला तसेच बारा टक्के व्याज सुद्धा देतात.
५) पी पी एफ मधील गुंतवणूक सहा वर्षानंतर काढून घेता येते आणि तीच रक्कम परत गुंतवणूक केल्यास त्यावर परत ३० % कर वाचतो . म्हणजेच अधिक ३०% नक्त नफा. असे आपण साहव्या वर्षानंतर करू शकता. (ती शक्यता अजिबात धरलेली नाही तरीही)
६) सोन्याची किंमत आपण म्हणता तशी पूर्वी वाढलेली नव्हती हि गेल्या पाच वर्षातील वाढ (२००७ ते २०१२) आहे मागच्या वर्षानंतर हि वाढ परत थांबली आहे. (http://zeenews.india.com/business/bullion/bullion-news/gold-price-india-...)तेंव्हा आपण त्या कालावधीत सोने घेतले तर भरपूर फायदा झाला त्यागोदर नाही आणि कदाचित लगेच पुढच्या पाच वर्षात होईल असे नाही. सोने फक्त ७३-७४, त्यानंतर ७७-८० आणि शेवटी २००७ ते २०१२ या कालावधीत भरभर वाढले होते आणि बाकी इतकी वर्षे ५-६ % या दरानेच वाढले आहे
७)सोने गेल्या ८८ वर्षात ८.५ टक्के दरानेच वाढलेले आहे यात एक महायुद्ध, असंख्य युद्धे भयानक जागतिक मंदी इ अनेक करणे असून सुद्धा.
(२०१२ साली २९००० आणि आता ३०००० म्हणजे जेमतेम ३ % म्हणजे आता आपण जर १२ टक्के व्याजाने पैसे घेतले तर नक्त ९ % नुकसान होते ) .
८) आपल्या हिशेबात १२ % व्याज (सोन्याच्या कर्जाचे) गृहीत धरलेले नाही.
९) वरील विदा मध्ये कोणत्या वर्षात सोने १२ टक्क्यापेक्षा वाढले तेवढीच वर्षे आपल्याला नफा होईल आणि इतर वर्षी नुकसान होईल. सोने वाढेल कि कमी होईल याचा अंदाज बांधणे ब्रम्हदेवाला सुद्धा शक्य नाही.
१०) सोन्याच्या व्यापारातून मिळवलेला नफा हा परत करपात्र आहे म्हणजे ३० % त्यातून आयकर कपात केली तर प्रत्यक्ष फायदा किती होईल ते पहा. ८८ वर्षात ८.५% दराने वाढलेल्या सोन्यावर ३० टक्के आय कर लावल्यास नक्त परतावा ५.८ टक्के होतो.
११) पी पी एफ मधील गुंतवणूक हि पूर्णपणे कर् माफ आहे
१२) सोन्यातील हा ट्रेड सर्व सामान्य माणसा ला सहज जमणारा नाही. पण वर्षात एकदा सरकारी खात्यात पैसे भरणे कोणाही माणसाला सहज जमणारे आहे.
सबब आपले म्हणणे अजिबातच पटणारे नाही.

उपाशी बोका's picture

26 Dec 2013 - 4:07 am | उपाशी बोका

१३) सोने विकताना येणारी घट गृहीत धरलेली नाही, ज्यामुळे फायदा अजून कमी होईल.

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 9:15 am | ज्ञानव

प्रथम इथे गेल्या ४१ वर्षातीलसोन्याचे भाव दिलेले आहेत.
म्हणजे सोन्याची वाढ हि गेल्या पाच वर्षातील वाढ आहे का ? त्याचे उत्तर मिळेल. सोन्याचे अनेक ट्रेड आहेत जे तुम्हाला इतर कुठल्याही गुंतवणुकीपेक्षा चांगले आणि सुरक्षित पैसे मिळवून देतातच. पण तुम्ही फार ढोबळ पणाने पी. पी. एफ आणि सोने हि सांगड घालता आहात.

मी २००६ पासून ह्या प्रकारात ट्रेड करत आहे. कॅडबरी किंवा बिस्कुट ह्या प्रकारात सोने घेतो आहे त्यामुळे ते विकताना घट कधीच आली नाही. माझा ट्रेड खालील प्रमाणे :

१० ग्राम सोने खरेदी दर रु. ८४०० प्रमाणे गुंतवणूक : ८४००
०९ ग्राम सोने खरेदी दर रु. ८४०० प्रमाणे गुंतवणूक :७५६० (हे पैसे बँकेने वरील १० ग्राम सोने गहाण ठेऊन दिले आहेत.)म्हणजे ७५६० भागिले ८४० रुपये प्रती ग्राम प्रमाणे ९ ग्राम

प्रथम गहाण ठेवलेले सोने सोडवले २००८ साली तेव्हा भाव होता १२५००

आता मी ९ ग्राम सोने विकले आणि आलेले पैसे बँकेत भरून उरलेले १० ग्राम सोडवून घेतले आणि तेही सोने विकले.

१९ ग्राम सोन्याची विक्रीतून आलेले पैसे : २३७५० (१९ * १२५०)
वजा बँकेचे कर्ज : ७५६०
१२% व्याज रुपये ९०७.२० दर साल : २७२२
प्रमाणे रुपये (९०७.२०* ३ = २७२१.६०)
एकूण नक्त नफा : २३७५० -(७५६०+२७२२+८४००)= ५०६८/- २७% नफा म्हणजे ९% वार्षिक

आता तुम्ही म्हणाल म्हणजे फिक्स डीपोझीट एवढाच झाला कि तर सकृत दर्शनी तुम्हाला ट्रेड कळावा म्हणून दिलेली पद्धत आहे ती. वास्तवात मी पुन्हा ५०६८ रुपयाचे सोने विकत घेतले असे करत करत आज माझ्याकडे नक्त ३० ग्रांम सोने, म्हणजे एकूण ४० ग्राम सोने, बिस्कुट रुपात जमा आहे. (फक्त ८ वर्षात...२५ नाही कि १५ नाही )पण त्यासाठी मला १० वेळा बँक ते सोनार धावाधाव करावी लागते जी पी पी एफ मध्ये पूर्णपणे वाचते कारण आता ओन लाईन पैसे भरण्याची सोय हि आहे. पण हा झाला माझा ट्रेड. ह्याचे अनेक कंगोरे आहेत जे मला भांडवलवृद्धी देतात ती हि युनीट्सच्या रुपात.
आता तुम्ही गणित करा २००६ ला माझी गुंतवणूक ८४०० आणि आज माझे भांडवल (जो माझा नफा हि आहे.) ३० ग्राम * ३००० प्रती ग्राम = रु. ९००००/- कोण फायद्यात आहे ते.(मुळ १० ग्राम मी लक्षातच घेत नाहीये.)

आता टेक्स : कर भरताना माझ्या एकूण उत्पन्नातून ३०% कर भरावा लागतो त्यात माझ्या करबचत योजनामधील गुंतवणूक माझ्या कामी येते आणि गम्मत म्हणजे त्या कर बचत योजनाही व्याज देतात.

माझा ट्रेड सर्वांना कळला का ? मी काही लपवतो आहे असे वाटत असेल तर जरूर विचारा.
---------------------------------------------------------------------------------

प्रथम, आर्थिक उत्पन्न हे नेहमी विक्रीतून येते मग ती बुद्धीची विक्री असो, सेवेची विक्री असो कि एखाद्या वस्तूची विक्री असो त्या विक्रीतून आणि फक्त विक्रीतूनच झालेला नफा हा करपात्र असतो.

तुम्ही सोने खरेदीतून सरसकट ३०% कर वजा कसा केलात ते मला समजले नाही.

कुणी मिपाकर जर सी ए असतील तर त्यांनी प्रकाश टाकावा. मला जाणून घ्यायला आवडेल.कारण त्याने माझे नफ्याचे प्रमाण भरपूरच वाढेल.
म्हणजे आजचे ३०००० रुपयाचे सोने कर वजवटीमुळे मला २१००० रुपयात बाजारात मिळेल असा अर्थ निघतो का?

तुम्ही पहिल्या प्रतिसादात काढलेला नफा रु. ३९००० होता जो पुढच्या प्रतीसादापार्यंत १५८००० झाला ते हि गणित इथे उदाहरणासहीत मांडा मोघम आकडेवारी नको कारण त्याने मी बावचळतो.

कारण जर तुम्ही खालील प्रमाणे गुंतवणूक पी पी एफ मध्ये केलीत अगदी वर्षाला १०० रुपये भरून तरीही पूर्वी १२% आणि आता ९% प्रमाणे गणित खाली दिले आहे.
(कुणाला खालील गणिताची एक्सेल हवी असल्यास अल्प मोबदल्यात उपलब्ध करून देण्यात येईल ....मोबदला : मिपा.)

१) रुपये 2२40 अधिक १०० रुपये दर वर्षी प्रमाणे २५ वर्षानंतर रुपये ३७७८९/-
२) रुपये ५६०० अधिक १०० रुपये दर वर्षी प्रमाणे २५ वर्षानंतर रुपये ७९२२२/-
३) रुपये ८००० अधिक १०० रुपये दर वर्षी प्रमाणे २५ वर्षानंतर रुपये १०८८१७/- असे पैसे मिळतात.

सकृत दर्शनी हे पैसे सोन्यापेक्षा जास्तच आहेत. पण...

१) सोन्याला जी रोखता आहे (लिक्विडीटी) ती पीपीएफ ला नाही. १५ वर्षापर्यंत पी पी एफ ची संपूर्ण रक्कम काढता येत नाही.
२) १२% व्याज दर ९% (१ एप्रिल २०१३ पासून ८.७०%) आलेला आहेच तो अजून हि खाली येऊ शकतो
३) योग्य तो कर सरकारकडे भरून जर मला हवे तेव्हडे कमावण्याची मुभा असेल तर मी जितक्या संधी मला उपलब्ध होतील तितके पैसे जास्त मिळवत राहीन असा विचार आपण का करू नये? सरकारला कर द्यावा लागेल म्हणून निष्क्रिय बसून राहणे म्हणजे चलनातून पैसा वाढतो ह्या नियमालाच खीळ घालणे होईल. आणि सरकारला कर देऊ नये का?

प्रत्येक गुंतवणुकीचे निकष हे वय, तुम्हाला लागणारी भविष्यातली गरज हे लक्षात घेऊनच करतात म्हणजे गुतंवणूक रोखता हाही तितकाच महत्वाचा भाग आहे. सोन्याचे युनिट्स जर बँकेच्या पैश्यात वाढवत राहिले तर तो फायदा किती आणि कसा होतो ते सोन्याच्या भावावरून दिसतेच.पी पी एफ चे युनिट्स तसे वाढवता येत नाहीत.
जगभरातल्या खाणीतून होणारे सोन्याचे उत्पादन आणि जगभरातली मागणी लक्षात घेता सोन्याचा भाव खाली जाईल का हे सांगयला श्री ब्रह्मदेव ह्यांना त्रास द्यायची गरज नाही. तसेच २०१२ साली 31७९९ आणि २०१३ साली ३४५०० इतका होता म्हणजे ८.५०% (मी जे १२% व्याज देणार त्यापेक्षा कमीच ओ !!!)
"असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" ह्या पद्धतीने पी पी एफ जे देईल तेच तुम्हाला घ्यावे लागेल म्हणजे खेळाचे नियम पी पी एफ्चे तर ते बरोबर नाही खेळाचे नियम माझ्या हातात हवे म्हणजे मी मला हवे तेवढे कमवू शकतोच.

आता मुद्दा सामान्य माणूस, मराठी माणूस (वास्तविक द्विरुक्ती आहे.) हे लेबल लाऊन किती दिवस जगणार हो. सोन्याच्या दुकानात आणि बँकेत गर्दी दिसते सोन्याचे भाव कितीही वाढले तरीही. आणि सामान्य कुणी नाही (कोट्यवधींची स्पर्धा ज्याने आईच्या पोटातच जिंकली तो सामन्य नाहीच...) ज्याला जरा जास्त पैसे देणारे कुणी दिसले तर तो त्या माणसाच्या मागे धावत सुटतो कारण तो सामान्य नाही "माठ" आहे म्हणून.
थोडक्यात कुणीतरी कमावून द्यावे मी मेहनत (??) सोर्री झंझट करणार नाही हि वृत्तीच सामान्य करतेय आपल्याला.

पी पी एफ वाईट नाही माझे हि खाते आहेच कि पण पी पी एफ मध्ये पैसे मी सोन्यातून ट्रेड करून भरतो इतकाच फरक आहे.
थोडक्यात गुंतवणूक आणि ट्रेड ह्याची योग्य सांगड घालून आर्थिक वृद्धीचा प्रयत्न सतत करणे कि वेगवेगळ्या योजनांमधून पैसे अडकवून वाट पाहत बसणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

@वारेन बफे बद्दल प्रचंड आदर मनात आहेच पण त्यांनी सगळ्या जगातील १/५ चांदी खरेदी केली होती ती का बुवा?

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 9:50 am | ज्ञानव

एकूण नक्त नफा : २३७५० -(७५६०+२७२२+८४००)= ५०६८/- २७% नफा म्हणजे ९% वार्षिक

माझी एकूण गुंतवणूक ८४०० +२७२२ = १११२२ आणि नफा ५०६८ /- म्हणजे जवळ जवळ ४५.५० %
कारण मी व्याज आणि पहिले भांडवल रु. ८४०० म्हणजे १५.६०% मी म्हंटलेच आहे.

वारेन बफे बद्दल प्रचंड आदर मनात आहेच पण त्यांनी सगळ्या जगातील १/५ चांदी खरेदी केली होती ती का बुवा?

त्यांनी चांदी घेतली, सोने नाही. चांदीची ऑद्योगिक क्षेत्रात बरीच गरज असते. ती सोन्या सारखी नुस्ती पडुन रहात नाही.

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 10:53 am | ज्ञानव

पण त्यांनी चांदी खरेदी मागचे कारण वेगळे होते. ते हि लिहितो नंतर.

प्रसाद१९७१'s picture

26 Dec 2013 - 11:08 am | प्रसाद१९७१

@ ज्ञानव - तुम्ही गहाण ठेवुन उगाच व्याज वाया घालवत आहात. त्यापेक्षा हे करुन बघा. ( तुम्ही स्टॉक्स मधे काम करता म्हणुन तुम्हाला उपयोगी आहे ). तुम्हाला माहीती असेलच, तरी पण.

१. सोने घेण्यापेक्षा त्याचे ETF घ्या ( तेव्हड्याच किमती चे ). उदा. १,००,०००
२. ते Pledge करा, तुम्हाला ८५,००० चे Margin मिळेल ( Without any Cost ).
३. ह्या मार्जीन चा उपयोग करुन तुम्ही F&O मधे काम करु शकता.
४. जर सोन्याचा भाव वाढला तर तुम्ही ते pledge काढुन, विकू शकता.

सुबोध खरे's picture

26 Dec 2013 - 11:21 am | सुबोध खरे

आणी सोन्याचा भाव उतरला तर ?
गेली चार ते पाच वर्षे २००७ ते २०१२ सोन्याचा भाव चढतच गेला म्हणून ज्ञानव साहब त्या काळात यशस्वी झाले.(त्या अगोदर असे झाले नसते ही गेल्या ८८ वर्षांच्या सोन्याच्या भावावरून स्पष्ट दिसत आहे.) याच काळात जर सोने पडले असते तर दुहेरी नुकसान झाले असते. हा सट्टा आहे सर्व समान्य माणसाने खेळू नये असे मला वाटते.
साध्या सोन्याला उतरती कळा लागलेली आहे तेनव्हा पुढच्य दोन ते तिन वर्षात सोने प्रत्यक्ष किंवा गोल्ड फंड मध्ये घेऊ नये असे मला वाटते. F & O हा सुद्धा सट्टा आहे ज्याचे जळते त्याचे ओले ही जळते आणी नाहि त्याचे सुकेही जळत नाहि.ज्याने कमित कमी पाच वर्षे शेअरबाजारात घालविली आहेत त्यानेच याचा विचार करावा. नाहीतर यात हात भाजून घेतलेले लोक मिपावर सुद्धा कमी नाहित असे पुर्वीच्या चिखलफेकी वरून जाणवते.

प्रसाद१९७१'s picture

26 Dec 2013 - 11:26 am | प्रसाद१९७१

डॉक्टर साहेब - माझा सल्ला फक्त ज्ञानव यांना होता. ते सोने गहाण ठेवून महीना १% व्याज उगाचच वाया घालवत आहेत, म्हणुन त्यांना ह दुसरा उपाय सांगितला. त्यांचे वर्षाचे १२ % व्याज वाचेल.

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 11:55 am | ज्ञानव

तुम्ही वाढवलेले युनिट्स कामाला येतातच.
हा सट्टा तर अजिबात नाही कारण सोने हे बराच काळ स्थिर असते असा अनुभव आहे. ते रातोरात पडत नाही कि चढत नाही आणि सोने चढायला लागल्यावरच ट्रेड केले पडायला लागल्यावर वाढवले तरी आज मी बराच पुढे आहे. रु. १९३ सोन्याचा भाव रु. ३४००० पर्यंत पोहचला हाही इतिहासच आहे. आणि सोने जर इतके नुकसान कारक आहे तर लोकांनी विकायला काढावे कि...

दागिन्यांची झीज होते तरीही आम्ही नव नवीन दागिने ३४००० रुपयाने हि विकत घेतोच आहोत. मग ते का हौस म्हणून ? म्हणजे "सामान्य माणसाकडे" ३४००० रुपयाची हौस करायला पैसा आहे? आणि ट्रेड करून तो वाढवायला सांगितला तर तो जुगार आहे? हे विसंगत आहे.

लहान मुलांचे भवितव्य घडावा सांगणाऱ्या म्युचअल फंदात पैसे बुडले तरी लोक हु कि चू करत नाहीत पण जो सोन्याचा ट्रेड ८४०० चे ९०००० फक्त ८ वर्षात करून देतो तो जुगार?

मग मी स्वतःला कृतीशील अडाणी म्हणतो ते तरी पटते का?

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 12:06 pm | ज्ञानव

(त्या अगोदर असे झाले नसते ही गेल्या ८८ वर्षांच्या सोन्याच्या भावावरून स्पष्ट दिसत आहे.)

८८ वर्षात ८.५ जर भाव वाढत असेल तर पुष्कळ आहे कि.

वाईट काय आहे ते लिहा

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 11:30 am | ज्ञानव

पण
१) मी जुगार कधीच खेळत नाही (F&O) च्या संदर्भात बोलतोय.
२) प्रत्यक्ष गोल्ड मला अनेक कारणांनी बरे पडते. सोनार आता घरातलाच असल्यासारखा झाला आहे. त्यामुळे फोनवर
काम होते.बँक जवळजवळ ९५% पैसे देते कारण बरीच वर्ष संबंध आहेत.
३) ब्रोकर्सवर तेवढा विश्वास नाही कारण खूप पहिले भोगले आहे.
४) CONSERVATIVE थिंकिंग असल्याने बँकच बरी पडते. व्याज आणि कर भरून हि स्लो बट स्टेडी मी युनिट्स वाढवतो आहेच.

एकतर धंदा आहे थोडी मेहनत घ्यावी आणि थोडे प्रत्यक्ष सोने हातात घेऊन बघण्याची नशा काही औरच आहे.

पण सल्ला पटला आवडला तरी तत्व आड येतात म्हणून सॉरी.

तसेच धन्यवादसुद्धा

सन २०४०
"सोन्याचा भाव जो आज ३२००० आहे तो रुपये १,००,०००/- होईल तेव्हा आता ठरवा काय करावे."
जर सव्वीस वर्षात गुंतवणूक तिप्पट झाली तर दर काय मिळतो ४.२४ टक्के वर त्या व्याजावर आपल्याला आयकर भरावा लागतो ३० % प्रमाणे म्हणजे शंभर रुपयचे सोने घेतले तर ते ३०० रुपयचे होणार विकलेल्या नफ्यावर (२०० रुपयावर ६० रुपये आपण कर भरणार)म्हणजे आपला परतावा फक्त ३.४ टक्के होतो. मग सोन्यात गुंतवणूक का करायची हे आपणच सांगा.

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 12:46 pm | ज्ञानव

म्हणूनच ट्रेड करायचा सल्ला देतोय २००६ साली १० ग्राम घेतलेले सोने आजे २०१३ मध्ये(८ वर्षात) १०+३० =४० ग्राम पर्यंत वाढवले त्याचा फायदा मला होतोच आहे. मी फक्त ८४०० आणि दरवर्षीचे व्याजच गुंतवतो बाकी पैसे बँक भरते. ३४००० रुपयाला हि सोने घेतले आहे. आणि आता २०००० येईल तेव्हाही घेणारच आहे. सोने हे दीर्घ मुदतीची गुंतवणूक आहे हे तुम्हीही जाणता पण म्हणून ते घेऊन नुसतेच बसून राहिलात तर कदाचित तितकी भांडवल वृद्धी मिळणार नाही कारण लोक सोन्याची रोखता लक्षात घेऊन पैसे गुंतवत जातात भांडवल वृद्धी हा त्यांचा उद्देश नसतो मी बाजारात उपलब्ध साहित्य म्हणजे सोने, बँकेकडे गहाण ठेवण्याची सोय, एक उत्तम सोनार आणि माझी अल्प बुद्धी वापरून एक सिस्टीम चालवतो ज्या द्वारे मला एक नियमित उत्पन्न मिळते ते मी पुन्हा सोन्यात गुंतवतो आणि माझी "युनिट्स" लक्षात घ्या "युनिट्स" वाढवत राहतो. माझे हि नियम तुमच्या सारखे साधेच आहेत की सोने हि दीर्घ मुदतीची गुंतवणूक आहे. आणि व्याज, कर काहीही ना चुकवता संपूर्ण कायदेशीर...उलट आमच्याच धंद्यात सगळे व्हाईट मध्ये व्यवहार होतात.....पद्धतीने करतो. पण तुम्ही म्हणता ती "बुद्धिवादी चर्चा किंवा गणिते" मला समजत नाहीत मी खरोखर एक अडाणी आहे जो संधी घट्ट धरून ठेवतो कारण सगळ्या प्राण्यांना शेपूट मागे असते "संधी" ह्या प्राण्याला शेपूट डोक्यावर असते ती येताना दिसली कि धरावी नाहीतर ती गेली कि गेली.

सोने गहाण ठेवा हि जाहिरात हा माझा क्ल्यू होता मी म्हंटले सगळ्या बँकांना एकदम कसे वेड लागले कि त्या सोने
गहाण ठेऊन पैसे देऊ लागल्या? मग थोडी बाजारत फेरी मारली आणि केले सुरु...आता २००६ साली मी हे सुरु केले तर तो योगायोग नाही कारण बँकाही तेव्हाच सोन्यावर कर्ज देऊ लागल्या आणि गम्मत अशी कि किसान विकास पत्र किंवा तत्सम गोष्टी गहाण ठेऊन मी ट्रेड करतच होतो तरी एवढी अक्कल नव्हती की सोनेपण ठेवावे....

असो कदाचित तुम्हाला ते समजाणार नाही कारण प्रत्यक्ष कामाचा तुम्हाला अनुभव नाही पण बँक जर बरोबर असेल आणि एक किंमती वस्तू माझ्याकडे असेल तर त्याला वेग कसा द्यायचा हे मी पूर्ण जाणतो..

उपाशी बोका's picture

26 Dec 2013 - 12:53 pm | उपाशी बोका

>> बँक जवळजवळ ९५% पैसे देते कारण बरीच वर्ष संबंध आहेत.
समजा, तुम्ही १ वर्षापूर्वी ३०,००० रुपयांनी १० ग्रॅम सोने घेतले. ते कर्ज ठेऊन ९५% लोन घेतले (२८,५००). मग त्या २८,५०० चे ९.५ ग्रॅम सोने घेतले. म्हणजे तुमच्याकदे १९.५० ग्रॅम सोने आहे आणि २८,५०० कर्ज आहे.
१ वर्षानी सोन्याचा भाव ३०,००० वरून २५,००० वर आला. बँकेच्या हिशोबाने तुम्हाला सध्याच्या २५,००० रेटच्या ९५% लोन (= २३,७५०) बँकेने द्यायला पाहिजे, पण तुमचे लोन तर २८,५०० आहे. अशा वेळी बँक तुम्हाला ४७५० चा (२८,५०० - २३,७५०) मार्जिन कॉल देणार का?

उपाशी बोका's picture

26 Dec 2013 - 1:41 pm | उपाशी बोका

२) समजा, तुम्ही बँकेला ४७५० रुपये भरले + १ वर्षाचे व्याज ३४५० (२८,५०० x १२%) पण भरले, म्हणजे तुमची "गुंतवणूक" झाली ३०,००० (सोने खरेदी) + ४७५०(मार्जिन कॉल) + ३४५० (व्याज) = ३८,२००.
सध्याच्या २५,००० रेटने तुमच्या १९.५ ग्रॅम सोन्याचे झाले ४८,७५० आणि डोक्यावर कर्ज आहे २८,५०० म्हणजे मिळणार २०,२५० आणि खर्च केले ३८,२००. ही "गुंतवणूक" (किंवा ट्रेडिंग म्हणा) फायद्याची कशी?
३) जर तुम्हाला मार्जिन कॉल भरायचा नाही, मग सोने विकावे लागेल. त्याचे मिळतील ४८,७५० (२५,०००/१० x १९.५) तुम्ही बँकेला देणार २८,५०० (कर्ज) + ३४५० (व्याज) = ३१,९५० म्हणजे हातात उरले ४८,७५० - ३१,९५० = १६,८०० म्हणजे तुम्ही गुंतवलेल्या ३०,००० चे झाले १६,८००.
leverage असा घातक ठरतो. पटतोय का हिशोब?

उपाशी बोका's picture

26 Dec 2013 - 1:55 pm | उपाशी बोका

२) समजा, तुम्ही बँकेला ४७५० रुपये भरले + १ वर्षाचे व्याज ३४५० (२८,५०० x १२%) पण भरले, म्हणजे तुमची "गुंतवणूक" झाली ३०,००० (सोने खरेदी) + ४७५०(मार्जिन कॉल) + ३४५० (व्याज) = ३८,२००.
सध्याच्या २५,००० रेटने तुमच्या १९.५ ग्रॅम सोन्याचे झाले ४८,७५० आणि डोक्यावर कर्ज आहे २३,७५० (४७५० भरल्यामुळे कमी झालेले कर्ज) म्हणजे मिळणार २५,००० आणि खर्च केले ३८,२००. ही "गुंतवणूक" (किंवा ट्रेडिंग म्हणा) फायद्याची कशी?

पण मी वर प्रतिसादात एक वाक्य दिले आहे.

(तेव्हा बाजारभाव होता १२०००/- नंतर २५०००/- आणि आता ३६०००/- झाला कि पुन्हा सोडवून पुन्हा अडकवणार.)

म्हणजे २५००० नंतर मी थांबलोय..

नुसतेच आकड्याचे खेळ नाहीत हे. मागचे पुढचे संदर्भ लक्षात घेऊन तयार केलेली सिस्टीम आहे हि. २५000 नंतर मी थांबलोय.(फक्त एकदाच ३४०००ला एकदा सोडवून थोडे सोने घेतले आहे.)
तुम्ही मध्येच एकदम समजा ३०००० ला घेतले तर असे आकडे मांडून लॉस नक्क्कीच दाखवू शकता कारण गुंतवणूक किंवा ट्रेड हयाची वेळ हि तितकीच महत्वाची आहे. बँक मला मार्जिन ट्रेडिंग करू देईल असे तुम्हाला वाटते का?
पण मी २००६ पासून "युनिट्स" गोळा करतो आहे.त्यामुळे माझ्याकडचे सोन्याचा भाव अवरेज करून वेगवेगळा झाला आहे. माझा ब्रेक इव्हन पोइंत येऊन गेला आहे.
मी एक पद्धत मांडली जी फूल प्रुफच आहे कारण वेळेत घेतलेला निर्णय कमावून देतोच. पण आता तुम्हाला माझ्या पद्धतीच्या ट्रेडिंगची सायकल परत मिळण्यासाठी थांबावे लागेल नुसतेच वाचले आणि ठरवले कि घ्या सोने असे तर नाही ना? आता तुम्हाला १८-२०००० पर्यंत भाव येण्याची वाट पहावी लागेल पण माझ्याकडे युनिट्स वाढल्याने मी मात्र मला हवा तसा ट्रेड करू शकतो. (व्याजाचे भान ठेऊन निर्णय घेत घेत.)
बाकी तुमचा हिशोब बरोबर ३०००० ने घेतलेल्या सोन्यावर आता काय मिळणार?

कदाचित माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल.

उपाशी बोका's picture

26 Dec 2013 - 2:49 pm | उपाशी बोका

बाकी तुमचा हिशोब बरोबर. ३०००० ने घेतलेल्या सोन्यावर आता काय मिळणार?
leverage किती घातक ठरू शकतो, एव्हडेच मला इतरांना उदाहरणाने पटवून द्यायचे होते. माझा हिशोब बरोबर आहे, हे सांगितल्याबद्दल आभारी आहे.

भाव ८,००० वरून १२,००० नंतर २५,००० आणि नंतर ३४,००० झाला, त्यामुळे तुमचे अ‍ॅव्हरेज कॉस्ट कमीच असणार. त्यामुळे ही सिस्टीम फूलप्रूफ आहे, असे तुम्हाला वाटणे सहाजिक आहे. माझ्या मते हा भ्रम आहे. (fallacy).
जर ८००० किमतीवरून १२,००० जाण्याऐवजी किंमत ६५०० वर गेली असती, तर वर म्हटल्याप्रमाणे नुकसान झालेच असते.

आता तुम्हाला माझ्या पद्धतीच्या ट्रेडिंगची सायकल परत मिळण्यासाठी थांबावे लागेल नुसतेच वाचले आणि ठरवले कि घ्या सोने असे तर नाही ना? आता तुम्हाला १८-२०००० पर्यंत भाव येण्याची वाट पहावी लागेल
तुमच्या सिस्टीमप्रमाणे २५,०००ला (च) का थांबलात किंवा १८-२०,०० पर्यंत का थांबायचे, ते जरा स्पष्ट करू शकाल का?

गुंतवणूक किंवा ट्रेड हयाची वेळ हि तितकीच महत्वाची आहे.
तुमच्या मते, तुमची सिस्टीम हा गुंतवणूकीचा प्रकार आहे की ट्रेडिंगचा?

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 3:08 pm | ज्ञानव

हा निव्वळ ट्रेड आहे. आणि त्यातून जनरेट होणारे रेवेन्यु गुंतवणुकीत लावतो म्हणजे सोनेच किंवा एफ डी किंवा पी पी एफ बाकी भाव केव्हा खाली जाईल ते आणि वर जाईल ती समज आता डेव्हलप झाली आहे. भाव २०००० किंवा १८००० का येईल त्याला कारण शेअर मार्केट आहे. प्रत्येक मार्केटची ट्रेड सायकल असते रियल इस्टेट आता स्थिरावले आहे. बराच माल पडून आहे. हिरा मार्केट संपल्यात जमा आहे. गोल्ड मध्ये कमावून झाले आहेत. जेव्हा एखाद्या माध्यमात (रियल इस्टेट, शेअर,गोल्ड )भरपुर स्पर्ट येतो त्यांनतर ते मार्केट धडधड कोसळू लागते
जनरली ते ५०% कोसळते आपल्या उच्चतम पातळी पासून म्हणजे सोने ३४००० - १७००० असा विचार करता १८ ते २० पर्यंत त्यात पुन्हा जोरात खरेदी सुरु होईल पण एकदा २२-२३000 ची पातळी त्यांने दाखवली आहे तेही विसरता कामा नये.

मी जे तुम्हला भरपुर स्पर्ट येतो त्यांनतर ते मार्केट धडधड कोसळू लागते म्हणतो त्याबाबत तुम्ही कुठलाही शेअर, कमोडीटी किंवा अगदी आय टी किंवा तत्सम क्षेत्रातल्या नोकर्यासुद्धा पाहा तुम्हाला जाणवेल.

शब्दात मांडणे कदाचित मला जमत नाहीये कारण वासावरून चव ओळखण्याचे कसब शब्दात बसवता येत नाही.

त्यामुळे ८००० भावाला जेव्हा वेग आला तेव्हा मी १२००० पातळी आधीच मनात धरली होती ८०००+४००० असे गणित करून आणि माझ्याकडे येणारी ग्राहक मंडळी मला हसत होती. (खुप वाईट वाटले तेव्हा मला आज तेच माझ्या मागे असतात कुठे पैसे लाऊ विचारत ......तेव्हाही वाईटच वाटते.)

मार्केटचा मी भक्त आहे कारण नावातच "पेठ"कर आहे. असो.
अभ्यास नसेल तर नुसत्या पद्धतीला काही अर्थ नसतो आणि गुंतवणूक प्रगल्भता लक्षात ना घेता एखाद्य्ला विरोध म्हणून विरोध असे असेल तर काय बोलणार???

कदाचित तुम्हाला कळले असेल मला काय म्हणायचे आहे ते.

सौंदाळा's picture

26 Dec 2013 - 4:55 pm | सौंदाळा

वासावरून चव ओळखण्याचे कसब शब्दात बसवता येत नाही.

वाक्य आवडले.

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 5:04 pm | ज्ञानव

धन्यवाद

प्रसाद१९७१'s picture

26 Dec 2013 - 2:14 pm | प्रसाद१९७१

CONSERVATIVE थिंकिंग असल्याने

@ज्ञानव - तुम्ही ट्रेडिन्ग करता आहात, त्यात सुद्धा गहाण ठेवुन, त्यावर व्याज भरुन अजुन पोझिशन तयार करता आहात. तरीही स्वताला Conservative म्हणता आहात. हा विरोधाभास आहे.

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 5:02 pm | ज्ञानव

विरोधाभास मला माफ असावा असे वाटते.
काय?

प्रसाद१९७१'s picture

26 Dec 2013 - 10:44 am | प्रसाद१९७१

डॉक्टर साहेब - तुमचे एकदम बरोबर आहे. सोन्याचे भाव मधल्या ४-५ वर्षात खुप वाढले म्हणुन त्यात १०% तरी ROI दिसतो आहे. ह्या भाववाढीची कारणे ही वेगळी होती. आता पुन्हा तशी भाववाढ दिसणार नाही.

मारकुटे's picture

26 Dec 2013 - 9:19 am | मारकुटे

सोन्याचा भाव भारतीय रुपयात देण्यापेक्षा गेल्या शंभर वर्षांचा विदा डॉलर्स मधे आहे त्याचा एकदा अभ्यास केला तर एकंदर तुमचे गणित फेल जाते असे दिसेल.

येत्या काही दिवसांत सोने ८०० डॉलर्स पर्यंत खाली येण्याचा अंदाज इनसायडर सांगत आहेत.

टेक केअर ... गार्निअर.

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 9:28 am | ज्ञानव

सोन्याचा भाव खाली जवळ जवळ २२००० ते १८००० पर्यंत येईल असा अंदाज आहे. आणि मला तेच हवे आहे. कारण प्रत्येक गुंतवणुकीची एक ट्रेड सायकल असतेच फक्त ती पकडता आली पाहिजे.
बाकी माहितीबद्दल धन्यवाद.

मारकुटे's picture

26 Dec 2013 - 9:49 am | मारकुटे

रावच शेपुट नका लावू...

"सोने खुप खाली आले आहे म्हणे, लोकं घेतायत, तुझे
काय मत आहे??" ह्या तिच्या 'लाखामोलाच्या' प्रश्नाने मी गडबडलो.

मी तर स्वतःच (बायकोने विचारायच्या आधीच) तिला म्हणतो "अग, जरा सोने घेतो तुझ्यासाठी." पण नवर्‍यावर "पूर्ण विश्वास" असल्याने तिला लगेच शंका येते, मग तीच म्हणते "जाऊ दे, मी कुठे वापरते कधी. नाहीतरी बँकेतच पडून राहाणार ना". मी लगेच आज्ञाधारकपणे "बरं" म्हणतो. याला म्हणतात "साप भी मरे और लाठी भी ना टूटे".
ती इथे मिपावर येत नाही, म्हणून बरे, नाहीतर काही खैर नाही. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Dec 2013 - 10:55 am | डॉ सुहास म्हात्रे

एक महत्वाची गोष्ट :

(अ) पी पी एफ् चे मुद्दल व परतावा यांची हमी सरकारने हमी दिलेली असते. त्यामुळे (१) मुद्दल बुडण्याची शक्यता नाही. आणि (२) व्याजदर फार खाली जाण्याची शक्यता नगण्य. (मागच्या वेळी पी पी एफ् चा व्याजदर अर्धापाव टक्का कमी करण्यावरून सरकारला पाठीबा देणार्‍या आणि विरोधी पक्षांच्या केवढ्या नाकादुर्‍या काढाव्या लागल्या होत्या हे लक्षात असेलच) म्हणजे एकूण परताव्याच्या साधारण आज केलेल्या आकडेमोडीएवढीच रकमेएवढी रक्कम मिळण्याची हमी असते.

याउलट

(ब) सोने किंवा इतर कोणत्याही कमॉडिटित केलेल्या गुंतवणूकीचा परतावा हा केवळ एक अंदाज असतो. याबद्दल कोणीही कोणतिही हमी देवू शकत नाही. जर भाव वर गेले तर आजच्या आकडेमोडीपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो पण भाव पडले तर मूळ मुद्दलातही घट होउ शकते. भाव सतत वर जाणे हे भाव वर जाण्याच्या सुरुवातीला जास्त प्रमाणात होते आणि भाव कोसळण्याची शक्यता भाव खूप वर असण्याच्या स्थितिला जास्त असते... आता सोन्याचे भाव बहुधा भाव त्यांच्या उच्च पातळीला आहेत (बबल / फुगवटा ?) असा अंदाज आहे.

थोडक्यात...

ज्यांना निर्धोक आणि खात्रीचा परतावा पाहिजे असेल त्यांनी पी पी एफ् मध्ये गुंतवणूक करणे योग्य.

ज्यांच्याकडे अशी शिल्लक आहे की जास्त परताव्यासाठी ती धोका पत्करून गुंतवायला त्यांची हरकत नाही, त्यांनी कमॉडिटी अथवा कलाकृती इ च्या गुंतवणूकीचा अभ्यास करून त्यांत गुंतवण्याचा निर्णय घ्यावा.

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 11:01 am | ज्ञानव

बद्दल बोलतोय. गुंतवणुकीबद्दल नाही.
गुंतवणूक करा पण ट्रेड करून करा एवढेच.
आणि युनिट्स वाढत असल्याने सुरक्षितता आणि परतावा दोन्ही उत्तमच आहे.
मुळात १ रुपयात १.९० पैशाची गुंतवणूक का कमावून देणार नाही?

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Dec 2013 - 11:51 am | डॉ सुहास म्हात्रे

वरचा प्रतिसाद अजून स्पष्ट करण्यासाठी अजून एक भर...

पी पी एफ् ही "इन्व्हेस्ट अ‍ॅन्ड फरगेट" अशी नसली तरी "इन्व्हेस्ट अ‍ॅन्ड रिमेंबर जस्ट वन्स अ इअर" अशी. त्यामुळे ही "एकरकमी + दरवर्षी किमान" किंवा "किमान रकमेच्यावर दरवर्षी हवी तशी" गुंतवणूक आहे. शिवाय "करोत्तर गुंतवलेले मुद्दल+ व्याज" पूर्णपणे आयकरमुक्त आहे. म्हणजे आज आकडेमोड केलेला परतावा १००% हातात येण्याची हमी आहे.

त्याविरुद्ध, कमॉडिटी ट्रेडिंग ही भारतात तेवढिशी न रुळलेली गुंतवणूक आहे. शिवाय तिच्यावर शेअरच्या बाजारभावासारखेच जागतिक मागणी-पुरवठ्याचे सर्व परिणाम, धोके, अटी आणि नियम लागू होतात. ट्रेडिंगसाठी आणि विशेषतः खरेदी-विक्रीच्या योग्य वेळा निवडण्यासाठी सतत जागरूक राहणे जरूरीचे असते. भाव वर जात असले तरी एक मर्यादा ठरवून (अजून भाव वाढतील असा मोह ताब्यात ठेवून) "प्रॉफीट बुक" करण्यासाठी विक्री करणे आणि भाव पडत असले तरी एक मर्यादा ठरवून (भाव परत वर येतील अशी आशा न बाळगता) "लॉस कंट्रोल" विक्री करणे अथवा सिंव्हाच्या काळाजाने "झाले नुकसान तर झाले" असे म्हणून गूतवणूक कायम ठेवणे (होल्ड) हे सर्वसामान्य गुंतवणुकदाराला कितपत झेपेल याची शंका आहे. त्याचबरोबर, एकदा ट्रेड केला की फायद्याने फार हुरळूळून जाता किंवा तोट्याची फार हळहळ न करता त्याचा पुढचा ट्रेड त्या नविन वेळेच्या परिस्थितीचे विष्लेशण करून थंड डोक्याने करणे जरूरीचे असते. अश्या गूतवणुकीचा हातात येणारा परतावा ठरवताना त्यांतून सर्व वजावट (ट्रेड्संबद्धीचे कर, ब्रोकर कमिशन आणि आयकर) वजा करायची असते.

थोडक्यात, कोणतीही गुंतवणूक तिच्याबद्दल शक्य तेवढी सर्व माहिती घेऊन आणि स्वतःची धोका पत्करण्याची तयारी (रिस्क अ‍ॅव्हर्जन) कितपत आहे हे ठरवून मगच करावी. शेअर अथवा कमॉडिटिच्या गुंतवणूकीचा परतावा भूतकालातील घडामोडीवर किंवा इतरांच्या पूर्वानुभवांवर अवलंबून नसतो. त्यामुळेच तशी धोक्याची सूचना अश्या सर्व गुंतवणूकींच्या जाहिराती आणि माहितीपत्रकांवर देणे कायद्याने जरूर आहे.

येथे मी कोणा एका गुंतवणूकीच्या प्रकाराचा विरोध अथवा भलावण करत नाही. वरीलपैकी कोणती परिस्थिती आपल्या खिश्याला आणि रक्तदाबाला परवडणारी आहे की नाही हे ज्याचे त्याने ठरवावे; इतकेच माझे मत आहे.

प्रसाद भागवत's picture

26 Dec 2013 - 1:44 pm | प्रसाद भागवत

सुरक्षीतता व व परतावा ह्या संकल्पना अनेकदा सापेक्ष ठरतात. तुलनाच करावयाची तर पी पी एफ् ही अधिक दीर्घकाळ अडकुन रहाणारी गुंतवणुक आहे. आणि जरी तिच्यातील व्याजदाराचे बदल ही अधिक संथपणे होतात तरी एकुणातच येथुन पुढे कोणालाही, अगदी सरकारलाही, व्याजदर कृत्रिमपणाने कमी वा जास्त ठेवणे शक्य नाही. (अशाच एका खात्रीच्या आणि 'सरकारी' असे बिरुद मिरवलेल्या युनिट ट्रस्ट चे अशाच कृत्रिमपणाने किंमती ठरविल्याने शेवटी काय झाले याची आठ्वण आल्याशिवाय रहात नाही) त्यामुळे मुद्दल बुडण्याची शक्यता नाही हे खरे असले तरी व्याजदराबद्दलचे अंदाज ( होय, अंदाजच) चुकु शकतात.
असा व्याजदर हा एकतर्फी ठरवला जातो आणि तो खात्यात असलेल्या सर्व रकमेवर लागु होतो.

करपात्रता हाही एक 'आज आहे पण उद्या ---? ' या पठडीतला्च मुद्दा आहे. E-E-E म्हणजे गुंतवणुकीच्या वेळॅॲ करसवलत देणारी - गुंतवणुकी दरम्यान करमुक्त उत्पन्न देणारी आणि शेवटी रोखतेच्या वेळीही करमुक्त असेल अशा गुंतवणुक पर्याय रद्द करण्याचा प्रस्ताव याआधीच अर्थखात्याच्या विचाराधीन आहे.

गंमतीचा भाग म्हणजे असे कोणतेही बदल जे गुंतवणुकीचा मुळ हेतु नष्ट करणारे असले तरी ते ' हम करे सो कायदा--' या तत्वाने घेतले जातात व त्याविरुद्ध गुंतवणुकदाराला बाहेर पडण्याचा वा ते नाकारण्याचा कोणताही हक्क नसतो.

तेंव्हा इस्पीकचा एक्का यांचे विचेचन चुकीचे नव्हे पण या धाग्या संदर्भात थोडेसे गैरलागु आहे.

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 2:08 pm | ज्ञानव

उच्चतम परतावा २६%
नीचतम शेवटचा मला आठवतो तो १४% तरीहि काही महाभाग विकत घेतच होते की...सरकारी गुंतवणुकीत तोटा नसतो सांगत अरे जे २६ वरून १४ वर आले तो काय फायदा का तुमचा .....?

पुन्हा किंमत आणि भाव ह्याचा अर्थ, महागाई वगैरे तर जाऊच देत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Dec 2013 - 5:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. तुमचे मत बँकेच्या सर्वसाधारण ठेवींबाबत खरे आहे पण पी पी एफ् बाबत नाही. पी पी एफ् (पब्लिक प्रॉव्हिडंड फंड) ही सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी निर्माण केलेली सामाजिक सेवानिवृत्ती योजना आहे भांडवलशाही योजना नाही. कोणीही सत्तेवर आले तरी सर्वसामान्य बँक ठेवींसारखा भांडवलशाही विचार पी पी एफ् बाबत होईल हा विचार अत्यंत धाडसाचा आहे ! किंबहुना पी पी एफ् च्या व्याजदराचा विचार सरकारतर्फे एकतर्फी होतो आणि तो गुंतवणूकदारांच्या बाजूने होते हेच पी पी एफ् चे एक शक्तीस्थान आहे ! कारण तो व्याजदर एकदम कमी करणे राजकिय दृष्ट्या कोणत्याही पक्षाला परवडणारे नाही !

इतक्या जास्त व्याजाचा, इतक्या कमी जोखमीचा आणि शिवाय पूर्णपणे करमुक्त गुंतवणूक पर्याय सद्या भारतात दुसरा व्कचितच (असलाच तर) असेल... असल्यास नक्कीच माहिती हवी आहे.

बँकांच्या व्याजदरांचा आणि पी पी एफ् च्या व्याजदरांचा तडक संबंध नाही हे खालील पी पी एफ् व्याजदरांवरून कळून येईलः

01.04.1986 to 14.01.2000.......................... 12%
5.01.2000 to 28.02.2001............................ 11%
01.03.2001 to 28.02.2002 .......................... 10.5%
01.03.2002 to 28.02.2004 .......................... 9%
01.03.2003 to 30.11.2011........................... 8%
01.12.2011 to 31.03.2012........................... 8.6%
01.04.2012 to 31.03.2013........................... 8.8%
01.04.2013 onward.................................... 8.8%

या सरकारी योजनेत वेळोवेळी बदल होतात. ते वर सांगितलेल्या कारणांमुळे बहुदा गुंतवणूकदारांच्या फायद्याचेच असतात. वरचे कमी झालेले व्याजदरही बँकांचे व्याजदर त्यापेक्षा अधिक कमी झाल्यानंतर सरकारवर फार मोठा बोजा पडू नये म्हणूनच कमी झालेले आहेत.

२. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (यु टी आय) आणि पी पी एफ् ची तुलना योग्य नाही. या दोन गोष्टी मूळातूनच फार वेगळ्या आहेत.

युनिट ट्रस्ट गुंतवणूक योजनेचे व्यवस्थापन करणारी राष्ट्रियिकृत लिमिटेड कंपनी आहे आणि तिच्या फंडातील निवेष ही १००% भांडवलशाही तत्वावरची गुंतवणूक आहे. यु टी आय बुडण्याचा आणि इतर लिमीटेड कंपनी बुडण्यात तसा अर्थाअर्थी फरक नव्हता. भारत सरकारने काही प्रमाणात तिला तारले ते केवळ नैतीक तत्वांवर.

पी पी एफ् हे सार्वभौम सरकारने स्वतः उभे केलेले कर्ज (सॉव्हरिन डेट) आहे. पी पी एफ् बुडणे म्हणजे भारत सरकार बुडणे असे म्हटले तर ते तितकेसे चूक नाही.

३. मात्र इतक्या फायद्यांबरोबर पी पी एफ् चे काही तोटे आहेत ते असे:

अ) ही गुंतवणूक दीर्घ मुदतिची आहे. सहा वर्षांनंतरच ५०% पर्यंत पैसे आणि १५ वर्षांनंतर १००% पैसे परत घेता येतात. १५ वर्षांनी अजून पाच वर्षे मुदत (अधिक हप्ते देऊन / न देउन) वाढवता येते. त्यामुळे सहज उपलब्ध असावी असे वाटणारी रक्कम यात गुंतवू नये.

आ) वार्षिक एक लाखापेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही. हा आकडा सरकार वेळोवेळी बदलून मोठा करत आलेले आहे, कधीच कमी केलेला नाही.

इ) अनिवासी भारतिय यांत गुंतवणूक करू शकत नाही :( . मात्र निवासी असताना सुरू केलेल खाते काही अटींवर चालू ठेवता येते.

असो. या फायद्याच्या आणि अतिशय निर्धोक अश्या गुंतवणूकीबद्दल फार माहिती नसते असे आढळल्याने इतके लिहीले. पूर्ण माहिती सरकारी संस्थळांवर अथवा आय सी आय सी आय सारख्या पी पी एफ् खाते स्विकारू शकणार्‍या बँकांच्या संस्थळावर मिळेल.

प्रसाद भागवत's picture

26 Dec 2013 - 6:18 pm | प्रसाद भागवत

सर, आपल्या पतिपादनाशी मी असहमत आहे.

आपण म्हणता ती स्थिती आणि आकडेवारी खरी असली तरी ती प्रामुख्याने भुतकाळाशी निगडित आहे. मात्र अलिकडे सरकारी आर्थिक धोरणात वेगवान बदल होत आहेत. एकेकाळी अशा योजनांतुन पैसे गोळा करणे ही अर्थव्यवस्थेची गरज होती कारण तुलनात्मक रित्या ते स्वस्तच पडत असत. मात्र अलिकडे वा भविष्यात परिस्थिती तशी रहिलेली नाही.,

मात्र अलिकडे कोणीही सत्तेवर आले तरीही पैशाचे सोंग यापुढे अगदी सरकारलाही आणता येणार नाही हे सत्य आपण स्वीकारावयास हवे. सरकार कोणासही आता अनावश्य्क संरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाही, सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी नव्याने निर्माण केलेली सामाजिक सेवानिवृत्ती योजना ( एन .पी . एस), पेन्शन, इन्शुरन्स सारख्या क्षेत्रातल्या सुधारणा, सब्सीडीबाबतची सरकारी भुमिका, या होवु घातलेल्या बदलांची साक्ष आहेत. पी पी एफ् सारख्या योजना ह्या एक ओझे म्हणुनच पाहिल्या जातात व हळुहळु त्या कालबाह्य होतील याबद्दल माझ्ह्या मनांत शंका नाही.

या योजनेच्या करपात्रतेबद्दलच्या सम्भावित बदलांबाबत मी लिहिलेच आहे. याशिवाय या योजनेतील गुंतवणुकीचा काही अंश शेअरबाजार वा तत्सम ठिकाणी गुंतवावा अशा वारंवार येणार्या सुचना ही अशा बदलांची नांदी आहे.

(२) तांत्रिक्द्रुष्ट्या काहीही असले तरी युनिट ट्रस्ट ची स्थापना केंद्रसरकारनेच आपल्या अन्य मध्यस्थांकरवी केली होती. त्यावर सरकारचे अप्रत्यक्ष पणाने पण पुर्ण नियंत्रण होते हे विसरता येणार नाही. आत्ता आपणास या . पी पी एफ् योजनेबद्दल असलेला विश्वास अनेकांना अगदी आपण सांगत असलेल्या मुद्द्यांमुळेच त्यावेळी युनिट ट्रस्ट बद्दल होता, ही वस्तुस्थिती आहे. तेंव्हा या दोघांची तुलना करणे अपरिहार्य आहे.

(३) जोखीम ही एक सापेक्ष कल्पना आहे असे मी म्हटलेच आहे. माह्झ्यामते गुंतवणुकीचे अधीक चांगले पर्याय नकीच उपलब्ध आहेत .आपणाबरोबर या मुद्द्यावर चर्चा करावयास नकीच आवडेल. आपण पुण्यात असता काय ?? मी पुण्याचा आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Dec 2013 - 10:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. तांत्रिक्द्रुष्ट्या काहीही असले तरी युनिट ट्रस्ट ची स्थापना केंद्रसरकारनेच आपल्या अन्य मध्यस्थांकरवी केली होती. त्यावर सरकारचे अप्रत्यक्ष पणाने पण पुर्ण नियंत्रण होते हे विसरता येणार नाही. आत्ता आपणास या . पी पी एफ् योजनेबद्दल असलेला विश्वास अनेकांना अगदी आपण सांगत असलेल्या मुद्द्यांमुळेच त्यावेळी युनिट ट्रस्ट बद्दल होता, ही वस्तुस्थिती आहे. तेंव्हा या दोघांची तुलना करणे अपरिहार्य आहे. ही केवळ तांत्रिक नाही पण बाजारी व्यवस्थेतील पूर्ण सत्य आहे. यु टी आयला मदत करणे हा १००% राजकिय फायद्याचा / नाईलाजाचा निर्णय होता तो कायद्याने जरूर नव्हता; जसा अमेरिकन पेन्शन फंड सांभाळणार्‍या वित्तसंस्थांना अमेरिकेने जागतिक आर्थिक संकटाच्या सुरुवातीला केला होता अगदी तसाच.

राजकीय भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या सरकारला कधी पैसा कमी पडला आहे?... आणि शेवटी हा सगळा पैसा जनतेने दिलेल्या करांतून अथवा देशाच्या नावावर कर्ज घेऊन अथवा देशाच्या नोटा छापूनच उभा केला जातो !

आर्थिक संकटाच्या वेळी अमेरिकेवर १० पेक्षा जास्त ट्रिलियन डॉलरचे कर्ज होते तरी २ ते ३ ट्रिलियन डॉलर कर्ज ज्यांनी बेजबाबदारपणे अर्थव्यवस्था बुडवली त्या अर्थसंस्थाना जवळ जवळ शून्य व्याजदराने दिले गेले. आता ते कर्ज १७ ट्रिलियनच्याही वर गेले आहे आणि दर क्षणाला वाढत आहे. तरी क्वांटिटेटिव्ह इझिंगच्या नावाखाली अर्थव्यवस्थेत पैसा छापून ओतणे आजही चालूच आहे. ते जरी मार्च २०१४ ला बंद करू म्हटले असले तरी ते होण्याची खास लक्षणे नाहीत असाच तज्ञांचा अंदाज आहे. येथे डोकावा आणि गम्मत पहा.

सरकारचे यु टी आयवरचे नियंत्रण आणि ५१% शेअर असलेल्या वैयक्तीक भागधारकाचे लिमिटेड कंपनीवरचे नियंत्रण यात शब्दशः काही फरक नाही. पूर्वी १००% टक्के सरकारी असलेल्या पण आत्ता डायव्हेस्ट केलेल्या आणि शेअरमार्केटवर नोंदवलेल्या कंपन्यांवर सरकारचे बहुमताचे नियंत्रण आहे आणि त्यांच्याकडून आपले बहुमत वापरून सरकार शक्य तेवढा आणि हवा तेवढा डिव्हिडंड घेते. पण त्याचा अर्थ असा नाही की उद्या जर त्या कंपन्या बुडीत निघाल्या तर सरकार भागधारकांना त्यांचे पैसे आताच्या शेअरच्या किंमतीप्रमाणे परत करेल. कंपनीची सगळी देणी देऊन उरलेली रक्कम (जर उरलीच तर) प्रत्येक भागधारकाला त्याच्या भागांच्या समप्रमाणात वाटली जाईल. मात्र कंपनी लिमिटेड असल्याने भागधारकाला कंपनी न फेडू शकलेल्या कर्जाचा भार उचलावा लागणार नाही हीच काळ्या ढगाची रुपेरी कडा !

पी पी एफ् हे कायद्याने स्वतः भारत सरकारने प्रत्येक ठेवीधारकाकडून स्वतंत्रपणे घेतलेले कर्ज आहे. त्यामूळे ते भारत सरकारची तडक जबाबदारी आणि सरकारच्या बाजारातल्या पतीशी तडक जुळलेले आहे.

त्यामुळे जर कोणी ते दोन्ही एकच समजले तर तो एक फार मोठा आणि कदाचित महागडा ठरणारा केवळ गैरसमज होता/आहे.

२. सब्सीडीबाबतच्या भारत सरकारच्या भुमिके बद्दल कृपया गैरसमज ठेवू नका. गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये) बालीत झालेल्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गॅनायझेशनच्या सभेत (ब्राझील वगैरेंनी सर्व देशांनी माघार घेतल्यानंतरही) एकट्या भारताने हट्ट धरून सब्सीडी कायम ठेवण्याचा क्लॉज मंजूर करून घेतलेला आहे. नुकताच मंजूर केलेला अन्न सुरक्षा कायदा हा भारतात या ना त्या कारणाने सब्सिडी पुढची अनेक वर्षे चालूच राहणार याची ढळढळीत साक्ष देत आहे. हे दोनच पुरावे येथे पुरे ठरावेत.

असो. इथे खूप झाले. प्रत्यक्ष भेट आवडली असती. पण मी सद्या भारतात नसल्याने अधिक चर्चा खरड वही / व्यनीवर करायला आवडेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Dec 2013 - 10:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

फक्त अजून एकच महत्वाचे आणि थोडक्यात...
एकेकाळी अशा योजनांतुन पैसे गोळा करणे ही अर्थव्यवस्थेची गरज होती कारण तुलनात्मक रित्या ते स्वस्तच पडत असत. मात्र अलिकडे वा भविष्यात परिस्थिती तशी रहिलेली नाही.

पी पी एफ चे पैसे सरकारी योजनांत वापरात येत असले तरी विनातरण कर्ज मिळवणे हा तिचा दुय्यम हेतु आहे. मुख्य हेतू सर्वसामान्य लोकांना निवृत्तिच्या काळात आर्थिक सुरक्षा देणे आहे. याच कारणासाठी तिच्या नावात "प्रॉव्हिडंड" हा शब्द आहे. आणि म्हणूनच आर्थिक झळ सोसूनही ही योजना सरकार अधिकाधिक आकर्षक ठेव॑त आलेले आहे. १५ वर्षे लॉक इन ही अट जाचक असली तरी ती प्रॉव्हिडंड फंड या कल्पनेशी मिळतीजुळती आहे आणि तो पैसा विनाकारण सर्वसामान्य कारणासाठी वापरला जाण्याची शक्यता काही अंशी कमी करते. अर्थात त्यामुळे सरकारला हा पैसा जास्त काळासाठी वापरायला मिळतो हा एक दुय्यम फायदा (जादा व्याज देऊनच मग) मिळतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Dec 2013 - 5:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. तुमचे मत बँकेच्या सर्वसाधारण ठेवींबाबत खरे आहे पण पी पी एफ् बाबत नाही. पी पी एफ् (पब्लिक प्रॉव्हिडंड फंड) ही सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी निर्माण केलेली सामाजिक सेवानिवृत्ती योजना आहे भांडवलशाही योजना नाही. कोणीही सत्तेवर आले तरी सर्वसामान्य बँक ठेवींसारखा भांडवलशाही विचार पी पी एफ् बाबत होईल हा विचार अत्यंत धाडसाचा आहे ! किंबहुना पी पी एफ् च्या व्याजदराचा विचार सरकारतर्फे एकतर्फी होतो आणि तो गुंतवणूकदारांच्या बाजूने होते हेच पी पी एफ् चे एक शक्तीस्थान आहे ! कारण तो व्याजदर एकदम कमी करणे राजकिय दृष्ट्या कोणत्याही पक्षाला परवडणारे नाही !

इतक्या जास्त व्याजाचा, इतक्या कमी जोखमीचा आणि शिवाय पूर्णपणे करमुक्त गुंतवणूक पर्याय सद्या भारतात दुसरा व्कचितच (असलाच तर) असेल... असल्यास नक्कीच माहिती हवी आहे.

बँकांच्या व्याजदरांचा आणि पी पी एफ् च्या व्याजदरांचा तडक संबंध नाही हे खालील पी पी एफ् व्याजदरांवरून कळून येईलः

01.04.1986 to 14.01.2000.......................... 12%
5.01.2000 to 28.02.2001............................ 11%
01.03.2001 to 28.02.2002 .......................... 10.5%
01.03.2002 to 28.02.2004 .......................... 9%
01.03.2003 to 30.11.2011........................... 8%
01.12.2011 to 31.03.2012........................... 8.6%
01.04.2012 to 31.03.2013........................... 8.8%
01.04.2013 onward.................................... 8.8%

या सरकारी योजनेत वेळोवेळी बदल होतात. ते वर सांगितलेल्या कारणांमुळे बहुदा गुंतवणूकदारांच्या फायद्याचेच असतात. वरचे कमी झालेले व्याजदरही बँकांचे व्याजदर त्यापेक्षा अधिक कमी झाल्यानंतर सरकारवर फार मोठा बोजा पडू नये म्हणूनच कमी झालेले आहेत.

२. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (यु टी आय) आणि पी पी एफ् ची तुलना योग्य नाही. या दोन गोष्टी मूळातूनच फार वेगळ्या आहेत.

युनिट ट्रस्ट गुंतवणूक योजनेचे व्यवस्थापन करणारी राष्ट्रियिकृत लिमिटेड कंपनी आहे आणि तिच्या फंडातील निवेष ही १००% भांडवलशाही तत्वावरची गुंतवणूक आहे. यु टी आय बुडण्याचा आणि इतर लिमीटेड कंपनी बुडण्यात तसा अर्थाअर्थी फरक नव्हता. भारत सरकारने काही प्रमाणात तिला तारले ते केवळ नैतीक तत्वांवर.

पी पी एफ् हे सार्वभौम सरकारने स्वतः उभे केलेले कर्ज (सॉव्हरिन डेट) आहे. पी पी एफ् बुडणे म्हणजे भारत सरकार बुडणे असे म्हटले तर ते तितकेसे चूक नाही.

३. मात्र इतक्या फायद्यांबरोबर पी पी एफ् चे काही तोटे आहेत ते असे:

अ) ही गुंतवणूक दीर्घ मुदतिची आहे. सहा वर्षांनंतरच ५०% पर्यंत पैसे आणि १५ वर्षांनंतर १००% पैसे परत घेता येतात. १५ वर्षांनी अजून पाच वर्षे मुदत (अधिक हप्ते देऊन / न देउन) वाढवता येते. त्यामुळे सहज उपलब्ध असावी असे वाटणारी रक्कम यात गुंतवू नये.

आ) वार्षिक एक लाखापेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही. हा आकडा सरकार वेळोवेळी बदलून मोठा करत आलेले आहे, कधीच कमी केलेला नाही.

इ) अनिवासी भारतिय यांत गुंतवणूक करू शकत नाही :( . मात्र निवासी असताना सुरू केलेल खाते काही अटींवर चालू ठेवता येते.

असो. या फायद्याच्या आणि अतिशय निर्धोक अश्या गुंतवणूकीबद्दल फार माहिती नसते असे आढळल्याने इतके लिहीले. पूर्ण माहिती सरकारी संस्थळांवर अथवा आय सी आय सी आय सारख्या पी पी एफ् खाते स्विकारू शकणार्‍या बँकांच्या संस्थळावर मिळेल.

सुबोध खरे's picture

26 Dec 2013 - 12:01 pm | सुबोध खरे

माझ्या दवाखान्याच्या मजल्यावर माझा शेअर ब्रोकर आहे ज्याच्याकडे मी गुंतवणूक करतो. माझ्याकडे रुग्ण आला की मी लगेच उठून दवाखान्यात येतो. एकदा तेथे बसलेल्या एका इसमाने विचारले की डॉक्टर इतकी घाई काय आहे इथे मार्केट चढते आहे जरा थांबा.
मी शांत पणे त्याला म्हणालो साहेब मी १९८४ सालपासून वैद्यक शास्त्र शिकतो आहे आणी १९९१ पासून रेडीयोलॉजी.शेअर बाजार हे अवांतर आहे.
त्यात मी किती वर्षे आहे फार तर पाच किंवा सहा. आलेला प्रत्येक रुग्ण माला नक्की पैसे देऊन जाणार आहे पण प्रत्येक शेअर ची ताशी खात्री नाही. एक पंच तंत्रातील गोष्ट आहे. एकदा एका गाढवाला एका लांडग्याने धरले. त्याला तो खाणार एवढ्यात गाढव त्याला म्हणाले अरे माझ्या मागच्या पायात काटा मोडला आहे. तो तु प्रथम काढ म्हणजे नंतर तुला खाताना त्रास होणार नाही त्याप्रमाणे लांडगा त्याच्या मागच्या पायात काटा शोधू लागला तेंव्हा गाढवाने त्याला एक जोरात लाथ मारली त्याने लांडग्याचे सर्व दात पडून गेले.लांडगा मनात म्हणाला, मला बापाने खाटकाचा धंदा शिकवला होता हा वैद्यकाचा धंदा करायला गेलो ती चांगली अद्दल घडली"
या उक्तीप्रमाणे साहेब माझा वैद्यकाचा धंदा चालतो आहे तो सोडून हा सटोडियाचा धंदा करणे नाही. आधी प्रपंच करावा नेटका

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 12:16 pm | ज्ञानव

जरा चर्चा रंगली असती तर मझा आला असता की...
आणि सटोडीयाचा धंदा तर मीही करत नाही.
बाकी गाढव-लांडगा काही समजले नाही... कारण तसा मी "निराकार गाढव" आहे हो फार लाथा बिथा झाडणे झेपत नाही.

सुबोध खरे's picture

26 Dec 2013 - 12:45 pm | सुबोध खरे

माझ्या म्हणण्याचा साधा सरळ अर्थ असा आहे की आपण ज्या विषयात शिक्षण घेतले आहे आणी ज्यावर आपला चरितार्थ अवलंबून आहे त्यात पूर्ण लक्ष घालून काम करावे आपल्याकडे खर्च करून उरलेला पैसा असेल तो सुरक्षित गुंतवणुकीत टाकावा आणी त्यातूनही जर अधिक पैसा असेल तर ट्रेड वगैरे मध्ये गुंतवावा. कारण पी पी एफ सारख्या गुंतवणुकीत व्याज फार जास्त मिळाले नाही तरी कर वाचतो आणी मु़ख्य म्हणजे भांडवल पूर्ण सुरक्षित असते. जर आज सोने ३०००० रुपये भावाने घेतले आणी उद्या ते २८००० झाले तर नुसते व्याजच नव्हे तर २००० रुपये मुद्दलातच खोट येऊ शकते. त्यातून ते जर १२ टक्के व्याजाने घेतले असतील तर व्याजही बोडक्यावर बसते. दिवसभर मान मोडून नोकरी किंवा धंदा केल्यावर मुद्दलात खोट आलेली किती मराठी लोकांना झेपेल. म्हणून मी म्हणतो कि कमीत कमी पाच वर्षे या क्षेत्रात प्रत्यक्ष काम केल्यावर ट्रेड वगैरे च्या नादास लागावे.
चार बुके वाचून जसे आयुर्वेदाचार्य किंवा वैद्यक विशारद होता येत नाही तसेच ट्रेडर सुद्धा होता येत नाही. (जसे लोक कोणालाही वैद्यकीय सल्ला फुकट देतात. त्यातून आयुर्वेदाचा सल्ला तर काहीही साईड इफेक्ट नाही म्हणून जास्तच तसेच टीप्स घेऊन कोणी श्रीमंत झालेला नाही. (बुडालेले मात्र भरपूर दिसतात)

सुबोध खरे's picture

26 Dec 2013 - 12:45 pm | सुबोध खरे

माझ्या म्हणण्याचा साधा सरळ अर्थ असा आहे की आपण ज्या विषयात शिक्षण घेतले आहे आणी ज्यावर आपला चरितार्थ अवलंबून आहे त्यात पूर्ण लक्ष घालून काम करावे आपल्याकडे खर्च करून उरलेला पैसा असेल तो सुरक्षित गुंतवणुकीत टाकावा आणी त्यातूनही जर अधिक पैसा असेल तर ट्रेड वगैरे मध्ये गुंतवावा. कारण पी पी एफ सारख्या गुंतवणुकीत व्याज फार जास्त मिळाले नाही तरी कर वाचतो आणी मु़ख्य म्हणजे भांडवल पूर्ण सुरक्षित असते. जर आज सोने ३०००० रुपये भावाने घेतले आणी उद्या ते २८००० झाले तर नुसते व्याजच नव्हे तर २००० रुपये मुद्दलातच खोट येऊ शकते. त्यातून ते जर १२ टक्के व्याजाने घेतले असतील तर व्याजही बोडक्यावर बसते. दिवसभर मान मोडून नोकरी किंवा धंदा केल्यावर मुद्दलात खोट आलेली किती मराठी लोकांना झेपेल. म्हणून मी म्हणतो कि कमीत कमी पाच वर्षे या क्षेत्रात प्रत्यक्ष काम केल्यावर ट्रेड वगैरे च्या नादास लागावे.
चार बुके वाचून जसे आयुर्वेदाचार्य किंवा वैद्यक विशारद होता येत नाही तसेच ट्रेडर सुद्धा होता येत नाही. (जसे लोक कोणालाही वैद्यकीय सल्ला फुकट देतात. त्यातून आयुर्वेदाचा सल्ला तर काहीही साईड इफेक्ट नाही म्हणून जास्तच तसेच टीप्स घेऊन कोणी श्रीमंत झालेला नाही. (बुडालेले मात्र भरपूर दिसतात)

या उक्तीप्रमाणे साहेब माझा वैद्यकाचा धंदा चालतो आहे तो सोडून हा सटोडियाचा धंदा करणे नाही. आधी प्रपंच करावा नेटका +१

प्रसाद१९७१'s picture

26 Dec 2013 - 12:06 pm | प्रसाद१९७१

१०० टक्के सहमत

बफे साहेबांच्या मते - महागाई शी लढण्यासाठी तुमच्या कडे Employable Skills असणे हा एकमेव उपाय आहे.

प्रसाद भागवत's picture

26 Dec 2013 - 1:43 pm | प्रसाद भागवत

(१) सोन्याचा भाव जो आज ३२००० आहे तो रुपये १,००,०००/- होईल --- होईलही, पण तो २५००० ही होण्याची शक्यताही आहेच ना ?? तेंव्हा असे अंदाज बांधण्याला तितकासा अर्थ नाही.

(२)आपण दिलेल्या खरेदी - गहाण- खरेदी या चक्राकार पद्ध्तीतुन ( ज्याला पिरॅमिड स्टोक थिअरी असेही म्हणतात) आपल्याला फायदा झाला याबद्दल आपले अभिनंदन. पण एक स्टेटर्जी म्हणुन वारंवार असे करणे हे घातक आहे. अशाच मार्जिन ट्रेंडिंग च्या अशाच अतिवापराने बाजारांत यापुर्वी भयावह पडझडी झाल्या आहेत भाव न वाढता अचानक कोसळ्ल्यास उदा . आपल्याच उदाहरणांप्रमाणे सोन्याचा भाव 8400 वरुन 7200 झाला असता तर आपली उपाययोजना काय असती ?? उपाशी बोका म्हणतात त्या प्रमाणे हे म्हणजे स्टॉकचे मार्जिन अकाऊंट उघडण्यासारखे झाले. आणि हे कमालीचे धोकादायक आहे हे नक्की.

या बाबत प्रसाद१९७१ ( नामसाधर्म्या शिवाय दुसरी ओळख नाही) यांचा विचार अधिक तर्क्शुधद्ध वाटतो.

( ३) सुरक्षीतता व व परतावा ह्या संकल्पना अनेकदा सापेक्ष ठरतात. तुलनाच करावयाची तर पी पी एफ् ही अधिक दीर्घकाळ अडकुन रहाणारी गुंतवणुक आहे. आणि जरी तिच्यातील व्याजदाराचे बदल ही अधिक संथपणे होतात तरी एकुणातच येथुन पुढे कोणालाही, अगदी सरकारलाही, व्याजदर कृत्रिमपणाने कमी वा जास्त ठेवणे शक्य नाही. (अशाच एका खात्रीच्या आणि 'सरकारी' असे बिरुद मिरवलेल्या युनिट ट्रस्ट चे अशाच कृत्रिमपणाने किंमती ठरविल्याने शेवटी काय झाले याची आठ्वण आल्याशिवाय रहात नाही) त्यामुळे मुद्दल बुडण्याची शक्यता नाही हे खरे असले तरी व्याजदराबद्दलचे अंदाज ( होय, अंदाजच) चुकु शकतात.
असा व्याजदर हा एकतर्फी ठरवला जातो आणि तो खात्यात असलेल्या सर्व रकमेवर लागु होतो.

करपात्रता हाही एक 'आज आहे पण उद्या ---? ' या पठडीतला्च मुद्दा आहे. E-E-E म्हणजे गुंतवणुकीच्या वेळॅॲ करसवलत देणारी - गुंतवणुकी दरम्यान करमुक्त उत्पन्न देणारी आणि शेवटी रोखतेच्या वेळीही करमुक्त असेल अशा गुंतवणुक पर्याय रद्द करण्याचा प्रस्ताव याआधीच अर्थखात्याच्या विचाराधीन आहे.

गंमतीचा भाग म्हणजे असे कोणतेही बदल जे गुंतवणुकीचा मुळ हेतु नष्ट करणारे असले तरी ते ' हम करे सो कायदा--' या तत्वाने घेतले जातात व त्याविरुद्ध गुंतवणुकदाराला बाहेर पडण्याचा वा ते नाकारण्याचा कोणताही हक्क नसतो.

तेंव्हा इस्पीकचा एक्का यांचे विचेचन चुकीचे नव्हे पण या धाग्या संदर्भात थोडेसे गैरलागु आहे.

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 2:38 pm | ज्ञानव

पण एक ट्रेडिंग पद्धत म्हणजे ती अंधानुकरण करून अवलंबायला लागा असे मी म्हंटलेच नाहीये. सोन्याच्या गुंतवणुकीचे दिवस किंवा ट्रेडिंगचे दिवस येतील तेव्हा त्यात सुरुवात करा कि.त्याआधी समजून घ्या .

आणि पी पी एफ चे व्याजदर जे मिळवून देईल त्याचे हि गणित इथे कुणीतरी मांडा.

१)३२००/ प्रती १० ग्राम मधून ३०% कर वजावट कशी होते ते हि कुणीतरी सांगा.
२)८००० रुपये १५८००० कसे झाले तेही सविस्तर लिहा.(मी तत्काळ १०० रुपये दर वर्षी मिळवून हिशोब प्रतिसादात दिलाय )त्यावर कुणाचे काहीच भाष्य नाही.

आणि हे

पी पी एफ मधील गुंतवणूक सहा वर्षानंतर काढून घेता येते आणि तीच रक्कम परत गुंतवणूक केल्यास त्यावर परत ३० % कर वाचतो. म्हणजेच अधिक ३०% नक्त नफा. असे आपण साहव्या वर्षानंतर करू शकता. (ती शक्यता अजिबात धरलेली नाही तरीही)

हि तर निव्वळ दिशाभूल आहे किंवा अभ्यास न करता केलेलं विधान आहे कारण गुंतवलेल्या किंवा जमा रकमेपैकी २५% पाच वर्षांनी (आणि तेही योग्य कारण देऊनच.) काढता येतात अन्यथा १५ वर्ष पैसे काढता येत नाहीतच.

म्हणजे माझे वडील किंवा आई हॉस्पिटल मध्ये मरणपंथाला असताना मला पी पी एफ किती कामाला येईल? शून्य टक्के कारण प्रोसिजर होऊन हातात पैसे येई पर्यंत मी आई वडिलांना होल्ड वर राहा सांगू का? सोने मला २ तासात पैसे हातात देते.

आणि सगळ्यात गंमतीशीर वल्गना म्हणजे

तीच रक्कम परत गुंतवणूक केल्यास त्यावर परत ३० % कर वाचतो.

कसा हो वाचतो जरा मलाही समजावा.(म्हणजे आयकर कलम कोणते ?)कारण कर बचती साठीची गुंतवणूक हि त्या वर्षाच्या इन्कम मधूनच व्हायला हवी असा नियम आहे. पण कर वाचवणारे त्याला बे कायदेशीर फाटे फोडून येन केन प्रकारे आपला कर वाचावतीलच.
(आणि एका वेळी पैसे काढून घेऊन लगेच त्याच वर्षात पुन्हा पी पी एफ ला तिथेच भरणे हा प्रकार हि मला कळत नाही. च्यायला....लोक कर वाचण्यासाठी काय काय करतात राव!)

आणि एकूण कर भरण्यापेक्षा कर न भरण्याकडेच सगळ्यांचा भर आहे. हे तर दुर्दैव आहे. मी काही देणार नाही आणि सरकारने मात्र गुंतवणूक दाराला विश्वासात घ्यायलाच पाहिजे. पुन्हा विसंगती.
कर माफी हा उद्देश अंमळ जास्तच आहे लोकांत मी म्हणतो घ्या कर पण द्या भरपूर.

म्हणजे पी पी एफ चा मूळ उद्देशच तुम्ही लक्षात घेत नाही आहात किंवा जाणून बुजून त्यावर काही बोलत नाही आहात.

प्रसाद भागवत's picture

26 Dec 2013 - 3:22 pm | प्रसाद भागवत

अहो ज्ञानव सर, "कसा हो वाचतो जरा मलाही समजावा.(म्हणजे आयकर कलम कोणते ?)कारण कर बचती साठीची गुंतवणूक हि त्या वर्षाच्या इन्कम मधूनच व्हायला हवी असा नियम आहे.---" हेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. कारण PPF मधली काढ्लेली रक्कम ही करपात्र उत्पनाचाच भाग बनते, भलेही ती व्याज असो की मुद्दल. आणि जर ती व्याज असेल तरीही ती करमुक्त आहे. त्यामुळे ती उत्पन्नांत मिळवुनही कराची देय रक्कम वाढ्णार नाही.. आता यात बेकायदेशीर फाटे वगैरेचा संबंध काय??

कर वचविण्याचा प्रयत्न करणे ही एक चांगली बाब आहे, कर चुकवु नय हे खरे पण सनद्शीर मार्गाने वाचविण्यात गैर काय ?? शेवटी a penny saved is penny earned नाही का ??

आपण कर बचत, कर चुकवेगिरी आणि कर माफी याची गल्लत करताय असे नाही वाटत ??

बाकी PPF मध्ये पैसे अडकुन पडतात हे खरे, याबाबत आपण सांगितलेला तपशील बरोबर आहे.

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 4:02 pm | ज्ञानव

वाचवण्यासाठी पीपीएफमधून जमा रकमेच्या २५% रक्कम काढून कर वाचवून पुन्हा पीपीएफलाच भरायचे?
तुम्ही सीए आहात का ?

कारण PPF मधली काढ्लेली रक्कम ही करपात्र उत्पनाचाच भाग बनते, भलेही ती व्याज असो की मुद्दल. आणि जर ती व्याज असेल तरीही ती करमुक्त आहे.

इथे वीड्रा रक्कम हि मुद्दल आणि व्याज मिळून आहे हे तुम्ही मान्य करताच आहात पण त्यातले मुद्दल हे इंकम नाही पण ते सर्रास इंकम म्हणून दाखवण्याची प्रथा आहे ते बेकायदेशीर आहे.कारण हे मुद्दल तुम्ही गेली ५ वर्षे पी पी एफ्ला भरता आहात ते आज ह्या वर्षी एकदम इंकम म्हणून कसे दाखवता कारण पी पी एफ मध्ये तुम्ही दर वर्षी आधीच ते इन्कम च्या रुपात दाखवून झालेले असते आणि कर वाजवट हि घेतलेली आहे. आणि तरीही तुम्ही पुन्हा कर वजावट जर मागाल तर ते विसंगत किंवा बेकायदेशीर होते. असो किचकट आहे थोडे. जर एखाद्या इन्कमच्या बाबतीत डबल कर लावता येत नाही तर डबल कर वजावट एकाच रकमेवर कशी चालेल? पण इथे अनेक पळवाटा आहेत साहेब त्या वापरल्यात तर मी चूक आणि तुम्ही सनदशीर..

१) मुद्दल मुळात इन्कम होईलच कशी?
२) व्याज (अगदी करमुक्त) हे जरी इंकम आहे तरी ते कितीसे असणार आणि त्याने किती फरक पडणार?
३) तसेच एकदा मुद्दल काढून झाल्यावर पी पी एफ च्या १५ वर्षांच्या कामगिरीवर होणारा परिणाम तुम्ही लक्षात घेतला का ?

सगळ्यात महत्वाचे काढलेली रक्कम हि व्याजात ना धरता मुद्दल म्हणून धरले जाईल त्यामुळे ते त्या वर्षाचे इंकम कसे होईल ? पण हा मुद्दया बाबत मी थोडा साशंक आहे कारण इथे बँकिंग इंव्होल्व होते म्हणून.

वरील मुद्दा दोनला अनुसरून जर मी दरवर्षी फक्त १०० रुपये गुंतवले तर ५ वर्षांनी मला १२५ रुपये काढण्याची मुभा आहे समजा त्यात व्याज हि मला मिळाले तर ते किती असेल किंवा डॉक्टर खरे ह्यांनी रुपये ५६०० जर १९८८ साली गुंतवले असते तर त्यांना ५ वर्षांनी फक्त १०५७ रुपये व्याजपोटी जमा होऊन त्यातील २५% त्यांना परत मिळाले असते. म्हणजे २५० रुपये करमुक्त इंकम त्या वर्षासाठी होईल उफ्फ्फ्स त्यासाठी इतकी मेहनत?

पी पी एफ मधील गुंतवणूक सहा वर्षानंतर काढून घेता येते आणि तीच रक्कम परत गुंतवणूक केल्यास त्यावर परत ३० % कर वाचतो . म्हणजेच अधिक ३०% नक्त नफा.

जर तुम्ही सी ए असाल तर ३०% नक्त नफा कसा ते हि मला सांगा. आणि इतरत्र मी जे मुद्दे मांडलेत त्याचे हि विवेचन द्या हि विनंती.

आणि ज्ञानव सर??....नको नको प्लीज.

प्रसाद भागवत's picture

26 Dec 2013 - 5:39 pm | प्रसाद भागवत

श्रीमान ज्ञानवजी,

आपण आपल्या आधीच्या पोस्ट्मध्ये काही विधानांबाबत ( माझ्या नव्हे) " हि तर निव्वळ दिशाभूल आहे किंवा अभ्यास न करता केलेलं विधान आहे" अशी आक्रमक भाषा वापरता, वस्तुस्थितीची संभावना 'गंमतीशीर वल्गना ' अशी करता आणि वर बिनादिक्कत 'कसा हो वाचतो जरा मलाही समजावा.(म्हणजे आयकर कलम कोणते ?) असा 'अहं ब्रह्मास्मि' थाटाचा प्रश्न विचारता------ मी यावर फक्त खुलासा केला आहे. .

तर सांगावयाचे हे की, कायद्याने असे करता येते. आणि कायद्याचा अर्थ लावायला कोणी C.A असायलाच हवे असे नाही. आपण करसवलत मिळण्यासाठीच्या गुंतवणुकीसाठी असलेले कलम 80C मुळांतुन वाचावे अशी आपणास नम्र विनंती आहे.. करसवलत मिळविण्यासाठी करावयाची गुंतवणुक करदात्याने त्याच्या करपात्र उत्पन्नंतुन करावी एवढीच आयकर खात्याची अपेक्षा आहे. ' ती त्या वर्षाच्या इन्कम मधूनच व्हायला हवी असा नियम आहे' हा तुम्ही लावलेला अर्थ आहे ज्याला आधार नाही.

माझे म्हणणॅ एवढेच आहे की एखाद्याने पी पी एफ मध्ये पैसे भरल्यास त्या पैशांवर त्याला कर वजावट मिळेल. ते पैसे त्याने कोठुन आणले, त्याच्या त्याच PPF खात्यातुन काढुन, की अन्य एखाद्या खात्यातुन ह्याचा विचार कोणी करण्याचा प्रश्न येतच नाही. सबब पीपीएफमधून जमा रकमेच्या २५% रक्कम काढून कर वाचवून पुन्हा पीपीएफलाच भरणे ह्यात अयोग्य अनैतिक असे काहीही नाही. रहिला प्रश्न तो अशा काढलेल्या रकमेचा आपल्या रिटर्न मधे दाखवायचा, त्यावर खुलासा हा की ते मुद्दल असल्यास प्रश्नच नाही, व्याज असल्यासही ते करमुक्त असल्याने उन्पन्न वाढ्ले तरी कर वाढ्णार नाही. असे असताना कोणी मुद्दल/ इन्कम याचा गोंधळ करावाच का ?? आणि करीत असेल तर त्याचा विचार आपण का करावा ?? बाकी आपली डबल कर वजावट वगैरे शंका अगम्य आहे.

आपण एक व्यावसायिक अर्थसल्लागार आहात, अशा वेळी आपल्या विधानांचे महत्व अनेकपटीने वाढते. आपण पैसा मिळविण्यासाठीच तर हा सारा उद्योग करतोय, अशावेळी कर बचत, कर नियोजन या सारख्या महत्वाच्या पैलुंवरही आपण मार्गद्रशन करावयास हवे, मात्र आपली त्या विषयाचा अभ्यास आणि भुमिका अनाकलनीय आहे.

आपण एखाद्या विषिष्ट कालावधीत यशस्वी झालेली गोष्ट 'सिस्टीम' म्हणुन अवलंबण्यापेक्षा( आणि तो 'फॉर्मुला' चालत नाहीशी विपरित परिस्थिती उद्भवली की मी 'थांबलोच' होतो अशी लंगडी कारणमिमांसा देण्यापेक्षा) अधिक व्यापक विचार करुन आमच्या सारख्या सामन्यांचा फायदा करुन द्यावा असे वाटते. "-----आर्थिक उत्पन्न हे नेहमी विक्रीतून येते मग ती बुद्धीची विक्री असो, सेवेची विक्री असो कि एखाद्या वस्तूची विक्री असो त्या विक्रीतून आणि फक्त विक्रीतूनच झालेला नफा हा करपात्र असतो. -----जगभरातल्या खाणीतून होणारे सोन्याचे उत्पादन आणि जगभरातली मागणी लक्षात घेता सोन्याचा भाव खाली जाईल का हे सांगयला श्री ब्रह्मदेव ह्यांना त्रास द्यायची गरज नाही. -----सोन्याचा भाव जो आज ३२००० आहे तो रुपये १,००,०००/- होईल" अशी अर्थहीन विधाने आपल्यासारख्या अनेक वर्षे बाजारात धालवलेल्या धुरिणाने करावीत हे एक आश्चर्यच आहे. खरे म्हणजे लिहायला संकोच वाटतो पण आपले या धाग्यामधले बहुतेक पोस्ट हे तार्किकतेच्या कसोटीवर टिकणारे नाहीत

आपण 06 वर्षांच्या मुदती संदर्भात बरोबर बोलला आहात असे मी आधीच म्हणालो आहे पण तरीही एकुणांत मुळ मुद्याला बगल देवुन, कल्पनांची गल्ल्त करुन वा मध्येच अत्यंत गैरलागु प्रश्न विचारुन आपण एका आर्थिक विषयावरील चर्चा दिशाहीन करीत आहात असे माझे मत आहे.

क्षमस्व.

सुबोध खरे's picture

26 Dec 2013 - 6:54 pm | सुबोध खरे

साहेब,
मी CA नाही किंवा कायदे तज्ञ हि नाही एक सामान्य माणूस आहे. परंतु "प्रामाणिकपणे" माझा कर भरतो. मी केलेले कोणतेही विधान बेकायदेशीर कसे ते आपण मला समजावून द्याल तर बरे होईल. पी पी एफ बद्दल काही माहिती मी वाचली आहे तिचे दुवे खाली देत आहे. ते आपण मुळापासून वाचावे आणी माझेही शंका निरसन करावे
http://profit.ndtv.com/news/cheat-sheet/article-seven-must-know-facts-ab...
http://www.personalfn.com/knowledge-center/fixed-income/fip-tutorials/12...
जर आपण दर वर्षी ८००० रुपये सोन्या ऐवजी PPF मध्ये टाकलेत तर पाचव्या वर्षानंतर आपण त्यातून ८००० रुपये काढू शकता. आणी हेच पैसे बँकेत भरून दुसरे ८००० दुसर्या दिवशी दिवशी आपण परत PPF मध्ये भरल्यास त्यावर्षीच्या करपात्र उत्पन्नातून आपले ८००० रुपये वजा होतील म्हणजे त्यावर लागलेला २४०० रुपये कर (आयकर कलम ८० क ) आपला कमी होईल आता यात बेकायदेशीर काय आहे ते आपण सांगाल काय ?

""आणि एकूण कर भरण्यापेक्षा कर न भरण्याकडेच सगळ्यांचा भर आहे. हे तर दुर्दैव आहे. मी काही देणार नाही आणि सरकारने मात्र गुंतवणूक दाराला विश्वासात घ्यायलाच पाहिजे. पुन्हा विसंगती.
कर माफी हा उद्देश अंमळ जास्तच आहे लोकांत मी म्हणतो घ्या कर पण द्या भरपूर.
""
हा निष्कर्ष आपण कशावरून काढलात ते कळेल काय?
""कारण हे मुद्दल तुम्ही गेली ५ वर्षे पी पी एफ्ला भरता आहात ते आज ह्या वर्षी एकदम इंकम म्हणून कसे दाखवता कारण पी पी एफ मध्ये तुम्ही दर वर्षी आधीच ते इन्कम च्या रुपात दाखवून झालेले असते आणि कर वाजवट हि घेतलेली आहे. आणि तरीही तुम्ही पुन्हा कर वजावट जर मागाल तर ते विसंगत किंवा बेकायदेशीर होते. असो किचकट आहे थोडे.""
कदाचित आपल्या विधानातील विसंगती दाखविल्याने आपल्याला राग आला असेल किंवापण पाच वर्षे ज्यात यशस्वी रित्या पैसे कमावले ती स्कीम पुढे तशीच चालणार नाही हे दाखविल्याने आपल्याला राग आला असेल परतू लोकांच्या प्रामाणिकपणा वर असे सरसकट विधान करणे बरोबर नाही असे मला वाटते. बाकी आपले मत आपल्यापाशी
अवांतर:-- आपल्याला कोणतीही गोष्ट तारण ठेवून बँकेकडून कर्ज घेताना त्याचे कारण लिहून द्यावे लागते आणी सोने तारण ठेवून कर्ज परत सोने विकत घेण्यासाठी आपल्याला आपली बँक कर्ज देत असेलही पण ते बँकेच्या नियमात बसत नाही असे वाटते.( माझ्या भावाने बर्याच वेळेस धंद्यासाठी सोने तारण ठेवून अल्प मुदतीसाठी कर्ज उचललेले आहे.)
असो आपले मत आपल्याजवळ.
मला फक्त एवढेच म्हणायचे होते कि आपली स्कीम सर्वसामान्य माणसासाठी सुलभ आणी "सर्व काळ" चालेल असे वाटत नाही.
बाकी लोक सुज्ञ आहेतच.

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 7:42 pm | ज्ञानव

जर आपण दर वर्षी ८००० रुपये सोन्या ऐवजी PPF मध्ये टाकलेत तर पाचव्या वर्षानंतर आपण त्यातून ८००० रुपये काढू शकता. आणी हेच पैसे बँकेत भरून दुसरे ८००० दुसर्या दिवशी दिवशी आपण परत PPF मध्ये भरल्यास त्यावर्षीच्या करपात्र उत्पन्नातून आपले ८००० रुपये वजा होतील म्हणजे त्यावर लागलेला २४०० रुपये कर (आयकर कलम ८० क ) आपला कमी होईल आता यात बेकायदेशीर काय आहे ते आपण सांगाल काय ?

एक शंका आहे साहेब...

१)तुम्ही पीपीएफमधून पैसे काढा आणि परत पीपीएफला लगेच ट्रान्स्फर करा अशी बँकेला विनंती करू शकता का ?

जर करू शकता तर माझी चूक मला मान्य आहे आणि जर नाही करू शकत तर का?
बँक ते डायरेक्ट तुमच्या सांगण्या नुसार का ट्रान्स्फर देत नाही ते कळायला हवे.

पण जर मी ते पी पी एफ मधून काढून घेतलेली रक्कम भरली नाही मी दुसरे पैसे आणून भरले असे सांगाल तर दोन प्रश्न येतात

१)जर दुसरे पैसेच भरायचे होते तर पी पी एफ मधून काढून का घेतले ?
२)आणि जर तेच पैसे पी पी एफ मधून काढून मी इथे भरले आहेत हे विवरण पत्रात कसे दाखवले ? म्हणजे कोणत्या हेड खाली. कारण बँक एन्ट्री दाखवतेय कि हे पैसे पी पी एफ मधून काढले आहेत ती कशी लपवणार?

आणि कुठल्याच गोष्टीचा राग येण्याचे कारण नाही कारण हा माझा अभ्यास आहे मी काही सर्वज्ञ नाही हे एक कारण आणि माझी सिस्टीम मला लखलाभ हे समजतेच आहे मला.

हि शंका दूर करा बाकीचे ठळक मुद्देही समजून घेतो..

सुबोध खरे's picture

26 Dec 2013 - 8:12 pm | सुबोध खरे

साहेब
बँकेत आपल्याच खात्यातून त्याच खात्यात पैसे "ट्रान्स्फर" करता येत नाहीत.
बँक एन्ट्री दाखवणारच त्यात लपवण्यासारखे काय आहे? तुम्हाला ppf मधून पैसे काढायचे आहेत तर काढा. ते पण एक खातेच आहे. त्यातून आज पैसे काढले आणी उद्या टाकले तर चालते मग तुम्ही त्याच नोटा किंवा दुसर्या टाका.
तुमच्या PPF खात्यात एक पैसे काढल्याची नोंद येईल आणी दुसरी पैसे भरल्याची. त्या खात्याचे पासबुकची प्रत आपण आपल्या आयकर विवरण पत्राला जोडा. त्यात गैर किंवा बेकायदेशीर काहीच नाही.

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 8:26 pm | ज्ञानव

जरा विस्तृत सांगा. जर मी दर वर्षी १ लाख रुपये भरले असे मी ७ वर्ष भरले आठव्या वर्षी मी त्यातून १ लाख रुपये काढले आणि तुम्ही सांगता त्याप्रमाणे (त्याच नोटा बर का )दुसर्या दिवशी भरले आणि

समजा हि केस स्क्रुटिनीला आली तर पी पी एफ च्या गुंतवणुकीचा सोर्स ऑफ इन्कम काय सांगणार?

सुबोध खरे's picture

26 Dec 2013 - 8:52 pm | सुबोध खरे

तुम्ही सात वर्षे कुठून गुंतवले ते तुम्हाला सांगायला लागेल पण आठव्या वर्षी सरळ लिहिता येईल कि PPF मधून काढले आणी परत गुंतवले. त्यात अनैतिक काय आहे ?

पण आठव्या वर्षी सरळ लिहिता येईल कि PPF मधून काढले आणी परत गुंतवले.

हि केस तुम्ही सी ए ला किंवा तुमच्या ओळखीत एखादे आयकर आयुक्त, आयकर निरीक्षक असतील तर त्यांच्याकडे कन्फर्म करा.
( फक्त पी पी एफ मधून काढून परत पी पी एफ लाच पैसे भरले असता ते करपात्र नाहीत असे तुम्ही लेखी देऊ शकता का आणि त्या वाजवटीचा फायदा मीळू शकतो का? )

कारण मी स्क्रूटिनीज अटेंड करतो माझी प्रक्टीस आहे ती. एक क्षण विचार करा कि मी जे सांगतोय तर काही तरी त्यात तथ्य असेलच.

जर उपाशी बोका म्हणतात त्याप्रमाणे मिन्ग्लिंग ऑफ फंड्स असेल तर केस वेगळी होते आणि ते अलाऊ होऊ शकते.

पण सरळ लिहिता येईल कि पी पी एफ मधून काढले आणि भरले तर ते डीसअलाव होऊन add back होऊन कर भरावा लागेलच.
तुम्ही सिरीयसली घ्यावे हि विनंती आहे. ह्या केसचे टेक्निकल मुद्दे प्रतिसादातून किंवा मुळ धाग्यातून मांडणे केवळ अशक्य आहे कारण income tax act हा एक मोठा आवाका असलेला कायदा आहे.

सुबोध खरे's picture

27 Dec 2013 - 8:01 pm | सुबोध खरे

साहेब,
मी काही अर्थ क्षेत्रातील नाही,किंवा मला कोणतेही अर्थविषयक शिक्षण मिळालेले नाही. तेंव्हा तुमचे म्हणणे मान्य केले कि तेच पैसे भरता येत नाहीत. ठीक आहे ते पैसे घरी वापरा आणि दुसरे पैसे (पगारातील किंवा दुसर्या उत्पन्नातील) PPF मध्ये गुंतवा. त्या दुसर्या पैशाच्या गुंतवणुकीवर कर वाचेलच ना ? म्हणजे माझा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल कि तसे पैसे फिरवून आपल्याला कर वाचवता येतो कि आणि त्यात कोणतीही लबाडी नाही. (आपण म्हणता तसे सरकार डीस अल्लाऊ करणार असेल तर). शब्दच्छल करण्यात काय हशील आहे?
मूळ मुद्दा सोन्यात गुंतवण्यात असलेल्या धोका आणि सुरक्षित गुंतवणूक ज्यात भांडवल सुरक्षा आहे यातील फरक हा आहे. गेली पाचवर्षे आपली स्कीम चालली कारण सोन्याचे भाव चढत होते. आता ते उतरणार असतील तर आपली गुंतवणूक आतबट्ट्याची ठरेल. मला एवढेच म्हणायचे होते.
I AM RATHER A PRAGMATIST THAN PURIST

पण आठव्या वर्षी सरळ लिहिता येईल कि PPF मधून काढले आणी परत गुंतवले.

हा तुमचा इंनोसंस पाहूनच मी तुम्हाला आयकर विषयक कायदा सांगण्याचा प्रयत्न केला.

सोन्याची गुंतवणूक आणि ट्रेड हा विषय तुमच्यासाठी नवीन आहे आणि मी त्यात तितकाच माहीर आहे जितके तुम्ही तुमच्या व्यवसायात. आयकर विक्रीकर सेवाकर एक्साईज सेबी बँकिंग हे आमचे अविभाज्य घटक असल्याने त्याचा संबंध माझ्याशी रोजचा आहे.
आगदी आजच ९ वर्षापूर्वी आयपीओला पैसे भरूनहि कंपनीने रिफंड दिला नाही म्हणून एक केस होती त्याचा रिफंड त्यांना मिळाल्याचा फोन मला सदर क्लायंटने केला होता. त्यांचे कुठेच काम झाले नाही त्यामुळे माझ्याकडे आल्या होत्या हे सांगण्यामागचा उद्देश हा कि कायदा बरेचजण ऐकून असतात त्याचे इंटप्रीटेशन फार कमी लोक जाणतात मग काम होणार नाही हा सल्ला देण्याची हि फी घेतात. तसे होऊ नये म्हणून.
मला वैद्यकीय क्षेत्रातील काही कळत नाही त्यामुळे तो सल्ला त्या प्रांतातल्या व्यक्तीकडूनच ग्राह्य मानतो मी.

पण पी पी एफ मधून काढून कर भरताना जर मी ते आयकर विभागाला तसे सांगितले तर ते डीसअलौ होईलच ह्यात दुमत होऊच शकत नाही आणि ते जर मी केले परंतु आयकर विभागला सांगितले नाही म्हणजे पीपीएफचे पैसेच पण दुसर्या सोर्स मधून दाखवून कर वजावट घेतली तर ते अनैतिकच आहे हे माझे वैयक्तिक मत झाले.

सुबोध खरे's picture

27 Dec 2013 - 11:28 pm | सुबोध खरे

मूळ मुद्द्याला फाटा फोडून शेवटी जितं मया असे तुम्हाला म्हणायचे असेल तर मला काही म्हणायचे नाही. पण तुमचा ट्रेड PPF सारख्या सुरक्षित स्किंपेक्षा चांगला आहे हे तुम्ही पटवूनहि देऊ शकत नाही.म्हणून मग तुम्ही त्या पुनर्गुंतवणुकीचा मुद्दा घेऊन त्यावर शब्दाचा डोंगर रचलाआणी मूळ मुद्द्याला फाटा फोडला.
एखाद्याने आपल्या PPF मधून पैसे काढले कुठेही वापरले आणि नंतर दुसर्या खात्यातून आपली वर्षाची CONTRIBUTION भरली तर त्याला तुम्ही अनै तिक ठरवून मोकळे होता आणि मी जेंव्हा विचारले कि सोने गहाण ठेवून कोणते कारण देऊन कर्ज घेता तेंव्हा मात्र बँकेचा नियम माहित नाही असे सांगून मोकळे होता ते मात्र अनैतिक नाही?
असो हि माझी शेवटची पोस्ट कारण तुम्ही मोठ्या शब्दांचा डोंगर रचलात तसा मी न रचता सरळ हि गोष्ट सर्वसामान्य माणसाला झेपणारी नाही असे म्हटले आहे. त्यात मी या क्षेत्रात माहीर आहे असे मला काहीही म्हणायचे नाही. एवढेच ट्रेड करताना बुडालेले असंख्य लोक आपल्याला दिसतात.पण सरकारी स्कीम मध्ये पैसे गुंतवून बुडालेले लोक दिसत नाहीत.
DISCLAIMAR --माझा स्वतःचे PPF खाते नाही कि मी PPF चा एजंट हि नाही

ज्ञानव's picture

28 Dec 2013 - 10:20 am | ज्ञानव

माझा स्वतःचे PPF खाते नाही कि मी PPF चा एजंट हि नाही

हे तुम्ही न सांगताच मी जाणून आहे.

सोन्याच्या गुंतवणुकीबाबत, ट्रेडबाबत बँकेचे कर्जबाबत आणि पीपीएफबाबतहि तुम्ही काही जाणत नाही आहात म्हणूनच तुम्हाला सगळे फक्त "शब्दच" वाटणे साहजिक आहे त्याचे अर्थ कळणे जरा कठीणच आहे.
कारण INCOME TAX हा जर "समजला" नाही तर ते नुसतेच "शब्द" असतात मग लोक आम्हाला ८० सी वाचण्याचे सल्ले देतात.खात्यातातून ट्रान्स्फर कशी होते ते शिकवतात.असो चालायचेच.
मी इथे हार जीत म्हणून किंवा तुम्हाला चार चौघात खोटे पडावे म्हणून काहीच लिहित नव्हतो पण " जितं मया" ह्या शब्दाने निराशा केली. त्यामुळे तुम्ही जिंकण्यासाठी स्वतःची बाजू मांडताय हे आणि तेही सर्व विषयाचे प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला नसताना हेहि कळाले. हे वेदनादायी आहे.मनापासून आवडले नाही.
कारण गैरसमाजातून तुमचे(म्हणजे डॉक्टर सुबोध खरे ह्यांचे नाही सर्वांचे) नुकसान होऊ शकते म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी सावधच करण्याचा आगाऊपणा करत आलोय (तुमचे बँकेच्या बाबतीतले मत ,100000 चा विमा सौरक्षण जर आठवत असेलत तर त्या संदर्भात).

माझ्या क्षेत्रात मी माहीर असल्याचा सार्थ गर्व आहे मला, तिथे मला कुणीही हलवू शकत नाहीच.पण ह्या मी पणामुळे मी अंध झालेलो नाही पूर्ण जमिनीवर आहे आणि काहीतरी दिशा घेऊन काम करतो आहे. म्हणजेच अर्थ क्षेत्रात माहीर असतानाही लोकांना इंजिनिअर कसे व्हावे हे शिकवत नाही किंवा एखाद्याच्या इंजीनिआरीन्ग मधल्या चुका दाखवत नाही कारण तो माझा प्रान्तच नाही.

ब्राम्हण असल्याने विद्यार्जन आणि विद्यादान करण्याचे कार्य करतो आहे.हे अप्रस्तुत वाक्य नाही तर जो स्वतःच्या जातीचा गुणधर्मच सोडू शकत नाही तो मूळ मुद्द्याला बगल देतो हे म्हणणे कितपत योग्य? ते सुज्ञ जाणतातच.
पण मी केवळ प्रतिसादातून प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली जे प्रश्न तुम्ही मला विचारलेत त्यामुळे प्रश्नरुपी सुकाणू तुमच्याच हातात होता माझ्या नाही. मी मुद्दा सोडलाच नाही कारण मी मुळ धाग्यात सोने ह्या विषयावर चर्चा असताना मी त्याच्या ट्रेड बद्दल माहिती दिली आणि फक्त सोन्याच्या ट्रेडबद्दल सविस्तर लेखन केले ह्याचा तुम्ही सोयीस्कर अर्थ पुंर्गुंताव्णूक हा पर्याय मी स्वतःला वाचवण्यासाठी लिहिला असा काढलात तरी हि तसे करण्याचा अधिकार मला आहेच कारण मी तसे (म्हणजे ट्रेड आणि गहाण वगैरे ) केले आहे करतो आहे आणि पुढील २५ वर्षे करतच राहीन. पण तुम्हीहि (म्हणजे डॉक्टर सुबोध खरे ह्यांनी नाही सर्वांनी ) तेच करावे हे म्हणण्याचे धाडस मी कधीच करणार नाही कारण जसे "डॉक्टर" होणे येर्या गबाळ्याचे काम नाही तसे ट्रेड हेही नाही हे मी जाणतो पण सोन्याच्या धाग्यात पी पी एफला (ज्यात तुमची गुंतवणूकहि नाही ) गुंतवून तुम्हीच मुद्द्याला फाटा फोडलात असे नाहीका होत ? सर्वांगीण गुंतवणुकीचा धागा असता तर ते बरोबर होते.

बँकेचे नियम बँकेला माहित ह्याचा अर्थ मला ते माहित नाहीत असा होत नाही हा एक भाग आणि बँक सोने तारण ठेवताना मलाच नाही कुणालाच काही प्रश्न विचारात नाही (ज्या सरकारी बँकेवर तुमचा विश्वास नाही असे तुम्ही अन्यात्रे एका धाग्यात म्हंटले आहे त्याच सरकारी बँकेत आणि तुमच्या लाडक्या का-ओपेरेटीव बँकेतहि )एक सोनार जो व्ह्यल्युअर म्हणून फी भरून बँकेत रजिस्टर असतो तो तुमच्या सोन्याची किंमत करतो आणि पैसे ठरवतो ज्यानुसार बँक तुम्हाला पैसे देते फक्त २ तासात.
आणि मी तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे देत आलो आहे त्यामुळे "जितं मया" म्हणण्याची गरजच नाही जे "सोने" आहे ते "सोनेच" असते पण चकाकते ते सर्व "सोने" (इथे पी पी एफ.) असतेच असे नाही.

आयकर विभागाच्या ट्रिब्युनलला केसेस लढवणार्या आम्हा (श्री व सौ पेठकर )ला आयकर म्हणजे काय ते थोडे तरी समजत असेलच ना ?

शब्दांचे अर्थ जेव्हा कळत नसतात तेव्हा ते डोंगर बनूनच पुढे येतात

अवांतर : बाकी माझा हा शेवटचा प्रतीसाद नाही कारण मी प्रत्यक्ष भेटीतच तुम्हाला सांगितले होते कि मी एक "कडक मास्तर" आहे मी कुणी चुकीचे काही बरोबर म्हणून सांगत असेल तर सोडतच नाही.

प्रसाद भागवत's picture

26 Dec 2013 - 10:00 pm | प्रसाद भागवत

कोणतीही 'टान्स्फर' होण्याकरिता दोन वेगळ्या ठिकाणांची आवश्यकता असते . मग एका अकाउंट्मधुन त्याच अकाउंट्ला 'टान्स्फर' कसी होणार ??

मात्र म्युचुअल फंड मधे एकाच अकाउण्ट्च्या डिव्हीडंड वा ग्रोथ अशा वेगवेगळ्या शाखा असल्याने तिथे हे शक्य होते. उदा. टॅकस वाचविण्याचा ०३ वर्षाचा लॉक-इन संपल्यानंतर तीच गुंतवणुक आपण केवळ पर्याय बदलुन ( म्हणजे मुळ पर्याय ग्रोथ असल्यास तो डिव्हीडंड करुन घेवुन) नव्याने करसवलत मिळवु शकतो. कायद्याने हे पुर्णपणाने संमत आहे.

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 7:47 pm | ज्ञानव

आपल्याला कोणतीही गोष्ट तारण ठेवून बँकेकडून कर्ज घेताना त्याचे कारण लिहून द्यावे लागते आणी सोने तारण ठेवून कर्ज परत सोने विकत घेण्यासाठी आपल्याला आपली बँक कर्ज देत असेलही पण ते बँकेच्या नियमात बसत नाही असे वाटते.

बँकेचे नियम बँकच जाणे पण मला बँक ऑफ बरोडाने असे काही विचारले नाही की नियम दाखवला नाही.

""कारण हे मुद्दल तुम्ही गेली ५ वर्षे पी पी एफ्ला भरता आहात ते आज ह्या वर्षी एकदम इंकम म्हणून कसे दाखवता कारण पी पी एफ मध्ये तुम्ही दर वर्षी आधीच ते इन्कम च्या रुपात दाखवून झालेले असते आणि कर वाजवट हि घेतलेली आहे. आणि तरीही तुम्ही पुन्हा कर वजावट जर मागाल तर ते विसंगत किंवा बेकायदेशीर होते. असो किचकट आहे थोडे.""

मुळात हा मुद्दा तुम्हाला समजला का ?

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 7:59 pm | ज्ञानव

PPF offers multiple tax benefits: Deposits in a PPF account qualify for a deduction under section 80C. Furthermore, the entire maturity amount including the interest is non-taxable. Not only is the interest earned tax free, PPF deposits are exempt from wealth tax too.

एका प्रतिसादात (श्री उपाशी बोका आणि घाटपांडे साहेब ) ह्यांना जी माहिती मी पुरवली तीच हि माहिती आहे

पण बँकेतून पी पीएफ मधून काढून परत पी पी एफ मध्ये भरायची आयडिया कशी ते सांगा कारण मग मी वर्षाला १ लाख भरून ७ वर्षाने जे पैसे जमा होतील त्यातून ५०% काढून घेऊन वजावट घेत जाईन.

त्यामुळे १००००० रुपयावर दरवर्षी मला वजावट मिळतेच आहे आणि सात वर्षाने काढलेल्या पैश्यावर हि मला वजावट मिळेल कारण ते माझे उत्पन्न असेल?

असे काही तुम्ही सांगताय का ?
कारण तुम्ही ज्या लिंक्स दिल्यात त्यात कुठे हि हि आयडिया डिस्कस केली नाहीये

उपाशी बोका's picture

26 Dec 2013 - 10:49 pm | उपाशी बोका

माझे पीपीएफ चे खाते नाही, पण एकंदर मला समजले ते असे.
समजा: तुमचे वार्षिक उत्पन्न आहे ६ लाख आणि तुम्ही दर वर्षी पीपीएफ मध्ये ६० हजार टाकले. सोयीसाठी समजू की दर वर्षी तितकेच उत्पन्न आहे आणि ६० हजारच पीपीएफमध्ये टाकले. असं तुम्ही ७ वर्ष केलं.
तुमचा पगार जमा होतो युनियन बँकेत आणि पीपीएफ खाते आहे स्टेट बँकेत.

आता ७ वर्षांनी (मला नक्की ५ की ६ की ७ ते माहीत नाही, earliest possible allowed समजा), तुम्ही ४० हजार (maximum possible allowed समजा) पीपीएफमधून काढून युनियन बँकेत जमा केलेत. दुसर्‍या दिवशी जाऊन ४० हजार स्टेट बँकेत जाऊन पीपीएफमध्ये भरले.

१. जर काढलेले ४० हजार टॅक्स-फ्री आणि कायद्यानुसार काढता येत असतील, तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसावा. बरोबर?
२. तुम्ही म्हणताय की पीपीएफ खातातल्या खात्यात मला ट्रान्स्फर करून का भरता येत नाहीत? पहिला मुद्दा म्हणजे एकाच खात्यातल्या खात्यात, पैसे फिरवता येणार नाहीत. दुसरे म्हणजे पीपीएफ हे earned income मधूनच भरले पाहिजेत असा काही नियम असेल. आता तुम्ही पीपीएफमधून काढलेले ४० हजार जर युनियन बँकेत जमा केले (जिथे तुमचा पगार पण जमा होतो) म्हणजे ते एकत्र झाले, ज्याला co-mingling of funds असे पण म्हणतात, आणि दुसर्‍या दिवशी युनियन बँकेतून ४० हजार काढून पीपीएफमध्ये भरले, तर तुम्ही असं कसं काय म्ह्णू शकता की ते ४० हजार माझ्या उत्पन्नातले नाहीत आणि पीपीएफच्या withdrawal पैकीच आहेत?
माझी समज बरोबर असेल आणि कायद्यानुसार हे बरोबर आहे. मग तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे?

प्रत्येकाने फायनान्शियल सल्ला घेताना, टॅक्सचा पण जरूर विचार करावा. It matters what you keep, not what you earn.

जाताजाता: तुमच्या सिस्टीमवर तुमचा किती विश्वास असावा, हे तुमचे वैयक्तिक मत आहे. पण इतर सर्वांना कळकळीची विनंती आहे की टिप्सवर विश्वास ठेऊ नका. If it is too good to be true, it probably is. आपले ज्ञान स्वतः वाढवा.

प्रसाद१९७१'s picture

27 Dec 2013 - 9:25 am | प्रसाद१९७१

@उपाशी बोका - जर तुम्ही भारतात असाल आणि पीपीएफ अकाउंट काढले नसेल तर लगेच काढा. बायकोचे पण काढा. शक्य असल्यास त्यात दर वर्षी १ लाख भरत रहा. मग बाकीच्या पैश्याची गुंतवणूक वगैरे करा.

प्रतिसादांमधून उत्तम माहिती मिळतीय.

प्रकाश घाटपांडे's picture

26 Dec 2013 - 4:22 pm | प्रकाश घाटपांडे

ही गुंतवणूक म्हणजे फारच कटकट आहे ब्वॉ!
१) सहा वर्षांनी पीपीएफ मधील काही रक्कम काढली
२) पंधरा वर्षांनी पीपीएफ खाते बंद झाल्यावर ( रिन्यु न केल्यास) मिळणारी रक्कम
तर अशा केस मधे मिळणारी रक्कम त्या वर्षाचे इनकम पकडतात का?

प्रसाद भागवत's picture

26 Dec 2013 - 4:29 pm | प्रसाद भागवत

होय, त्या रकमेतील मिळालेले व्याज हे निश्श्चितच उत्त्पन्न आहे, मात्र ते करमुक्त असल्याने टॅक्स वाढ्णार नाही हे महत्वाचे.

मुद्दा १ आणि मुद्दा २ ह्याचे उत्तर खालील प्रमाणे.

जे व्याज मग ते ६ वर्षांनी मिळाले कि १५ वर्षांनी मिळाले ते कर मुक्त आहे तसेच तेव्हढे व्याजच फक्त त्या वर्षाचे (म्हणजे ६ किंवा १५ वर्षाचे )इन्कम होऊ शकते.

आता गेली ६ वर्षे किंवा १५ वर्षे जी मुद्दल तुम्ही पी पी एफ ला दिलीत त्यावर तुम्ही कर वजावट दर वर्षी आधीच घेतली आहे त्यामुळे त्या मुद्दलास ६ किंवा १५ वर्षानंतर इन्कम म्हणून गणता येणार नाही आणि ते कुठल्याही वजावटीस पात्र असणार नाही.

प्रसाद भागवत's picture

26 Dec 2013 - 5:36 pm | प्रसाद भागवत

श्रीमान ज्ञानवजी,

आपण आपल्या आधीच्या पोस्ट्मध्ये काही विधानांबाबत ( माझ्या नव्हे) " हि तर निव्वळ दिशाभूल आहे किंवा अभ्यास न करता केलेलं विधान आहे" अशी आक्रमक भाषा वापरता, वस्तुस्थितीची संभावना 'गंमतीशीर वल्गना ' अशी करता आणि वर बिनादिक्कत 'कसा हो वाचतो जरा मलाही समजावा.(म्हणजे आयकर कलम कोणते ?) असा 'अहं ब्रह्मास्मि' थाटाचा प्रश्न विचारता------ मी यावर फक्त खुलासा केला आहे. .

तर सांगावयाचे हे की, कायद्याने असे करता येते. आणि कायद्याचा अर्थ लावायला कोणी C.A असायलाच हवे असे नाही. आपण करसवलत मिळण्यासाठीच्या गुंतवणुकीसाठी असलेले कलम 80C मुळांतुन वाचावे अशी आपणास नम्र विनंती आहे.. करसवलत मिळविण्यासाठी करावयाची गुंतवणुक करदात्याने त्याच्या करपात्र उत्पन्नंतुन करावी एवढीच आयकर खात्याची अपेक्षा आहे. ' ती त्या वर्षाच्या इन्कम मधूनच व्हायला हवी असा नियम आहे' हा तुम्ही लावलेला अर्थ आहे ज्याला आधार नाही.

माझे म्हणणॅ एवढेच आहे की एखाद्याने पी पी एफ मध्ये पैसे भरल्यास त्या पैशांवर त्याला कर वजावट मिळेल. ते पैसे त्याने कोठुन आणले, त्याच्या त्याच PPF खात्यातुन काढुन, की अन्य एखाद्या खात्यातुन ह्याचा विचार कोणी करण्याचा प्रश्न येतच नाही. सबब पीपीएफमधून जमा रकमेच्या २५% रक्कम काढून कर वाचवून पुन्हा पीपीएफलाच भरणे ह्यात अयोग्य अनैतिक असे काहीही नाही. रहिला प्रश्न तो अशा काढलेल्या रकमेचा आपल्या रिटर्न मधे दाखवायचा, त्यावर खुलासा हा की ते मुद्दल असल्यास प्रश्नच नाही, व्याज असल्यासही ते करमुक्त असल्याने उन्पन्न वाढ्ले तरी कर वाढ्णार नाही. असे असताना कोणी मुद्दल/ इन्कम याचा गोंधळ करावाच का ?? आणि करीत असेल तर त्याचा विचार आपण का करावा ?? बाकी आपली डबल कर वजावट वगैरे शंका अगम्य आहे.

आपण एक व्यावसायिक अर्थसल्लागार आहात, अशा वेळी आपल्या विधानांचे महत्व अनेकपटीने वाढते. आपण पैसा मिळविण्यासाठीच तर हा सारा उद्योग करतोय, अशावेळी कर बचत, कर नियोजन या सारख्या महत्वाच्या पैलुंवरही आपण मार्गद्रशन करावयास हवे, मात्र आपली त्या विषयाचा अभ्यास आणि भुमिका अनाकलनीय आहे.

आपण एखाद्या विषिष्ट कालावधीत यशस्वी झालेली गोष्ट 'सिस्टीम' म्हणुन अवलंबण्यापेक्षा( आणि तो 'फॉर्मुला' चालत नाहीशी विपरित परिस्थिती उद्भवली की मी 'थांबलोच' होतो अशी लंगडी कारणमिमांसा देण्यापेक्षा) अधिक व्यापक विचार करुन आमच्या सारख्या सामन्यांचा फायदा करुन द्यावा असे वाटते. "-----आर्थिक उत्पन्न हे नेहमी विक्रीतून येते मग ती बुद्धीची विक्री असो, सेवेची विक्री असो कि एखाद्या वस्तूची विक्री असो त्या विक्रीतून आणि फक्त विक्रीतूनच झालेला नफा हा करपात्र असतो. -----जगभरातल्या खाणीतून होणारे सोन्याचे उत्पादन आणि जगभरातली मागणी लक्षात घेता सोन्याचा भाव खाली जाईल का हे सांगयला श्री ब्रह्मदेव ह्यांना त्रास द्यायची गरज नाही. -----सोन्याचा भाव जो आज ३२००० आहे तो रुपये १,००,०००/- होईल" अशी अर्थहीन विधाने आपल्यासारख्या अनेक वर्षे बाजारात धालवलेल्या धुरिणाने करावीत हे एक आश्चर्यच आहे. खरे म्हणजे लिहायला संकोच वाटतो पण आपले या धाग्यामधले बहुतेक पोस्ट हे तार्किकतेच्या कसोटीवर टिकणारे नाहीत

आपण 06 वर्षांच्या मुदती संदर्भात बरोबर बोलला आहात असे मी आधीच म्हणालो आहे पण तरीही एकुणांत मुळ मुद्याला बगल देवुन, कल्पनांची गल्ल्त करुन वा मध्येच अत्यंत गैरलागु प्रश्न विचारुन आपण एका आर्थिक विषयावरील चर्चा दिशाहीन करीत आहात असे माझे मत आहे.

क्षमस्व.

ज्ञानव's picture

27 Dec 2013 - 5:05 pm | ज्ञानव

*** करसवलत मिळविण्यासाठी करावयाची गुंतवणुक करदात्याने त्याच्या करपात्र उत्पन्नंतुन करावी एवढीच आयकर खात्याची अपेक्षा आहे.

ह्या संदर्भात,

तुम्ही सांगितल्या बर हुकुम ८०सी परत वाचला मुळातून.

आता २ गोष्टी

१)तुम्ही जी आयकर खात्याची अपेक्षा सांगितली आहेत त्या नुसार करपात्र उत्पन्न जे त्याच आर्थिक वर्षाचे दाखवले जाते तेच तुम्हाला अपेक्षित आहे ना? जर असेल तर माझ्या

' ती त्या वर्षाच्या इन्कम मधूनच (म्हणजेच तुम्ही म्हणता त्या करपात्र उत्पनामधून)व्हायला हवी असा नियम आहे' हा तुम्ही लावलेला अर्थ आहे ज्याला आधार नाही.

हा वाक्याला तुम्हीच आधार दिला आहे.

आणि

SECTIONS 80C TO 80U SPECIFIES THE DEDUCTIONS TO BE MADE FROM THE GROSS TOTAL INCOME. GROSS TOTAL INCOME MEANS THE TOTAL INCOME, UNDER ALL HEADS OF INCOME, COMPUTED IN ACCORDANCE WITH THE PROVISION OF THE ACT [SECTION 80B(5)].

इथे वर मांडलेल्या सेक्शन नुसार जे उत्पन्न UNDER ALL HEADS OF INCOME, COMPUTED म्हणून डिफाईन केले आहे ते कोणत्या वर्षाचे?
GROSS TOTAL INCOME कोणत्या वर्षाचे असते त्याच वर्षाचे असतेना ?

आणि मी तुम्हाला तुम्ही सी ए आहात का ? हे जे विचारले ते केवळ तुम्हाला माझे म्हणणे सांगताना तुम्ही सी ए असाल तर काही गोष्टी गृहीत धरून बोलता येतील ह्या अपेक्षेने.
पण बोलल्या गेलेल्या शब्दांना भावना असतात लिहल्या गेलेल्या शब्दांच्या भावना वाचाणाऱ्या वर अवलंबून असतात त्यामुळे कदाचित तुम्हाला राग आला असावा त्याबद्दल क्षमस्व...

प्रसाद भागवत's picture

3 Jan 2014 - 11:40 am | प्रसाद भागवत

शब्दाचा अथवा कायद्याचा कीसच काढावयाचा झाला तर " --- total income computed in accordance with the provisions of this Act, before making any deduction under this Chapter ---" ही वाक्य रचना फक्त याच वर्षासाठी आहे असे कशावरुन ?? व्याकरण वा काळांचा अभ्यास केलेली कोणीही व्यक्ती हे वाक्य वर्तमानाईतकेच भुतकाळालाही लागु पडते हे सहज सांगु शकेल.

याचाच अर्थ स्पष्ट आहे, गेल्या वर्षी विवरण पत्रकांत दाखविलेल्या उत्पन्नातुनही ( जे आता या वर्षी करीता त्या करदात्याची संपत्ती, wealth म्हणुन गणली जाईल) करदाता अशी गुंतवणुक करु शकतो.

खरे तर खरे म्हणजे अशा प्रकारची तरतुद करण्याचा उद्देश हा करदात्यांस सक्तीची बचत करावयास लावणे आणि त्याच वेळी बेनामी व्यवहार टाळणे एवढाच आहे. आणि सदरची गुंतवणुक ही करदात्याच्याच खात्यातुन व्हावी एवढीच अपेक्षा आहे, खात्याकडुन केल्या vividh गेलेल्या निर्धारणांत( assessment) वा दिल्या गेलेल्या निर्णयांतुन ही बाब पुरेशी स्पेष्ट आहे..

समजा एखाद्या करदात्याचे वार्षिक उत्पन्न 3,50,000 आहे, त्याचे पुस्तकांत दिसणारे वार्षिक खर्च रु. ,2,80,000, आहेत आणि त्याने बॅकेकडुन र. 1,50,000 एवढी उचल वा कर्ज घेतले आहे, अशा परिस्थित्तीत तो या कलमाखाली रु.1,00,000 ची गुंतवणुक केल्यास, वर व्यक्त अर्थाप्रमाणे ती रु 70,000 पर्यंतच ग्राह्य मानुन उर्वरित रु 30,000 करदात्याच्या उन्पनातुन आलेली नाही या अर्थी नाकारली जाईल काय ?? --- याचे उत्तर नाही असे आहे. गुंतवणुक ग्राह्य मानली हाईल.

एका करदात्याने तर मार्च महिन्यात आपल्या केडिट कार्डाने इन्शुरन्स चा हप्ता भरला आणि कार्ड कंपनीने तो पुढील आर्थिक वर्षांत (म्हणजे अप्रिल मधे) करदात्याकदुन वसुल केला. अशी गुंतवणुक ही खात्याने नव्हे तर ट्रिब्युनलने मान्य केली आहे. बाकी येथे काथ्याकुट करताना काही विद्वानांना अशा विमा वा पीपीफ गुंतवणुकी, पुन्हा एकदा, त्या करदात्याच्याच खात्यातुन केल्या आहेत हे सिद्ध करण्याची जबाब्दारी करदात्यावर असलेने) रोखीने भरु नयेत याचे भान दिसत नाही हा भाग अलहिदा.

असो. माझे अनेक अशील अनेक वर्षे अनेकदा या प्रकारचे व्यवहार करीत असलेने मला त्याच्या वैधतेविषयी थोडीही शंका नाही मात्र माझ्याकडे या व्यतिरिक्त अधिक काही सांगण्यासारखे नसल्याने, मी स्वतःला कोणत्याच विषयातला 'माहिर' समजत नसल्याने आणि मुद्द्यांची सरमिसळ, तथ्थ्यांचे गौडबंगाल, वा शब्द्बबंबाळ अतार्किक पोस्ट्स करणे अथवा 'चुकीचे अर्धवट सल्ले' देणारे लिखाण करणे अशी कोणतीही आयुधे मला वापरता येत नसल्याने आपल्याला त्रिवार वंदन करुन मी आपल्याशी या विष्यावरची चर्चा थांबवतो.

ज्ञानव's picture

26 Dec 2013 - 7:16 pm | ज्ञानव

आपण एक एक मुद्दा घेऊ
प्रथम माझ्या 'सिस्टीम' बद्दल...

आपण एखाद्या विषिष्ट कालावधीत यशस्वी झालेली गोष्ट 'सिस्टीम' म्हणुन अवलंबण्यापेक्षा( आणि तो 'फॉर्मुला' चालत नाहीशी विपरित परिस्थिती उद्भवली की मी 'थांबलोच' होतो अशी लंगडी कारणमिमांसा देण्यापेक्षा).

मुळात तुम्ही फक्त माझ्या सिस्टीमकडे पाहत आहात ती समजून घेण्याऐवजी त्यावर भाष्य करताय. हि जी सिस्टीम जी तुम्हाला पूर्ण अनाकलनीय आहे त्यात शंकाच नाही पण म्हणून ती अयोग्य आहे किंवा मी लंगड्या कारणमीमांसा करतो हे तुम्हाला कसे समजले?
त्यासाठी मार्केट आणि ट्रेड (म्हणजे मार्केट मग ते कुठले हि असो रियल इस्टेट, इक्विटी, सोने ई.पैकी कुठलेही)ह्या दोन गोष्टी तुम्ही (म्हणजे प्रसाद भागवत नाहीत...) जाणता असे मी इथे गृहीत धरले होते.
त्यामुळे ट्रेड करताना आज जर मी म्हंटले सदनिका घ्या तुम्ही कदाचित म्हणाल नको भाव वाढत नाहीयेत. किंवा सोने घ्या तुम्ही म्हणाल नको भाव खाली येतील हे जे तुम्ही म्हणाल तुम्ही म्हणाल आहे ना ते तुमची निर्णयशक्ती दाखवते. जी प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि ट्रेड हा त्या निर्णयशक्ती वर अवलंबून असतो. निर्णय तुमच्या अभ्यासावर केव्हा एखादी वस्तू घ्यावी आणि केव्हा विकावी ह्याचे मूल्यमापन करावेच लागते आणि मग आपला खरेदीचा किंवा विक्रीचा भाव येईपर्यंत "थांबावेच" लागते तसा मी "थांबलोय" बाजार उलटा फिरला तरीही थांबावे लागते आणि बाजार चढत असताना ही थांबावेच लागते.

जर मी थांबलो आहे तर ती लंगडी कारणमीमांसा कशी?
मी का थांबलोय ते कळण्यासाठी ट्रेडिंग यायला हवे.
२००६ पासून मी सोन्यात अनेक ट्रेड केले ते राम भरोसे बरोबर आले असा जो समज आहे तोच प्रगल्भतेला धरून नाही.
त्यासाठी दोन वर्षे मार्केटचा अभ्यास केला , खरेदी कशी करता येईल आणि प्रोफित मार्जिन कसे वाढवता येईल हे पाहिलं आणि हाच महत्वाचा भाग इथे दुर्लक्षिला जातोय किंवा तो तुम्ही जाणता हे मी गृहीत धरतोय.
तर केव्हा कुठले मार्केट चालेल हे ज्याचे त्याने अभ्यासानेच शोधावे लागते त्या नुसार कुणी सदनिका मार्केट कधी चालेल ते लक्षात घेऊन सदनिका घेतात आणि ताबा मिळायच्या आधी २ वेळा ट्रेड करून मोकळे होतात.( हि पद्धत तुम्हाला माहित आहे असे गृहीत धरतो.) पण जेव्हा साचुरेशन येते तेव्हा सगळ्या मार्केट मध्ये सगळेच जण थांबतात कारण ती वेळ मार्केट वर जाणार कि खाली हे ठरवणारी असते.....तर "थांबणे" ह्या शब्दाची हि कारण मीमांसा आहे आणि मार्केट प्लेयरला ती समाजलीच असेल.पण तुम्हाला ती लंगडी का वाटली कारण हे सगळे भाव आता इतिहास जमा आहेत त्यामुळे मी हे सांगू शकतोच. जर असे वाटत असेल कुणाला तर बोलणेच खुंटले मी माघार घेतो कि मी चुकलोय. (हे इथपर्यंत माझा मुद्दा लक्षात आला का मग पुढे सरकू या )

"-----आर्थिक उत्पन्न हे नेहमी विक्रीतून येते मग ती बुद्धीची विक्री असो, सेवेची विक्री असो कि एखाद्या वस्तूची विक्री असो त्या विक्रीतून आणि फक्त विक्रीतूनच झालेला नफा हा करपात्र असतो. -----जगभरातल्या खाणीतून होणारे सोन्याचे उत्पादन आणि जगभरातली मागणी लक्षात घेता सोन्याचा भाव खाली जाईल का हे सांगयला श्री ब्रह्मदेव ह्यांना त्रास द्यायची गरज नाही. -----सोन्याचा भाव जो आज ३२००० आहे तो रुपये १,००,०००/- होईल"

ह्यात एक्झाटली काय अर्थहीन आहे ते मला सांगा मी तेही मुद्देसूद समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन.

हे दोन मुद्दे आधी समजावून घेऊ म्हणजे माझ्या चुका मला ज्ञात होतील.

नंतर कर आणि ८०सी बद्दल बोलू. म्हणजे माझी गल्लत व्हायला नको तसेच मी (?!!) दिशाहीन चर्चा करायला नको.

साती's picture

27 Dec 2013 - 9:10 pm | साती

काय ही चर्चा.
आम्ही सामान्य लोक थोडे पीपीएफ थोडे पॉलिसी थोडे सोने सगळ्यात पैसे गुंतवतो.
मात्रं हे खरेय की सोने इंस्टंट सोर्स ऑफ मनि आहे.
अ‍ॅज गुड अ‍ॅज हार्ड करन्सी.
आमच्या हास्पिटलात ऐनवेळी अ‍ॅडमिट होणारा गाबठी पेशंटचा नातेवाईक चटकन सराफ कट्ट्यावर जाऊन अंगठी गहाण ठेऊन पैसे घेऊन येति.
बँका , एटीएम्स कधी बंद कधी चालू याची ग्यारंटी नाही. (किमान टायर थ्री सिटीत तरी)
आणि पिपिएफ वैगेरे गुंतवणूक शेवटी एका लिमिटमध्येच करता येते ना.
बाकी आपण मराठी माणसं नैतिकतेने वागून टॅक्स भरून टॅक्स चुकविणार्या, बुडविणार्यांचे भले करून देत असतो हे ही खरेच.

सोने विकत घेणारे ८० टक्केहून अधिक लोक तरी ते आपल्या अ‍ॅसेटमध्ये दाखवित नाहीत असे माझे निरीक्षण आहे.

याऊलट पहिल्याच डिक्लरेशन मध्ये तुमच्याकडे वडिलोपार्जित / स्त्रीधन म्हणून खूप जास्तं सोनं आहे असे दाखवून ठेवा (नसतानाही) म्हणजे नंतर सरप्लस कॅशचा कधी प्रश्न आला तर सोनं विकलं असं दाखविता येईल असा माझ्या सीएचा सल्ला होता.

माझा मात्रं कुठल्याही गावठी डॉक्टरप्रमाणे जमिनीत गुंतवणुकीवर विश्वास आहे.

ज्ञानव's picture

27 Dec 2013 - 9:29 pm | ज्ञानव

याऊलट पहिल्याच डिक्लरेशन मध्ये तुमच्याकडे वडिलोपार्जित / स्त्रीधन म्हणून खूप जास्तं सोनं आहे असे दाखवून ठेवा (नसतानाही) म्हणजे नंतर सरप्लस कॅशचा कधी प्रश्न आला तर सोनं विकलं असं दाखविता येईल असा माझ्या सीएचा सल्ला होता.

आणि हे

सोने विकत घेणारे ८० टक्केहून अधिक लोक तरी ते आपल्या अ‍ॅसेटमध्ये दाखवित नाहीत असे माझे निरीक्षण आहे.

हि प्राक्टिस खूप कॉमन आहे. खूप मोह होतोय पण जाऊ देत....कारण मला काय म्हणायचे आहे ते समजणारा / समजणारी एक तरी आहे इथे.

बाकी मी सगळे सोने दाखवले आहे हं (असलेले)म्हणूनच बिनधास्त इथे माझ्याकडे ४० ग्राम (क्या य ते ४०च)आहे असे बोलू शकतो.

एखाद्याच्या खातेवहीत जेव्हा "ADJUTMENTS" येते तिथेच अनैतिकता,बेकायदेशीरपणा सुरु होतो. "दाखवा हो काहीपण कोण विचारताय इथे?" असे सल्ले आमचेच क्लायंट आम्हाला देतात किंवा एखादी "ADJUTMENTS" वहिवाटीसारखी वापरतात तेव्हा त्यात काय गैर आहे असे त्यांना जाणवतहि नाही.

साती's picture

27 Dec 2013 - 10:11 pm | साती

मी पण .
बाकी मी माझे' सग्गळे अ‍ॅसेट्स ओपनली दाखविले आहेत' असे मला परवा एकजण सांगत होती आणि मी मला उकळून फुटणारे हसू दाबायचा प्रयत्न करत होते ते आठवलं.
;)

ज्ञानव's picture

27 Dec 2013 - 10:32 pm | ज्ञानव

ह्या रुक्ष विषयात तेव्हढाच विरंगुळा....

प्रकाश घाटपांडे's picture

28 Dec 2013 - 2:12 pm | प्रकाश घाटपांडे

=))

बॅटमॅन's picture

3 Jan 2014 - 2:12 pm | बॅटमॅन

=)) =)) =))

नगरीनिरंजन's picture

28 Dec 2013 - 6:32 pm | नगरीनिरंजन

सुखवस्तु गरिबांनी सुखवस्तु गरिबांसाठी काढलेला धागा.
विशिष्ट गरजेसाठी केलेली दूरगामी गुंतवणूक आणि पैशासाठी पैसा कमावण्यासाठी केलेल्या उलाढाली यात फरक आहे इतकी अर्थसाक्षरता असणे सामान्य माणसाला पुरेशी आणि आवश्यक आहे असे वाटते. असो.

ज्ञानव's picture

28 Dec 2013 - 7:31 pm | ज्ञानव

तुमच्याशी सहमत आणि एकमत हि आहे.

कारण गुंतवणूक हि मुळातच वय आणि उद्दिष्टे लक्षात घेऊन केली जाते. पण जर संततीचे शिक्षण, लग्न आणि आपली निवृत्ती हि आपल्या आयुष्याची उद्दिष्टे जर असतील तर. माझ्या सर्व लेखात मी गुंतवणूक आणि ट्रेड ह्याची योग्य सांगड घालता आली पाहिजे असे म्हंटले आहे आणि टीप पासून हि लांब राहा सांगत आलोय तरी हि......???

उलाढाल करणे गैरच आहे का ? आणि सामान्य माणूस कोण ?

एखादा शेतकरी जेव्हा शेतात काही पिकवतो तेव्हा तो जुगार खेळतो का? तो सामान्य माणूस नसतो ?त्याला भीती नसते का की पिक नाही आले तर हि ?
तो नसती उलाढाल करत असतो का ?
तो हि अनेक घटकांवर अवलंबुनच असतो, प्रयोगशील असतो तेव्हा तो सामान्य माणूस नसतो ?
रेकॉर्डतोड उत्पन्न घेणारे अशिक्षित शेतकरी वाचले पहिले आहेत आणि आत्महत्या केलेले हि वाचनात आहेत म्हणून ते "सामान्य शेतकरी " जगणे सोडत नाहीत कि स्वतःच्या जमिनीला, ना येणाऱ्या पावसाला किंवा कुठल्याच घटकांना दोष देत बसत नाहीत ते संघर्ष करतात उमेदीने कारण ते सामान्यच असतात ना.

ज्या दगडावर काही पिकवणे शक्य नाही तिथे टायर्समध्ये माती भरून शेती केलेली माणसे आहेत.
ती सगळी "नशिबाने" यशस्वी झाली असे म्हणणे माझ्याच्याने कधीच होणार नाही कारण त्यांची मेहनत आणि अडचणीवर मात करण्याची जिद्द ह्याला सलाम आहे माझा.
जो अशिक्षित (आणि सुशिक्षित हि ) शेतकरी आहे तो माझा कायम आदर्श राहिला आहे.
ते शेतकरी जे करतात तेही सामान्यच आहेत.

सोन्याचा ट्रेड जो मी सांगितला त्यावर तो कसा फक्त चालणार्या मार्केट मध्येच योग्य आहे हे सांगण्यात आले ते मला पसंत नाही.

आणि सोने गहाण ठेऊन पैसे देणारी बँक नियमबाह्य काम करतेय किंवा एकूणच मी जे सांगतो ते काहीतरी जुगारी तत्वाने भरलेले आहे खूप कठीण आहे असे दाखवले गेले. ते वेदनादायी होते.
सोने हा विषय होता मी माझी पद्धत मांडली बस इतकेच होते ते.

कुठलाहि डॉक्टर जेव्हा अत्यंत क्रिटीकल केस वाचवतो (सामन्यतः भाजलेल्या पेशंटला एक उदाहरण म्हणून तशा बाळंतपणाच्या सुद्धा )तेव्हा तो त्या पेशंटच्या जीवावर satta खेळतो कि त्या डॉक्टरचे कौशल्यहि असते?

आणि तो डॉक्टर सामान्य म्हणायचा कि असामान्य ?

थोडक्यात ज्या क्षेत्रात जो माणूस असतो त्याबद्दल तो लिहितो बोलतो त्या क्षेत्राची भलामण तो करतो आणि त्या क्षेत्राबद्दल अनंभिज्ञ असणारे "सामान्य माणूस" ह्या टर्म मध्ये येत असतील तर त्यांनी "आपलेच खरे" असे सांगण्याचा असामान्य प्रयत्न करावा का ? मी कधी ज्या प्रांताची माहिती नाही तिथे इतके छाती ठोक कुणाला आज तागयात
बोललेलो नाही आणि पुढे हि ते घडणार नाही.
आणि म्हणूनच मी वेगळे दालन काढा असे म्हणतोय
जेणे करून चार जाणकारच तिथे फिरकतील.

उपाशी बोका's picture

29 Dec 2013 - 2:02 am | उपाशी बोका

>> माझ्या सर्व लेखात मी गुंतवणूक आणि ट्रेड ह्याची योग्य सांगड घालता आली पाहिजे असे म्हंटले आहे.
तुमचे लेख वाचले. बहुतेक ठिकाणी ट्रेडबद्दल आणि ट्रेडिंग कसे करावे याचीच माहिती दिसतेय. गुंतवणूकीबद्दल कधी लिहिणार आहात?

>>सोन्याचा ट्रेड जो मी सांगितला त्यावर तो कसा फक्त चालणार्या मार्केट मध्येच योग्य आहे हे सांगण्यात आले ते मला पसंत नाही.
>>सोने हा विषय होता मी माझी पद्धत मांडली बस इतकेच होते ते.
leverage किती घातक ठरू शकतो, हे मी वर उदाहरण देऊन स्पष्ट केले आहे आणि ते तुम्हालाही मान्य आहे. सोने गहाण ठेऊन अजून सोन्यावर पैसे लावायची तुमची सिस्टीम तुमच्या स्वतःच्या अनुभवात, आत्तापर्यंत यशस्वी झाली, ती चढत्या मार्केटमध्ये सफल झाली म्हणून कायमच होईल असे नाही आणि विशेषतः नवख्या आणि अननुभवी लोकांसाठी तर अतिशय घातक आहे इतकेच सांगायचे आहे. (नाण्याची दुसरी बाजू समजा).

>>कुठलाहि डॉक्टर जेव्हा अत्यंत क्रिटीकल केस वाचवतो...
डॉक्टर (किंवा दुसरा कोणी प्रोफेशनल म्हणा) यांनी शिक्षण घेऊन, परीक्षा देऊन त्यांचे ज्ञान सिद्ध केलेले असते. केवळ इंटरनेटवर अभ्यास करून किंवा अनुभव आहे म्हणून कोणी स्वतःला डॉक्टर किंवा सी.ए. म्हणवून घेत नाही. (मी डॉक्टर किंवा सी.ए. नाही, गैरसमज नसावा, पण त्यांच्या ज्ञानाबद्दल मला आदर जरूर आहे.) तसेच तुम्ही आर्थिक सल्लागार म्हणून सल्ला देता, तेव्हा तुम्ही CFP वगैरे क्वालिफिकेशन मिळवली असतील, असा अंदाज आहे. एखादा प्रोफेशनल सल्ला देतो, तेव्हा "मी त्या जागी असतो तर मी स्वतः काय केले असते" असा विचार करून त्याने सल्ला देणे, इतपत अपेक्षा असते. आणि तो सल्ला मला पटतो की नाही, हा विचार मला करता आला पाहिजे. बाकी काही नाही. त्याच्यासाठी इतरांवर घसरण्याची गरज नाही.

ज्ञानव's picture

29 Dec 2013 - 9:04 am | ज्ञानव

आणि मी कुणावर घसरत नाहीये. मी कुठल्याच प्रश्नाचे उत्तर लपवले नाही अगदी मी ब्रोकर आहे हि हि .
शिक्षण जेमतेम बी कॉमच आहे.
कुठलेही सी एफ पी वगैरे प्रोफेशनल सर्टिफिकेट नाही.
गुंतवणूक विषयक पुरेपूर १० लेखांची सिरीज लिहितो आहे ती प्रकाशित करायला १० १५ दिवस लागतील
सोन्याचे ट्रेडबद्दलची माहिती मी माहिती म्हणूनच दिली होती मी कुणालाही माझे सल्ले ग्राह्य माना असे सांगत नाहीह्ये किंवा मी कुणालाही मी किती हुशार आहे हे सांगत नाहीये. बाकी लीवार्जेचे म्हणाल तर ती दुधारी तलवार आहे हे मी पुरेपूर जाणतो आणि त्याचा उपयोग हि जाणतो.पण ते करणारा मी ह्या जगात एकमेव यशस्वी ट्रेडर असा दावाहि केला नाही तसेच जे मी करतो ते कुणालाच जमणार नाही हा भ्रमही बाळगला नाही.
मी ह्या गैर समजात नक्कीच होतो कि मिसळपाववर जे लेखन येते ते माहिती म्हणून आहे हे समजण्याची कुवत सगळ्यांमध्ये आहे. आणि त्या माहितीचे विश्लेषण करून किंवा त्या माहितीबद्दल अधिका अधिक जाणून घेऊन ती माहिती योग्य कि अयोग्य हे ठरवल्या नन्तर निष्कर्ष काढण्या इतकी प्रगल्भता इथे असेल पण तसे न होता मी दिशाभूल केली हे सांगितले गेले मी विचारलेल्या प्रश्नानापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले गेले नाही. तुमचे प्रतिसादच फक्त विषयाची माहिती घेण्याच्या उद्देशाने होते किंवा तुम्ही त्यात थोडे तरी जाणकार आहात असे माझे मत झाले.
कुणाला दुखावणे हा हेतूच नव्हता तो माझा पिंड नाहीच. पण सोने ह्या विषयावर कुणीतरी धागा काढला आहे आणि मी त्यातल्या ट्रेड ह्या विषयाचे एक लेखन केले जे मूळ धाग्याला लागुनच होते. पण त्यावर पी पी एफ,आयकर आणि हाइट म्हणजे पैसे ट्रान्स्फर करायला किमान दोन खाती लागतात हे मला शिकवण्याचा प्रयत्न हास्यास्पद होता.'
जगात दोनच माणसे असतात एक चांगला आणि एक वाईट. मी सतत आपण कुठल्या प्रकारात बसतो ते जाणून त्याचे भान ठेऊन वागत असतो. आणि माझ्या त्याच तत्वाने मी सी ए..ज्यांच्यात माझी रोजची उठबस आहे त्यात हि चांगले आणि वाईट दोन्ही सी ए आहेत. त्यांचे लोकांना दिलेले गेलेले सल्ले आणि त्यांचे frauds पाहत आलोय (ह्या सर्तीफिकेट धारकांनी स्वतःच्या सख्या भावालाही कधी सोडले नाही)जर मी ह्या सरटीफिकेट धारक लोकांचे भारतात संगणक येण्यापूर्वीचे frauds आणि नंतरचे frauds ह्याबद्दल लिहिले तर ते फारच रंजक होईल पण गुन्हा पाहणे लिहिणे,वाचणे रंगवून सांगणे म्हणजे गुन्ह्याला प्रोत्साहन देणेच आहे असे मला ठामपणे वाटते.

माझ्या भावना आपल्या पर्यत पोहोचल्या असतील असे वाटते.
कदाचित misalpav वर पूर्वी काही घटना घडून गेली आहे जी मला माहित नाही त्याचा परिणाम म्हणून माझ्याकडे पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टीकोन कदाचित नकारात्मक असावा. असो.

जेपी's picture

28 Dec 2013 - 8:10 pm | जेपी

मिपावर आल्यापासुन किमान 10 धाग्यावर मी शतकी प्रतिसाद दिलाय . बाकी लगे रहो .

उपाशी बोका's picture

1 Jan 2014 - 11:14 pm | उपाशी बोका

ही बातमी बघा. (Gold's biggest annual decline in 32 years)

काळा पहाड's picture

2 Jan 2014 - 12:40 am | काळा पहाड

फार कन्फ्युजन आहे.. मला एक साधी गोष्ट कोणी सांगेल का?
१. मी दर वर्षी माझ्या व बायकोच्या नावे १-१ लाख पीपीएफ मधे भरतो. माझे ८०सी आधीच ओव्हर्फ्लो असल्याने (पॉलिसी, एम्प्लोयी पिएफ वगैरे) मला त्याच्या टॅक्स बेनेफिट काहीच नाही. आता ज्यावेळी मला माझे पैसे परत मिळतील (१५+५+५ वर्षांनी) त्यावेळी टीडीएस कापला जाईल का? की मला ते पैसे इन्कम म्हणून दाखवावे लागतील? की मला ते पैसे एक रकमी टॅक्स न भरता मिळतील?
२. मुलाच्या/मुलीच्या नावाने १ लाखाचे पीपीएफ भरावे का? की मी पीपीएफ वर जास्तच भरवसा ठेवतो आहे आणि ते पैसे म्युच्युअल फंड मधे वगैरे गुंतवावे?

प्रसाद भागवत's picture

2 Jan 2014 - 10:26 am | प्रसाद भागवत

तुम्हाला जेंव्हा कधी पैसे परत मिळतील (१५+५+५ वर्षांनी) त्यावेळी (जर आजचेच नियम लागु असतील तर) टीडीएस कापला जाणार नाही, ते पैसे एक रकमी टॅक्स न भरता मिळतील.

पीपीएफ मध्ये शिल्लक रकमेवर प्रतिवर्षी व्याज मिळते, आणि व्याज म्ह्टले की ते सहाजिकच उत्त्पन्न म्हणुन धरले जाते. आपण असे दरवर्षी मिळालेले व्याज खरे तर त्या त्या वर्षीच्या रिटर्न मध्ये दाखवावयास हवे परंतु हे व्याज करमुक्त असल्याने आणि ते उन्पन्नत मिळविल्याने कोणताही करभार वाढत नसल्याने आयकर अधिकारी सुद्धा त्या बाबत आग्रह धरीत नाहीत. मात्र असे व्याज दाखविण्याचा कोणाताही तोटा नसलेने आपले रिटर्न अधिक बाळसेदार होण्याच्या द्रुष्टीने ( कर्जे वगैरे मिळण्यासाठी) असल्यास ते पैसे इन्कम म्हणून जरुर दाखवावे. ते पैसे एक रकमी टॅक्स न भरता मिळतील?

मुलाच्या/मुलीच्याच काय पण करसवलत मिळत नसल्यास आपणही पीपीएफ वरील भर कमी करावा आणि ते पैसे म्युच्युअल फंड मधे वगैरे गुंतवावे. अधिक माहिती हवी असल्यास व्य.नि करावा.

ज्ञानव's picture

2 Jan 2014 - 3:22 pm | ज्ञानव

मुलाच्या/मुलीच्याच काय पण करसवलत मिळत नसल्यास आपणही पीपीएफ वरील भर कमी करावा आणि ते पैसे म्युच्युअल फंड मधे वगैरे गुंतवावे.

जरी हे बरोबर वाटत असले तरी

१)म्युच्युअल फंड्स हे शेअर मार्केटशी संबधित असल्याने रिस्कसुद्धा शेअर्सबरोबरच निगडीत असते...

२)म्युच्युअल फंड्सचे परतावे आणि पी पी एफ चे परतावे आणि मुख्य म्हणजे दोन्ही गुंतवणुकीची उद्दिष्टे...

३)आणि गुंतवणूक किंवा पी पी एफ चे उद्दिष्ट फक्त आणि फक्त कर वाचवणे आहे का ?

ह्या वरील ३ गोष्टींचा विचार आपण करावा

तसेच जर पी पी एफ ८% वार्षिक परतावा देतय पण करसवलत मिळत नाहीये अथवा मिळते आहे तर त्याची तुलना तशीच एखादी गुंतवणूक योजना बाजारात आहे का असल्यास त्या गुंतवणुकीबरोबर करावी.

मुलाच्या/मुलीच्या नावाने १ लाखाचे पीपीएफ भरावे का? की मी पीपीएफ वर जास्तच भरवसा ठेवतो आहे आणि ते पैसे म्युच्युअल फंड मधे वगैरे गुंतवावे?

तुम्हाला स्वतःला गुंतवणुकीबाबत शंका असेल अथवा अजीबातच माहिती नसेल तर पी पी एफलाच टाकावे.

माहिती नसेल तर ती तुम्ही ब्रोकर वर अवलंबून राहाल जे घातकी ठरू शकते.

प्रसाद भागवत's picture

3 Jan 2014 - 11:44 am | प्रसाद भागवत

SECTIONS 80C TO 80U SPECIFIES THE DEDUCTIONS TO BE MADE FROM THE GROSS TOTAL INCOME. GROSS TOTAL INCOME MEANS THE TOTAL INCOME, UNDER ALL HEADS OF INCOME, COMPUTED IN ACCORDANCE WITH THE PROVISION OF THE ACT [SECTION 80B(5)].

इथे वर मांडलेल्या सेक्शन नुसार जे उत्पन्न UNDER ALL HEADS OF INCOME, COMPUTED म्हणून डिफाईन केले आहे ते कोणत्या वर्षाचे? GROSS TOTAL INCOME कोणत्या वर्षाचे असते त्याच वर्षाचे असते ना? अह्सी शंका उपस्थित करन्यात आली होती. त्यावर माझा खुलासा असा-

शब्दाचा अथवा कायद्याचा कीसच काढावयाचा झाला तर " --- total income computed in accordance with the provisions of this Act, before making any deduction under this Chapter ---" ही वाक्य रचना फक्त याच वर्षासाठी आहे असे कशावरुन ?? व्याकरण वा काळांचा अभ्यास केलेली कोणीही व्यक्ती हे वाक्य वर्तमानाईतकेच भुतकाळालाही लागु पडते हे सहज सांगु शकेल.

याचाच अर्थ स्पष्ट आहे, गेल्या वर्षी विवरण पत्रकांत दाखविलेल्या उत्पन्नातुनही ( जे आता या वर्षी करीता त्या करदात्याची संपत्ती, wealth म्हणुन गणली जाईल) करदाता अशी गुंतवणुक करु शकतो.

खरे तर खरे म्हणजे अशा प्रकारची तरतुद करण्याचा उद्देश हा करदात्यांस सक्तीची बचत करावयास लावणे आणि त्याच वेळी बेनामी व्यवहार टाळणे एवढाच आहे. आणि सदरची गुंतवणुक ही करदात्याच्याच खात्यातुन व्हावी एवढीच अपेक्षा आहे, खात्याकडुन केल्या vividh गेलेल्या निर्धारणांत( assessment) वा दिल्या गेलेल्या निर्णयांतुन ही बाब पुरेशी स्पेष्ट आहे..

समजा एखाद्या करदात्याचे वार्षिक उत्पन्न 3,50,000 आहे, त्याचे पुस्तकांत दिसणारे वार्षिक खर्च रु. ,2,80,000, आहेत आणि त्याने बॅकेकडुन र. 1,50,000 एवढी उचल वा कर्ज घेतले आहे, अशा परिस्थित्तीत तो या कलमाखाली रु.1,00,000 ची गुंतवणुक केल्यास, वर व्यक्त अर्थाप्रमाणे ती रु 70,000 पर्यंतच ग्राह्य मानुन उर्वरित रु 30,000 करदात्याच्या उन्पनातुन आलेली नाही या अर्थी नाकारली जाईल काय ?? --- याचे उत्तर नाही असे आहे. गुंतवणुक ग्राह्य मानली हाईल.

एका करदात्याने तर मार्च महिन्यात आपल्या केडिट कार्डाने इन्शुरन्स चा हप्ता भरला आणि कार्ड कंपनीने तो पुढील आर्थिक वर्षांत (म्हणजे अप्रिल मधे) करदात्याकदुन वसुल केला. अशी गुंतवणुक ही खात्याने नव्हे तर ट्रिब्युनलने मान्य केली आहे. बाकी येथे काथ्याकुट करताना काही विद्वानांना अशा विमा वा पीपीफ गुंतवणुकी, पुन्हा एकदा, त्या करदात्याच्याच खात्यातुन केल्या आहेत हे सिद्ध करण्याची जबाब्दारी करदात्यावर असलेने) रोखीने भरु नयेत याचे भान दिसत नाही हा भाग अलहिदा.

असो. माझे अनेक अशील अनेक वर्षे अनेकदा या प्रकारचे व्यवहार करीत असलेने मला त्याच्या वैधतेविषयी थोडीही शंका नाही मात्र माझ्याकडे या व्यतिरिक्त अधिक काही सांगण्यासारखे नसल्याने, मी स्वतःला कोणत्याच विषयातला 'माहिर' समजत नसल्याने आणि मुद्द्यांची सरमिसळ, तथ्थ्यांचे गौडबंगाल, वा शब्द्बबंबाळ अतार्किक पोस्ट्स करणे अथवा 'चुकीचे अर्धवट सल्ले' देणारे लिखाण करणे अशी कोणतीही आयुधे मला वापरता येत नसल्याने या, आयकर ककम 80C बाबतची,चर्चा माझ्ह्यापुरती थांबवतो.

ज्ञानव's picture

3 Jan 2014 - 12:54 pm | ज्ञानव

मुळ मुद्दा सोने खरेदी हा होता पण नंतर तो पी पी एफ मधून पैसे काढून परत पी पी एफ ला भरले तर आयकर खात्याला चालते का ? इथे कुणीतरी नेला आणि तिथून तो आयकर ह्या क्षेत्रात गेला....... मी मागे मागे मुर्खासारखा फिरत राहिलो आणि मीच हि चर्चा शब्दबंबाळ अतार्किक आणि शब्दांचे डोंगर उभी करून दिशाहीन केली हे आरोप हि पहिले

"आता आपणच बँकेकडून कर्ज हा नवीन मुद्दा उपस्थित केला आहे"

जो वरील प्रतिसादात आणि मुळ धाग्यात कुठेही आलेला नाही.
८० सी च्या अनुषंगाने तसेच कर्ज काढून भरलेल्या विम्याच्या हप्त्याआड आपण जे काही खुलासा म्हणून वर मांडले आहे.

त्यावर मी पुन्हा "मुद्द्याची सरमिसळ" "शद्बबंबाळ" "अतार्किक" आणि "तथ्याचे गौडबंगाल" ह्याच्या आधारे बराच मोठा खुलासा लिहू शकतो जे मी न करणे हेच आता "शहाणपणाचे" होईल.

बाकी आपण सी ए आहात का ? ह्या साध्या शब्दात आणि तर्कशुद्ध भाषेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले असते तर आवडले असते.

बाकी माहीर तर मी आहेच.

*** करसवलत मिळविण्यासाठी करावयाची गुंतवणुक करदात्याने त्याच्या करपात्र उत्पन्नंतुन करावी एवढीच आयकर खात्याची अपेक्षा आहे.

हे वाक्य माझे नाही. दिनांक २६/१२/२०१३ रोजी 17.३६ चे पोस्ट मधील आपलेच वाक्य आहे.
असो....समाप्त.

उपाशी बोका's picture

3 Jan 2014 - 1:42 pm | उपाशी बोका

बाकी आपण सी ए आहात का ? ह्या साध्या शब्दात आणि तर्कशुद्ध भाषेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले असते तर आवडले असते.

तुम्ही उगीचच फार काथ्याकूट करताय, असं माझं मत झालंय. तुमच्या या अट्टाहासाखातर मी माझ्या सी.ए. मित्राशी बोललो. तो म्हणाला, पीपीएफ गुंतवणुकीवर टॅक्स वाचतो, withdrawals आणि व्याज हे टॅक्स-फ्री असतात. जर किमान १ लाख वार्षिक उत्पन्न असेल, तर तुम्ही किमान ५०० आणि कमाल १ लाखपर्यंत पीपीएफमध्ये भरू शकता (तुम्ही withdrawal घेतले किंवा नाही घेतले तरी). आता तुमचे समाधान झाले का? नसेल झाले, तर "तुमच्या" सी.ए.बरोबर बोला.

बाकी माहीर तर मी आहेच.
या बाबतीत मी सहमत नाही, असं खेदाने म्हणावे लागेल. तुम्ही स्वतः सी.ए. नाही, CFP पण नाही, तरी आर्थिक सल्लागाराचे काम करताय, म्हणजे आश्चर्यच आहे. तुमचे क्लायंट तुमच्यावर विश्वास ठेवत असतील, पण मी ठेवणार नाही, हे मात्र नक्की. कोणावरही आंधळा विश्वास ठेऊ नये, असे माझे स्पष्ट मत आहे.

ज्ञानव's picture

3 Jan 2014 - 2:29 pm | ज्ञानव

माझ्या अशीलाना माझा हाच सल्ला असतो.

"कुणावरही" आंधळा विश्वास ठेऊ नये. (ह्यात कुणावरही हा शब्द फार महत्वाचा वाटतो मला )
सल्लागाराचे काम आम्ही गेली (१९९६-२०१३ )इतकी वर्षे करतो आहे. सरकार तर्फे केसेस दिल्या जातात (कुठलीही गैरव्यवस्था, लाच लुचपत काहीही न करता)आम्ही त्याला आमच्या "शब्दबंबाळ" प्रतिसादाने प्लीड करतो.
नवख्या सीएचे सुद्धा प्रसंगी आभार आणि कौतुक चार चौघात मी केलेलं आहे आणि काही दिग्गज सी ए चुकत असताना त्यांनासुद्धा त्यांच्या वयाचा, अनुभवाचा शिक्षणाचा मान देऊन चूक दाखवली आहे.

वाईट इतकेच वाटते कि कायदा हा कीस काढून समजून घ्यावाच लागतो नुसते व्याकरण चेक करून चालत नाही.

पी पी एफ गुंतवणुकीवर कर वाचतो.......बरोबर
withdrawals आणि व्याज हे टॅक्स-फ्री असतात.....पूर्ण बरोबर
किमान ५०० आणि कमाल १ लाखपर्यंत पीपीएफमध्ये.....हे हि बरोबर.

पण तुम्ही जर सगळा पोस्ट आणि प्रतिसाद वाचलेत तर मुद्दा वेगळा आहे साहेब.

असो शब्द बंबाळ होतंय हळूहळू ...तेव्हा समाप्त.

अवांतर : इथे कुणी माझ्यावर विश्वास (आंधळा का होईना )ठेवू नये आणि योग्य मार्गदर्शनपर माहितीपूर्ण लेख इथे अन्य सर्वांकडूनहि यावेत, त्यावर चर्चा व्हाव्यात आणि माझ्याच ज्ञानात भर पडावी ह्यासाठीच वेगळ्या दालनाचा माझा प्रयत्न चालू होता पण आता तो हि मी सोडून देतोय.

आदूबाळ's picture

3 Jan 2014 - 11:25 pm | आदूबाळ

ज्ञानवजी

सेक्शन ८०सी ची वजावट मिळवण्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक ही करपात्र उत्पन्नातूनच करावी लागते असं कुठे लिहिलं आहे? सेक्शन ८०सी(१) the whole of the amount paid or deposited in the previous year असं म्हणतो.

पेड ऑर डिपॉझिटेड ची रक्कम शेतीचं (किंवा अन्य सेक्शन १०) उत्पन्नही असू शकतं, जे एरवी "ग्रॉस टोटल इन्कम" मध्ये धरलं नाही, तरी "इन्कम" असतंच.

ज्ञानव's picture

4 Jan 2014 - 9:22 am | ज्ञानव

आपण सी ए चा अभ्यास करताय असे माझ्याच लाभांश ह्या धाग्यावर "dividnd striping" असा जो प्रतिसाद आपण दिला होतात त्या प्रतिसादाखाली वाचनात आले.
वर आपण जे म्हणताय त्याबाबत आपण प्रत्यक्ष भेटून बोलू या का? कारण आयकर कायदा हा एक धर्मग्रंथ आहे. तुम्ही जे वर म्हणताय त्याचे खुलासे मी देत बसलो तर पुन्हा माझ्यावरच "शब्दबंबाळ" लेखन हा आरोप होईल.
तरीही एव्हढेच लिहितो कि...
१)

कारण कर बचती साठीची गुंतवणूक हि त्या वर्षाच्या इन्कम मधूनच व्हायला हवी असा नियम आहे.

Thu, 26/12/2013 - 14:38 हे माझे वाक्य आहे.

२)

सेक्शन ८०सी ची वजावट मिळवण्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक ही करपात्र उत्पन्नातूनच करावी लागते असं कुठे लिहिलं आहे?

हे वाक्य माझे नाही.

३)इन्कम आणि taxable इन्कम ह्यामधील फरक आपणही जाणताच.

बाकी मी ह्यावर जास्त काही लिहू इच्छित नाही. पण जर प्रत्यक्ष भेटलात तर तुमचे उदाहरणासहीत शंका निरसन करीन.

ज्यांना पी पी एफ मधील withdrawal पुन्हा पी पी एफ मध्येच केले आता मला tax बेनिफिट द्या असे विवरण पत्रात दाखवायचे आहे त्यांनी तसेच करावे (पण मिन्ग्लीग ऑफ फंड्स न करता छातीठोकपणे....) हा सल्ला मी आयुष्यात देणार नाही कारण ते disallow होऊन माझ्या अशिलाचे नुकसान होईल.
.

ज्ञानव's picture

4 Jan 2014 - 9:26 am | ज्ञानव

सेक्शन ८०सी ची वजावट मिळवण्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक ही करपात्र उत्पन्नातूनच करावी लागते

हे माझे वाक्य नाही.

आयुर्हित's picture

4 Jan 2014 - 5:06 am | आयुर्हित

सोने की कीमत में होगी 30 साल की सबसे बड़ी गिरावट
Source :http://www.patrika.com/news/gold-to-witness-biggest-fall-in-over-30-year...

कळावे, लोभ असावा,
आपला लाडका :
आयुर्हीत

ज्ञानव's picture

4 Jan 2014 - 9:25 am | ज्ञानव

उठाव सोना जितना मंगता है लेकीन गीरावट के पु रे थमने के बाद.....

मारकुटे's picture

5 Jan 2014 - 11:06 am | मारकुटे

काय ठरलं मग?

आयुर्हित's picture

16 Dec 2014 - 11:02 am | आयुर्हित

MCX वरील सोन्याचा भाव आज रोजी २७०४५/-

याचा अर्थ एका वर्षापूर्वी ३२०००/- ने सोने घेणारे एका वर्षात (फक्त) ५०००/-ला झोपले!

उपाशी बोका's picture

23 Nov 2015 - 1:18 am | उपाशी बोका

ज्ञानव, तुमच्या 'सिस्टीम'ची सध्या काय परिस्थिती आहे? हे जाणून घ्यायला आवडेल.

जयन्त बा शिम्पि's picture

23 Nov 2015 - 3:14 am | जयन्त बा शिम्पि

१) सामान्य माणसाने , वा सामान्य मराठी माणसाने , चढ उतार होणार्‍या , बेभरवशाच्या , सोन्याच्या गुंतवणुकीपेक्षा , पी पी एफ मध्येच पैसे टाकीत रहावे
२) सध्याच्या नियमानुसार पी पी एफ मध्ये दर वर्षी रुपये १,५०,०००/- पर्यंत गुंतवता येतात.
३) बघता बघता १५ वर्षे कशी बचत होते हे कळत नाही. लोक २५/ २५ वा ३० /३० वर्षांची विमा पॉलिसी सहज काढतात, त्यावेळी एव्हढ्या दीर्घ मुदतीचा विचार कोणी करतात काय ? ( म्हणजे मुदत पुर्ण झाल्यावर किती पैसे मिळतील ? त्यावेळी रुपयाची किंमत किती घसरली असेल ? इ इ )
४) १५ वर्षानंतर , तुमचे पी पी एफ चे खाते पुढे दर पाच पाच वर्षे दोन प्रकारे वाढवू शकता. एक म्हणजे दरवर्षी गुंतवणुकीसह किंवा गुंतवणूक विरहीत. पाच पाच वर्षे, गरज नसेल तर वाढवीत रहाणे अधिक चांगले.
५) पी पी एफ खात्यात दर महिन्याच्या १ ते ५ तारखेच्या आत पैसे भरले तर त्या त्या महिन्याचे सुद्धा व्याज , खात्यावर जमा होते. ५ तारखेनंतर मात्र पैसे भरल्यास, त्या महिन्याचे व्याज मिळत नाही.१ ते ५ तारखेपर्यंत रोख पैसे भरावयाचे नसल्यास, चेकने पैसे भरता येतात.
त्यासाठी चेक ५ तारखेपर्यंत क्लिअर व्हावयास हवा. मी त्यासाठी महिन्याच्या शेवटच्या किंवा दोन दिवस अगोदरचा चेक देतो. पैसे आरामात ५ तारखेच्या आत जमा होतात. कारण पाच तारखेनंतर , अन्य बचत खात्यातून पैसे काढलयास , बचत खात्यामधील , काढलेल्या पैशांचे व्याज तर मिळत नाही, शिवाय , पी पी एफ मध्ये सुद्धा व्याज मिळत नाही. दोन्हीकडून व्याजाचे नुकसान कां करून घ्यावे ?
६) पी पी एफ खात्यातुन , उचल मिळणे फारसे अवघड नाही. एक तारखेस अर्ज केला, तर जास्तीत जास्त दुसर्‍या दिवशी पैसे हातात मिळतात. तेच रोख पैसे , पाच तारखेच्या आत ,पी पी एफ मध्ये भरल्यास, गुंतवणुक सुद्धा दाखविता येते. यात गैर काहीच नाही. जगात , किमान भारतात , असा कोणीही नाही, जो प्रत्येक कायदा पाळतो. साधे रहदारीचे नियम घ्या. सिग्नलला पोलिस असला , तर आम्ही नियम पाळतो. आणि पोलिस नसला तर , सिग्नल हिरवा होण्याची वाट थोडीच बघत बसतो ! ! हाण तिच्यायला ! !
६) शेवटी सर्वात महत्वाचे, लोकांना बचतीची संवय लागली पाहिजे आणि सरकारला सुद्धा विकासासाठी पैसा हवा असतो.

प्रकाश घाटपांडे's picture

23 Nov 2015 - 9:34 am | प्रकाश घाटपांडे

६) शेवटी सर्वात महत्वाचे, लोकांना बचतीची संवय लागली पाहिजे आणि सरकारला सुद्धा विकासासाठी पैसा हवा असतो.

मग १.५ लाख लिमिट का ठेवली? जर ती नसती ठेवली तर लोकांनी गुंतवले असते व सरकारला विकासासाठी अधिक निधी उपलब्ध झाला असता.

पगला गजोधर's picture

23 Nov 2015 - 9:40 am | पगला गजोधर

गरजेपेक्षा जास्त वित्त पुरवठा पण नको असतो सरकारला.

प्रकाश घाटपांडे's picture

23 Nov 2015 - 9:50 am | प्रकाश घाटपांडे

मग सरकार नेहमी कर्जबाजारीच का असते? बाहेरुन पैसा घेण्यापेक्षा लोकांकडूनच घ्यावा ना!

सुबोध खरे's picture

23 Nov 2015 - 9:51 am | सुबोध खरे

दोन चार टक्क्यांनी कोण सरकारला पैसे देईल ते सुद्धा १०-१५ वर्षे मुदतीचे.
खालील प्रतिसाद पहा.

प्रकाश घाटपांडे's picture

23 Nov 2015 - 10:10 am | प्रकाश घाटपांडे

प्रतिसाद नंतर वाचला.

सरकारला जागतिक बँकेकडून किंवा जपान कडून एक ते दोन टक्क्यांनी कर्ज उपलब्ध असेल तर सरकार ३९% (पर्यंत) (९ टक्के व्याज आणि ३०% कर वजावट) दराने पैसे कशाला घेईल.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही सरकारने सामान्य माणसांसाठी उपलब्ध करून दिलेली सुविधा आहे त्यामुळे त्याच्यावर बंधन( लिमिट) आहे.

प्रसाद भागवत's picture

23 Nov 2015 - 10:14 am | प्रसाद भागवत

सरकार ३९% (पर्यंत) (९ टक्के व्याज आणि ३०% कर वजावट) दराने??? डॉ. साहेब, अतर्क्य आकडेमोड..

सुबोध खरे's picture

23 Nov 2015 - 10:56 am | सुबोध खरे

साहेब

जेंव्हा तुम्ही १०,०००/- भविष्य निर्वाह निधीत ठेवता तेंव्हा त्याच्या वर आपल्याला ३०००/- आय कर ( ३०% दर वाल्यांना म्हणून कंसात "पर्यंत"आहे) वजावट ताबडतोब मिळते. म्हणजेच सरकारला मिळणारे ३००० रुपये कमी होतात (आणि वर ९ % व्याज आपल्याला द्यायला लागते.) म्हणजे पहिल्या वर्षात सरकारला सात हजार मिळतात आणि वर्ष अखेरीस ९०० रुपये व्याज द्यायला लागते. म्हणजे सरकारच्या खात्यात ६१००/- रुपये वर्षा अखेरीस जमा होतात वापरासाठी. परंतु त्याचे नक्त मुल्य( सरकारला आपल्याला देणे) मात्र १०,०००/- आहे.

प्रसाद भागवत's picture

23 Nov 2015 - 11:54 am | प्रसाद भागवत

असहमत....सरकार देत असलेली कर सवल एकदाच मिळते मात्र पैसे पुढील १५ वर्षे वापरायला मिळतात.
या न्यायाने ही करसवलत या पुर्ण कालावधीकरिता विभागुन घ्यावयास हवी. करसवलत हे अल्प व्याजाने दीर्घकालीन रक्क्कम मिळविण्यासाठीचे गाजर आहे. मला या सवलतीची तुलना हुषार व्यापारी देत असलेल्या भरघोस 'डिस्काउंट' शी करावीशी वाटते...अर्थात PPF मध्ये मुदर्पुर्व पैसे काढता येतात ही बेसिक माहिती मलाही आहेच,. या पोस्टचा हेतु ३०% सवलतीचा फायदा पहिल्याच वर्शीच्या परताव्यात दाखविण्याच्या तर्क चुकीचा आहे हे सांगणे हा आहे

प्रसाद भागवत's picture

23 Nov 2015 - 11:54 am | प्रसाद भागवत

असहमत....सरकार देत असलेली कर सवल एकदाच मिळते मात्र पैसे पुढील १५ वर्षे वापरायला मिळतात.
या न्यायाने ही करसवलत या पुर्ण कालावधीकरिता विभागुन घ्यावयास हवी. करसवलत हे अल्प व्याजाने दीर्घकालीन रक्क्कम मिळविण्यासाठीचे गाजर आहे. मला या सवलतीची तुलना हुषार व्यापारी देत असलेल्या भरघोस 'डिस्काउंट' शी करावीशी वाटते...अर्थात PPF मध्ये मुदर्पुर्व पैसे काढता येतात ही बेसिक माहिती मलाही आहेच,. या पोस्टचा हेतु ३०% सवलतीचा फायदा पहिल्याच वर्शीच्या परताव्यात दाखविण्याच्या तर्क चुकीचा आहे हे सांगणे हा आहे

सुबोध खरे's picture

23 Nov 2015 - 12:32 pm | सुबोध खरे

करसवलत हे अल्प व्याजाने दीर्घकालीन रक्क्कम मिळविण्यासाठीचे गाजर आहे
असहमत-- तसे असेल तर ६ आणि ७ टक्क्याने भांडवली नफ्याचे कर्जरोखे किंवा ८% चे सरकारी कर्ज रोखे सरकार कशाला काढेल? या वरील व्याज करमुक्त नसताना हि त्यात भरपूर गुंतणूक होते.
मी परत हेच म्हणेन कि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हि भारत सरकारने सर्व सामान्य लोकांना दिलेली सुविधा आहे आणि तिचा लाभ लोकांनी जरूर घ्यावा.

प्रसाद भागवत's picture

23 Nov 2015 - 11:54 am | प्रसाद भागवत

असहमत....सरकार देत असलेली कर सवल एकदाच मिळते मात्र पैसे पुढील १५ वर्षे वापरायला मिळतात.
या न्यायाने ही करसवलत या पुर्ण कालावधीकरिता विभागुन घ्यावयास हवी. करसवलत हे अल्प व्याजाने दीर्घकालीन रक्क्कम मिळविण्यासाठीचे गाजर आहे. मला या सवलतीची तुलना हुषार व्यापारी देत असलेल्या भरघोस 'डिस्काउंट' शी करावीशी वाटते...अर्थात PPF मध्ये मुदर्पुर्व पैसे काढता येतात ही बेसिक माहिती मलाही आहेच,. या पोस्टचा हेतु ३०% सवलतीचा फायदा पहिल्याच वर्शीच्या परताव्यात दाखविण्याच्या तर्क चुकीचा आहे हे सांगणे हा आहे

प्रसाद भागवत's picture

23 Nov 2015 - 12:01 pm | प्रसाद भागवत

ओह.. पोस्ट्च्या पुनुरुक्ती बद्दल क्षमस्व.
या शिवाय..... 'पहिल्या वर्षात सरकारला सात हजार मिळतात आणि वर्ष अखेरीस ९०० रुपये व्याज द्यायला लागते. म्हणजे सरकारच्या खात्यात ६१००/- रुपये वर्षा अखेरीस जमा होतात वापरासाठी...... अशा प्रकारची पैशाची Time Value विचारात न घेता केलेली विधाने आकडेवारी ओढुन ताणुन केल्याची साक्ष आहेत.

सुबोध खरे's picture

23 Nov 2015 - 12:21 pm | सुबोध खरे

प्रसाद साहेब
आपण लिहिले इतके सोपे हि ते नाही.
कर्जाचा दर सरकारला पहिल्या वर्षात ३९ %च पडतो. तुम्ही तुमचे गृह कर्ज १० लाखाचे ९ टक्क्याने घ्यायचे असेल आणि त्यातील आपल्याला सातच लाख हातात पडणार असतील तर ते घ्याल का?
कारण आपल्याला मिळणारी वजावट पहिल्या वर्षातच मिळते. पुढच्या वर्षात हे कर्ज आपल्याला ९% व्याज ( अधीक त्याच्या व्याजावर मिळणारा आयकर २. ७ % हाही बुडतो म्हणजे ११. २७ %).
आपण जेवढे अधिक पैसे पुढच्या वर्षात भरता तेवढे परत साकारला ३९ % ने कर्ज दिल्यासारखे आहे.
१०००० रुपये १० टक्के व्याजाने घेता तेंव्हा तुमच्या हातात १०००० रुपये येतात. पण १०००० रुपये घेतले म्हणून ३०% कापून मुळातच ७००० रुपयेच हातात पडतात. त्यावर १५ वर्षाचे व्याज( (९ %) १३५०० होते यावरिल पण आय कर सरकारला मिळत नाही. हा कर पण ३०% म्हणजे ४००० होतो. म्हणजे सरकारला एकूण सात हजार मिळतात आणि त्यावर व्याजासकट आणि या न मिळालेल्या करासकट एकूण रक्कम २७५०० होते.
म्हणजेच सरकारने ७००० रुपये तुमच्याकडून घेतले तर ते कर्ज एकंदर २७५०० रुपयाला पडते. यात सरळ व्याज धरलेले आहे. चक्रवाढ व्याजाच्या दराने ते अजून जास्त होतील.
म्हणजे हे कर्ज किती दराने पडले हे कोणी गणितज्ञ सांगू शकेल काय?

सुबोध खरे's picture

23 Nov 2015 - 12:24 pm | सुबोध खरे

चक्रवाढ दराने सात हजाराचे व्याज+ मुद्दल ३८४१९ रुपये होईल.

प्रसाद भागवत's picture

23 Nov 2015 - 1:02 pm | प्रसाद भागवत

डॉ.साहेब, एखाद्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा त्या गुंतवणुकीचा एकुण कालावधी व त्यात मिळणारा एकुण परतावा याचा एकत्रित आढावा घेवुन मग ठरतो. वेगगेवळ्या वर्षी परताव्याचा दर वेगवेगळा असल्यास वास्तववादी परतावा काढण्यासाठी IRR ( Internal Rate of Return) हे तंत्र वापरावे लागते.

येथे आपण गुंतवणुक एकापेक्षा जास्त वर्षे करणार आहोत असे असताना फक्त पहिल्या वर्षी किती फायदा मिळेल याचा विचार करुन निर्णय घेणे तर्क्संगत नाही.

शिवाय जो 30% करसवलतीचा भाग आहे...अन्य ठिकाणीही तो उपलब्ध आहेच ही. तेंव्हा 39% ही ( जरी चुकीची असली तरीही) काही असामान्य गोष्ट नव्हे.

प्रसाद१९७१'s picture

23 Nov 2015 - 12:03 pm | प्रसाद१९७१

डॉक्टरसाहेब, हे जरी खरे असले तरी परत फेड परकी चलनातच करावी लागते. आणि भारतात महागाई जास्त असल्या मुळे दर वर्षी रुपयाचे अवमुल्यन होतच असते. त्यामुळे एकुणात परतफेड करायची रक्कम रुपयात जवळपास तेव्हडीच येते.

पीपीएफ ला मर्यादा आहे कारण तितके पैसे सरकारला नको आहेत. मर्यादा वाढवली आणि गरज नसली तरी सरकारला पैसे घ्यावे लागतील आणी त्यावर व्याज द्यावे लागेल.

प्रसाद भागवत's picture

23 Nov 2015 - 10:12 am | प्रसाद भागवत

तीव्रतेने असहमत...मात्र हा मुद्दा माझ्ह्याकडुन अनेकदा स्पष्ट केला गेला असल्याने नवीन लिहिण्यासारखे काही नाही.

सुबोध खरे's picture

23 Nov 2015 - 9:45 am | सुबोध खरे

आणी सोन्याचा भाव उतरला तर ?
गेली चार ते पाच वर्षे २००७ ते २०१२ सोन्याचा भाव चढतच गेला म्हणून ज्ञानव साहब त्या काळात यशस्वी झाले.(त्या अगोदर असे झाले नसते ही गेल्या ८८ वर्षांच्या सोन्याच्या भावावरून स्पष्ट दिसत आहे.) याच काळात जर सोने पडले असते तर दुहेरी नुकसान झाले असते. हा सट्टा आहे सर्व समान्य माणसाने खेळू नये असे मला वाटते.

हा माझा २६ /१२/२०१३ तारखेचा प्रतिसाद होता. वर पहा
आज जवळ जवळ २ वर्षांनी सोने वाढले तर नाहीच परंतु १५ टक्क्यांनी कमी झाले आहे. दोन वर्षात झालेल्या महागाईचा ( चलनवाढीचा) दर जरी ६% धरला तरी २०१३ साली सोने आर्थिक गुंतवणूक म्हणून ज्यांनी केली त्याचे २७ % नक्त तोटा झाला असे स्पष्ट दिसून येत आहे.
जाणकारांनी स्पष्टीकरण द्यावे.
भावनिक गुंतवणूक ( मुलीचे लग्न इ. साठी सोने घेतले तर त्याला आर्थिक गुंतवणूक म्हणता येणार नाही आणि ती हौस म्हणून धरली जाईल. हौसेला मोल नसते

मार्मिक गोडसे's picture

23 Nov 2015 - 10:32 am | मार्मिक गोडसे

सरकारला जागतिक बँकेकडून किंवा जपान कडून एक ते दोन टक्क्यांनी कर्ज उपलब्ध असेल

परकीय चलनातले कमी व्याजाचे कर्ज जागतीक चलनाच्या अस्थीर विनिमय दरामुळे महागही ठरू शकते. जागतीक मंदीच्या काळात देशाची निर्यात घटल्यास हे कर्ज फेडणे अजुनच कठीण होउन बसते.

संदीप डांगे's picture

23 Nov 2015 - 11:05 am | संदीप डांगे

सोने हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे. खरेंनी म्हटल्याप्रमाणे २००७ ते २०१२ याकाळात सोन्यात अनैसर्गिक वाढ झाली. तीच आज अनेकांच्या बोकांडी बसली आहे. चांदीने २०११ मधे बहुधा ७५हजार पर्यंत दर घेतला होता. आज काय परिस्थिती आहे? माझ्या माहितीतल्या अनेकांनी त्याकाळात सोने विकून चांदी घेतली आता पस्तावत आहेत. अशा प्रकारच्या खेळात जे चढलेला रंग पाहून शेवटी भाग घेतात ते वाईट हरतात. हेच रीअल इस्टेट मधेही झालं.

सोनं दागिन्यांच्या स्वरुपात तर कधीच घेऊ नये. आज मंगळसूत्र करायला किमान ३ तोळं शुद्ध सोनं लागतं. त्यात मजुरी किमान ३०० रुपये प्रतिग्राम. म्हणजे ९००० रुपये + ७५००० रुपये सोनं = ८४००० रुपये. हेच मंगळसुत्र विकत घेऊन लगेच दुसर्‍या दुकानात त्याच दिवशी विकायला गेलं की ते होतं पुढीलप्रमाणे: घट २५% म्हणजे २२.५ ग्रॅम गुणीले घेण्याचा भाव (नेहमी २०० ते ४०० असा कितीही कमी असू शकतो.) म्हणजे सुमारे ५५ हजार रुपये हातात मिळतात. तर ८४-५५ = २९ हजार रुपये घेतल्यासरशी घालवणारी वस्तू अ‍ॅसेट कशी काय असू शकते?

बरेच लोक तर घेतलेले सोने कधीच विकत नाहीत. काहीही झाले तरी. अगदी भिकेला लागायची वेळ आली तरी.

माझ्या माहितीतल्या एक गृहीणी दर तीन-चार वर्षांनी जुने सोने मोडून नवीन दागिने करतात. म्हणजे नवीन दागिन्यांवर सरळ सरळ सराफाला सोन्याच्या किमतीच्या ५०% पर्यंत फुकट किंमत अदा करतात. काही वर्षांनी त्यांच्या जेव्हा लक्षात येईल की आपल्याकडे उपलब्ध सोन्याचे मूल्य आपण खर्च केलेल्या पैशांशी जुळत नाही तेव्हा काय होईल देवजाणे. परत ज्या सोनाराकडून सोने घेता तोच सोनार ते परत विकत घेतो. दुसरा घेत नाही.

मला तर अशी शंका आहे की खर्‍या सोन्याचे दागिने बाजारात मिळतच नसावे. किंवा २४ क्यारेटच्या नावाखाली १८क्यारेटचे दिले जातात. लाखाचे बारा हजार करायचे असतील तर नाजूक, भयंकर कलाकुसर असणारे दागिने घ्यावे.

हौसेला मोल नसते म्हणून ठिक पण सोन्यात 'गुंतवणूक' करणे शुद्ध मूर्खपणा आहे. ३५ हजाराने विकत घेतलेलं सोन्याचे आज २५ हजार भाव आहेत. तेही २ वर्षात. पुढे दहा वर्षांत तरी ते ३५ पार करेल अशी अजिबात आशा दिसत नाही.

मार्मिक गोडसे's picture

23 Nov 2015 - 11:33 am | मार्मिक गोडसे

नुकतीच सरकारने लाँच केलेल्या gold bond scheme ला अल्प प्रतिसाद का मिळाला? धातू स्वरूपातील सोन्यातील गुंतवणूकीपेक्षा नक्कीच उजवी होती ही स्किम. माझ्यामते फक्त अडाणीच लोकं सोने (धातू)खरेदी करतात.

भाऊंचे भाऊ's picture

23 Nov 2015 - 1:12 pm | भाऊंचे भाऊ

सोने आपल्याकडॅ हवेच कारण ते असणे हौस मौज अन प्रतिष्ठेशी निगडीत आहे. ही हौस मौज अन प्रतिष्ठा मिरवायला प्रत्यक्ष सोने अंगावर असणे आवश्यक ठरते, नुसतं कागद मिरवायला काय कामाचा ? म्हणून लोकांचा कल प्रत्यक्ष सोने घेण्याकडे असतो, गोल्ड बाँड घेण्याकडे नाही. कारण गुंतवणुकीची भावना कमी अन हौस मौज अन प्रतिष्ठा मिरवायची भावना जास्त असते. सणासुदीला आजही मी एखादी नखशिकांत दागीन्यांने मढलेली मुलगी/सुवासीनी बघतो तेंव्हा मन प्रसन्न होते. म्हणून हो हौस मौज अन प्रतिष्ठेपायी सोने अवश्य थोडे थोदे खरेदी करत चला पण त्याला आर्थीक गुंतवणूक अजिबात मानु नका.

प्रकाश घाटपांडे's picture

23 Nov 2015 - 3:20 pm | प्रकाश घाटपांडे

तुमचे सोने सरकारकडे ठेवा त्यावर तुम्हाला सोनेरुपीच व्याज मिळेल या स्किमचे काय स्थिती आहे सध्या?

मार्मिक गोडसे's picture

23 Nov 2015 - 4:15 pm | मार्मिक गोडसे
मार्मिक गोडसे's picture

23 Nov 2015 - 3:40 pm | मार्मिक गोडसे

सोने आपल्याकडॅ हवेच कारण ते असणे हौस मौज अन प्रतिष्ठेशी निगडीत आहे

पहीले प्रतिष्ठा कमवा, नंतर अंगावर खोटे सोने घातले तरी समोरचा ते सोने खरे समजतो. लग्नकार्यात माझी आई कर्णफूल व कडे बेंटेक्सचे वापरते अजुनही कोणाला शंका आली नाही. हौसही होते, मिरवताही येते, बचतही होते व मुळात असलेल्या प्रतिष्ठतेला त्यामुळे कोणतीही बाधा येत नाही.

संदीप डांगे's picture

23 Nov 2015 - 9:18 pm | संदीप डांगे

सोन्यासोबत फार भावना असतात हो लोकांच्या चिकटलेल्या. तुम्ही लिहले तेच लिहायला मघाशी आलो होतो. पण सोडून दिले. ते बोलतायत तसा विचार समाजातला बहुसंख्य वर्ग करतो. तुमच्या-माझ्यासारखा विचार करणारे फार थोडे. त्यामुळे सोडाच. माझ्या ओळखीतल्या एक गृहीणींचे खायचे-खर्चाचे वांदे आहेत पण लग्नकार्यात दिड किलोचे दागिने घालून फिरतात.

जयन्त बा शिम्पि's picture

23 Nov 2015 - 3:51 pm | जयन्त बा शिम्पि

जर पी पी एफ ला मर्यादा ठेवली नसती तर , कर्मचार्‍यांनी , अमर्याद ( वेतनापेक्क्षा जास्त ) पैसा गोळा केला असता , तोही भ्रष्टाचाराने , आणि असा हा वरचा काळा पैसा ( ब्लॅक मनी ) , ' पांढरा ' ( व्हाईट मनी ) झाला असता, शिवाय सरकारचे आयकराचे उत्पन्न , तेही बुडाले असते.

टवाळ कार्टा's picture

23 Nov 2015 - 9:22 pm | टवाळ कार्टा

सोने को कभी ना मत कहो ;)