कारवार - दाण्डेली सहल भाग-१

पुतळाचैतन्याचा's picture
पुतळाचैतन्याचा in भटकंती
18 Nov 2013 - 10:37 pm

तसा मिपावर लेख लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न…!!!
फार वर्षा पासून आरामशीर नोकरी हवी होती जिथे माझी विकांताला फिरण्याची हाउस पूर्ण करता येईल आणि ती मिळाल्यावर आता गाडी जोरात सोडली. बंगलोर हून निघून सकाळी हुबळी गाठली आणि सहलीला खर्या अर्थाने सुरवात झाली. हुबळी-गोकर्ण- मुरुडेश्वर-एडगुंजी - कारवार-दांडेली अशी २ दिवसात आटोपशीर वाटणारी सहल अपेक्षे पेक्षा फार सुंदर झाली.

हुबळी ते गोकर्ण हा रस्ता यल्लापुर नामक एका गावातून जातो. त्या गावात प्रसिद्ध असणारे डोसे (दोसे) हाणायचा कार्यक्रम झाल्यावर गाडी सुसाट सोडली.
हुबळी ते गोकर्ण या मुख्य रस्त्यात सहज नजरेस न पडणारा एक झुलता पूल लागला. झुलता पूल म्हणून त्याची किंमत सामान्याच पण त्यावरून दिसणारे हे दृश्य पहिले तर का थांबलो हे कळेल.
Karwar

आणि

On the way

आधाशा सारखे फोटो काढले पण पुढे अनेक पूल लागले ज्या वरून अजून सुंदर दृश्ये टिपता आली.
River

bridge

जसे जसे पुढे गेलो तसा निसर्ग पेटला होता. पुढे जाउन मुंबई-गोवा रस्त्याचा पुढचा भाग म्हणजे गोवा-कोचीन रस्ता आला. तिथून दक्षिणे कडे गेल्यावर साधारण १ तासांनी गोकार्णाचा रस्ता दिसू लागलं.
शेवटी १२.२५ ला कसे तरी गोकर्ण मंदिरात पोचलो. कसे तरी पोचलो कारण मंदिर १२.३० ला बंद होते अशी ऐकीव माहिती होति. गोकर्णचे मंदिर अतिशय सुबक व कोरीव वाटले. जास्त पैसे भरून लवकर दर्शनाच्या वाटेला न जाता साध्या ओळी मधून पण लवकर दर्शन मिळाले. सोमवारी गोकर्ण दर्शनाचे पुण्य घेऊन आणि मंदिरा पासून जवळच असणाऱ्या मंडपात प्रसादचे जेवण करून मुरुडेश्वर कडे प्रयाण केले. वाटेत गोकर्णाच्या बाजूला असणारा ओम बीच लागला, आणि तिकडे जाणारा रस्ता पण तेवढाच सुंदर आहे. हा रस्ता पाहताना आन्जरल्याच्या मंदिरा बाहेरून दिसणारा देखावा आठवला.

karwar

Karwar

हा बीच बघून मुरुडेश्वर गाठला कोण्या रत्नाकर शेट्टी नामक माणसाने हे मुरूडेश्वर्राचे भव्य मंदिर आणि मूर्ती बांधली आहे. हा क्रिकेट बोर्ड वाला शेट्टी नाही हे नंतर कळले. मंदिराच्या बाजूलाच मुरुडेश्वर चा बिच आहे. गर्दी फार असते पण हा बीच डेंजर आहे हे कळल्याने वोटर स्पोर्ट्स च्या नादाला लागलो नाहीं.

Karwar

तसे या भागातले प्रसिद्ध लोक म्हणजे कामत. कामतांचा गोतावळा बराच मोठा असावा. अनेक कामतांची अनेक हॉटेल इकडे दिसली. एव्हाना ५ वाजले होते. रात्र पडायच्या आता १०० कि. मी. लांब असणारे कारवार गाठायचे होते. मुरुडेश्वर हून निघाल्यावर ३० कि. मी. अंतरावर एड्गुंजी नामक गणपती चे कर्नाटकात प्रसिद्ध असणारे सुंदर मंदिर लगले. मुख्य रस्त्यापासून साधारण ६-७ कि. मी. आत असणारे हे मंदिर भव्य आहे. ते दर्शन झाल्यावर मात्र मस्त अंधारात गाडी सुसाट सोडली आणि आता कारवारच्या हॉटेल अमृत कडे सगळे लक्ष लागले होते. कारवार मध्ये मासे मिळणारे हे सर्वात चांगले हॉटेल आहे असे ऐकले होते. तिथे पोचण्या आधी कारवार मध्ये एन्ट्री करताना रवींद्रनाथ टागोर बीच लागला. रात्रीच्या अंधारात पण त्याचे सौंदर्य खुलले होते. तिथे जुलमाचा राम राम करून जेवायला हॉटेल गाठले आणि जे वाटेला येईल ते मनसोक्त हाणले.
रात्री ओळखीच्या पाहुण्यान कडे मुक्काम टाकला. खास कोकणी घरात राहायचा योग फार वर्षांनी आला सकाळी तिथे कारवार स्पेशल पोळी/नीर डोसे खावून बीच कडे प्रयाण केले. देवबाग आणि माजली असे २ बीच लागून आहेत. माजली बीच च्या पलीकडे गोवा चालू होते. आख्या बीच वर फक्त आम्ही ७-८ जण सोडून कोणी नव्हते. एवढा स्वच्छ किनारा फार दिवसांनी पाहत होतो. यथासांग डुम्बायचा सोहळा झाल्यावर खास मास्याचे घरगुती जेवण मिळाले.
Karwar

Karwar

परतीचा प्रवास कारवार-दंडेली-हुबळी भाग २ मधे….!!!

प्रतिक्रिया

पुतळाचैतन्याचा's picture

18 Nov 2013 - 11:29 pm | पुतळाचैतन्याचा

आपल्या प्रतिक्रिया जरुर कळवा

रुस्तम's picture

19 Nov 2013 - 7:23 am | रुस्तम

मस्त ....

फारच छान फोटो .या सहलीकडे खास लक्ष आहे .इकडे जाणार आहे .अप्सरा कोंडा धबधबा आणि बेट होनावरजवळ कुठे आहे ?, एका टिव्हिच्या कार्यक्रमात पाहिलेले .आगुम्बे आणि श्रिँगेरीपण पाहायचे आहे पुढच्या सहलीत दांडेलीबद्दल उत्सुकता आहे .

पुतळाचैतन्याचा's picture

19 Nov 2013 - 3:36 pm | पुतळाचैतन्याचा

अप्सरा असा धबधबा ऐकला नाहिये कारन तिथे जोग धब्धबा सर्वत प्रसिध्ह.श्रिन्गेरि बरेच दक्शिनेला आहे. एका सहलित सगळे होइल असे वाटत नाहि इतके लाम्ब लाम्ब आहे.

चौकटराजा's picture

19 Nov 2013 - 8:59 am | चौकटराजा

आमच्या लाडक्या पर्यटन राज्यातील हा प्रवास आवडला. १९७२ साली गोकर्णला गेलो होतो. आता सगळे फारच बदलले असणार . दांडेली बद्द्ल उत्सुकता आहे.

यशोधरा's picture

19 Nov 2013 - 9:18 am | यशोधरा

मस्त लिहिले आहे, आवडले. आमच्या कारवारबद्दल अजून जास्त लिहायचे की हो! :)
येल्लापूर.. :)

सुबोध खरे's picture

19 Nov 2013 - 9:44 am | सुबोध खरे

फोटो सुंदर आहेत. वर्णन जरा पटकन आटपल्यासारखे वाटले. जरा विस्ताराने लिहा म्हणजे अजून मजा येईल

सुहास..'s picture

19 Nov 2013 - 11:13 am | सुहास..

सहल आवडली

वर्णन अजुन डिट्टेलवारी येवु द्यात ...

या मार्च मध्येच जाऊन आलो होतो इथे.. बाकी ठिकाणीही जाणे झाले आहे.. फोटोसोबत अधिक वर्णन, अनुभवही येऊद्या

जायचंच आहे अशा स्थळांपैकी एक.

गोकर्न महाबळेश्वर म्हणतात तेच गोकर्ण ना?
फोटोज मस्त! माश्याची आठवण देउन खवळवल्याबद्दल निषेढ!! (आज कोठे मंगळवार...मग बुध..गुरु..शुक्र आन मग श्नि..)

पुतळाचैतन्याचा's picture

19 Nov 2013 - 2:05 pm | पुतळाचैतन्याचा

हेच गोकर्ण. शिवलिन्गचे नाव महाबलेश्वर आहे. भाग २ लवकरच.

प्रभाकर पेठकर's picture

19 Nov 2013 - 4:49 pm | प्रभाकर पेठकर

निसर्ग आणि मासे.... दोन्ही आमचे दुर्बल बिन्दू. कधी योग येतो आहे देवास ठावूक. वाचनखूण साठविली आहे.

जिन्क्स's picture

19 Nov 2013 - 5:25 pm | जिन्क्स

यल्लापूर जवळ 'याना' नावाचं गाव आहे. तिथे निसर्गाचा अद्भूत चमत्कार आहे. तो तुम्ही बघायला हवा होता. फोटो मिळाल्यास डकवतो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Nov 2013 - 7:15 pm | राजेंद्र मेहेंदळे

पुण्याहुन करायचे असेल तर कसे जावे लागेल? म्हणजे पुणॅ ते पुणे अशी राउंड ट्रिप म्हणतोय

पुतळाचैतन्याचा's picture

19 Nov 2013 - 7:35 pm | पुतळाचैतन्याचा

तुम्ही गाडी घेउन जाणार असे धरले तर सरळ पुणे-बेळगाव हायवेने यावे. बेळ्गाव गावातुन दान्डेलीला रस्ता जातो. मग दान्डेलिला मुक्काम करता येतो. बरी होटेल आहेत. सगळीकडे पाट्या आहेत. पुढे अन्शि पार्क करुन कारवार ला जाता येइल. कारवार पाहुन कुमटा मार्गे गोकर्ण, मुरुडेश्वर आणि बाजुचे अनेक बिच/मन्दिरे/नद्या पाहत साउथकडे जाउ शकता. परत येताना आला तोच मार्ग पकडा वा गोवा करुन फोन्डा- राधानगरि- कोल्हापुर- पुणे जाउ शकता.

घाटावरचे भट's picture

19 Nov 2013 - 7:44 pm | घाटावरचे भट

दांडेलीबाबत माहित नाही, परंतु मी गेल्या दिवाळीत गोकर्ण-मुरुडेश्वर-कारवार अशी ४ दिवसांची ट्रिप करून आलो. पुण्याहून गोकर्ण साधारण ६०० किमी आहे. रस्ता उत्तम आहे (एन एच ४ सोडल्यावरचा थोडा भाग वगळता). फाटे फाटे (६:३० वगैरे) निघालात तर दुपारी ३ पर्यंत गोकर्णमधे पोहोचता येते.

आधी गोकर्ण अशासाठी की मधे अंकोला (अकोला नाय) गाव लागते. तिथुन गोकर्ण दक्षिणेस साधारण तीस किमी आहे तर कारवार उत्तरेला ३० किमी. पण मुरुडेश्वर वगैरे करायचे असल्याने आधी तो मार्ग पकडला. गोकर्णात मुक्काम करून दुसर्‍या दिवशी ओम बीच वगैरे पाहिला. मग मुरुडेश्वरला गेलो. खरं तर मुरुडेश्वरचा बीच खूपच उथळ आहे. पाण्यात खेळायला भरपूर मजा येते (वॉटर स्पोर्ट्सचं माहित नाही). मुरुडेश्वरला मुक्काम करून (शेट्टी बाबाची ३ हॉटेल्स आहेत. चांगली आहेत) सकाळी कारवारकडे प्रयाण केले. कारवारला केटीडीसीच्या देवबाग बीच रिसॉर्ट मधे मुक्काम केला होता. जागा उत्तम आहे. देवबाग ही बेटसदृश जागा आहे. रिसॉर्टचा खासगी बीच अतिशय सुंदर आहे. तिथे एक दिवस मुक्काम करून पुण्याकडे प्रयाण केले. येताना कोल्लापुरात नातेवाईकांकडे मुक्काम केला आणि मग पुण्यात परतलो. असो.

अजून इच्छा असेल तर कारवारला टांग मारून मुरुडेश्वराहून खाली उडुपीपर्यंतसुद्धा जाता येइल. तो भागही सुंदर आहे असे ऐकून आहे. आमचा मुख्य हेतू देवबागच्या रिसॉर्टवर जाण्याचा असल्याने बाकी ट्रिप त्याप्रमाणे आखली.

सुहास..'s picture

20 Nov 2013 - 6:36 pm | सुहास..

ते सगळ राहु दे भटा ...

लेका जिवंत आहेस व्हय अजुन ...का दर्शन मात्र आहेस ??

घाटावरचे भट's picture

20 Nov 2013 - 7:10 pm | घाटावरचे भट

जिवंत हाय मालक. इथे अधून मधून येत असतो. पण बहुधा वाचनमात्रच असतो.

कपिलमुनी's picture

19 Nov 2013 - 8:12 pm | कपिलमुनी

हा दौरा बाईक वर करावा असे मनात येते आहे ..

रस्ता . ट्रॅफिक कसा आहे ?

पुणे - कोल्हापूर- बेळगाव - दांडेली - कारवार - गोकर्ण - येल्लापूर ( याना रॉक ) - बेळगाव मार्गे पुणे ..

असा रस्ता गुगलला तर १२०० किमी आहे ..म्हणजे ४-५ दिवसांचा दौरा होइल ..
कोणी बाईक वर गेले आहे का त्या भागा मधे ?

पुतळाचैतन्याचा's picture

19 Nov 2013 - 8:43 pm | पुतळाचैतन्याचा

पुणे ते कागल हा पट्टा पुर्ण गर्दिचा आहे. पुढे बेलगावकडे कमी गर्दी असते. त्या पुढे एकदम आराम आहे. परत गोवा-कोचिन रस्ता चारपदरि नाहिये. तिथे गर्दि नसली तरी सारखी वळ्णे आहेत. परत येताना हुब्बल्लि मार्गे या. तिकडे गन्गुबाइ हन्गल आणि सवाइ गन्धर्वन्चा वाडा पाहुनच या. तेवढ्यासाठि तुम्हाला परत जाणे होणार नाहि.

घाटावरचे भट's picture

19 Nov 2013 - 10:24 pm | घाटावरचे भट

तुम्ही कोणत्या वेळेला पुण्यातून निघता त्यावर बरेच काही अवलंबून आहे. उशिरा निघाले तर मुख्य त्रास हायवे वर कशाही येणार्‍या दुचाकी - ट्रॅक्टर - बैलगाड्यांचा होतो, ज्यामुळे अनेकदा ट्रॅफिक खोळंबतेसुद्धा. सकाळी ९-९:३० च्या आत जर कोल्हापूर ओलांडले तर पुणे-कोल्हापूर रस्त्यालाही तुरळकच रहदारी असते. आणि पुढचा बेळगाव - धारवाड - हुबळी रस्ता तर सुरेखच आहे. अजिबात ट्रॅफिक लागत नाही. मी स्वतः पहाटे ५:३० ला निघून सकाळी ८:३० ला बेळगावात पोहोचलो आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Nov 2013 - 9:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

फारच सुंदर दिसतोय हा भाग. वर्णन करताना हात आखडता घेऊ नका राव. फोटोही मस्त आहेत. जर width="600" केली तर चित्रातले बारकावे स्पष्ट दिसून बघायला अजून मजा येईल.

पुतळाचैतन्याचा's picture

19 Nov 2013 - 10:11 pm | पुतळाचैतन्याचा

क्रुपया भाग २ पहावा.

पैसा's picture

20 Nov 2013 - 7:19 pm | पैसा

मस्त लिहिलं आहे. फोटोंचा आकार जरा मोठा ठेवून बघा, खरंच चांगलं दिसेल. आम्ही काही दिवसांपूर्वी दांडेलीला गेलो होतो. तेव्हा काळी नदी आणि धरण पाहिले. २/३ दिवस रहायला खूप छान आहे. हॉटेल्सही खूपच स्वस्त वाटली.