Skip to main content

लोकसंवाद :- काही चितपरिचित डायलॉग्ज

लेखक मन यांनी गुरुवार, 14/11/2013 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
लोकगीत, लोककला, लोकसंगीत कसं असतं अगदि लोकांत मिसळून गेलेलं; त्यांच्यात वारंवार आढळणारं; तसेच हे "लोकसंवाद" हल्लीचे काही लोकसंवाद. खरं तर लोकरोग. लोकांच्या टाळक्याला झालेले आजार. (ह्यातले एक दोन मी जालवरील प्रतिसादातून उचलले आहेत) . . १.मुलगी काळी असली तरी कमावती आहे!! २.तू आयटीत आहेस? मग तिसरं होम लोन कधी घेतोयस? ३.तू आयटीत आहेस? मग भारतात काय करतोयस? ४.भेंचोत महागाई इतकी वाढलिये आजकाल; ग्लेनफिडिच पितानाही हाच विचार सतावतो. ५.मी मुलगा इंजिनिअर असला तरच होकार देणार. ६.तो मुस्लिम/ब्राम्हण्/दलित असला तरी चांगलाय! ७.तो अमुक अमुक मोठा गायक आहे ना, गायक असला तरी निर्व्यसनी आहे! (अरे चौकटीबंद चष्मा काढून जरा त्याच्या गायकीकडे बघा रे) ८.नै, तुम्हाला वाटेल जरा पर्सनल होइल, पण एक विचारु का? काय हो..... (अरे पर्सनल आहे ना, मग गप्प बैस ना.) ९.राहुलचं बाळ गेलं मागच्या महिन्यात. शिवाय मुलगा होता हो! १०.बस मॅम, तुम्ही आम्हाला फक्त अमुक हजार द्या. काssssही कष्ट्/व्यायाम्/आहार नियोजन न करता हे अस्सं वजन कमी होत पहा. ११.तसंही जगून काय करनार भेंचोत. मस्त सुस्साट बेभान हाकायची गाडी. आपल्याला जीवाची फिकिर नाय. बिंदास हे आपन. १२.ई ई ई नाऱळासोबत खडीसाखरेचा तुकडा नको. क्यालरिज असतात त्यात फार. १३. काही गोष्टी अजून विज्ञानालाही उमजलेल्या नाहित.( म्हणून मी वाट्टेल त्या कविकल्पना गळ्यात मारिन; त्या मुकाट्याने ऐक) १४.त्या हिरोइनचं ऐकलं का? ती त्याच्यासोबत अमुक अमुक ठिकाणी फिरत असते म्हणे. १५. अरे आपला तो हा अमुक आणि आपली ती ही तमुक फार सोबत दिसताहेत. ऑफिसनंतरही भटकताना दिसतात बराच वेळ. मी पीछा करताना समजलं की...(आँ? त्यांचं भटकणं चूक, तर साल्या तुझं असं चोरीछुपे गॉसिपिंग आणि पीछे करणं आंबटशौकिनपणा नै का?) १६.आता मी कशाला स्वतःच्या तोंडानं सांगू? पण अमक्याच्या तमकीसोबत काहीतरी चालल्याचं मी ढमक्याकडून ऐकलय. १७. बस आता आम्हाला इतके इतके दिलेत, की महिन्याभरात अंबानीच्या दुप्पट रक्कम तुमच्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये येणार! १८.जाउ दे रे. ह्याही वेळी पार्शलिटी झाली; नाही तर आपल्यालाच मिळालं असतं प्राइझ. १९. अहो त्यानं अभ्यास खूप केला होता. पण बोर्डात काय घोळ झाला ठाउक नाही. तसा तो फार हुशार आहे. पण नक्की चेकिंग मध्येच प्रॉब्लेम आला असणार. २०. आपण कोण? किंवा:- आडनाव काय म्हणालात तुमचं? . . तुमच्या कडे असल्यास असे लोकसंवाद इथे शेअर करावेत. --मनोबा

वाचने 33445
प्रतिक्रिया 132

प्रतिक्रिया

१ मित्र दुसर्‍याला:- तीचं फेसबूक प्रोफाईल बघीतलं आणी लग्नाला नकारच दिला. काय पोरगी म्हणायची का सोंग.. :))

In reply to by यसवायजी

अगागागागागा =)) बाकी पोराचे स्वतःचे घर असूनही १ बीएचकेचाच फ्लॅट असल्याने नकार देणार्‍या पोरीही पाहिल्या आहेतच.

In reply to by बॅटमॅन

आमच्याकडे एकाला आयटीत आहे (जवळपास ७५ च्या वर पगार) पण परदेशी जाण्यचा चान्स नाही म्हणून नकार दिला एका मुलीने. आता बोला.

In reply to by खबो जाप

अहो तुम्ही काहीही सांगितलं तरी शिक्का बसवणारे बसवतीलच. तुमचं निरीक्षण खरंखोटं आहे की कसं याचा त्यांना फरक पडत नै.

In reply to by खबो जाप

आमच्या वेळी हे असलं नव्हतं. कलियुग का काय ते हेच.. ;) ----------------- बाकी, 'नकार दिला जाण्याची हल्लीची कारणे' यावर १ धागा उघडता येइल.

In reply to by बॅटमॅन

+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११ :( #@#@$$%^%$$@#!$^%#%#&%%!@%#$@%

१)'नाकीडोळी नीटस मुलगी' आणि 'कमावता मुलगा' हेही ऐकून ऐकून कंटाळा येतो. डॉक्टर इंजिनियरांना तर इतका भाव असतो की जगातले बाकीचे व्यवसाय हे मोडीतच काढलेले असतात (बरं याबद्दल फार बोलत नाही कारण माझ्या बाबांचच असं मत असल्याने गप्प बसावं लागतं, त्यामुळेच तो ३ इडियट शिनेमा आवडला मला). २)आणखी म्हणजे मुलगी सरळ्/चांगल्या वळणाची/ सोशीक असणं. कशाला हवी सोशीक मुलगी? घरातल्यांनी हवं तसं उधळावं आणि हिनं खस्ता खाव्यात म्हणूनच ना! ३)एकदा घरी कोणतातरी कार्यक्रम होता, साहजिकच जेवणं लांबली. मी खाण्यापिण्याच्या वयातली असल्यानं "कधी संपणार ही पूजा, मला भूक लागलीये" म्हणताच एक शिनियर शिट्टीझन बाई म्हणाल्या "अंहं, असं नाही म्हणायचं, आधी पुरुषांची पंगत होऊ दे, भूक काढायला शिकलं पाहिजे." हे कसं काय बुवा शिकायचं? ते मला अजूनही जमलेलं नाही. भूक लागली की मी जेवते.

१. मी काय म्हणत्ये, मुलगी चांगली आहे रे. घराचं सवडीनं बघ. शिवाय दोघे कमावते असल्यावर सोपं जाईल. २. त्यांनी नकार दिलाच नव्हता तसा, म्हणजे नकार नव्हताच. ज्या ज्योतिषाला पत्रिका दाखवलंनीत त्याने नीट सांगितलं नव्हतं. तुम्ही लोक पहा ना जरा तुमच्याकडे कोणाला तरी पत्रिका दाखवून. ३. आडनांव काय म्हणे?? म्हणजे नक्की कोण? देवरुखला आहे का कोणी? ४. सर, ते फ्याट मसल्स मध्ये कन्व्हर्ट होतं हो !! (कसं शक्य आहे?? :)) ) ५. तू सप्लिमेंट्स घेत नाहीस? कसं होणार मग !! ६. आज खरंच कंटाळा आलाय.

In reply to by सूड

लक्षणं काही ठीक नै दिसत! ह्हूं..... =)) असतं ब्वॉ एकेकाचं असं! :p

अखेर आई म्हणालीच, बाबारे! मुलगी कमी शिकलेली असेल तरी चालेल पण फेसबुक, वॉट्सअपवाली नको रे बाबा. आपल्या घरात कामं असतात.

मस्त !! प्रत्येक वाक्यावर एक लेख होउ शकतो.
शिवाय मुलगा होता हो!
यावर माझा अनुभव: मला जेव्हा दुसरी मुलगी झाली तेव्हा मी आणि बायको खूप आनंदी होतो. आम्हालाही मुलगीच हवी होती. पण शेजारच्या दोघी तिघी जणी हॉस्पिटल मध्ये आल्या आणि एकच वाक्य वारंवार उच्चारू लागल्या. "दुसरी पण मुलगीच झाली? अरेरे मुलगा झाला असता तर बरे झाले असते" च्याआयला आम्हाला काही प्रोब्लेम नाही तर तुम्ही का हळहळताय. एवढा संतापलो होतो कि वाटले होते कि सर्वाना हाकलून द्यावे. त्यात अजून एक मित्र ज्याला दोन मुली आहेत तो मला बायको समोर म्हणाला "आता आपण समदुख्खी" आता मात्र माझी सटकली व त्याच्याकडे रागाने बघत म्हणालो "समदुख्खी ??????" त्यानंतर तो बरेच दिवस मला टाळत होता.

In reply to by प्रचेतस

तू आधी 'ते' राष्ट्रीय कार्य पूर्ण कर. विक्रमादित्य पिछा सोडणार नाही नाहीतर वेताळा! ;) सारखा सारखा 'जाहीर' प्रश्न विचारतो हा विक्रमादित्य! हे कुठं नि ते कसं! =))

काय करणार! हे असंच चालणार बाबा!! शेवटी अल्पसंख्यांक आहोत ना आपण!!!

In reply to by सुहासदवन

=)) अवांतरः तुमचा आयडी सुहासवदन असा पाहिजे होता की तुम्ही 'सुहास धवन' आहात ;)

In reply to by बॅटमॅन

तुला एक फार चांभार चौकश्या रे ब्याट्या ;) हापिसातले काही डायलॉग खुप झेलु आहे हा (ही ) नुसता सरांपुढे हांजी हांजी करत असतो ( ते) बिचारा एक्स वाय झेड घरातली सगळी कामे उर्कुन येतो म्हणून उशिर होतो हापिसला ;)

In reply to by यसवायजी

आँ? कसली हो कुस्ती? तो 'मय्त्रि कर्न्र कं' हाही एक लोकसंवादच आहे, फक्त पियुशाचं नाव घालून लिहिला इतकंच.

In reply to by बॅटमॅन

लोकसंवाद का ? वोक्के.. पन त्यात नाव घालायची काय गरज होती ऑं? (रच्याकने.. ब्याट्या, पियुशा हा ड्यु आयडी आहे - इती प्यारे.) जपुन बरं का भौ..

In reply to by यसवायजी

च्यायला .... यसवायजी , का पण जळुन राहीले बाप्पा तुम्ही ब्याट्या वर :P कु्. ह. घ्या :)

In reply to by बॅटमॅन

अहो अहो कुणाला करता आहात हो बॅटमॅन तुम्ही ? अग - तुग चालेल ;) बस्स बुवा ...धाग्याचा मालक यायचा पिटाळायला आप्ल्याला पळते मी ब्ब बाय ;)

In reply to by पियुशा

अग्ग अग्ग पियुशी.. ते मला अहो अहो म्हंतायत.. तु टेन्षन नक्को घेउ हां.. :) ------- आणी अहो बॅटमॅन तुम्ही .. मला अरे तुरे म्हणा बघु.. उगाच (आपल्या?) पियुशीला त्रास होतोय..

In reply to by बॅटमॅन

पिवशे मझ्यशि मय्त्रि कर्न्र कं? इश्श्श्श........... ;) अजुन भर * आमचे हे नाही हो असले , देवमाणूस आहेत अगदी .... * तिने नवर्याचा घाण्याचा बैल करुन ठेवलाय नुसता.... * डोक्यात भुसा भरलाय का ? * आमची कामवाली बै नै आली आज, सगळ मीच केल हो एक्टीने ... * माझी कड्की चालुये ... * मी कंगाल ब्यांकेचा म्यानेजर आहे .... * मी कशी दिस्त्ये ;)

In reply to by पियुशा

जल्ला ता इश्श म्हंजी क म्हनाचा, मना त द्येवदासवाला आठवून र्‍हालाय. बाकी अजून आमचीपण भरः * आज कुठली साडी घालू? घाल कुठलीपण. (तसंही कोण बघणारे तेच्यायला, इतकी वर्षं झाली लग्नाला इ.इ. अनुभवी लोकांनी रिकाम्या जागा भराव्यात-अर्थात मनातच)

In reply to by बॅटमॅन

* आज कुठली साडी घालू? घाल कुठलीपण. (तसंही कोण बघणारे तेच्यायला, इतकी वर्षं झाली लग्नाला इ.इ. अनुभवी लोकांनी रिकाम्या जागा भराव्यात-अर्थात मनातच) झालं..... टाकली का काडी बॅटमॅना ;) पॉप कॉर्न घेउन ये ;)

In reply to by पियुशा

बघू की काय होते, पॉपकॉर्न तर आम्ही सुरुवातीलाच घेऊन बसलो होतो ;)

In reply to by पियुशा

काही ठरलं की नाही? तुझ्याएवढा/ढी असताना दोन दोन मुलं झालेली आम्हाला!

In reply to by यशोधरा

तेच लिहीणार होतो पण मेल्यान् शब्दात पकडलंन् तर काय करु म्हणून गप बसलो.

In reply to by सूड

अरे सुडक्या मी उगीच पकडापकडी खेळत नै रे ;) (माझा मूड असल्याशिवाय ;) )

In reply to by यशोधरा

हा हा हा, बरोबरे, अंमळ गुंडाळलं खरं ;) बादवे अलीकडे धोत्रेसुद्धा प्यांटप्रमाणे 'घालायची' निघालीत असे ऐकतो.

In reply to by बॅटमॅन

माझे नाव आत्तापर्यंत बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांनी सुहासवदन म्हणूनच लिहिलेले आहे. पण ते सुहास द वन (SUHAS THE ONE) असे आहे.

तो उद्दाम ना , तो नेहमी ट्रोल करण्यासाठी लिहितो..

१. अगं बाई, कपाळावरची टिकली पडली वाटतं तुझी, (पडायला मुळात आधी लावायला हवी ना ?), हे काय हातात बांगड्या नाहीत तुझ्या? २. काय आराम चालू आहे वाटतं? ३. जेवण झालं का? आज काय केलं होतं? ४. (माझा मुलगा माझ्या बरोबर आलेला असेल तर ) किती मोठा झाला हा? ओळखलच नाही? आईपेक्षा उंच झाला ना? मजा आहे. (आता यात मजा काय कोण जाणे) ५. सध्या उद्योग काय चालू आहे? ('काही नाही' असे उत्तर दिले की ) अगं मग घरी ये ना कधी तरी, रिकामीच असतेस ना? :( ५. (प्रत्येक वेळी पुण्याला आल्यावर) आता परत कधी जाणार? किंवा किती दिवस मुक्काम? :(

In reply to by मनीषा

सगळ्या संवादांशी सहमत. आणखी भर म्हणजे "काय मग्ग, काय म्हणते अमेरिका?, तुमच्या ओबामानं अमूक तमूक केलं." (जसं काही मनमोहन सिंगानं जे काय केलय त्याची नोंद या ठेवतातच). तुमचं बरय बै, तिकडं अमेरिकेत कोणाचं येणं जाणं नै, सगळी कामं यंत्रानं होतात, इथं म्हणजे सगळ्या ठिकाणी आपणच मरा! धुणं भांड्याची बाई आली नाही की कपड्याचं मशीन लावा, कामापुरती भांडी धुवून घ्या, निदान घरात व्हॅक्यूम क्लिनर तरी फिरवा. मग काय, तुमच्या नेहमी पार्ट्या असतात ना? आईकडे गेलं की आईला नेहमी "काय मग आता, लेक आलीये ना?" "काय गं, तिकडं नेहमी बर्गर, पिझ्झाच खाता ना?" "तिकडं म्हणे नको इतकं मोकळं वातावरण आहे?" या प्रश्नांची उत्तरं देऊन देऊन मला भोवळ येते. ;)

In reply to by मनीषा

किती मोठा झाला हा? ओळखलच नाही? आईपेक्षा उंच झाला ना? मजा आहे. वडिलांवर गेलाय अगदी. उत्तर: अहो हा शेजारचा रवी आहे. तो आमच्या ह्यांच्यावर कशाला जाईल.....

In reply to by विजुभाऊ

अहो हा शेजारचा रवी आहे. तो आमच्या ह्यांच्यावर कशाला जाईल.....
खपल्या गेले आहे =)) अन मग यानंतर खाजगीतः तरी मी म्हणत होते, त्यांचं ('आमच्या' ह्यांचं) लक्षण कै ठीक नाही. घरचं सोडून दारच्याची भूल पडली हो त्यांना. अन आता तेच फक्त म्हटले तर कोण राग येतो ;)

In reply to by प्यारे१

अहो मी सांगितलेलं वाक्यसुद्धा मिपालोकसंवादाचंच उदाहरण होतं, त्यात फक्त पियुशाचं नाव घातलं एवढंच =))

In reply to by पियुशा

हा हा हा, अगदी अगदी ;) प्यारेकाकांना आज ओळखत नाय आपण ;) हां तर मग ते मय्तरिचं काय झालं म्हणे?

In reply to by केदार-मिसळपाव

माहितीये ना कै म्हणाल्या नैत, म्हणून तर विचारतोय ;) तुम्हीपण आहात वाट्टे लायनीत =))

In reply to by बॅटमॅन

अरे समाजसेवा रे फक्त. काय गं पियु? ;) तिकडं त्या पिलियन नि पिशी खुश होणार बघ ब्याट्या. जरा 'माणसाळलास' म्हणून. कुठं गेल्या?

In reply to by प्यारे१

अंहं. इथे समाजसेवा वैग्रे कै नै. काका सो काका और तरणा सो तरणा. अन आम्ही माणसाळायला मुळात जंगलाळलो कधी होतो?

In reply to by प्यारे१

आम्ही 'बॅट'मध्ये बसून अख्ख्या गॉथम शहरावर घिरट्या घालत आहोत
तो कसला माणसाळतो? तरी पिवशीने बोलतं केलं बरंच त्याला.. कीप माणसळाविंग पियु... लायनीत सगळ्यांना... ;)

In reply to by पिशी अबोली

स्वतः रानटी (वाइल्ड म्हटले की कसे फ्याशनेबल वाट्टे नै =)) ) राहून दुसर्‍यांना माणसाळवणे हे कै बरे नव्हे ;)

In reply to by पिशी अबोली

bells हा लै मोठा गैरसमज आहे. आम्ही अगोदर जैसे होतो तैसेच आहोत.

In reply to by पियुशा

मय्त्री कबुल असल्याने तूर्तास आम्ही 'बॅट'मध्ये बसून अख्ख्या गॉथम शहरावर घिरट्या घालत आहोत ;) अन मेल्यावरपण डॉळा मारणारी पियुशा बाकी ग्रेटच हो ;)

In reply to by पियुशा

@ आउर कौन कौन है लाइन मे ? आन दो :D अगो काय सतनारयनाचा पर्साद हाय काय? का गावजेवन हाय? ;)

१)साला लाईफच झंड झालीय... २) टॅलंट वर काही नसतं रे, सगळं लक वर आहे... ३) कंटाळ्याचादेखील आता कंटाळा येतो..

In reply to by प्रचेतस

अहो वल्ली हे सगळे "चितपरिचित डायलॉग्ज" आहेत. तुम्हाला काय वाटलं?

In reply to by सूड

रुक्मिणी.... ये ना.... जगू कसा तुझ्याविना मी राणी ग हे रुक्मिणीच्या लग्नाचे थीम साँग असावे काय?

१.साला ३० लाखात फ्लॅटच मिळेना आजकाल (यात दरवर्षी १० लाखाची भर घाला) २.जास्त ब्लॅक दिला तर रेटमध्ये अ‍ॅड्जस्ट करुन देउ (सगळाच दिला तर?) ३.पाण्याची सोय नाहीये अजुन..पण काही प्रॉब्लेम येणार नाही ..टँकर २४ तास (बांधकाम होइपर्यंत आमच्याकडुन..नंतर बसा बोंबलत हे नै सांगत) ४.फ्लॅट मस्त होता हो..पण बजेट ज..रा कमी पडले

गाडी घेताय? मारूतीचीच घ्या. जास्त टेन्शन नाय्.परत चांगल्या किंमतीला विकता येते. गाडी घेताय ? मग टाटाचीच घ्या.खात्रीलायक ब्रॅन्ड. गाडी घेताय?Volkswagaon घ्या. महाग असते पण जर्मन इंजिनियरिंग आहे ना?कधीच प्रॉब्लेम नाही येत. गाडी घेताय? कशाला पाहिजे?रिक्षा आहेत्,मेरू कॅब्स आहेत. गाडी म्हणजे पांढरा हत्ती.

ते: क्वॉय? ऑळखलं ना? आपणः हॅहॅहॅ..हॅ..हॉ.. हो. होहो.. हं..हॅहॅहॅ.. ते: सांगा बघू कोण? आपण..... ** आता काही डॉक्टरकी स्पेशलः ** मी (गंभीर चेहर्‍याने) : आजींच्या मेंदूत रक्तस्त्राव झालेला आहे. वय ही ८०च्या पुढेच आहे. आपण त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलंय. पेसिंगही केलेलं आहे. थोडक्यात म्हणजे मशीन चालू आहे तोपर्यंत त्या आहेत. पुढचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.. पेशंटचे नातेवाईक : डाक्टर, पण तसं शिरेस काय नाय ना? मी.... ** पेशंटः डाक्टर, ४ दिवसापासून थोडा नॉर्मल ताप येतोय. मी... ** मी: काय होतंय? पेशंटः बघा ना तुम्हीच तपासून!

In reply to by आनंदी गोपाळ

शेवटचे दोन कहर आहेत. पहिलं खूपच परिचयाचं आहे. सर्वात बकवास म्हणजे कुठूनही कॉल करुन "ओळख बरं मी कोण बोल्तोय" हा एक होप्लेस प्रकार. कुणीतरी दहा वर्षांपूर्वी आपण अभिनयाचं , चित्र्कलेच किम्वा अजून कशाचं एक दिवसाचं शिबिर/वर्कशॉप केलेलं असतं ; तेव्हा फक्त दोन मिनिटापुरतं हाय्-हॅलो झालं असलं तरी इथं फोनवर फाल्तू "विसरले राव तुम्ही" वगैरे छळवाद होतो. बालिश वर्तणूक वाटते. हे असं "ओळख बरं कोण आहे.", "चल अजून एक चान्स देतो. आता ओळख" वगैरे वगैरे प्रकार लै डोक्यात जातात.

In reply to by मन१

चित्र्कलेच किम्वा अजून कशाचं एक दिवसाचं शिबिर/वर्कशॉप केलेलं असतं ; तेव्हा फक्त दोन मिनिटापुरतं हाय्-हॅलो खी खी खी. श्या! कायपण.

In reply to by मन१

"ओळख बरं कोण आहे" "विसरले राव तुम्ही"
आपली स्मरणशक्ती इतकी कच्ची कशी असे वाटून पूर्वी मनात अपराधगंड यायचा, पण, आता अश्या लोकांना मी स्पष्टपणे "ओळखले नाही" असे म्हणतो, आणि समोरच्या व्यक्तीने आपली ओळख ठेवावी इतकी आपली किंमत नाही ही झाकलेली मुठ उघडी पाडण्यात आपलीच बेअब्रू होते हे ज्यांच्या लक्ष्यात येत नाही त्यांची अब्रू घालवतो. च्यायला, आपल्याला समोरची व्यक्ती ओळखत नाही यात किमान अर्धा दोष आपलाच नाही का?

१ ) सालं आमचं नेट नेहमी मेलेलं असतं… २) ऑफिस - हा बघावं तेव्हा मिपा उघडून बसलेला असतो. ३) पत्नी - सारखं काय रे मिपा वर, कंटाळा नाही येत ? (तिला काय माहिती काय मजा आहे ती)

अशी पुरणपोळी कधी दुसरीकडे खायला मिळणार नाही (पुरणपोळी च्या जागी कुठल्याही खायच्या पदार्थाचे नाव टाकू शकतो. जेवणाच्या बाबतीत माझ्या माहितीतल्या प्रत्येक घरातल्या लोकांच हेच मत आहे कि त्यांच्या इतकं नीट चांगलं चुंगलं चविष्ट जेवण / फळं / तूप / तेल कोणाकडेच नसतं. आणि जर दुसऱ्याकडे जर आपल्यापेक्षा जास्त नीट करतात हे लक्षात आलं की, त्यांच्याकडे जर अतीच असतं, पोट बिघडेल अशाने ही वरून पुस्ती. माझ्या माहितीत असलेल्या प्रत्येक कुटुंबात स्वतः करत असलेल्या अन्नाचा / करण्याच्या पद्धतीचा अतिशय अभिमान आणि दुसऱ्याच्या पद्धतीला तुच्छ (हा कदाचित जास्त तीव्र शब्द होईल, कमी लेखण्याची म्हणा हवं तर )लेखण्याची प्रवृत्ती दिस्ते.

तुमचा आधीचा पण लेख / काकू बहुतेक असाच काहीतरी होता (आठवत नाही). पण एवढा विचार केला तर निम्मं आयुष्य मौनव्रतात जाईल बहुतेक :D

डोक्याला हेडअ‍ॅक झालाय नुसता... आपला तर बाबा बॅडलकच खराब आहे...

"काय आज कामावर नाही का गेलास? अरे हो... आज शनिवार नाहीका.... मजाय राव तुम्ची शनिवारी सुट्टी म्हणजे"

तुम्ही लिवा> माझा स्पेशल: लँडलाईनवर फोन केलेला असतो. "काय रे, कुठे आहेस?" "मी ना? अरे जरा इकडे बाहेर आलोय" "अरे भाऊ मग लँडलाईण कसा उचललास?" "त.. ते.. त्ते ना? ते कॉल फॉर्वर्ड लावलाय"!!? मी...

भाजप सद्ध्या जोरावर आहे बुवा (म्हणजे नक्की काय?) काँग्रेसचे काही खरे नाही या निवडणुकीत (तुम्ही कधी जाता मतदान करायला? लोळत तर पडलेले असता) या राष्ट्रवादीवाल्यांना जाम माज आहे (आमच्या पार्कींगमध्ये गाडी लावुन वर आम्हालाच दमदाटी....) मनसेच गप्प कशी अजुन? (का? तुमच्या काचा फोडायला पाठवु? ख्ळ्ळ ख्ट्याक) ओबामा जाम हुशार हं पहील्यापासुन(तुमच्याकडे वारावर जेवतो काय?)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कंसातील टोमणे भारिच आहेत .... शेवटाचे तीन जस्त आवडले. नाकावर दाणकन् ठोसा मारल्यासारखे वाटतात.

भारताला ठीक करायचे तर लोकशाही उपयोगाची नाही. डिक्टेटरच हवा.

या, तुमचीच कमी होती. आपलं कुठलं नशीब एवढं ! ए सॉल्लीड बोर आहे तो ' ती आपल्या मैत्रिणीला. त्या बेदीमुळं आपला शिवलकर कुजविला गेला रे ! " आझाद मैदानावर चा कधीकाळचा डायलॉग. जाउ दे आयला आपल्या नशीबात नव्हती ती ' बरं आम्ही मूर्ख तुम्ही शहाणे....बस्स ? या क्रिकेटवाल्यांचे फारच लाड चाललेयत हल्ली !

एवढे ८५% मार्क्स मिळालेत तर आर्टस् काय घेतोस? सायन्स घे रे? अरे मुलगा असुन रडतोस काय बायकांसारखा? १ : "किती टक्के पडले?" २ : "८९%" १ : "ठीक आहेत. आमच्या त्यांच्या मामांच्या काकांची मुलगी आहे ना तिला ९५% टक्के मिळालेत." २ : "हो का? नाव काय मग तिचं?" १ : "आठवंत नाय रे. पण तुला काय करायचंय" २ : "नाही सहजच. बोर्डात पहिला आलाय त्याला ९१% मिळालेत ना म्हणून.." १ (आता चुप्प.)

काही झालं तरा कावळा पिंडाला शिवेना. किती बाटल्या रक्क्त लागलं ऑपरेशनला ? अनेशेसिया जनरल , लोकल की स्पायनल दिला ? अरे तू फार केलंस तिचं ! शेवटी प्रत्येकाला जायचं आहे ! इतः: पर तुम्हाला लग्न करायचं असेल तर करा आम्ही आपलं सावध करायचं काम केल बुवा ! बाळ बाळंतीण कुशल आहेत. बरंय गाडी सुटायची वेळ झाली. तब्बेतील जपा म्हटलं ! काही नाही हो या तपासण्या म्हण्जे... डोकटर लोकांचं रॅकेट असतं ! काहे पैशा बियशाची मदत लागली तर सांग !

आम्ही एवढे जीव तोडून सांगत होतो तर किंमत नव्हती, आता बस म्हणाव रडत हे बघ, शेवटी निर्णय तुझा आहे, आम्ही काय भल्यासाठीच सांगतो च्यायला, ह्या ट्रॅफिकनं वैताग आणलाय