तपस्या

झंम्प्या's picture
झंम्प्या in जे न देखे रवी...
4 Nov 2013 - 7:02 am

का गं आज अशी शांत का ?
कोणी बोललं का तुला ?

विशेष काही नाही.
आज स्वतःशीच बोलायचं होतं.

इथपर्यंत पोहोचन्यात एक तप गेलं
पण आज अस वाटतं की रोजनिशीच एक पान उलटल

आज जाणवलं स्वतहाकडे पाहून,
कधी कळलच नाही वेळेमाघे धाऊन,

का, कशासाठी धावले हे कधी उमगलच नाही,
तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा समोर उभे राही,

खरच अशी होते का मी,
अल्लड वार्‍यासारखी होती जी,

आता पाठीचा कनाही वाकलाय,
चेहर्‍यावर भूतकाळ दाटलाय,

एकटीच चालताना कधी आधाराची गरज वाटली नाही,
चालताना कधीच भावनांची गर्दी मनात दाटली नाही,

बेभान उर्मीने पुढे निघत राहिले,
परिस्थितीचे वार छातीवर घेतले,

जबाबदारीची जाणीव झाली जेव्हा,
कुठल्याश्या ओझाने दबले तेव्हा,

सगळ्यांच्या मनाचा विचार करताना,
चेहऱ्यावर कायम हसू ठेवताना,

स्वतःलाच पुरती विसरले,
आरशासमोर परकी भासले,

रोज रात्री डोळ्यात स्वप्न जन्मायची,
दिवसा मात्र डोळ्याकाठीच विरायची,

मनातील कळ्या मुक्यानेच खोडल्या,
अवघडलेल्या मुठीत त्या गुदमरून सडल्या,

काळाबरोबर मनही मारायला शिकले,
एकटीच धाऊन मात्र आता पूर्ती थकले,

आयुष्याची सांजवेळ आता झाली,
पण खरच वेळ का निघून गेली ?

पण आता काही फरक का पडणार आहे,
गेलेला काळ पुन्हा का येणार आहे,

तुझ्याशी बोलून खूप बर वाटलं,
मनात उगाच आभाळ दाटल,

खूप वेळ झाला आता उठाव लागेल,
अस स्वतःचा विचार करून कसं भागेल.

कविता

प्रतिक्रिया

अग्निकोल्हा's picture

9 Nov 2013 - 12:48 am | अग्निकोल्हा

....