आली सुमधूर संमोहक दिवाळी

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जे न देखे रवी...
2 Nov 2013 - 11:28 am

ती पहा आली सुमधूर संमोहक दिवाळी...

दूर करून अंधार कृष्णछायेच्या कपाळी !
आशा घेऊन अश्विन सुमंगल सकाळी !!
घेऊनी सोनप्रकाश ओजस्वी आश्वासक ओंजळी !
लख्ख करण्यास अनंत आकाशगंगेच्या ओळी !!

ती पहा आली सुमधूर संमोहक दिवाळी...

समग्र संकट समूळ सारीत !
सर्वसमावेशक सण सोहळा सुशोभित !!
अंधार होऊनी निसंशय पराजित !
प्रकाश येऊनी मनात विराजीत !!

समाज