असू दे
दिवाळीत फार फार प्रदूषण होतं.
पण वात पेटवून दोन्ही कान गच्च दाबत जीव खाऊन दूर पळणारं पोरगं.. वळून वळून पाहात राहतं..
धम्माड स्फोट होतो.. पण आपल्याला काही होत नाही.. या जाणिवेत खूप सुख असतं..
मनगटात बळाच्या मनगट्या चढतात.. पुढे कधीच न चढणार्या..
म्हणून असूदेत थोडे फटाके..!!
..
तेल तूप बेसन नेहमी महागच होत असतं.. स्वस्त नव्हे..
कितीही काहीही महाग झालं तरी फराळाचे डबे फळीवर चढतातच..
आणि गेल्यावर्षीचे दमट फटाके उन्हात वाळत पडतातच..
पण दिवाळीच्या तोंडावर महाग झालं म्हणून हेडलाईन्स तरी येतात..
अन मध्यमवर्गाचे हाल पुराव्याने शाबीत होतात.
म्हणून असू दे थोडी महागाई..!!
...
सगळा फराळ तेलातला..आरोग्याला बाधक म्हणतात..
पण शेजारच्या चकल्या हसतात तेव्हा बायाही हसतात..
विकट का होईना पण हसतात तर..
आईच्या शिकवणीचं आपलं मोहन मात्र कसं कडकडीत आणि बरोब्बर...
बाया सुखावतात..
म्हणून असू दे थोडा तळकट फराळ..!!
...
दिवाळीच्या संध्याकाळी
चाकरमानी मन सुट्ट्यांच्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी खंतावून तयार होतं..
"बेंदूर बेंदूर सणाचं लेंढूर".. ने सुरु झालेलं ते सगळं "दिवाळी दिवाळी सणांना ओवाळी".. ने संपतं..
आंघोळ तर रोजच करतात लोक.. काहीतर दोनदोनदा..
पण दिवाळीच्या पहाटे पायाच्या बोटांमधल्या बेचक्यालाही साबण मिळतो..
धुतल्या मनाला दिवाळीच्या दुपारी मनातल्या मनात बांधायला एक तरी किल्ला मिळतो..
म्हणून पुढच्या दिवाळीच्या ओढीसाठी..
असू दे थोडा सुट्ट्यांचा दुष्काळ..!!
- गवि
वाचने
39244
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
मस्त ! दिपावलिच्या मंगलमयी
मस्तं.
शुभ सुरुवात..
सुट्ट्या
छानच..
मस्तच
साधु साधु
मस्त....
झक्कास!
छान मुक्तक!
मस्त !
एक नंबर गवि साहेब ....
नेहमीसारखंच!!
मुक्तक आवडलं
In reply to मुक्तक आवडलं by बहुगुणी
+१ अगदी अगदी
In reply to +१ अगदी अगदी by चतुरंग
+ २
मस्तच गवि शेट! याप्पी दिवाली.
खास गवि'टच' मुक्तक!
मस्त
अगदी अगदी!
सुरेख!
मस्तच!!
मस्त !!!
क्या बात है गवि साहेब....
मान गये उस्ताद..
फार आवडली कविता. वाचताना नंतर
मस्तचं...
मस्त हो गवि...
क्या बात है..!!!!!
अंतर्मुख करणारी कविता!
मस्तच...... :)
सुरेख
छान लिहिलय
मुक्त केलेला प्रत्येक क अवडला
In reply to मुक्त केलेला प्रत्येक क अवडला by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद हो बुवा.
सरस मुक्तक !
व्वा मालक वा. मस्तच.
व्वा !!!
वाह व्वा
झक्कास
असु दे! असु दे!
मस्तच......!
पुन्हा वाचलं...
छान आहे.