तुझिया डोळ्यांत तेंव्हा पाऊस दाटला होता …

घन निल's picture
घन निल in जे न देखे रवी...
15 Oct 2013 - 4:56 pm

तुझिया डोळ्यांत तेंव्हा पाऊस दाटला होता …
तुझा हात जेंव्हा माझ्या हातून सुटला होता ….
तू थांबवलीस असावे तुझी ,
पण बांध तरीही फुटला होता …
ऊन पिऊन अंगणात सुकला पारिजात माझ्या,
निळा कोवळा पाऊस मी नियतीस विकला होता …
ओंजळीत भरलेस तू श्वास तुझे सुगंधी,
मी हात त्यावरी एक झाकला होता …
मी न थांबलो तिथे , न वळून बघितले निघताना,
विश्वास तुझा तरीही न थकला होता …
मी चेतविल्या पुन्हा तुझ्या आठवणी,
मी विझलो तेंव्हा त्यांचा उजेड फाकला होता …

मराठी गझलगझल

प्रतिक्रिया

हरवलेला's picture

15 Oct 2013 - 5:16 pm | हरवलेला

शेवटची ओळ वाचल्यावर सुरेश भट यांच्या "मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते" या कवितेची आठवण आली.

वेल्लाभट's picture

15 Oct 2013 - 5:21 pm | वेल्लाभट

भाव जमलेत हे नक्की. छान.
पण मीटर, आणिक गजल चे काही निकष या बाबतीत मात्र गंडलीय.

घन निल's picture

15 Oct 2013 - 6:00 pm | घन निल

गझल आणि एकूणच इतर काव्य प्रकारातल्या तांत्रिक बाबी शिकण्याची इच्छा आहे …. मान्यवरांनी मार्गदर्शन करावे .

चौकटराजा's picture

22 Oct 2013 - 8:54 am | चौकटराजा

कवितेतील भाव पोचले. अचूक शब्द वापरण्याबाबत मी आग्रही असतो रसिक म्हणून. आपल्याला गझल चा तांत्रिक भाग शिकायचा आहेसे दिसते. माझ्याकडे त्याचे काही धडे जालावरून घेतलेले आहेत. त्याची लिंक मिळाली तर ती देतो.त्या लिंकचे लेखक बहुदा सुरेश भट हेच आहेत.
च्यायला आपलं सर्वांचंच असंच असतं
मिळालेल्या पेक्षा हातून सुटलेलंच अधिक असतं

घन निल's picture

22 Oct 2013 - 1:45 pm | घन निल

मी सुद्धा शोधत आहे अंतर्जालावर काही मिळाल्यास ,आपनही लिंक द्या

चौकटराजा's picture

22 Oct 2013 - 6:51 pm | चौकटराजा

या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ईमेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.

MarathiGazal.Com is an online user community dedicated to the cause of promoting & developing Marathi Gazal writing
No part of this site may be copied, transmitted & used in any form & using any media without express written permission of the authors of respective posts

घन निल's picture

23 Oct 2013 - 2:09 pm | घन निल

धन्यवाद

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

15 Oct 2013 - 5:58 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

छान प्रयत्न.
पु. ले. शु.

धन्या's picture

15 Oct 2013 - 6:09 pm | धन्या

सुंदर आहे कविता.

अग्निकोल्हा's picture

18 Oct 2013 - 12:27 am | अग्निकोल्हा

वाचुन झाल्यावर ति गेली तेंव्हा रिमझिम पाउस निनादत होता पुन्हा पुन्हा ऐकले...!

आमच्या क्षुद्र शाब्दिक जुळवा जुळवी ने आपल्याला ग्रेस आठवले यातच भरून पावलो