उरेल काही उणे उणे,
आयुष्य सारे मला म्हणे,
भोगाच्याही पदरी उरते,
वेदनेचे गाणे
मखमलीच्या दाव्याला,
जीवा बांधणे.
उरेल काही उणे उणे,
आयुष्य सारे मला म्हणे,
कुणी गावे उद्याच्या,
आशेचे गाणे
उगवतीच्या पोटी लपले,
अंधाराचे लेणे
उरेल काही उणे उणे,
आयुष्य सारे मला म्हणे,
बेधुंद होऊन छेडावे,
उगीच का तराणे
भैरवीचे सूर घेते,
अखेरीचे गाणे
उरेल काही उणे उणे,
आयुष्य सारे मला म्हणे,
-- सागरलहरी