रताळ्याचे गुलाबजाम

खादाड_बोका's picture
खादाड_बोका in पाककृती
14 Jul 2008 - 11:59 pm

सामुग्री :

चार रताळी
साखर दीड वाटी
तळण्यासाठी तूप
शिंगाडे पीठ 2 चमचे
साबुदाणा पीठ 1 चमचा
वेलची पूड

कृती :

रताळी उकडून सोलून घ्यावी आणि चांगली कुस्करून त्यात दोन चमचे शिंगाडे पीठ, साबुदाणा पीठ घालून ते मळून घ्यावे. या मिश्रणात वेलचीचा दाणा घालून लहान गोळे करून घ्यावे. कढईत तूप तापवून घ्यावे. त्यात मंद आचेवर हे गुलाबजाम सोनेरी रंगावर तळून घ्यावे. नंतर साखरेचा एकतारी पाक करून त्यात हे तळलेले गुलाबजाम सोडावे आणि या पाकात दोन चमचे गुलाबपाणी घालावे. चार पाच तास हे गुलाबजाम पाकात भिजत राहू द्यावे.

सजावट :
सजावटीसाठी त्यावर लाल गुलाबाच्या पाकळ्या आणि सुक्या मेव्याचे बारीक तुकडे पेरावे.

प्रतिक्रिया

वरदा's picture

15 Jul 2008 - 12:14 am | वरदा

कधी खाल्ले नाहीयेत्...करुन पाहीन नक्की.....जरा आधी टाकले असते तर उपसाला केले असते ना आजच्या....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

मला तर स्वप्नातही भुक लागते.... :P

वरदा's picture

15 Jul 2008 - 1:04 am | वरदा

आपल्याकडे ३६५ पैकी ६५ उपास तर असतातच ह्या नाही तर पुढच्या उपासाला करुयात...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

शितल's picture

15 Jul 2008 - 12:14 am | शितल

किती मस्त पाककृती सा॑गितलीत.
उपवासाला काही तरे गोड हवेच असते.
:)

विसोबा खेचर's picture

15 Jul 2008 - 8:42 am | विसोबा खेचर

हेच म्हणतो...!

प्राजु's picture

15 Jul 2008 - 12:29 am | प्राजु

एकदम वेगळीच आहे रेसिपी.. बघेन करून.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/