आहे!?
आहे? आहे? आहे? आहे? साखर आहे?
आहे! आहे! आहे! आहे! साखर आहे!
आहे? आहे? आहे? आहे? गुळ आहे?
आहे! आहे! आहे! आहे! गुळ आहे!
आहे? आहे? आहे? आहे? तेल आहे?
आहे! आहे! आहे! आहे! तेल आहे!
आहे? आहे? आहे? आहे? खोबरे आहे?
आहे! आहे! आहे! आहे! खोबरे आहे!
(नारळ, साबूदाणा, शेंगदाणे, मोहरी, हळद, मीठ..... फिनाईल, घासणी, झाडू इ. आहे? आहे? आहे?)
(नारळ, साबूदाणा, शेंगदाणे, मोहरी, हळद, मीठ..... फिनाईल, घासणी, झाडू इ. आहे! आहे! आहे!)
किती मोजू सांगा? किती घ्यायचे आहे?
साखर ५ किलो, गुळ अर्धा किलो आहे
तेल ३ किलो आहे, तुप पाऊण किलो आहे, मिरची अर्धा किलो आहे
नारळ, साबूदाण, शेंगदाणे, मीठ, मोहरी, हळद मागच्याप्रमाणे आहे
सामान मोजले, चला लवकर ८४३ रुपये काढा, गिर्हाईकांची घाई आहे
काय शेठ! इतके पैसे कसे झाले? हा महागाईचा आलेख चढता आहे!
मी काय म्हणतो लिहून ठेवा! आत्ता पैसे नाहीत उधारी आहे!
रामू सगळा माल आत ठेव! माफ करा, उधारी बंद आहे!
- पाभे
प्रतिक्रिया
17 Aug 2013 - 9:59 am | चित्रगुप्त
अगदी वेगळ्या धर्तीची कविता आवडली. असे काही वेगळे वाचायला छान वाटते.
....मीठ, मोहरी, हळद मागच्याप्रमाणे आहे...
यातील 'मागच्याप्रमाणे' चा अर्थ समजला नाही.
17 Aug 2013 - 4:50 pm | Bhagwanta Wayal
मागच्याप्रमाणे म्हणजे, मागच्या महिन्याच्या यादीप्रमाणे.
17 Aug 2013 - 5:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुलेशु.
-दिलीप बिरुटे
17 Aug 2013 - 5:42 pm | चित्रगुप्त
पाभे, आता तुम्हाला फोन येणारः
गुड मॉर्निंग सर, मै आयसीआयसीआय बँक से विनित कुमार बोल रहा हूं. सर आपको क्रेडिट कार्ड के लिये सिलेक्ट किया गया है....वगैरे...
वाटल्यास हा व्हिडो बघा (आचरट आहे बरे):
http://www.misalpav.com/node/25394#new
17 Aug 2013 - 5:44 pm | चित्रगुप्त
लिंक चुकली, इथे बघा:
http://www.youtube.com/watch?v=ey9usei6ojg
17 Aug 2013 - 6:15 pm | दत्ता काळे
हि कविता वाचल्यावर मला द.मा.मिरासदारांच्या गाणारा मुलुख ह्या कथेची/नाटिकेची आठवण आली. कथेतल्या मुलुखातला राजा सगळ्या प्रजेने सर्व दैनंदिन संभाषणसुध्दा गाण्यातूनच करावे असा हुकूम काढतो. आणि मग धमाल सुरू होते. प्रत्येकजण गाण्यातच बोलू लागतो. त्यात नवराबायकोच्या संवादाची सुरवात काहीशी अशी आहे ..
बायको : तेल संपले, तूप संपले, स्वैपाक आता मी करू कशाचा ?...
19 Aug 2013 - 7:06 am | अत्रुप्त आत्मा
आहे. आहे. आहे.
ही भेदक कविता पाषाणाचि'च आहे! :)
21 Aug 2013 - 8:36 pm | निरन्जन वहालेकर
वेगळ्या धर्तीची कविता. आवडली.
24 Aug 2013 - 2:11 pm | पैसा
महागाईपुढे बोलती बंद आहे!
24 Aug 2013 - 3:39 pm | भावना कल्लोळ
आजचे हे भीषण कटू सत्य आहे !!!