ही ठमा

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
29 Oct 2007 - 2:53 am

आमची प्रेरणा बेसनलाडू यांची गझल पौर्णिमा

चिंब भिजली, काल रात्री, घार गोरी ही ठमा
पावसाच्या कल्पनेने शिंकणारी ही ठमा

भांडण्यांचे रान उठते फक्त थोडे बोलता
केवढी बेजार करते बघ पुणेरी ही ठमा!

का अशी मम नजर खिळली तिच्या पाठीकडे
ओळखू आली कशी ना पाठमोरी ही ठमा?

बघ मला, कोजागिरीला अवस वाटू लगली
(साजरी हल्ली जरा करते गटारी ही ठमा)

राखरांगोळी तुझी बघ "केशवा" होणार ही
लागली राशिस आता रोज वक्री ही ठमा!

विडंबन

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

29 Oct 2007 - 3:51 am | बेसनलाडू

छान विडंबन. पुणेरी, गटारी, वक्री विशेष. "वक्री" हा काफिया खारीज ठरेल, असे वाटते, चूभूद्याघ्या. भांडण्यांचे नको; भांडणांचे हवे.
(वक्री)बेसनलाडू

चांदण्यांचे च्या जवळपास म्हणुन कदाचित भांडण्यांचे...असू दे तेवढे चालायचेच विडंबन आहे (कांजीण्यांचे घालण्यापेक्षा हे बरे. ;-))

राखरांगोळी --(रातरांगोळी) आवडले. :-)

बेसनलाडू's picture

29 Oct 2007 - 4:08 pm | बेसनलाडू

अहो वजनाच्या दृष्टीने चांदण्यांच्या आणि भांडणांचा दोन्ही सारखेच आहेत. षष्ठी विभक्ती प्रत्यय (च्या,ची,चे) लावताना भांडण शब्दाचे बहुवचनी सामान्यरूप भांडणां होते, भांडण्यां नाही :)
जवळपास जायचे म्हणून कैच्या कै? न्हाय बॉ!
(व्याकरणवीर)बेसनलाडू

प्राजु's picture

29 Oct 2007 - 4:52 am | प्राजु

पुणेरी काय??? छान.
बेसनलाडवाशी सहमत.

- प्राजु.

सहज's picture

29 Oct 2007 - 8:23 am | सहज

छान वाटले वाचायला. (छचोरगीरी म्हणा हवे तर) पण मजा आली.

विसोबा खेचर's picture

29 Oct 2007 - 8:37 am | विसोबा खेचर

बघ मला, कोजागिरीला अवस वाटू लगली
(साजरी हल्ली जरा करते गटारी ही ठमा)

राखरांगोळी तुझी बघ "केशवा" होणार ही
लागली राशिस आता रोज वक्री ही ठमा!

केशवा, मस्त रे!

तात्या.

धोंडोपंत's picture

29 Oct 2007 - 10:58 am | धोंडोपंत

वा वा वा वा केशवसुमार !!!

झकास विडंबन झालाय हो. ठमी आवडली.

आपला,
(हसरा) धोंडोपंत

मजा आहे राव तुमची. आमच्या राशीला अजून कोण पुणेरी ठमा लागली नाही.

आपला,
(उपेक्षित) धोंडोपंत

मक्ता फारच छान झालाय. काफ़िया खारिज होणार नाही. वृत्ताच्या लयीत गुणगुणतांना वक्री चा उच्चार वकरी असा होतो. दोघांचेही वजन गा गा आहे. त्यामुळे मात्रेतही फरक येत नाही.

आपला,
(तंत्रशुध्द) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

तरसे हुए सेहरा से जो बिन बरसे गुज़र जायें
इतनी भी मग्रूर न कोई सावन की घटाँ हों

बेसनलाडू's picture

29 Oct 2007 - 2:07 pm | बेसनलाडू

पंत,
वक्रीचे उच्चारण वकरी न होता वक् + री असे होते, असे मला वाटते. चूभूद्याघ्या.
(विद्यार्थी)बेसनलाडू

सर्किट's picture

29 Oct 2007 - 10:42 pm | सर्किट (not verified)

भाकीत खरे ठरले. जरी "अमावस्या" नावाचे विडंबन नसले, तरी गटारीचा उल्लेख आला आहेच !

भांडण्यांचे रान उठते फक्त थोडे बोलता
केवढी बेजार करते बघ पुणेरी ही ठमा!

तुम्हालापण ???

- (समदु:खी) सर्किट