अंकानाम वामतो गति:
" उर्दू-फारसी-अरबी ." या धाग्यावर लिहीतांना श्री. बॅटमन लिहीतात "अक्षरन अक्षर उजवीकडून डावीकडे लावत जायचे. आता यात अजून एक मजा अशी, की उर्दू-फारशी-अरबी लिहीतांना आकडे मात्र डावीकडून उजवीकडे लिहतात...भारतीय पद्धत ढापल्यामुळे
श्री. इस्पिकचा एक्का ... हा एक मोठा पुरावा असे म्हणतात व त्यावर परत
श्री. बॅटमन +११११११११११११११ असा मोठा पाठिंबा देतात.
आता खरी गम्मत पहा. प्राचीन भारतात आकडे उजवीकडून डावीकडे लिहीत, आज आपण लिहिते त्याच्या बरोबर उलटे.
षड् द्विक पंच् द्वि असे लिहले तर त्याचा अर्थ २५२६ . अंकानाम वामनो गती हा नियम. प्राचीन संस्कृतात हीच पद्धत वापरेली आपणास आढळेल. जा काळी आपण भारतातून अरबस्थानात गणित पाठवले तेव्हा हीच पद्धत वापरात असली पाहिजे. पुढे केव्हा तरी आपण हल्लीची पद्धत स्विकारली. आता अंकांबदल सुरुवात केली आहेच तर थोडी जास्त माहिती पाहू.
जेव्हा आपणाला संख्या मोजण्याची गरज भासली तेव्हा पहिल्यांदि आपण उपयोग केला बोटांचा. दहापर्यंत मोजावयास पुरेशी बोटे देवाने आपणास दिली आहेतच. जरा जास्त मोजावयाचे असेल तर पेरे वापरा. जेव्हा लिखित स्वरूपात लिहणे अनिवार्य झाले तेव्हाही बोटांप्रमाणे उभ्या रेघा आल्या (व आडव्याही !). (विसाव्या शतकातही आपण १० आणे II= असेही लिहीत होतो ! ) थोड्याफार फरकांनी भारत व इजिप्तमध्ये करिता उभ्या-आडव्या रेघांनी मोठे आकडे लिहणे शक्य झाले.
संख्यावाचक शब्दांशिवाय इतर सांकेतिक शब्दांचा वापरही शेकडो वर्षे भारतात केला जातो. हे संकेत सहज समजण्यासारखे होते.
शून्य करिता गगन हे पटणारे आहे. चंद्र एकच दिसतो, भू एकच. मग एका ऐवजी चंद्र लिहल्याने भागते.
० करिता शून्य, ख, .गगन, पूर्ण, रंध्र, इ.
१ करिता शशी, आदि, अब्ज, भू, इ.
२ करिता लोचन, कर, कुच ..इत्यादी
३ करिता लोक. अग्नी, गुण
४ करिता वेद, युग, वर्ण इ.
५ करिता प्राण, पांडव, इ.
६ करिता रस, ऋतू, दर्शन इ.
८ करिता वसू, गज, सिद्धी, इ.
९ करिता अंक, निधी,ग्रह, द्वार, इ.
१० करिता दिशा, अंगुली, अवतार इ.
तिथी, पक्ष म्हणजे १५ हे आता आपल्या लक्षात आले असेलच.
याचा उपयोग करून चालू वर्ष झाले गुण-भू-ख-कर .
याचा उपयोग विशेषत: कवींना काव्यात करता येतो. संस्कृतात ज्योतिष व गणित या शास्त्रांवरचे ग्रंथ छंदोबद्ध असल्यामुळे या ग्रंथांतील मोठमोठ्या संख्या सांकेतिक शब्दांकांनीच दाखविल्या जातात.
जुन्या हस्तलिखितात अंकांकरिता अक्षरांचाही उपयोग केलेला आढळतो. उदा. पहिले २५ वर्ण पहिल्या २५ संख्यांकरिता. क=१ ख = २ इ. याचे अनेक भेद पहावयास मिळतात.
अरबांनी आपले अंक उचलले हे खरेच. त्यातही पूर्वेकडील व पश्चिमेकडील असे दोन भेद होतेच. युरोपमधील लोकांनी पश्चिमेकडील भेद स्विकारला.
हे जरा कंटाळवाणे झाले असेल तर पुढचे एक कोडे सोडवून बघा.
16 23 2 7
6 3 20 19
22 17 8 1
4 5 18 9
जादूचा चौकोन सर्वांना माहीत आहे. लहान चौकटील अंकांची आडवी, उभी, तिरपी वा शेजारच्या चार चौकानातील बेरिज सारखी आली पाहिजे. उदाहरण शेजारी दिले आहे. बेरीज ४८ च येते. तर असा जादूचा चौकोन कोणत्याही संख्येकरिता तयार करिता येतो. आपल्या एका पूर्वज गणितज्ञाने याचे सूत्र शेकडो वर्षांपूर्वीच लिहून ठेवले आहे. शाळेत संस्कृत घेतलेल्या कोणालाही त्याचा अर्थ सांगता येईल. तुम्ही सोडवाल तेव्हा "मला आले" असा प्रतिसाद द्या. सर्वांना वाव मिळावा म्हणून तीन दिवसांनी उत्तर प्रसिद्ध करू. एक, जरा मोठा आकडा ठरवा. ती वांच्छित संख्या.
सोळा चौकोनांना १ ते १६ आकडे द्या व त्यात सूत्राप्रमाणे आकडे भरा.
सूत्र असे :
वांच्छा कृतार्धा कृतमेक् हीनम् !
द्वीये ग्रहे शोडष सप्तमेsष्टमे !
तिथ्याsवतारे प्रथमेsवशिष्टे !
द्विसप्त षड् त्र्यष्ट भूवेद्प्राणा: !
(वांच्छा..इच्छिलेली संख्या)
शरद
.
वाचने
6575
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
अंकानाम वामनो गती रोचक आहे.
मला आले..
हे सुत्र कळाले नाही पण
पूर्वज गणितज्ञ लूजर असल्याने
In reply to हे सुत्र कळाले नाही पण by प्रसाद गोडबोले
अरेरे
In reply to पूर्वज गणितज्ञ लूजर असल्याने by विश्वनाथ मेहेंदळे
अंकानाम् वामतो गति: असं
+१
In reply to अंकानाम् वामतो गति: असं by पिशी अबोली
वामतो हेच बरोबर
In reply to अंकानाम् वामतो गति: असं by पिशी अबोली
माझंही लिहिण्यात चुकलंय थोडसं
In reply to अंकानाम् वामतो गति: असं by पिशी अबोली
कृपया हे सूत्र नक्की कुठे
रोचक धागा. अक्षरी लिहिताना
अर्र्र्र्र्र्र्र्र्र चुकलो
In reply to रोचक धागा. अक्षरी लिहिताना by बॅटमॅन
आलं संस्कृतपंडीत मास्तर
In reply to अर्र्र्र्र्र्र्र्र्र चुकलो by बॅटमॅन
अवो कसला कलास अन कसलं काय?
In reply to आलं संस्कृतपंडीत मास्तर by प्यारे१
या बॅट्याचे प्रतिसाद लै आवडले
In reply to अवो कसला कलास अन कसलं काय? by बॅटमॅन
+१११
In reply to या बॅट्याचे प्रतिसाद लै आवडले by प्रचेतस
आंक्षी आंक्षी
In reply to +१११ by डॉ सुहास म्हात्रे
उत्तर
विषम संख्या
कां नाही ?
अपूर्णांकांतल्या
उत्तम माहिती