संक्षिप्त

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
7 May 2013 - 10:37 am

वेदनेचे रूप आहे हिमनगाची सावली
वाटते ते बेट तरते नाळ कोणी पाहिली
आंधळ्या हृदयास दिसते कोणतीही माउली
अधिकतर अंदोलनांच्या सुप्त वेठी काहिली

लाट भर आघात अगणित पेटलेल्या मैफिली
भेटले अज्ञात कोणी शोधते मन चाहुली
वेध व्याधाचे इथे जाळीत माया गुंतली
जाळ शीतल कोपले आणि समिधा गोठली

एकले हे युद्ध तरिही संगरी प्रश्नावली
उत्तरे संक्षिप्त कलिका कोष झाकुन राहिली
गंध मदनाचे अधूरे झुळुक अवचित थांबली
वादळे उठली; मुक्याने ऐन भाषा संपली

............................अज्ञात

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 May 2013 - 5:17 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

वेध व्याधाचे इथे जाळीत माया गुंतली
जाळ शीतल कोपले आणि समिधा गोठली

व्वाह!! क्या बात!!!

प्यारे१'s picture

7 May 2013 - 6:55 pm | प्यारे१

पहिली दोन अक्षरे वाचून डोकावलो.
तसं काहीच नाही. :(
कविता समजली नाही मात्र वाचताना आवेश जाणवतोय. एकेका शब्दाबरोबर नाद उमटतोय.

अत्रुप्त आत्मा's picture

7 May 2013 - 10:56 pm | अत्रुप्त आत्मा

क्या बात है...क्या बात है यार..... मार डाला...मार डाला... प्रत्येक ओळी ओळीवर फिदा आहे.
सलाम सलाम सलाम!!!

मस्त मस्त मस्त.
आवडली एकदम.

साऊ's picture

8 May 2013 - 7:08 pm | साऊ

फार छान.