मिक्स व्हेज मलई

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
14 Apr 2013 - 2:53 pm

नेहमीच्या पारंपारीक मेथि-मटर मलई ला पर्याय :)

veg malai

साहित्यः
१. कांदा - १ मध्यम
२. मगज बी - १ चमचा (watermelon seeds white)
३. काजु - ८ ते १०
४. हिरव्या मीरच्या - २ (तिखट असतील त्या प्रमाणात आवडिप्रमाणे कमी/जास्त)
५. फ्रेश क्रिम/मलई - २ चमचे
६. कसुरी मेथी पावडर - १/२ चमचा
७. आलं/लसुण/हिरवी मिरची पेस्ट - २ चमचे
८. मिक्स भाज्या - १.५ ते २ कप (मी फ्लॉवरचे तुरे, फ्रोजन मटार, गाजर, बेबी कॉर्न (नसतील तर आपले नेहमीचे मक्याचे दाणे उकडुन), हिरवी सीमला मिरची (चौकोनी तुकडे करुन), आणि पनीर क्युब्स :D वापरलय)
९. तमालपत्र - १
१०. तुप - २ पळ्या
११. चवीनुसार मीठ/साखर किंवा मध
१२. बारीक चीरलेली कोथींबीर

कॄती:
१. सोललेले कांदे, काजु आणि मगज बी कुकर मधे २ शीट्या देउन उकडवुन घ्या. गार झालं कि मिक्सर मधे मुलायम वाटुन घ्या
२. एका पातेल्यात २ कप पाण्याला उकळि आली कि सीमला मिरच्या आणि पनीर सोडुन बाकि सर्व भाज्या एक ५ ते १० मि. अर्धवट शीजवुन घ्या (पार मेण होईस्त नाहि). पाणी फेकुन देउ नका. नंतर हेच पाणी व्हेज स्टॉक म्हणुन वापरता येईल किंवा आमटिची डाळ शीजवण्याकरिता वापरु शकतो
३. आवडत असल्यास पनीर शॅलो फ्राय करुन घ्या
४. मध्यम आचेवर एका नॉनस्टिक कढईत/पातेल्यात तुप तापलं कि तमालपत्र, आलं-लसुण-हिरवी मिरची पेस्ट टाकुन परतत रहा
५. पेस्टचा कचा वास गेला कि कांदा-काजुची पेस्ट टाकुन परतत रहा. काजु मुळे पेस्ट कदाचीत खाली लागण्याची शक्यता आहे तेव्हा सतत ढवळत रहा
६. पेस्ट ब्राउन झाली आणि कडेने तुप सुटु लागलं कि त्यात सीमला मिरची/फ्रोजन मटार टाका. वरिल वगळलेलं थोडं भाज्याचं पाणी टाका म्हणजे पेस्ट खाली लागणार नाहि
७. सीमला मिरचीची साल मउ झाली कि अर्धवट उकडलेल्या भाज्या / शॅलो फ्राय केलेलं पनीर टाका
८. भाजी हलक्या हाताने मिक्स करुन एक दणदणीत वाफ काढा
९. आता त्यात कसुरी मेथी, फ्रेश क्रिम/मलई, पाव चमचा साखर किंवा मध घालुन एक ५ मि. गॅस बंद करा. काजुचा गोडपणा पुरणार असेल तर साखर/मध घालायची गरज नाहि किंवा आवडत असल्यास त्यात एक चमचा मनुके टाका (वाफवलेल्या भाज्या टाकल तेव्हा)
१०. वरुन बारीक चीरलेली कोंथींबीर पेरुन पोळि, फुलका, नान, रोटि बरोबर गरमा गरम सर्व करा :)

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

14 Apr 2013 - 3:38 pm | कवितानागेश

मस्स्स्त. :)

भारी दिसतं आहे! करुन बघणार. :)

प्यारे१'s picture

14 Apr 2013 - 3:53 pm | प्यारे१

शिका काहीतरी पुरुषांकडून. ;)

यशोधरा's picture

14 Apr 2013 - 3:54 pm | यशोधरा

दिपककाकांनाच पुन्हा असे सांगतो आहेस? :D

प्यारे१'s picture

14 Apr 2013 - 4:04 pm | प्यारे१

पेडगावच्या का तुम्ही? ;)

यशोधरा's picture

14 Apr 2013 - 4:06 pm | यशोधरा

मी पेडगावची नाही, पण धाग्यावर प्रतिसाद दिला आहेत तुम्ही, म्हणून गंमतीत विचारले. असो.

प्यारे१'s picture

14 Apr 2013 - 4:20 pm | प्यारे१

छान पाकृ आहे. :)

अवांतर:माझा निर्देश 'वेड पांघरुन पेडगावला जाणे' ह्या म्हणीकडे होता. आपला?
(माझे वरील प्रतिसाद उडवल्यास हरकत नाही.)

प्रभाकर पेठकर's picture

14 Apr 2013 - 4:28 pm | प्रभाकर पेठकर

पाकृ छान आहे. आहे ह्या पद्धतीने नक्की करून पाहीन.

तसेच,

कांदा, काजू, मगज बी आधीच शिजलेले आहे. ते पाकृच्या शेवटच्या टप्प्यात टाकले तरी चालू शकेल.
किंवा कांदा वेगळा आणि काजू+मगज बी वेगळे शिजवून, शिजवलेला कांदा आधी परतून, काजू+मगज बी शेवटी मिसळले तरी चालू शकेल. हि आपली माझी पद्धत झाली.

अभ्या..'s picture

14 Apr 2013 - 4:39 pm | अभ्या..

दिपक रेशिपी भारी हाये पण कांद्याला पर्याय नाय का?

पैसा's picture

14 Apr 2013 - 5:06 pm | पैसा

पाकृ आणी फोटो मस्तच!

दिपक.कुवेत's picture

14 Apr 2013 - 5:56 pm | दिपक.कुवेत

तुम्हि सांगीतलेली पद्धत पण चांगली आहे. पुढल्या वेळेस तसं करुन पाहिन.

@अभ्या..: वाटणात कांदा नाहि घातलास तरी चवीत काहि फरक पडेल असं मला तरी वाटत नाहि. करुन सांग :)

सानिकास्वप्निल's picture

14 Apr 2013 - 6:01 pm | सानिकास्वप्निल

मिक्स व्हेज मलईची पाकृ आवडली
फोटो ही छान आहे :)

इन्दुसुता's picture

14 Apr 2013 - 8:15 pm | इन्दुसुता

आवडली पाकॄ, नक्की करणार ..

मदनबाण's picture

14 Apr 2013 - 10:02 pm | मदनबाण

मस्त ! :)
ते मगज बी कशासाठी ?

वा... मस्तच... करुन बघायला पाहिजे. पनीर मुळे अजुनच छान चव आली असेल ना??? ;) :D :D

स्पंदना's picture

15 Apr 2013 - 9:31 am | स्पंदना

चच्चु कब्बी मुलायम बोलते, कब्बी दणदणीत बोलते, ये भाजी है की पैलवान लोगोंका अक्क्खाडा जी?

फोटो मस्तच.
नक्की करुन बघणार. :)

दिपक.कुवेत's picture

15 Apr 2013 - 11:48 am | दिपक.कुवेत

@ बाणा: मगज बी व्हाईट पेस्ट साठि

@ मॄणालीनी: हि हि हि हो पनीर मुळे भाजीची लज्जत अजुन वाढली

@ अपर्णा: तुम क्या बात करता जी? मेरेकु कुच समझ मै नई आता जी

धनुअमिता's picture

15 Apr 2013 - 2:10 pm | धनुअमिता

मस्त...................

कच्ची कैरी's picture

15 Apr 2013 - 4:39 pm | कच्ची कैरी

आवडली पाककृती :)

लाल तिखट वापरावे का? आमच्याकडे या ग्रेव्हीची भाजी तिखट नसेल म्हणून आधीच नाक मुरडतात.

दिपक.कुवेत's picture

15 Apr 2013 - 7:33 pm | दिपक.कुवेत

पण तिखटाएवजी तु सुख्या लाल मिरच्या जरा पाण्यात भीजवुन मग वाटणात घाल म्हणजे ग्रेव्हिला छान लाल रंग येईल किंवा काश्मिरि तिखट वापर....ते नुसतं रंगाला लाल असतं चवीला एवढं तिखट नसतं

ह्म्म तरीच म्हटलं पनीरशिवाय कशी काय केलीत रेसिपी. साहित्य दोनदा वाचलं आणि पनीर सापडलंच शेवटी. ;)

दिपक.कुवेत's picture

15 Apr 2013 - 7:27 pm | दिपक.कुवेत

हा हा हा.....

सुहास झेले's picture

15 Apr 2013 - 8:16 pm | सुहास झेले

सही... फोटो तर अल्टीमेट :) :)

गौरीबाई गोवेकर's picture

17 Apr 2013 - 12:24 pm | गौरीबाई गोवेकर

आवडली बाबा.

मेघना मन्दार's picture

16 Apr 2014 - 3:26 pm | मेघना मन्दार

मगज बी ला काय पर्याय ??

त्रिवेणी's picture

16 Apr 2014 - 3:52 pm | त्रिवेणी

मगज बी ला काय पर्याय - साल काढ्लेले शेंगदाणे.
बाकी पाक्रु नेहमीप्रमाणे मस्त.

दिपक.कुवेत's picture

16 Apr 2014 - 7:55 pm | दिपक.कुवेत

मगज बी अगदि सहजगत्या उपलब्ध असतं कि!

कंजूस's picture

16 Apr 2014 - 8:45 pm | कंजूस

मगज बीला पर्याय अर्थात रश्शाची केमिस्ट्री .ज्याला आपण तेलबिया (शेंगदाणे ,तीळ ,काजू ,अक्रोड ,खोबरे इत्यादी )म्हटतो त्या सर्वाँचा उपयोग रश्शासाठी करता येतो .हे पदार्थ भिजवून वाटल्यावर त्यांच्यातील कण एका टोकाला पाणी आणि दुसऱ्या टोकाला तेलाचे अणू पकडून ठेवतात तेव्हा खरा स्निग्ध रस्सा तयार होतो .ही मधली स्थिती आहे .तेलात वाटण परततांना अगोदर फक्त पाणी आणि नंतर फक्त तेलाच्या अणूंना धरतात त्यावेळी रस्सा पाणचट अथवा तेलकट लागतो .
कांद्याचा रस्सा बनतो हे तितकेसे खरे नाही ,त्यातले खोबरे हे काम करत असते .कांदा लगदा वाढवतो ,वास देतो ,करामल झाल्यास तपकिरी रंग अधिक कडवटपणा येतो इतकेच .

दिपक.कुवेत's picture

17 Apr 2014 - 10:46 am | दिपक.कुवेत

हि नविनच माहिती कळली आज.

पदार्थ आवडला ...फोटो हि सुंदर ...

सविता००१'s picture

17 Apr 2014 - 11:14 am | सविता००१

नक्की करणार, उद्या..

मेघना मन्दार's picture

18 Apr 2014 - 12:36 pm | मेघना मन्दार

काल च करुन पाहिली ही भाजी आणि सगळ्यान्ना खुप आवड्ली :) पाक्रु साठी धन्यवाद!!

आयुर्हित's picture

18 Apr 2014 - 10:59 pm | आयुर्हित

आरोग्यदायी पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद.