मिक्स व्हेज मलई
नेहमीच्या पारंपारीक मेथि-मटर मलई ला पर्याय :)
साहित्यः
१. कांदा - १ मध्यम
२. मगज बी - १ चमचा (watermelon seeds white)
३. काजु - ८ ते १०
४. हिरव्या मीरच्या - २ (तिखट असतील त्या प्रमाणात आवडिप्रमाणे कमी/जास्त)
५. फ्रेश क्रिम/मलई - २ चमचे
६. कसुरी मेथी पावडर - १/२ चमचा
७. आलं/लसुण/हिरवी मिरची पेस्ट - २ चमचे
८. मिक्स भाज्या - १.५ ते २ कप (मी फ्लॉवरचे तुरे, फ्रोजन मटार, गाजर, बेबी कॉर्न (नसतील तर आपले नेहमीचे मक्याचे दाणे उकडुन), हिरवी सीमला मिरची (चौकोनी तुकडे करुन), आणि पनीर क्युब्स :D वापरलय)
९. तमालपत्र - १
१०. तुप - २ पळ्या
११. चवीनुसार मीठ/साखर किंवा मध
१२. बारीक चीरलेली कोथींबीर
कॄती:
१. सोललेले कांदे, काजु आणि मगज बी कुकर मधे २ शीट्या देउन उकडवुन घ्या. गार झालं कि मिक्सर मधे मुलायम वाटुन घ्या
२. एका पातेल्यात २ कप पाण्याला उकळि आली कि सीमला मिरच्या आणि पनीर सोडुन बाकि सर्व भाज्या एक ५ ते १० मि. अर्धवट शीजवुन घ्या (पार मेण होईस्त नाहि). पाणी फेकुन देउ नका. नंतर हेच पाणी व्हेज स्टॉक म्हणुन वापरता येईल किंवा आमटिची डाळ शीजवण्याकरिता वापरु शकतो
३. आवडत असल्यास पनीर शॅलो फ्राय करुन घ्या
४. मध्यम आचेवर एका नॉनस्टिक कढईत/पातेल्यात तुप तापलं कि तमालपत्र, आलं-लसुण-हिरवी मिरची पेस्ट टाकुन परतत रहा
५. पेस्टचा कचा वास गेला कि कांदा-काजुची पेस्ट टाकुन परतत रहा. काजु मुळे पेस्ट कदाचीत खाली लागण्याची शक्यता आहे तेव्हा सतत ढवळत रहा
६. पेस्ट ब्राउन झाली आणि कडेने तुप सुटु लागलं कि त्यात सीमला मिरची/फ्रोजन मटार टाका. वरिल वगळलेलं थोडं भाज्याचं पाणी टाका म्हणजे पेस्ट खाली लागणार नाहि
७. सीमला मिरचीची साल मउ झाली कि अर्धवट उकडलेल्या भाज्या / शॅलो फ्राय केलेलं पनीर टाका
८. भाजी हलक्या हाताने मिक्स करुन एक दणदणीत वाफ काढा
९. आता त्यात कसुरी मेथी, फ्रेश क्रिम/मलई, पाव चमचा साखर किंवा मध घालुन एक ५ मि. गॅस बंद करा. काजुचा गोडपणा पुरणार असेल तर साखर/मध घालायची गरज नाहि किंवा आवडत असल्यास त्यात एक चमचा मनुके टाका (वाफवलेल्या भाज्या टाकल तेव्हा)
१०. वरुन बारीक चीरलेली कोंथींबीर पेरुन पोळि, फुलका, नान, रोटि बरोबर गरमा गरम सर्व करा :)

वाचने
11411
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
मस्स्स्त.
भारी दिसतं आहे! करुन बघणार.
शिका काहीतरी पुरुषांकडून.
In reply to शिका काहीतरी पुरुषांकडून. by प्यारे१
दिपककाकांनाच पुन्हा असे
In reply to दिपककाकांनाच पुन्हा असे by यशोधरा
पेडगावच्या का तुम्ही?
In reply to पेडगावच्या का तुम्ही? by प्यारे१
सोडून द्या.
In reply to सोडून द्या. by यशोधरा
छान पाकृ आहे.
पर्यायी पद्धत.
मस्त आहे
मस्त पाकृ!
पेठकर काका...
मिक्स व्हेज मलईची पाकृ
आवडली पाकॄ, नक्की करणार ..
मस्त ! ते मगज बी कशासाठी ?
वा... मस्तच... करुन बघायला
चच्चु इसमे मलई किधर होना?
नेहमीप्रमाणेच वेगळी आणि छान पाककॄती.
धन्यु लोक्स
मस्त
मस्त
ग्रेव्ही लाल दिसण्यासाठी हिरव्या मिरची ऐवजी..
In reply to ग्रेव्ही लाल दिसण्यासाठी हिरव्या मिरची ऐवजी.. by अनन्न्या
हो चालेल
ह्म्म तरीच म्हटलं पनीरशिवाय
In reply to ह्म्म तरीच म्हटलं पनीरशिवाय by सूड
हि हि हि...
सही... फोटो तर अल्टीमेट
मस्तच
मगज बी ला काय पर्याय ??
मगज बी ला काय पर्याय - साल
पण पर्याय का??
मगज बीला पर्याय अर्थात
ओह
पदार्थ आवडला ...फोटो हि सुंदर
मस्त
मस्त भाजी
आरोग्यदायी पाकृ