बेत खमंग राया आपुला
देऊ फोडणी आमच्या प्रीतीची …
अहो नव्ह डीश ही दुपारची
याला वेळ हवी हो रातीची I2I
ह्यो नजरेचा मदन बान
छेडी गुलाबी बेधुंद तान
ही गोडी गुलाबी यो मस्का
का न लागावा ओ यांचा चस्का
कशी सांगू मी बाई कुणाला
कथा तुमच्या या करामातीची …
अहो नव्ह डीश ही दुपारची
याला वेळ हवी हो रातीची I2I
ऊब मिठीची उतरे मनात
कशी रसरसली माझी काया
त्या चंद्राला जाउन सांगा
जरा दमान पुढ सारकाया
चाहु दिशांनी गार हवेनी
दिली सलामी तुमच्या ख्यातीची …
अहो नव्ह डीश ही दुपारची
याला वेळ हवी हो रातीची I2I
प्रतिक्रिया
20 Feb 2013 - 3:37 pm | अभ्या..
एकदम टिपीकल.
लगे रहो. मस्त
20 Feb 2013 - 3:55 pm | परिकथेतील राजकुमार
कविता आवडेश.
ह्यावरुन भाऊसाहेबांचे लिखाण आठवले :-
शायर सूर्यास म्हणतो- भास्करा येते दया मला तुझी आधीमधी. आहेस का तू पाहिली रात्र प्रणयाची कधी?
सूर्य उत्तर देतो - आम्हासही ह्या शायराची कीव केऊ लागते, ह्याच्या म्हणे प्रणयास ह्याला रात्र यावी लागते!
20 Feb 2013 - 8:10 pm | आर्णव
मित्रा,
शायर सूर्यास म्हणतो- भास्करा येते दया मला तुझी आधीमधी. आहेस का तू पाहिली रात्र प्रणयाची कधी?
सूर्य उत्तर देतो - आम्हासही ह्या शायराची कीव केऊ लागते, ह्याच्या म्हणे प्रणयास ह्याला रात्र यावी लागते!
अप्रतीम!