राष्ट्रपती - इंग्रजी संज्ञांचे भारतियीकरण

खटासि खट's picture
खटासि खट in काथ्याकूट
17 Feb 2013 - 10:49 pm
गाभा: 

राष्ट्रपिता या संबोधनामुळे अंमळ हळवेपण आल्याचे कांही ठिकाणी दिसून आले. या निमित्ताने राष्ट्रपती या संबोधनाबद्दल ज्ञानात भर पडावी असे वाटतेय. मूळ शब्द शोधण्यासाठी इंग्रजीचा आधार घ्यावा लागत असल्याने तसे केले. त्या शब्दास अध्यक्ष असे म्हणत असावेत अशी एक शंका मनात येऊन गेली. जर प्रेसिडेण्ट = ....पती हे बरोबर असेल तर घराघरातून अध्यक्षमहाराज, जेवायला चला असा हाकारा ऐकू यायला काहीच हरकत नाही. इकडून तिकडून पेक्षा आमचे अध्यक्ष आज दुचाकीवरून मार्गस्थ झाले हे म्हणायला आणि ऐकायलाही सुटसुटीत वाटते. असो.

मुद्दा असा, प्रेसिडेण्ट म्हणजे पती असे भाषांतर कुणी केले असावे ? सरकार दरबारी त्यास मान्यता कशी मिळाली यावर चर्चा व्हावी हा प्रस्ताव ठेवला आहे. आपल्याकडे अस्तित्वात नसलेल्या बाबींना इंग्रजी प्रतिशब्द नसताना अनेक इंग्रजी शब्दांचे अट्टाहासाने केलेले भाषांतर आजही कालसुसंगत ठरावे का ? चेंडू हा शब्द अस्तित्वात असल्याने त्या शब्दाच्या वापराबाबत शंका नाही पण क्रिकेट हा खेळच परकीय असताना विकेट या संपूर्ण नव्या प्रकारासाठी यष्टी सारखे शब्द योजणे, रूजवणे हा अट्टाहास देखील योग्यच आहे का ?

( या विषयावर आधीच चर्चा झालेली असल्यास ती शोधण्याचा प्रयत्न केला. पण तसे न आढळल्याने प्रस्ताव ठेविला ऐसे )

प्रतिक्रिया

खटासि खट's picture

17 Feb 2013 - 10:51 pm | खटासि खट

या निमित्ताने

राष्ट्रपिता

या संबोधनाबद्दल

राष्ट्रपती असे वाचावे. क्षमस्व !

आदूबाळ's picture

17 Feb 2013 - 11:03 pm | आदूबाळ

माझ्या मते संज्ञांचं "मराठीकरण" करावं, पण "प्रतिशब्दीकरण" करू नये. म्हणजे परकीय शब्द रुळवून घ्यावा पण त्याचा (जत्रेत हरवलेला) मराठी भाऊ शोधण्याची धडपड नको. त्याने भाषेचा लहेजा बिघडतो असं मला वाटतं.

मिपावर वाचलेले दोन नमुने: चोप्य पस्ते (मराठीकरण) आणि "हलकेच घ्या" (टेक इट लाईटलीचं प्रतिशब्दीकरण)

पैसा's picture

18 Feb 2013 - 12:06 am | पैसा

लै भारी धागा! पण खटांनो, क्रिकेट परकीय म्हणून कोणी सांगितलं? आमचा कन्हैया चेंडुफळी खेळत होता की! तसे स्टंप याचे भाषांतर यष्टी हे बरोबर आहे.

प्रेसिडेंट याचे भाषांतर राष्ट्रपति कोणी केले ते मात्र माहित नाही. पति म्हणजे स्वामी असा काहीसा अर्थ येतो. राष्ट्रपती आपल्या देशाचे मालक नक्कीच नाहीत!

श्रीरंग_जोशी's picture

18 Feb 2013 - 12:18 am | श्रीरंग_जोशी

जसे सेनापती म्हणजे सेनेचा प्रमुख.

तसेच राष्ट्रपती म्हणजे राष्ट्राचा प्रमुख.

शाळेत मराठी भाषेचा जुजबी अभ्यास केला असेल तर राष्ट्रपती मधला पती = नवरा अशी समजुत व्हायला नको...

श्रीरंग_जोशी's picture

18 Feb 2013 - 12:30 am | श्रीरंग_जोशी

तर हिंदी, संस्कृत व इतरही भारतीय भाषांमध्ये हाच अर्थ होतो.

सांजसंध्या's picture

18 Feb 2013 - 12:33 am | सांजसंध्या

पती या शब्दाचा अर्थ काय आहे ?

श्रीरंग_जोशी's picture

18 Feb 2013 - 6:34 am | श्रीरंग_जोशी

वरील उदहरणांखेरीज लक्षाधीश व कोट्याधीश या शब्दांना हिंदीत लखपती व करोडपती असे म्हंटले जाते. यातल अर्थ तेवढ्या किमतीच्या संपत्तीचा स्वामी.

तुम्ही दिलेल्या सर्व उदाहरणात स्वामी हाच अर्थ अभिप्रेत आहे. सेनापती हा शब्द पचलित असण्याच्या काळात स्वामीत्व हीच भावना प्रचलित असणार. हल्ली लष्करप्रमुख, हवाईदलप्रमुख असे शब्द प्रचलित आहेत. कोट्यशीश तर सरळ सरळ त्याच्या खाजगी मालमत्तेचा पती असंच आहे. राष्ट्रपती हा शब्द योजताना ते एक पद असल्याने पुरूषवाचक समजले जाऊ नये असी सूचनाही त्यासोबत असल्याचे स्मरते. हे सगळं जमेस धरूनही त्या शब्दातून ध्वनीत होणारा अर्थ पाहता असा शब्द प्रचलित करणे हे योग्य आहे का हा चर्चेचा प्रस्ताव आहे. तुम्ही दिलेल्या सर्व उदाहरणात अभिप्रेत असलेले अधिकार राष्ट्रपतींना आहेत का ? क ते एक शोभेचे पद आणि घटनात्मक पद आहे ?
( लोकशाही लोकांना जबाबदार असल्याने लोकांचा - नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून भारताचे प्रथम नागरिक या नात्याने ते पद असेल का ? शासनाचे सर्व व्यवहार आणि आदेश राष्ट्रपतीच्या नावे होत असल्याने ते भारतातील सर्व नागरिकांच्या वतीने होतात इतकाच काय तो प्रतिकात्मक अर्थ असावा. राष्ट्राचे स्वामी हा अर्थ नाही या पैसाताईंच्या मताला अनुमोदन. तज्ञांच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत )

श्रीरंग_जोशी's picture

19 Feb 2013 - 9:51 am | श्रीरंग_जोशी

हा अर्थ काढणे शब्दशः शक्य आहे. पण राष्ट्रपतीपदाचे अधिकार, जबाबदार्‍या वगैरे अतिशय स्पष्टपणे घटनेत वर्णिल्या असल्याने आजवर तरी या संज्ञेवर कधी कुणा तज्ञ व्यक्तिने आक्षेप घेतल्याचे आठवत नाही.

खटासि खट's picture

19 Feb 2013 - 10:08 am | खटासि खट

म्हणजे आपणच का ते ?
आम्ही मूढ घेऊ शकतो ना ?

चिंतामणी's picture

18 Feb 2013 - 2:18 am | चिंतामणी

धागाकर्त्याचा पहीला पोस्ट वाचा.

अग्निकोल्हा's picture

18 Feb 2013 - 6:40 am | अग्निकोल्हा

मि रजनी अण्णाचा दलपती नावाचा सिनेमा पाहिलाय... त्याला "दलपती - द लिडर" असच म्हट्लं होत.

रमेश आठवले's picture

18 Feb 2013 - 2:16 am | रमेश आठवले

आपल्या येथे जवळ जवळ सर्व विमानतळावर- अमुक अमुक राष्ट्रीय विमान पत्तन- असे फलक लावलेले असतात. विमानात बसण्यासाठी जाताना अथवा येणार्या पाहुण्यांची वाट पहात असताना हे फलक वाचून पोटात धसका भरतो. पत्तन च्या ऐवजी पतन या शब्दाची आठवण येते. सरकारच्या प्रत्येक विभागात एक हिंदी ( राष्ट्रभाषा) चा खास विभाग असतो. तेथे काम करणार्यांनी या विषयी गंभीर दखल घ्यावयास हवी.

मनीषा's picture

18 Feb 2013 - 9:09 am | मनीषा

समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांचे वर्णन करताना "गजपती, हयपती, भूपती..." असा उल्लेख केला आहे. त्याचा अर्थ प्रमुख असा होतो पण त्या प्रमाणे पालनकर्ता/रक्षणकर्ता असाही होऊ शकतो. जसे अधिपती, श्रीपती (श्री म्हणजे संपत्ती अथवा लक्ष्मी या अर्थाने)
@सांजसंध्या मला वाटते पती म्हणजे पत्नीचे रक्षण करणारा, पालन करणारा असाच असावा. कारण पारंपारिक हिंदु विवाहा मधे पतीला अग्नीच्या साक्षीने शपथ घ्यावी लागते की मी पत्नीचे रक्षण करीन वगैरे वगैरे.. त्यामुळे हा अर्थ मला योग्य वाटतो.
'पत्नी'चा अर्थ माहीत नाही.. त्याची व्युत्पत्ती कोणी सांगेल का?

खटासि खट's picture

18 Feb 2013 - 9:35 am | खटासि खट

पत्नी'चा अर्थ माहीत नाही.. त्याची व्युत्पत्ती कोणी सांगेल का?

भार हलका करणारी असा असावा. उदा. खिसा.

तुम्ही तुमचा अनुभव सांगीतला .. पण हा काही खरा अर्थ नव्हे .

वामन देशमुख's picture

18 Feb 2013 - 11:58 am | वामन देशमुख

"पतनी"चा... क्षमा करा, "पत्नी"चा अर्थ खरंच माहित नाही?

नितिन थत्ते's picture

18 Feb 2013 - 9:31 am | नितिन थत्ते

@पैसा
>>तसे स्टंप याचे भाषांतर यष्टी हे बरोबर आहे.

आम्हाला यष्टी म्हणजे हीच ठाऊक आहे.

st

अरे आमच्या आडनावाबद्दल उल्लेख देखील नाही, असो.

श्रिया's picture

18 Feb 2013 - 1:09 pm | श्रिया

"टाय" या शब्दाचे मरठीकरण "कंठलंगोट" हे हि गमंतीशीर वाटते. "टाय" साठी फित हा श्ब्द कदाचित चालू शकेल.

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Feb 2013 - 11:23 am | llपुण्याचे पेशवेll

मराठीकरण जरून करावे. जितके जमेल तितके ते रूढ करावे. अनेक शब्द सुरुवातीला मजेशीर किंवा थोडेसे वेगळे वाटतिल पण एकदा रुळले की ते तितके गैर वाटत नाहीत. जेव्हा इंग्रजीमधे कॉम्प्युटरच्या माऊसला माऊस हा शब्द आला तेव्हा तो देखील सुरुवातीला मजेशीरच वाटला असेल. पण आता तो रुळला ना!
उगाच लहेजा लहेजा करत बोंब मारण्यात काय अर्थ आहे कळत नाही.
आय मीन मला हे कळत नाही दॅट इतके सारे इंग्लिश वर्डस यूज केल्यावर मराठीचा लहेजा जात नाही का!