नजीक किनारे येता कैसी नावच बुडते रे
पैशाच्या फुंकरीने जळते सुर्य विझती रे
कसा पाऊस होतो छोटा
अन पैसा होतो मोठा
हे व्यस्त प्रमाणी अवघड मज ना
समिकरण सुटते रे.....
त्यांनी भुर्रकावे लोणि मी ताकच का प्यावे
दुखणे ऐसे ठणकत रहाते , अवघड जागीचे
ही खोड जीत्याची रे,
त्या मरण कसे यावे.
इथे हरल्या पोथ्याही,
गीता,गाथा , ओव्याही.
कसा मोहासाठी विवेक आपला
गहाण पडतो रे
नजीक किनारे ...
गंजुन गेली शरपंजरी तरी विरक्ती ना आली
जीव अडकला सत्तेसाठी मरणही वेशीशी
ही शर्यत सत्तेची
इथे अट ना अंताची,
त्यां भय ना पापाचे
दानव वा देवांचे
जरी गर्दन मारा तरी अशांची
शेपुट फडफडते
नजीक किनारे ...
गीत - कौस्तुभ
प्रतिक्रिया
2 Feb 2013 - 6:28 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
झुंझार गीत!! आवडले.
2 Feb 2013 - 8:29 pm | पैसा
कविता आवडली.
3 Feb 2013 - 5:40 pm | श्री गावसेना प्रमुख
झुंझार गीत!! आवडले.
कविता आवडली
हे गीत आहे का कवीता ना कळेना मज पामराला
3 Feb 2013 - 10:10 pm | जेनी...
सुधरा जरा ... अजुन किती वर्ष पामरात मोडनार आहात ??
4 Feb 2013 - 12:14 am | कवितानागेश
पामर म्हन्जे काय?
4 Feb 2013 - 6:22 am | जेनी...
पामर म्हणजे ' मंद ' गं ! :P
6 Feb 2013 - 9:29 pm | इनिगोय
नाय गं माऊ, हिच्या सांगण्यावर नको जाऊ..
पामर म्हंजे गरीब.
आणि 'गाजर!' म्हणजे मंद.. :|
आमच्या ओळखीच्या एक बाई कोणालातरी मंदपणा केला म्हणून 'गाजर आहेस!!!' असं म्हणताना आजच ऐकलं मी :P
6 Feb 2013 - 11:41 pm | जेनी...
गवार कुठली ! :-/
7 Feb 2013 - 3:13 pm | इनिगोय
गवार ना, इथलीच भारतातलीच. अजून माहिती हवी तर हे बघ. :P
8 Feb 2013 - 4:32 pm | श्री गावसेना प्रमुख
बुद्धु आहात काय?हा लेख वाचा कळेल मग खर काय ते,आधी अभ्यास करावा अन मग बोलाव माणसाने,की उचलली जीभ लावली नाकाला.
6 Feb 2013 - 9:53 am | कौस्तुभ आपटे
धन्यवाद !
6 Feb 2013 - 10:13 am | परिकथेतील राजकुमार
नक्की काय प्राब्लेम हाय ते कळाले नाय. इस्कटून सांगा.
8 Feb 2013 - 5:04 pm | मनीषा
त्यांनी भुर्रकावे लोणि मी ताकच का प्यावे
हा प्रॉब्लेम असावा .
8 Feb 2013 - 4:57 pm | गवि
कवितेमागची थीम चांगली पण शब्दरचनेत बरीच मोडतोड आहे..
ऐसे तैसे अशी काहीशी जुनी शैली बर्याच ठिकाणी येते तर मधेच बेअरिंग सुटून नव्या पद्धतीची रचनाही होतेय.
नजीक किनारेची संगती लागत नाहीये..
उदा.
नजीक किनारे ही ओळ वगळून वरच्या सर्व ओळींचा "नजीक किनारे"शी काय संबंध आहे??
की मलाच काहीच कळत नाहीये? की मला काहीच कळत नाहीये? की मला काही कळतच नाहीये?
8 Feb 2013 - 5:13 pm | संजय क्षीरसागर
याचा अर्थ संपन्नतेला जेंव्हा विपन्नता भेटते (किंवा सत्ताधिशाला सामान्य भेटतो) तेंव्हा विपन्नाची (किंवा सामन्याची) नांव बुडते!
कवितेचा प्रयत्न आवडला. विषेशतः `नजीक किनारे येता कैसी नावच बुडते रे' ही कल्पना.
9 Feb 2013 - 12:54 am | कौस्तुभ आपटे
`नजीक किनारे येता कैसी नावच बुडते रे' यात मला म्हणायचे आहे कि बरेचदा मोठ्या प्रयत्नांनी आणि कष्टांनी मीळवलेल्या गोष्टी काही लोकांच्या स्वार्थ आणि आत्ममतलबी स्वभावामूळे,फितूरीमूळे धूळीला मिळतात. सत्ता,पैसा या मागे लोक तारतम्य गमावतात त्याच परीणाम समाजाला भोगावा लागतो.
पहिल्या कडव्यात हे असे का होते ते म्हटलं आहे.
दुसर्या कडव्यात अशा टोकाला गेलेल्या लोकांच्या वृत्तीचे वर्णन द्यायचा प्रयत्न केला आहे
अभिप्रायावद्द्ल धन्यवाद!
9 Feb 2013 - 12:59 am | धन्या
"नजीक किनारे येता कैसी नावच बुडते रे" या ओळीने "लब तक आते आते होठोंसे सागर छूट जाता हैं" हे गाणं आठवलं.