आजपर्यंत अनेक दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट वगैरे पाहण्यात आले होते. प्रत्येक वेळेस केवळ अतिरेकी अमुक धर्माचा आहे म्हणून दहशतवादाला त्या धर्माचे नाव देता कामा नये हा नियम कटाक्षाने पाळला जात होता. तमाम साहेब, म्याडम व्यासपीठावरून उच्चरवात हेच ठासून सांगत होते. त्यामुळे दहशतवाद हा नेहमीच कृष्णधवल चष्म्यातून पहात होतो.
पण आधुनिक काळाला अनुसरून आपले द्रष्टे गृहमंत्री शिंदेसाहेब ह्यांनी ह्या प्रकाराला फाटा द्यायचे ठरवले आहे. आणि रंगीत दहशतवाद हा एक नवा उपक्रम सुरू केला आहे. च्यारिटी बिगिन्स आट होम ह्या न्यायाने सुरवातीला भगवा हा अस्सल भारतीय मातीतला रंग निवडला आहे.
त्या धोरणाला अनुसरुन आजकाल भगवा दहशतवाद भारतात फोफावतो आहे, रा. स्व. संघाचे लोक मोठ्या प्रमाणात अतिरेकी प्रशिक्षण केंद्रे चालवत आहेत. तिथे गठ्ठ्याने अतिरेकी बनत आहेत वगैरे रोचक विधाने आपल्या गृहमंत्र्यानी केली. आणि मोठीच खळबळ झाली. बहुधा काळेपांढरे टीव्ही जाऊन रंगीत आल्यावर अशीच खळबळ माजली असेल. अर्थात सिनेमा चालू असताना प्रेक्षकाने खलनायकावर ओरडणे, त्याच्या अंगावर धावून जाणे बावळटपणाचे वाटते तसे गृहमंत्री हा एकरंगी दहशतवादाचा खेळ तटस्थपणे बघत आहेत. प्रत्यक्ष मैदानात उतरून संबंधित संघटनेवर बंदी घालू, संबंधित संघटनांचे सदस्यत्व मिरवणारे आमदार, खासदार ह्यांचे पद रद्द करू, कुठल्या राज्यातील सरकार अशा वाईट नादाला लागत असेल तर ते बरखास्त करू असे काही म्हणत नाहीत.
पण आता काही बुरसटलेले, जुनाट विचारांचे काँग्रेसी नेते ह्या रंगीत दहशतवादाला नाकारुन पुन्हा ब्लॅक अँड व्हाईट दहशतवादाकडे वळू असे म्हणत आहेत.
http://online2.esakal.com/esakal/20130123/5600019574208857395.htm
पूर्वीही असे अप्रिय सत्य ठणकावून सांगणार्या द्र्ष्ट्या लोकांना हालअपेष्टा सहन करायला लागल्या होत्या. गॅलिलिओ, टॉलेमी अशा लोकांच्या तोडीस तोड आपले गृहमंत्रीजी आहेत असे वाटते.
आपल्याला काय वाटते? रंगीत दहशतवादच बरा नाही का? रंगीत सिनेमे आल्यावर कुणी ब्लॅक अँड व्हाईटला विचारतो का?
फक्त आपल्याला हवे ते रंग निवडायचे स्वातंत्र्य हवे, कसे?
प्रतिक्रिया
2 Feb 2013 - 1:04 am | आशु जोग
रंग माझा वेगळा
22 Feb 2013 - 11:17 am | अधिराज
काल हैदराबादमध्ये दिलसुखनगर भागात सायंकाळी सातच्या सुमारास झालेल्या दोन स्फोटांत किमान २० ठार, तर १०० हून अधिक जखमी झाले. अजमल कसाब व अफझल गुरू यांच्या फाशीनंतर दहशतवादी संघटनांकडून त्याला प्रत्युत्तर दिले जाण्याची शंका हैदराबादमध्ये झालेल्या दोन स्फोटांनी खरी ठरली.
ह्या दहशतवादाचा रंग कोणता ते आता सुशिलकुमार स्पष्ट सांगतिल का?
22 Feb 2013 - 11:54 am | चिरोटा
हा हा. ते आता दहशतवादाला कुठलाच रंग नसतो असे म्हणतील.पुढच्या एक दोन दिवसात- ह्या स्फोटामागे आय्.एस्.आय. असल्याची स्टोरी सांगतली जाईल. मग पाकिस्तानला 'कडक' समज दिली जाईल.पाकवाले स्फोटाचा 'कडक' निषेध करतील.
मनमोहन्,शिंदे जखमींची 'विचारपूस' करतानाचे फोटो दाखवले जातील.तपास यंत्रणा/पोलिस असला स्फोट होणार होता हे आम्हाला आधीच माहित होते असे सांगतील.
22 Feb 2013 - 1:02 pm | श्रीगुरुजी
>>> आता दहशतवादाला कुठलाच रंग नसतो असे म्हणतील.पुढच्या एक दोन दिवसात- ह्या स्फोटामागे आय्.एस्.आय. असल्याची स्टोरी सांगतली जाईल. मग पाकिस्तानला 'कडक' समज दिली जाईल.पाकवाले स्फोटाचा 'कडक' निषेध करतील.
मधूनच दिग्विजय, आर आर पाटिल इ. वाचाळवीर असे सांगायला सुरूवात करतील की या स्फोटासाठी हिंदू दहशतवादी संघटनांची देखील चौकशी करावी. मग लगेचच अबू आझमी, रशीद अल्वी इ. सांगायला सुरूवात करतील हिंदू दहशतवादीच या स्फोटामागे आहेत. या स्फोटांचे निमित्त करून साध्वी प्रज्ञासिंग इ. ची चौकशी करणारे एनआयएचे अधिकारी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करायला अजून मुदत मागतील व कारण सांगतील की आम्हाल असीमानंद, प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहित इं. चे या स्फोटाशी कनेक्शन आहे का ते तपासायाला वेळ लागेल. लगेचच दिग्विजय, आबा पाटिल वगैरे शंका व्यक्त करायला सुरूवात करतील की अफझलच्या फाशीमुळे वातावरण तापलेले असताना या स्फोटांचे आरोप निरपराध मुस्लिम समाजावर जातील हे गृहित धरून संघपरिवारानेच हे स्फोट घडवून आणले असावेत. शेवटी या स्फोटांमागचे खरे आरोपी सापडणार नाहीत व संशयाची सुई मात्र संघपरिवारावर वळविली जाईल.
13 May 2016 - 10:30 pm | काळा पहाड
NIA's cleanchit to Sadhvi Pragya, Karkare probe was fudged
http://www.newsx.com/national/28340-nias-cleanchit-to-sadhvi-pragya-kark...
15 May 2016 - 11:32 am | नितिन थत्ते
थांबा थांबा......
But the elite agency has recommended prosecuting Army Colonel Srikant Purohit for conspiracy and under the Unlawful Activities (Prevention) Act (UAPA) or UAPA
15 May 2016 - 11:59 am | बोका-ए-आझम
असं म्हटलंय. म्हणजे खटला चालवावा. याचा अर्थ खटला भरण्यासारखे आरोप कर्नल पुरोहित यांच्यावर ठेवता येतील आणि पुरावा कोर्टासमोर मांडता येईल. त्यावरून कोर्टालाच ठरवू द्या पुरोहित दोषी की निर्दोष ते.
15 May 2016 - 12:03 pm | नितिन थत्ते
ते कोर्ट ठरवेल हे बरोबरच. फ़क्त भगवा दहशतवाद हा शब्द पुसून टाकायची परिस्थिती "अजून" आलेली नाही इतकेच.
15 May 2016 - 12:11 pm | गामा पैलवान
नितीन थत्ते,
भगवा दहशतवाद हा शब्द पुसायचा कशाला? जो शब्द अस्तित्वातच नाही तो पुसून टाकता येईल काय? कर्नल पुरोहित दोषी ठरले तर आणि तरंच भगव्या दहशतवादाबद्दल चर्चा करता येईल. पण तरीही ही संज्ञा स्वीकारण्यात अडचणी आहेतंच. कारण की हिंदूंमध्ये धर्माच्या नावाखाली निरपराध्यांना ठार मारायची पद्धत नाही.
आ.न.,
-गा.पै.
15 May 2016 - 12:12 pm | नितिन थत्ते
>>कारण की हिंदूंमध्ये धर्माच्या नावाखाली निरपराध्यांना ठार मारायची पद्धत
=))
15 May 2016 - 12:45 pm | बोका-ए-आझम
देशातल्या काही कोटी हिंदूंपैकी एकाने दहशतवादी कृत्य केलं तर लगेच तो भगवा दहशतवाद होतो का?
15 May 2016 - 1:15 pm | टवाळ कार्टा
अगदी बरोबर...पण जातीच्या नावाखाली चालते
15 May 2016 - 1:39 pm | बोका-ए-आझम
पण जातीयवादामुळे होणाऱ्या हत्यांना काहीतरी कारण असतं, काहीतरी trigger असतो. हिंदू धर्मात एका जातीचे लोक दुस-या जातीच्या माणसाला केवळ तो त्या जातीत जन्माला आला म्हणून मारत नाहीत. कुठल्याही कारणावरून मारण्याचं समर्थन अजिबात नाही, पण केवळ वेगळ्या मानवसमुहात जन्माला आला म्हणून मारणं हे जास्त अमानुष आहे, मग ते कोणत्याही धर्माचे असोत.
15 May 2016 - 11:26 pm | तर्राट जोकर
हत्या ह्या अमानुषच असतात. त्यात कमी वा जास्त अमानुष असे काही नसते. असतो तो फक्त दृष्टिकोन.
15 May 2016 - 11:29 pm | बोका-ए-आझम
मी फक्त शब्द वेगळे वापरलेले आहेत. खरंतर अमानुषपणाचं ranking करणं चुकीचं आहे.
15 May 2016 - 11:42 pm | तर्राट जोकर
तुमचं मत वेगळं आहे असं तुमच्या प्रतिसादावरुन वाटतंय.
16 May 2016 - 1:10 am | बोका-ए-आझम
तसं करणं खरं तर चुकीचं आहे, असं मला म्हणायचं होतं.