वांग्याचे भरीत... (खांदेशी)

योगिता_ताई's picture
योगिता_ताई in पाककृती
2 Jul 2008 - 4:47 pm

साहीत्य :
हिरवी मोठी वांगी - ४
जाड मिरच्या - ५ ते ६ (चवीनुसार)
लसुण पाकळ्या - ८ ते १०
कांद्याची पात बारीक चिरुन - १ वाटी
शेंगदाणे - १ मुठ
खोबरे काप - आवडीनुसार
कोथिंबीर - बारीक चिरुन आवडीनुसार
तेल तळण्यासाठी
फोडणी साठी - ओवा, मोहरी
मीठ चवीनुसार

कृती :
प्रथम वांग्यास बारीक छेद देवुन गॅसवर खमंग भाजुन घ्यावेत. भाजलेली वांगी गार झाल्यावर त्याची साले व देठे काढुन घ्यावीत. वांग्याचा गर चांगला स्मॅश करुन घ्याव्या.
मिरच्या कढईत थोडे तेल गरम करुन खमंग भाजुन घ्याव्यात. भाजलेल्या मिरच्या, कोथिंबीर, लसुण पाकळ्या एकत्र जाडसर भरडुन ठेचा करुन घ्याव्या.
कढईत २ डाव तेल गरम करुन त्यात ओवा व मोहरीची फोडणी करावी. त्यात शेंगदाणे व खोबरे काप खमंग तळुन घ्यावे. त्यात कांद्याची पात घालुन तेल सुटेपर्य॑त परतावे. त्यात मिरचीचा ठेचा व स्मॅश केलेला वांग्याचा गर घालावा. चवीनुसार मीठ घालुन व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे. वरुन कोथिंबीर घालावी.

वांग्याचे भरीत तयार!!!!.......

हे भरीत गरम गरम पुरी किंवा कळण्याच्या भाकरी बरोबर एकदम झकास लागते.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

2 Jul 2008 - 5:05 pm | विसोबा खेचर

वांग्याचं भरीत म्हणजे आमचा वीक प्वाईंट!

योगिताताई, सुरेख पाकृ!

येऊ द्या अजूनही...

तात्या.

चित्रा's picture

3 Jul 2008 - 5:39 am | चित्रा

छान कृती.

माझा पण! :)
वाह.. लसूण, शेंगदाणे आणि खोबरं.. क्या बात है!!

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

वरदा's picture

2 Jul 2008 - 7:07 pm | वरदा

पण मी कांदा, कोथिंबिर घालून साधी फोडणी देऊन करते..लसूण, दा. कूट नाही घालत...आता हे ट्राय करेन....

एक्स्पर्ट लोकांनो..अमेरीकेत वांगं भाजायच्या काही ट्रीक्स आहेत का? मी कन्वेंशनल ओव्हन मधे भाजते...पण ते पॅन सॉलीड खराब होतं आणि डिसपोसेबल पॅन घेतलं की ते फाटून तेल खाली गळतं मी हल्ली मेटल पॅन मधे डिसपोजेबल पॅन ठेवून भाजते पण वेळ लागतो फार्....तापमान काय ठेवायचं असतं? मी ३०० ठेवते...

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

कुंदन's picture

2 Jul 2008 - 7:25 pm | कुंदन

तै दा. कूट नाही टाकत यात , आख्खे शेंगदाणेच टाकतात.

वरदा's picture

2 Jul 2008 - 8:32 pm | वरदा

बरं झालं सांगितलं आता तेच करेन ट्राय करताना...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

चकली's picture

3 Jul 2008 - 1:05 am | चकली

मलापण वान्गे भाजयला ४०-४५ मिनीटे लागतात.
चकली
http://chakali.blogspot.com

बहुगुणी's picture

3 Jul 2008 - 12:02 am | बहुगुणी

मी गेल्याच आठवड्यात एका मित्राकडे वांगी आउटडोअर ग्रिलवर (कोळश्याच्या) भाजलेली पाहिली, मस्त वासही लागतो कोळश्याचा. विद्युत ग्रिलवर देखील चांगली भाजता येतील असं वाटतं.

वरदा's picture

3 Jul 2008 - 1:04 am | वरदा

चिकटली नाहीत का ती ग्रील ला? अख्खं भाजलं की काप करुन? मी तुकडे केलेल्या सगळ्या भाज्या टाकते ग्रील वर पण अख्खं वांगं नाही टाकून पाहिलं कधी...

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

मी प्रयत्न केला, पण ग्रिल वर नीट होत नाही. काही वेगळे केले का?
चकली
http://chakali.blogspot.com

प्रभाकर पेठकर's picture

5 Jul 2008 - 4:24 pm | प्रभाकर पेठकर

भाजण्यापूर्वी वांग्याला मस्तपैकी तेलाचा हात लावून डायरेक्ट गॅसवरच भाजायचे. मध्यम आंचेवर आधी तळाकडून भाजत शेवटी देठाकडे भाजावे म्हणजे वांगे फिरवायला सोपे जाते.

वरदा's picture

7 Jul 2008 - 6:35 pm | वरदा

पण गॅस नाही ना...
इलेक्ट्रीक शेगडी आहे...ती पण सिरॅमिक्...कॉईल सुद्धा नाही.... नुसती दिसायला पॉश पण स्वयंपाक करायला एक्दम थर्ड क्लास....
फुलके पण नाही करता येत्..कंपल्सरी घडीची पोळी खावी लागते....:(
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

कुंदन's picture

7 Jul 2008 - 6:39 pm | कुंदन

मग भरीत रद्द .... :-(

मनस्वी's picture

3 Jul 2008 - 12:50 pm | मनस्वी

खानदेशी वांग्याच्या भरीत - मस्त पाककृती योगिता ताई. धन्यवाद!

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

सहज's picture

3 Jul 2008 - 1:37 pm | सहज

भरीत भाजी आवडली.

धन्यवाद.

खादाड_बोका's picture

3 Jul 2008 - 6:48 pm | खादाड_बोका

Varda,

Me every alternate week bharit karto. Adhi vangyala madun chirto aani tyala gode tel lavto. Conventioal oven madhe jee steel chi plate aste, tyachavar aluminium chi foil lavun, vangyacha sapat bhag khali karun tyavar thevto. Conventional oven che temperature 450 C var thevto, va madhun madhun vange shijle ki nahi te pahato. Generally 15-20 minute lagtat. Oven var avalambun aahe.

Ya regular microwave oven madhe hi bhajale jatat. Mazyakade GE cha small microwave aahe, tychat 25 minute lagtaat.

विसोबा खेचर's picture

3 Jul 2008 - 6:51 pm | विसोबा खेचर

बोकेराव,

प्रतिसाद मराठीत लिहिलात तर मेहेरबानी होईल!

आपला,
(मराठी) तात्या.

वरदा's picture

7 Jul 2008 - 9:20 pm | वरदा

मी आता ट्राय करेन नक्की..मीही कन्वेंशनल मधे करुन पाहिलं होतं पण एकतर मेटल चं भांडं असेल तर ते काळं पडतं आणि डिसपोझेबल असेल तर ते फाटून जातं असले उद्योग झाले...पण मी खूप कमी ३००-३५० वर ठेवलं होतं आता ४५० वर ठेवून पटकन झाल्यावर कदाचित प्रॉब्लेम कमी येईल...धन्यु!

आता मराठीत लिहायला माझी एक ट्रिक...जसा आपण उच्चार करतो ना तस्संच टाईप करुन पहा...जसं म्हणाल ना जोडाक्षर तसंच जोडून पहा...आणि रोज ४-५ ओळी लिहायची सवय केली की ८ दिवसात नक्की पटापट लिहिता येईल नक्की...

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

खादाड_बोका's picture

3 Jul 2008 - 8:20 pm | खादाड_बोका

तात्या प्रयत्न करतो पण खुप वेळा पाहीजे तो शब्द लिहील्या जात नाही. तेव्हा कनटाळुन (|: ईग्रजीचा वापर करणे सोपी जाते. मी मराथी मधे पोस्ट करायचा पुर्ण प्रयत्न करीन.

क्शमा असावी ;)

मी खवय्या's picture

11 Jul 2008 - 5:33 pm | मी खवय्या

वरदा ताई,

अमेरीकेत तुम्ही वांगी भाजु शकत नाही, त्यापेशा आपला भारत चांगला.

वरदा's picture

11 Jul 2008 - 6:00 pm | वरदा

आणि अमेरिका यात आपल्या आपल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत हो दादा...कशाला त्यात शिरा..यावरची चर्चा अगदी चावून चोथा झालेय....

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

पुरण पोळी's picture

23 Jul 2008 - 10:30 am | पुरण पोळी

वाव.............. तोडाला पाणी सुट्ले............................

प्रियाली's picture

23 Jul 2008 - 3:05 pm | प्रियाली

मस्त झालं पण मी दाण्याचं कूट घातलं. आख्खे शेंगदाणे दाताखाली नाही येत का याची कल्पना आली नाही.

माझ्याकडे गॅस आहे त्यावर वांगं अर्थातच व्यवस्थित भाजता येतं. पूर्वी कॉईल होती त्यावर किंवा सिरॅमिक प्लेटवर इंडीयन स्टोरमध्ये फुलके भाजण्यासाठी ग्रील मिळते ते ठेवावे आणि त्यावर वांगे भाजावे. ते ही व्यवस्थित भाजता येतं. मी बरेचदा भरीत करते. चांगलं होतं.

कुंदन's picture

7 Aug 2008 - 1:02 pm | कुंदन

ताई,
जसे आपण पोह्यांमध्येही कधी कधी आख्खे शेंगदाणे टाकतो , त्याप्रमाणे या भरीतात पण आख्खे शेंगदाणेच टाकतात.
छान लागतात तसेही ...

टिउ's picture

24 Jul 2008 - 6:05 am | टिउ

कधी खायला मिळणार आम्हाला काय माहीत!

घाटावरचे भट's picture

7 Aug 2008 - 1:23 pm | घाटावरचे भट

वा व्वा...पाकृ वाचके तोंड को पाणी सुट्या...

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

सुनील's picture

7 Aug 2008 - 3:13 pm | सुनील

पाकृ अतिशय सुंदर.

कंवेन्शनल ओवनमध्ये ३५० डिग्रीला साधारण ४०-४५ मिनिटे लागतात. वांग्याला किंचित तेलाचा हात लावायचा आणि छेद देऊन त्यातच काही लसूण पाकळ्या घुसवायच्या. म्हणजे वांग्याबरोबर लसूणदेखिल चांगला भाजून निघतो. आणि छान चव लागते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वेदनयन's picture

8 Aug 2008 - 1:03 am | वेदनयन

योगिताताई, कळण्याच्या भाकरीबद्दल जरा लिहाहो. खुप दुवा मिळेल (मिपा वर आधिच असेल तर क्षमस्व).

अनिता's picture

9 Aug 2008 - 1:37 am | अनिता

तो. पा. सु. (तोडाला पाणी सुटले)