Skip to main content

टाकाऊतून टिकाऊ

टाकाऊतून टिकाऊ

Published on 19/12/2012 - 08:54 प्रकाशित मुखपृष्ठ
आईच्या घराशेजारच्या काकू पिको फॉल करायच्या, ते करत असताना साडीला फॉल करताना साडी सरळ रेषेत थोडी कापून घ्यावी लागते त्या कापलेल्या चिंद्यांचे हे बस्कर मला आत्याने करायला शिकविले होते.स्वेटर विणायच्या सुयानी ये विणले आहे.
लेखनविषय:

याद्या 21520
प्रतिक्रिया 42

कलाकौशल्याला सलाम..!! सहजच सुचलेलं- मला 'अरविंद गुप्ताज टॉईज' आठवली..

1 हे तुम्ही कसे काय केले जरा सविस्तर सांगाल का(शक्य असेल तर)?आमचे कडे कारागीर आले होते ते मशिन ने तयार करुन द्यायचे हे जर घरीच तयार होइल तर किती छान.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

मी हे 7-8 वर्षांपूर्वी केले होते. कॉलेजला सुट्टी असायची तेव्हा. पण अजूनही जपून ठेवले आहे(कपाटात, वापरत नाही)साडीच्या चिंदया एका सरळ रेषेत कापून घ्यायच्या. त्याना गाठ मारून एकमेकाला जोडून घ्याव्या व बंडल तयार करून घ्यावे. घे मी स्वेटर विणायच्या सुयानी (मी आता मोजायचा प्रयत्न केला) पहिल्या स्टेपला 35 टाके घातले. पण कमी कसे केले ते आता आठवत नाही(मी जयवि ताईना विनंती करेन की plz आपण राऊंड करताना कसे करतो ते सांगावे) म्हणजे मलाही परत recall होईल. मी कॉटन च्या साडीचे ही पायपुसणे केले होते, ते तर खूपच सोपे आहे. ते करायची पद्धत सांगते पण आता त्याचा फोटो माझ्याकडे नाही. कॉटनची थोडी जुनी झालेली साडी आडव्या साइडने फाडावी. फाडलेल्या पट्टयंची वेणी घालतो तशी घालत जावी. या कामाला दोन जन तरी लागतात कारण आपण पुढे वेणी घालत असताना मागे त्या पट्ट्या एकमेकात गुंढालेल्या जातात. वेणी पूर्ण झाली की दोन्ही टोकही सुई दोर्‍याने शिवून टाकावी. सर्व वेण्या तयार झाल्या की चकली ज्या प्रमाणे करतो तसे आतून गोल गोल करत सुई दोर्‍याने शिवून टाकावे. झाले पायपुसणे तयार. ते तर खूपच छान दिसते. माझ्या कडची कॉटनची साडी थोडी जुनी झाली की करून फोटो टाकेन. आता लग्न झाल्यावर कधी कधी साडी नेसत असल्याने आताशा साडी फाडणे जिवावर येते.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

सवड म्हणजे हे करण्याची सवड की प्रतिसाद टाइप करण्याची सवड. करण्याच्या सवडीबद्दल- आई कडे असताना मुलींना सवड आणि आवड असतेच(लग्नानंतर या गोष्टींना) मुरड घालावी लागते ती गोष्ट वेगळी. स्माईली(मला अजून स्मायलि कशी टाकायची ते माहीत नाही). आतच्या प्रतिसाद टाइप करण्याचा बाबतीत म्हणाल तर काल पासून कॉलेजला सुट्ट्या लागल्या आता पुढचे 15 दिवस काही काम नाही, नवराही सकाळी 7:40 लाच ऑफिसला गेला. कामाच्या गडबडीत मागचे बरेच लेख अजून वाचायचे आहेत. आज आणि उद्यात फक्त तेवढेच काम.

In reply to by त्रिवेणी

आई कडे असताना मुलींना सवड आणि आवड असतेच(लग्नानंतर या गोष्टींना) मुरड घालावी लागते
छे राव.. असं खरंतर नाय व्हायला पायजे..
काल पासून कॉलेजला सुट्ट्या लागल्या आता पुढचे 15 दिवस काही काम नाही, नवराही सकाळी 7:40 लाच ऑफिसला गेला.
चांगलं वाटलं.. लग्नांनंतरदेखील शिक्षण चालू ठेवल्याचं वाचून..

In reply to by ह भ प

चांगलं वाटलं.. लग्नांनंतरदेखील शिक्षण चालू ठेवल्याचं वाचून..
त्या विद्यार्थीनी च आहेत हे कशावरुन त्या प्राध्यापीका सुद्धा असु शकतात

In reply to by त्रिवेणी

मी टाकाउ मधुन टिकाउ ह्या कामासाठीची सवड विचारतोय ,तुम्ही घरी फावल्या वेळात काय करता त्याच्याशी मला काय करायचय बाकी तुमचा दिवस टाइम पास करण्यातच जातो हे बघुन लै आनंद झाहला1

In reply to by श्री गावसेना प्रमुख

मी अजून विद्यार्थिनीच आहे. नाय वो, मिपा येणे म्हणजे टाइम पास नाय काय. पण खरच सदध्या खरच पुढेच 8-10 दिवस तरी मी टाइम पासच करणार आहे.

In reply to by त्रिवेणी

करा हं बघु तुम्ही काय टाइम पास करतात्,शेवटी येथेच येणार टाइम पास केलेल दाखवायला राम राम येतो आता

दुसर्‍या फोटूतलं जे काय हाय त्येची रंगसंगती अफलातून जमलीये... :-) अवांतरीत अवांतर---@टाकाऊतून टिकाऊ >>> माझ्या प्रतिसादाच्या वरपर्यंत.... ;-)

मी लहानपणी हे असे ताईच्या जुन्या ओढण्यांचे केले होते. वेण्या घालून, गोल गोल शिवून.. करण्याच्या सवडीबद्दल- आई कडे असताना मुलींना सवड आणि आवड असतेच(लग्नानंतर या गोष्टींना) मुरड घालावी लागते >> अगदी सहमत. :)

हम्म जमलय जमलय :) हल्ली मी सूद्द्धा नविन नविन क्रोशे शिकलीये अन एक पर्स एक बटवा दोन कानटोप्या एक स्कार्फ एक तोरण बनवले मलादेखील मोह होत आहे इथे फटु डकवण्याचा पण आवरते घेते नै तर माझा बाजार उठेल ;)

In reply to by पियुशा

मीपण आता घरी गेले की आमच्या (आता मोठ्या झालेल्या) बाळाचे जुने डायपर्स, फ्रोक्स, पुढच्या दारातले पायपुसणे, मागच्या दारातली केराची टोपली, गेल्या च्या गेल्या वर्षीचा आकाशदीवा अन ब्रश अडकवायचे कापडी मनिम्याव या सगळ्यांचे सुर्रेख फोटो काढणारे अन इथ्थे डकवणारे... उठेना बाजार, तो राहील बाजारात, मी माझ्या घरात...

In reply to by पियुशा

मा. पियुशातै, यांस सनविवि नम्र विनंती करणे की जी, आपण आरंभलेल्या कलेकुसरीच्या कामाचे एक भव्य आंतरजालीय प्रदर्शन भरवावे.

उठेना बाजार, तो राहील बाजारात, मी माझ्या घरात... क्या बात है. लगे राहो..... बस्कर टाकावू झाले की त्यापासून काय बनवता येईल ?

In reply to by तर्री

बस्कर टाकाउ झाले की त्याचे सरळ लांब लांब तुकडे करुन त्याच्या वाती वळाव्या त्या वाती जाळुन दिवे लावावे दिवे जाळल्यावर राहिलेल्या राखुंडीने दात घासावेत. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

दात घासून झाल्यावर चूळ एखाद्या कापसाच्या आळ्यात टाकायची तेवढेच पोटॅश मिळून छान येतो कापूस. मग आहेच परत चालू (कपास नसेल तर लावायचा दारात. चक्र थांबू द्यायचे नाही)

चूळ कापसातल्या आळीवर टाकली तर ती कोष जोमाने धरू / बनवू शकेल काय?

आळीवर चूळ नाही रे आळ्यात. आणि आळी, कोष..? अरे आपण कापसाचे बोलतोय, रेशमाचे नाही (रे शी म, सिल्क सिल्क. ते पण डर्टी नाही)

दोन्हि गोष्टी छान आहेत. दुसर्या फोटोतील रंगसंगती अप्रतीम आहे....लगे रहो

त्रिवेणीताई, मी तुम्हाला कालच एक खरड केलीये. ती कृपया वाचा. तुमचे धागे कलात्मक आहेत पण त्याबरोबर वर्णन हवे आहे. तुम्ही प्रतिसादामध्ये जे वर्णन करताय ते धाग्यातच का नाही लिहीत? संपादक मंडळावर दया करा. असे धागे अप्रकाशित करायला आवडत नाहीत पण करावे लागतात. कालच तुमचा एक धागा 'वर्णन नाही' या कारणास्तव अप्रकाशित केल्यावर मी खरडले होते. त्यावर कृपया विचार करा. मिपावर फोटो कसे चढवायचे ते शिकून घ्या. धागा टाकायची घाई नको. यानंतर तुमचे असे धागे नाईलाजाने काढून टाकावे लागतील. फक्त फोटोच्या धाग्यावर खिल्ली उडवणार्‍या प्रतिक्रिया आल्यावर रागावू नका मात्र.

In reply to by मोदक

अच्छा म्हंजे खरडपट्टी काढलेली कधी कळणार म्हणायचेय का ;) सांग कधी कळणार तुला नाच माझ्या खवतला =)) =))

तुम्ही प्रतिसादामध्ये जे वर्णन करताय ते धाग्यातच का नाही लिहीत? संपादक मंडळावर दया करा. असे धागे अप्रकाशित करायला आवडत नाहीत पण करावे लागतात. कालच तुमचा एक धागा 'वर्णन नाही' या कारणास्तव अप्रकाशित केल्यावर मी खरडले होते. त्यावर कृपया विचार करा >>>> आम्ही म्हणालो होतो ...पण सुहाश्या च कस एकणार !! चालु द्यात की, का नवोदितांच्या उत्साहाला संपादकीय खीळ बांधत आहात...छ्या !!

धागा 'वर्णन नाही' या कारणास्तव अप्रकाशित केल्यावर मी खरडले होते. डोळ्यासमोर एकदम , नापास / व्रात्य विध्यार्थी मान खाली घालून उभा आहे आणि शिस्तप्रिय आणि कर्तव्य कठोर हेड बाई त्याची "खरडपट्टी काढत आहेत असे दृश्य उभे राहिले.

In reply to by तर्री

कर्तव्य कठोर हेड बाई त्याची "खरडपट्टी काढत आहेत असे दृश्य उभे राहिले.
कदाचीत म्हणूनच त्यांनी "खरडीतून" लिहीले असावे. ;) पण मला वाटतो, असे सांगण्यात त्यांचा उद्देश समजून घ्यावा: हा धागा "वर्णन" वगैरे नसल्याने "टाकाऊ" झाला आहे तो "टिकाऊ" कसा करता यावा आणि त्यामूळे त्यात दाखवलेल्य कलेला न्याय कसा मिळवून द्यावा असे त्यांना म्हणायचे असावे.

डोळ्यासमोर एकदम , नापास / व्रात्य विध्यार्थी मान खाली घालून उभा आहे आणि शिस्तप्रिय आणि कर्तव्य कठोर हेड बाई त्याची "खरडपट्टी काढत आहेत असे दृश्य उभे राहिले. >>> तरी बरे , डोळ्यासमोर एकदम , नापास / व्रात्य विध्यार्थी मान खाली घालून उभा आहे आणि शिस्तप्रिय आणि कर्तव्य कठोर हेड बाई त्याच्यासवे " झिम्मा-फुगडी खेळत आहेत " असे दृश्य दिसले नाही ;)

In reply to by त्रिवेणी

कोंच्याबी स्त्री आय्डिला पैलं झुट काकु नायतर आजै म्हंनुन हाक माराची, जर का पल्याडनं आरडावरडा झाला का म्या काय आजी वाटले का / काकु दिसले का काय वैगरे तर मग ताई माई वर याचं.. संद्रभ धोरन कम्रांक १.५६/८६क - मिपाकंपु अदिकुरुत धोरन गरनंथ.

In reply to by ५० फक्त

आज काल काकु च्या वयाच्या सुद्धा मला काकु नै म्हणायच वाटल्यास वैनी म्हणा अस सांगतात तर इथली गोष्टच न्यारी राव