सारे काही बाळासठी...
माझ्या वहिनीच्या बाळासाठी या काही नेहमीच्याच बाळाच्या उपयोगाच्या गोष्टी जरा कल्पकतेने सजवल्या आहेत.मी आणि माझ्या बहिणीने या वस्तू तयार केल्या आहेत.
१) बाळासाठी नेहमीच लागणारे डायपर्स- एकेक डायपर गोल गुंडाळून त्याभोवती रबर लावला. मध्ये जॉन्सन पावडरचा डबा ठेवला. त्याभोवती गोलाकार डायपरच्या गुंडाळ्या ठेवून मोठा रबर लावला. त्याभोवती अजून एक राउंड केला. केकच्या शेपमध्ये सजवले. सजावटीसाठी बाळाचीच खेळणी वापरली.
२) बाळाची टोपी, मोजे, लंगोट इ. वापरून त्याना गुंडाळून फुलांसारखा गुच्छ केलाय.
३) बाळाचा टॉवेल गुंडाळून पॅक केलाय.
देश-विदेशाची सफर करणाय्रा मिपाकराना यात किती नाविन्य वाटेल माहित नाही. याचे फोटो घेताना ते लोडवण्याचा विचार नसल्यामुळे कामाच्या पसाय्रातले फोटो आहेत. तेव्हा मी मिपाची सदस्य नव्हते.
प्रतिक्रिया
8 Dec 2012 - 6:02 pm | श्री गावसेना प्रमुख
मला वाटले तुमच्या मुलासाठीच आहेत काय इतके छान आहेत ते

8 Dec 2012 - 6:59 pm | अनन्न्या
माझा मुलगा आठवीत आहे. किती विचार करून लिहीले तरी कोणता तरी शब्द खटकतोच धाग्यावर.. पुढच्या प्रतिक्रिया या शब्दावर अडू नयेत म्हणून हा लगेच खुलासा!!
8 Dec 2012 - 7:28 pm | सूड
मेणबत्त्या ? त्या कुठे लावायच्या म्हणे ?
9 Dec 2012 - 8:37 am | श्री गावसेना प्रमुख
डायपर मध्ये मेणबत्त्या कुठे लावतात्?मला नाही माहीत
8 Dec 2012 - 6:06 pm | पिलीयन रायडर
फार फार सुंदर....!!!
आमच्याही घरात सध्या असल्या गोंडुल्या गोंडुल्या गोष्टी पडलेल्या असतात....
8 Dec 2012 - 7:16 pm | निवेदिता-ताई
कित्ती सुंदर............. :)
8 Dec 2012 - 7:50 pm | रेवती
तिन्ही फोटो आवडले.
8 Dec 2012 - 9:31 pm | पैसा
सुरेखच सजावट आहे!
8 Dec 2012 - 10:57 pm | सूड
वरील दोन्ही प्रतिसाद संपादकांनी प्रतिसाद कसे द्यावेत याचे उत्तम उदाहरण असून भावी संपादकांच्या मार्गदर्शनासाठी ते जतन करावेत असे नम्रपणे नमूद करु इच्छितो.
8 Dec 2012 - 11:07 pm | हारुन शेख
कल्पक आहात. सजावट बारशासाठी केली होती काय. मस्तच. तुमची कला पाहून 'डायपर' पासून ताजमहाल पण बनविता येईल अशी एक आयडिया मनात चमकून गेली. डायपर पासून अश्या कलाकृती बनविण्याचा गिनीज बूक रेकॉर्ड कोणाच्याच नावावर नाही असे गूगलबाबाने सांगितले. त्यामुळे प्रयत्न करण्यास वाव आहे. प्रचंड प्रमाणावर डायपर लागतील असे पाहता माझ्याकडून १० डायपरचे एक पाकीट मी माझाही सहभाग म्हणून पाठवीन तुम्हाला. शुभेच्छा . ही अत्यंत प्रामाणिक प्रतिक्रिया आहे. ;)
9 Dec 2012 - 8:17 am | श्री गावसेना प्रमुख
हे लिहीले यातच सर्व काही आले शेख राव
नवीन कलाकारांना प्रोत्साहान द्यायच सोडुन हे काय
9 Dec 2012 - 11:01 am | अनन्न्या
बाळाच्या बारशाला बाळाच्या उपयोगाचे साहित्य देतात. नाही दिले तरी त्या गोष्टी घ्याव्या लागतात. त्याच गोष्टी थोड्या वेगळ्या पध्द्तीने दिल्या तर काय बिघडले? ताजमहालचे म्हणाल तर तो काही मला कोणाला भेट द्यायचा नाहीय. जर एखादी वस्तू मला कोणाला द्यायची असेल तर ती विकत घेण्याची धमक आहे माझ्यात, तुम्ही ती तसदी घेऊ नका. इथुन पुढे आपले डोके इतरांच्या कल्पना विस्त्तारण्यासाठी न वापरता स्वत:च्या कला दाखवा. तुमचे स्वागत आहे. गिनीज बूकमध्ये आपले नाव वाचायला आवडेल. दुसय्राना दिलेल्या चकट्फू सल्ल्यांची गिनीज बुक मध्ये नोंद होत असेल तर पहा. तुमचा चान्स लागेल.
ता.क. ताजमहालच काय तुम्हाला हवी असेल ती कलाक्रुती मी बनवू शकेन. फक्त त्याचा वापर व्हायला हवा. मी दिलेले डायपर बाळाने वापरलेत. आणि खर्चाची चिंता करू नका.
9 Dec 2012 - 11:21 am | श्री गावसेना प्रमुख
मि पा बुक ऑफ जागतीक रेकॉर्ड मध्ये शेखांच नाव गेलय डायपर पासुन ताजमहालाची कल्पना सुचविल्याबद्दल

9 Dec 2012 - 11:26 am | परिकथेतील राजकुमार
त्यांच्यात 'इतरांच्या कल्पना विस्त्तारण्याची आणि चकटफू सल्ले देण्याची' कला आहे.
डायपरपासून पाणी साठवण्यासाठी एखादी पखाल वैग्रे बनवून मिळेल काय ? आमच्या एका दुबै वाल्या काकांना गिफ्ट द्यावी म्हणतो.
9 Dec 2012 - 3:18 pm | अत्रुप्त आत्मा
@बाळाच्या बारशाला बाळाच्या उपयोगाचे साहित्य देतात. नाही दिले तरी त्या गोष्टी घ्याव्या लागतात. त्याच गोष्टी थोड्या वेगळ्या पध्द्तीने दिल्या तर काय बिघडले? >>> यहीच बात पे शेहेमत है हम...। हटके कुछा होनाही मांगता है लाइफ में...।और इसिलिये हमकू आयडीयाची डायपर पॅक कल्पना आवाडी है॥ ;-)
9 Dec 2012 - 4:18 pm | ज्ञानोबाचे पैजार
डायपर बाळा पेक्षा बाळाच्या आईच्या सोयीचे असतात. बाळाच्या उपयोगाचे असतातच असे म्हणणे धाडसाचे ठरेल. बाळाचे डायपर हे आईचे कपडे / मेकप / खराब होउ नये, तसेच आईला पार्टी निर्विघ्न पणे एंजॉय करता यावी म्हणुनच असतात. अनेक वेळा सार्वजनीक ठिकाणी बाळे / मुले जडच्या जड डायपर वागवीत /ओढीत रांगत /चालत असलेली बघितलीत.
डायपरचा ताजमहाल बनवला तरी वापरता येइलच की. लहान बाळासाठी एकुण जितके डायपर लागतात त्यात ताजमहाल नक्कीच होईल. बाळ जर फारच काटकसरी असेल तर डायपर शिल्ल्क आहेत म्हणुन अजुन एक चान्स घ्यायला हरकत नाही. अगदी ते ही नाही तर बाळाच्या बाळा साठी नक्कीच वापरता येतील. हरुनशेठची ताजमहालाची आयडीया काही इतकी वाईट नाही.
पैजारबुवा,
9 Dec 2012 - 11:35 am | मदनबाण
मस्त ! :)
9 Dec 2012 - 12:57 pm | पियुशा
अरे वा आयडीया मस्त आहे :) नेमक्या गरजेच्या वेळी हा धागा आला
आमच्या वहिनीच अन छोट्या (२ महिन्याच्या ) बेबीच आगमन होणारेच काही दिवसात घरी अशा गिफ्ट्स ने रुम सजवली तर भारी वाटेल नै :)
9 Dec 2012 - 1:29 pm | दादा कोंडके
डायपरचे केक, दुपट्यांचे पडदे, वाईप्सच्या पताका, पॅशिफायरची तोरणं वैग्रे बघून ड्वाले पाणावले.
9 Dec 2012 - 2:54 pm | पियुशा
कोंड्के आजोबा
लिहिण्यात अंमळ मिश्टेक झालीये माझ्या
इतकही शिरेसली घेउ नका की तुमचे ड्वाले पाणावतील ;)
हम्म हा घ्या
9 Dec 2012 - 4:17 pm | दादा कोंडके
नको नको. ठेउन घ्या तुम्हीच. तुमच्यासाठी बाळासाठी दुपट्याला होतील. :)
9 Dec 2012 - 4:47 pm | पियुशा
च्यायला ..................बोल्ले असते पण जाउ देत
9 Dec 2012 - 9:32 pm | जेनी...
पियु बोल बोल ... मला ऐकायचय :D
9 Dec 2012 - 1:15 pm | सर्वसाक्षी
झकास सजावट.
विषयांतर -
खरे सांगायचे तर अशा कलाकृती मोठ्यांना सुखावण्यासाठी असतात. करणार्याला केल्याचे सुख आणि इतरांना पाहायचे सुख. (मिपाकरांना अभिप्राय देण्याचे सुख). बाळाला बिचार्याला त्याच्याशी काय देणे घेणे? कपडे ओले झाले की मोठ्यांनी ते वेळच्यावेळी बदलावेत अशी त्याची माफक अपेक्षा असते.
9 Dec 2012 - 4:07 pm | जयवी
फार कल्पक आहेत तुमच्या गिफ्ट्स.......आवडल्या :)
9 Dec 2012 - 6:36 pm | मीनल
यावरून एक आठवण झाली. माझ्या मुलाच्या बारश्याला कुणीतरी छानसे दुपटे करून दिले. त्यात कोपर-याला २ ससे आणि त्याची २ लहान पिल्ले होती. ती पॅच वर्क करून भरली होती. आजूबाजूला छान फुले, पाने, फुलपाखरू ही होते. शिवाय वरती धाग्याने भरले होते -- चला जाऊया बारश्याला'.भरतकाम सुंदरच होते
आम्हाला ते आवडले म्हणून आम्ही लगेच ते पाळण्याच्या मागच्या भिंतीवर लावले.
त्यावर आवडल्याच्या अनेक प्रतिक्रिया आल्या.
माझ्या नव-याच्या मित्रांना मात्र काही तरे वेगळेच दिसले. ते म्हणाले- " चल जाड्या बारश्याला" , असे तूझ्यासाठी लिहिले आहे का?
तेव्हा मी अतिशय काटकूळी आणि नवरा मात्र त्यामानाने लठ्ठ होता. त्याला मित्र "जाड्या"च म्हणायचे.