ओल्या हळदीचे लोणचे:

गौरीबाई गोवेकर's picture
गौरीबाई गोवेकर in पाककृती
4 Dec 2012 - 7:55 pm

ओल्या हळदीचे लोणचे:

साहित्य:ओल्या हळदीचे कंद, आले, लिंब, हिरव्या मिरच्या, मोहरीची डाळ, हिंग, मेथीचे दाणे, तेल, मिठ.

दोन वाट्या हळदीच्या फोडी असतील तर २ वाट्या आल्याच्या फोडी, दीड वाटी मिरच्यांच्या फोडी,
१ वाटी मोहरीची डाळ, दोन ते तीन चमचे हिंग पुड व १ चमचा मेथी पुड असे प्रमाण घ्यावे.

तयारी: हळदीचे कंद स्वच्छ धुवुन अर्धा तास पाण्यात बुडवून ठेवावे.
नंतर पाण्याबाहेर काढून स्वच्छ फडक्याने पुसून घ्या.ते कंद बारीक चिरून त्याच्या फोडी करून घ्या.
तसेच आले व मिर्चांचे सुध्दा चिरून बारीक तुकडे करून घ्या.
मिर्च्यांचे केलेले तुकडे अगदी जरासे (एक सेकंद) मिक्सरला फ़िरवा.

मेथीचे दाणे थोड्या तेलावर तळून त्याची पुड करा. हिंग तळून घ्या. लिंबांचा रस काढून घ्या.
मोहरीची डाळ, मेथीची पुड, हिंग हे एकत्र करा. आता हळदीचे तुकडे व आले एकत्र करून
त्या तुकड्यांना हा मसाला चोळा. त्यात मीठ घाला व बारीक केलेल्या मिरच्या त्यात घाला.
व लिंबाचा रस घालून चांगले कालवा.

आता एका कढईत तेल चांगले कडकडीत तापवा त्यात मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करा.
ही फ़ॊडणी थंड झाल्यावर फ़ोडींवर घालून चांगले कालवा.

रूचकर व औषधी लोणचे तयार. हे टिकावू असते. पोटात गॅस झाल्यास किंवा अग्नीमांद्य (भूक नाहीशी होणे)
या वर हे लोणचे चमचाभर खावे. बरे वाटते.

प्रतिक्रिया

पैसा's picture

4 Dec 2012 - 8:18 pm | पैसा

पारंपारिक पाकृ साठी धन्यवाद! लोणचं कसं करायचं ते यावेळी बरोबर लक्षात आलं आहे. आता परत खांसाहेबांच्या गोष्टी सांगायला सुरुवात करा!

गौरीबाई गोवेकर's picture

4 Dec 2012 - 8:29 pm | गौरीबाई गोवेकर

खां साहेब उत्तम गाणारा, उत्तमातील उत्तम खाणारा आणि अति उत्तम खिलवणारा अवलिया होता. त्यांच्याबद्दल काय सांगू?
त्यांचे उपकार विसरणे अशक्य आहे.

स्पंदना's picture

6 Dec 2012 - 4:59 am | स्पंदना

खरच बाई!
अवलियाकडे तुम्ही शिकल्या, असे नाना प्रकार तुम्ही बनवता! काय म्हणाव काय तुमच्या या कौशल्याला.

मस्तंच. माझी माऊली यात गाजरं ही घालते.
घराच्या आठवणी ने व्याकुळ झालो. :(

अत्रुप्त आत्मा's picture

4 Dec 2012 - 9:36 pm | अत्रुप्त आत्मा

शेवटचा फोटू येक लंबर... :-)

दीपा माने's picture

5 Dec 2012 - 8:20 am | दीपा माने

अशीच कृती शोधत होते. नक्कीच करणार आहे. आपल्या पारंपारिक पाककला नेमाने मिपाकरांना मिळोत.

पियुशा's picture

5 Dec 2012 - 10:21 am | पियुशा

बाप रे हे असले लोणच्याचे प्रकार कधी जन्मात ऐकले किंवा बघितले नव्हते
टेस्टी दिसतय प्रकरण ,पण ही ओली हळद कूठुन आणायची ? तुम्ही कुठूण आणली ?

साधारण पावसाळा संपला की हळदीचे कंद तयार होतात. ते फेब्रुवारी महिन्यात मकर संक्रांती पर्यंत भाजी मार्केट्मध्ये विकायला असतात. हीच हळद पुढे जून झाली की ती सुकवणे, कंद उकड्णे, फोडणे, दळणे या प्रक्रियांमधुन जाते व आपल्या रोजच्या फोडणीतली हळद बनते.

गौरीबाई गोवेकर's picture

5 Dec 2012 - 1:19 pm | गौरीबाई गोवेकर

मी लहान असताना आमच्या गोव्यात प्रत्येकाच्या परसात ही लावलेली असायची. ते कंद वर्षभर तसेच जमीनीच्या पोटात रहातात व पुन्हा पावसाळ्यात त्याला पाने फुटून वाढतात. त्या पानांचा उपयोग आम्ही सांदणे करण्यासाठी करीत होतो. मुंवईच्या मार्केटात हे हळदीचे कंद मिळतात.

रुमानी's picture

5 Dec 2012 - 11:44 am | रुमानी

एकदम भारी....मस्तच.

जयवी's picture

5 Dec 2012 - 6:28 pm | जयवी

अहा..........मस्त मस्त :)

सुबक ठेंगणी's picture

6 Dec 2012 - 1:06 pm | सुबक ठेंगणी

मीठ मोह-या आणि लिंबू मिरच्यांच्या फोटोमुळे लागणार नाही पण एरवी अगदी द्रिष्ट लागावी असा धागा..

ह भ प's picture

6 Dec 2012 - 2:15 pm | ह भ प

"श्ळSSरूरSप..." तोंडाला सुटलेल्या पाण्याचा आवाज कसाबसा उमटवण्याचा प्रयत्न केलाय.. जेव्हा हे लोणचे याची देही याची जिव्हा चाखायला मिळेल तोच अमुचा सुदिन..

घरी माझ्या आईला परत असे लोणचे करायला सांगतो आता ! :)माझी आई अंबे हळद आणि ओली हळद असे मिक्स लोणचे करते ! आह्ह... काय चव लागते सांगु ! :)

मला फोटो दिसत नहियेत कय क्रवे ब्रे