ओल्या हळदीचे लोणचे:
साहित्य:ओल्या हळदीचे कंद, आले, लिंब, हिरव्या मिरच्या, मोहरीची डाळ, हिंग, मेथीचे दाणे, तेल, मिठ.
दोन वाट्या हळदीच्या फोडी असतील तर २ वाट्या आल्याच्या फोडी, दीड वाटी मिरच्यांच्या फोडी,
१ वाटी मोहरीची डाळ, दोन ते तीन चमचे हिंग पुड व १ चमचा मेथी पुड असे प्रमाण घ्यावे.
तयारी: हळदीचे कंद स्वच्छ धुवुन अर्धा तास पाण्यात बुडवून ठेवावे.
नंतर पाण्याबाहेर काढून स्वच्छ फडक्याने पुसून घ्या.ते कंद बारीक चिरून त्याच्या फोडी करून घ्या.
तसेच आले व मिर्चांचे सुध्दा चिरून बारीक तुकडे करून घ्या.
मिर्च्यांचे केलेले तुकडे अगदी जरासे (एक सेकंद) मिक्सरला फ़िरवा.
मेथीचे दाणे थोड्या तेलावर तळून त्याची पुड करा. हिंग तळून घ्या. लिंबांचा रस काढून घ्या.
मोहरीची डाळ, मेथीची पुड, हिंग हे एकत्र करा. आता हळदीचे तुकडे व आले एकत्र करून
त्या तुकड्यांना हा मसाला चोळा. त्यात मीठ घाला व बारीक केलेल्या मिरच्या त्यात घाला.
व लिंबाचा रस घालून चांगले कालवा.
आता एका कढईत तेल चांगले कडकडीत तापवा त्यात मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करा.
ही फ़ॊडणी थंड झाल्यावर फ़ोडींवर घालून चांगले कालवा.
रूचकर व औषधी लोणचे तयार. हे टिकावू असते. पोटात गॅस झाल्यास किंवा अग्नीमांद्य (भूक नाहीशी होणे)
या वर हे लोणचे चमचाभर खावे. बरे वाटते.
वाचने
13901
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!
खां साहेब उत्तम गाणारा,
खरच बाई!
In reply to खां साहेब उत्तम गाणारा, by गौरीबाई गोवेकर
मस्तंच. माझी माऊली यात गाजरं
शेवटचा फोटू येक लंबर...
अशीच कृती शोधत होते. नक्कीच
बाप रे हे असले लोणच्याचे
साधारण पावसाळा संपला की हळदीचे कंद तयार होतात.
In reply to बाप रे हे असले लोणच्याचे by पियुशा
मी लहान असताना आमच्या गोव्यात
In reply to बाप रे हे असले लोणच्याचे by पियुशा
एकदम भारी....मस्तच.
अहा..........मस्त मस्त
:)
यम्मी..!!
घरी माझ्या आईला परत असे लोणचे
मला फोटो दिसत नहियेत कय क्रवे