व्हेज कडाई

Primary tabs

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in अन्न हे पूर्णब्रह्म
3 Oct 2012 - 3:00 am

Veg Kadai

साहित्यः

फरसबी १० नग
गाजर २ नग
कॉली फ्लॉवर १ मोठी वाटी भरून.
मटार १/२ मोठी वाटी.
भोपळी मिरची २ नग
कांदा २ नग मध्यम

अख्खे धणे १ मोठा चमचा (टेबल स्पून)
जीरं १ लहान चमचा (टि स्पून)
काश्मिरी मिरच्या ३ नग

लसूण ५-६ पाकळ्या
आलं १ इंच
हिरवी मिरची १ नग

हळद १/२ लहान चमचा
धणे पावडर १ मोठा चमचा

टोमॅटो २ मध्यम
तेल अर्धी वाटी
मीठ चवीनुसार
काजूपाकळी ८-१० (वैकल्पिक)
कोथिंबीर आणि आलं सजावटीसाठी.

तयारी:

फरसबी, गाजर, भोपळी मिरची, टोमॅटो ह्या भाज्यांचे अर्ध्या इंचाचे तुकडे करून घ्या.
कांदा लांब आकारात चिरुन घ्या.
कॉलीफ्लॉवरचे छोट्या आकाराचे तुरे काढून घ्या.
आख्खे धणे, जीरे आणि काश्मिरी मिरच्यांचे तुकडे कोरडेच परतून त्याची पावडर करून घ्या.

आलं, लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरवर वाटून घ्या.

कोथिंबीर चिरून घ्या. आल्याचे, काड्यापेटीच्या काडीच्या आकारात, तुकडे करून घ्या.

कृती:

एका कढईत तेल तापवा. त्यात काजूपा़कळी फिकट रंगावर परतून घ्या. त्यावर कांदा टाकून परता. कांदा शिजून मऊ होईपर्यंत परता.

धणे, जीरे, काश्मिरी मिरच्यांची वाटलेली पावडर थोड्या पाण्यात कालवून कढईत टाका. पाणी आटेपर्यंत मध्यम आंचेवर परता.
पाणी आटल्यावर आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट त्यात मिसळा. पुन्हा परतत राहा.
भोपळी मिरच्या आणि टोमॅटो वगळून बाकी भाज्या कढईत टाकून परता. थोडे पाणी घालून, नीट मिसळून, झाकण ठेऊन मंद आंचेवर भाज्या शिजवून घ्या.

भाज्या अर्धवट शिजल्यावर त्यात भोपळी मिरच्या आणि टोमॅटो मिसळा. हळद, धणे पावडर आणि मीठ मिसळा. गरज असल्यास थोडे पाणी घालून (अंतीम पातळीला भाजीत जास्त पाणी असता कामा नये हे लक्षात असू द्यावे) झाकण ठेवून भाज्या पूर्ण शिजवा.

भाज्या शिजल्यावर बाऊलमध्ये काढून कोथिंबीर आणि आल्याच्या काड्यांनी सजवा.

शुभेच्छा....!

प्रतिक्रिया

जेनी...'s picture

3 Oct 2012 - 3:08 am | जेनी...

काका काका काका ..
कसं भारी दिसतय
एकदम भारी आलाय फोटो :)

इतकी मस्त रेसिपी दिल्याबद्दल तुमचे आभार.
आत्ता फक्त फरसबी नाहिये ती आणली की हीच भाजी करणार.

बहुगुणी's picture

3 Oct 2012 - 3:56 am | बहुगुणी

-^- दंडवत स्वीकारा! फोटो तर लई भारी! भाजीही सोपी वाटतेय करायला.

इरसाल's picture

3 Oct 2012 - 10:11 am | इरसाल

जबरदस्त.
ह्यात फक्त थोडे पनीरचे तुकडे टाकले की झाली उत्तरे कडील मिक्स वेज तय्यार.

गवि's picture

3 Oct 2012 - 10:54 am | गवि

वा वा... फारच मस्त...

अक्षया's picture

3 Oct 2012 - 11:04 am | अक्षया

फारच मस्त...:) नक्कीच करुन पाहीन.

सानिकास्वप्निल's picture

3 Oct 2012 - 11:48 am | सानिकास्वप्निल

खूप छान पाकृ आहे. रंग ही सुरेख आलाय काका. इतक्या छान चवीची पाकृ दिल्याबद्द्ल धन्यवाद :)

दादा कोंडके's picture

3 Oct 2012 - 12:05 pm | दादा कोंडके

पाकृ चवीष्ट असेल त्यात शंकाच नाही. छोटी सुटसुटीत कृती आवडली.
बाकीचं पाल्हाळ न लावता थोडक्यात पाकृ लिहिल्याबद्दल आणि करतानाचे कलात्मकता की काय दाखवून उगाच पण्णास फोटो न टाकल्याबद्दल आभार. ;)

गणपा's picture

3 Oct 2012 - 1:18 pm | गणपा

व्हेज कडाई आवडली.

तर्री's picture

3 Oct 2012 - 1:30 pm | तर्री

मिपा चा पाकृ विभाग भलताच फार्मात आलेला आहे. काय एक एक कलाकृती सादर होत आहेत ? वा रे वा !

स्वाती दिनेश's picture

3 Oct 2012 - 2:02 pm | स्वाती दिनेश

व्हेज कढाई मस्तच दिसते आहे,
स्वाती

पियुशा's picture

3 Oct 2012 - 3:14 pm | पियुशा

व्वा जिओ काका जिओ :)

अत्रुप्त आत्मा's picture

3 Oct 2012 - 3:17 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/cook/perfecto.gif

ज्योति प्रकाश's picture

3 Oct 2012 - 3:42 pm | ज्योति प्रकाश

फोटो पाहून तों.पा.सु..अप्रतिम.

वा काका.... मस्तच.. तोंपासु.. :)

जाई.'s picture

3 Oct 2012 - 9:08 pm | जाई.

वाह!!!!!!!!!

मैत्र's picture

3 Oct 2012 - 9:49 pm | मैत्र

मिक्सर नाही.. सगळ्या भाज्या. आणि चवीला मस्त .. जरा चमचमीत..
नक्की करण्यात येईल

धन्यवाद पेठकर काका!

मैत्र's picture

3 Oct 2012 - 9:51 pm | मैत्र

मिक्सर आहे पाककृतीत.. त्या शिवायचा पर्याय सुचवा ... बर्‍याच बॅचलर आणि भारताबाहेर असणार्‍यांचा नेहमीचा प्रॉब्लेम..

प्रभाकर पेठकर's picture

4 Oct 2012 - 2:21 am | प्रभाकर पेठकर

मिक्सर नसेल तर निदान छोटा, पितळेचा, खलबत्ता असतो तो घरात असावा. त्यात सर्व कुटून घ्यावे.

तोही नसेल तर आलं + लसूण + हिरवी मिरची अगदी बारीक चिरुन पोळपाटावर ठेवून वरून लाटण्याचे दाब देऊन लाटायचे आणि ते मिश्रण वापरायचे.

पोळपाट लाटणंही नसेल तर कटींगबोर्डावर बारीक चिरलेलं आलं + लसूण + हिरवी मिरची हे मिश्रण घेउन एखाद्या वाटीने चेपून घ्यायचे.

आणि तेही नसेल तर आलं + लसूण + हिरवी मिरची शक्य तितकी बारीक चिरून पाककृतीत वापरायची. व्हेज कडाई चांगली होईल.

रेवती's picture

4 Oct 2012 - 7:38 pm | रेवती

मैत्रसाहेब,
अगदी स्वस्तातले मिक्सर मिळतात. नसेल घ्यायचा तर मला सांगा. हिरव्या देशात माझ्या जवळपास असाल तर (इलिनॉय) माझ्याकडचा जादाचा घेऊन जावा. एवढी काळजी करू नका व या यंत्रयुगात असे चांगल्या पाकृपासून स्वत:ला वंचित ठेऊ नका. मस्त स्वयंपाक, वाटणाघाटणाच्या भाज्या करा. घरच्यांना तुमची काळजी वाटणे कमी होईल, शिवाय तब्येत छान राहील.

मैत्र's picture

9 Oct 2012 - 2:21 pm | मैत्र

उगाच थ्री पीस सूट / फ्लॅनेलचा सूट घातल्या सारखं वाटतं.. रेवती काकू / आज्जी.. :)

पण वरचे दोन्ही प्रतिसाद - (पेठकर काका आणि रेवती)दिसत नाहीयेत विना मिक्सर पर्यायांचे .. त्यामुळे उत्तर समजलं नाही..

रेवती's picture

9 Oct 2012 - 7:17 pm | रेवती

प्रतिसाद दिसवलेत. ;)

मैत्र's picture

9 Oct 2012 - 9:53 pm | मैत्र

प्रतिसाद दिसले..
पेठकर काकांच्या पर्यायांसाठी धन्यवाद!! प्रयत्न करतो.

सविता००१'s picture

4 Oct 2012 - 1:21 pm | सविता००१

मस्त पाककृती. झकास.

प्रियाकूल's picture

4 Oct 2012 - 9:03 pm | प्रियाकूल

अख्खे धणे मस्तच.

खुशि's picture

9 Oct 2012 - 1:50 pm | खुशि

आजच करते रात्रीच्या स्वयम्पाकात.

वेताळ's picture

9 Oct 2012 - 1:54 pm | वेताळ

एकदम झक्कास काका....

आत्ताच ही भाजी केलिये. मी एकटीनेच चव घेऊन पाहिली. ;) धण्याच्या स्वादाची छान झालिये (बहुतेक मी नुकतेच आणलेले धणे ष्ट्राँग आहेत).

कुंदन's picture

10 Oct 2012 - 6:43 pm | कुंदन

ऑर्गॅनिकही असावेत , अन्यथा या हायब्रीडच्या जमान्यात अशी चव मिळणे म्हणजे अशक्यच ! ;-)

असतील हो असतील. तुम्हाला पाठवू का थोडे.......काळजी नको, माझ्याच खर्चानं पाठ्वते. ;)

वा वा! शेवभाजी नंतर अख्खे धणे वापरून भाजी केलेली नाहिये.. विकांताचा एक बेत ठरला :)
आभार

प्रभाकर पेठकर's picture

10 Oct 2012 - 5:37 pm | प्रभाकर पेठकर

ऋषिकेश,

आख्खे धणे, जीरे आणि काश्मिरी मिरच्यांचे तुकडे कोरडेच परतून त्याची पावडर करून घ्या.

पाककृतीत आख्खे धणे नाही तर त्याची पावडरच वापरली आहे.

वेताळ's picture

10 Oct 2012 - 12:22 pm | वेताळ

असे पुण्यात येवुन परत म्हनावे लागणार.
एकदम झक्कास.....

मस्त !! नक्की करुन बघणार :)