पॅनिंग...

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
12 Jul 2012 - 9:07 pm

जालावर फोटुग्राफी संदर्भात वाचन करत असताना...मला पॅनिंग हा प्रकार कळला !
वेगवान विषयावर फोकस ठेवुन त्याच्याच गतीने कॅमेरा फिरवायचा...आणि क्लीक करायचे...
मग काय होतं ? तर ज्या विषयावर (सबजेक्ट) फोकस ठेवला आहे,तो सुस्पष्ट राहतो आणि त्याच्या आजुबाजुचे मात्र धुसर(ब्लर) होते.
खिडकीतुन पॅन करायला जास्त जागा आणि वेळ मिळत नाही,तरी सुद्धा मी या पॅनिंगचा माझा पहिला प्रयत्न केला आहे...फोटु तुम्हाला आवडतील अशी अपेक्षा करतो...

अधिक माहिती इथे :--- http://en.wikipedia.org/wiki/Panning_%28camera%29

कॅमेरा:--- निकॉन डी-५१००
*फोटो फक्त कंप्रेस केलेले आहेत,सॉफ्टवेअर वापरुन इतर कोणताही बदल केलेला नाही.

(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....

मौजमजाछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

www.cambridgeincolour.com प्रमाणेच हे पुढचे साईट ही बुकमार्क करून ठेवा. www.http://mansurovs.com
आपण फोटोग्राफी सागराच्या काठावर उभे आहोत .पण या दोन नौका माहितीने खच्चून भरलेल्या आहेत.त्याना अव्हेरू नका.
आप्ला चौ रा

धन्स... :)
लिंका बुकमार्कवल्या आहेत... :)

नैसर्गिक ब्लरसाठी युक्ती भारीये.

सर्वसाक्षी's picture

12 Jul 2012 - 9:42 pm | सर्वसाक्षी

मदनबाणा,

उत्तम प्रयत्न. एकदा खाली उतरुन विषयाला समांतर टिपुन बघ. वेगाचा भास अधिक मजा आणेल.

शिल्पा ब's picture

12 Jul 2012 - 9:49 pm | शिल्पा ब

मस्त. वेग कमी असला तरी एकदम प्रचंड असल्याचा इफेक्ट येतोय. मी पण प्रयत्न करुन बघेन.

स्स्सही ! आमच्या मेल्या पॉइंट आणि शूट वाल्या क्यामेराने स्थिर गोष्टीं पण फोटो मधे पळायला लागतात. आमच्या बाल्कनीतून तुमच्या ह्या पद्धतीने फोटो काढून बघतो पण क्यामेरा पण तसा पाहिजे (फोटो येईन क्यामेरा वाकडा!)

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2012 - 4:10 pm | अत्रुप्त आत्मा

बाणेश्वर...अता एक धागा...पावसात शाळेला रेनकोट घालुन जाणार्‍या लहान मुलांचा पायजे,त्या बारक्या बारक्या भावल्या पाण्यातनं उड्या मारताना काय मस्त दिसतात...!

अश्या....

फोटू...अंजा.वरुन साभार :-)

मदनबाण's picture

13 Jul 2012 - 7:23 pm | मदनबाण

रेनकोटवाले काही टिपले आहेत्,पण अजुन पाउस व्हायला हवा...तर काही तरी गवसेल ! :)

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2012 - 11:12 pm | अत्रुप्त आत्मा

वोक्के सर...!

बहुगुणी's picture

13 Jul 2012 - 12:41 am | बहुगुणी

तुम्ही नायकॉन डी ५१०० एसएलआर कॅमेरा वापरला आहे, पण हे असं डिजिटल कॅमेर्‍यानेही करता येतं असं वाचलं. तुम्ही इतकी सुंदर प्रकाशचित्रं काढली आहेत हे पाहून, डिजिटल कॅमेर्‍याने पॅनिंग जमवून बघण्याचा अनावर मोह होतो आहे.

त्या त्या वाहनांचा वेग जाणवतो आहे या प्रकारामुळे.

जेनी...'s picture

13 Jul 2012 - 3:27 am | जेनी...

सॉलिड आयडिया.
मी पण करुन बघते
थँक्स ...
फोटो मस्त रे एक्दम :)

५० फक्त's picture

13 Jul 2012 - 8:11 am | ५० फक्त

मस्त फोटो रे पुन्हा एकदा, धन्यवाद

प्रभाकर पेठकर's picture

13 Jul 2012 - 8:18 am | प्रभाकर पेठकर

व्वा..! सुंदर काढली आहेत छायाचित्र. गतीचा परिणाम साधण्यात कमालीचे यश प्राप्त झाले आहे.

सर्वसाक्षीजींनी म्हंटल्या प्रमाणे एवढ्या वरच्या कोनातून छायाचित्र काढण्यापेक्षा (त्यात रस्त्याचा भाग जास्त येतो आहे) वाहनाच्या समान पातळीवरून छायाचित्र काढल्यास पार्श्वदृश्यात निसर्ग किंवा इमारती छायाचित्रातील गतीमानतेला उठाव देतील, छायाचित्र जास्त आकर्षक आणि परिणामकारक दिसेल.

अभिनंदन.

मराठमोळा's picture

13 Jul 2012 - 8:22 am | मराठमोळा

पुन्हा मस्त फोटु आनी प्रयत्न रे बाणा..
पण एका बघ्याच्या दृष्टीने काही फोटुमधे आड येणार्‍या झाडाच्या फांद्या, खांब टाळले तर आणखीन चांगले वाटतील फोटु असे वाटते. :)

पुफोप्र ;)

प्रचेतस's picture

13 Jul 2012 - 8:43 am | प्रचेतस

मस्त फोटो रे बाणा.

मोदक's picture

13 Jul 2012 - 9:47 am | मोदक

हेच बोल्तो..

:-)

मदनबाण's picture

13 Jul 2012 - 9:49 am | मदनबाण

सर्वांना धन्यवाद... :)

@सर्वसाक्षी / प्रभाकर पेठकर
एकदा खाली उतरुन विषयाला समांतर टिपुन बघ. वेगाचा भास अधिक मजा आणेल.
वाहनाच्या समान पातळीवरून छायाचित्र काढल्यास पार्श्वदृश्यात निसर्ग किंवा इमारती छायाचित्रातील गतीमानतेला उठाव देतील, छायाचित्र जास्त आकर्षक आणि परिणामकारक दिसेल.
तुम्ही अगदी योग्य सांगितले आहेत...एकदम सहमत ! :) पण सध्या पावसाळा असल्याने कॅमेरा खाली नेण्याचा मोह टाळतोय.

@शिल्पा ब
वेग कमी असला तरी एकदम प्रचंड असल्याचा इफेक्ट येतोय. मी पण प्रयत्न करुन बघेन.
वेग कमी नाहीये.साधारण ताशी ३० ते ४५ किमी असेल सहज...
वाहन स्पष्ट दिसणारच,कारण तोच तर खरा उद्देश आहे.
जर वेग कमी असेल तर बाईकचे स्पोक्स फोटोत दिसुन येतात...
उदा.

तुम्ही नक्की प्रयत्न करुन पहा, जर एसएलआर वापरत असाल तर शटर स्पीड १/२०,१/२५किंवा १/३० इ. ठेवुन काढा...वाहनाचा वेग,शटर स्पीड आणि पॅनिंग स्पीड यांचा जेव्हा ताळमेळ बसतो,तेव्हा सब्जेक्ट क्लीअर आणि बाकीचे ब्लर दिसते.
हाच प्रयोग मी नाईट व्हीजन वापरुन केला,तेव्हा एक वेगळीच गंमत मला अनुभवायला मिळाली !

@बहुगुणी
तुम्ही नायकॉन डी ५१०० एसएलआर कॅमेरा वापरला आहे, पण हे असं डिजिटल कॅमेर्‍यानेही करता येतं असं वाचलं.

काका,वरती जे शिल्पा ब यांना सांगितले आहे, ते महत्वाचे आहे.डिजिटल कॅमेराने कितपत करता येईल ते ठावुक नाही,पण जर त्यात शटर स्पीड देता येत असेल तर हा प्रयोग करता येईल्,त्यातही जितका झूम कराल तितकी लेन्स अनस्टेबल होते,आणि पूर्ण फोटो ब्लर येण्याची शक्यता वाढते.
पण तुम्ही प्रयोग कराच... मला उत्सुकता आहे. :)

पहाटे ६ वाजता सूर्योदयाआधी आकाशात शंभर-एक फूटांवर एक घार दिसली, तिच्या वेगाशी 'मॅच' करत प्रकाशचित्र काढायचा हा प्रयत्न, कॅमेरा Nikon Coolpix L21, 8MP, (अ‍ॅडजस्टमेंट काहीही नाही, इथे देतांना फक्त चित्र क्रॉप करून देतोय आकाशाचा आवाका कमी करण्यासाठी).

मला साध्या नजरेने जी दिसली नव्हती ती पिसांची टोकं प्रकाशचित्रात दिसताहेत असं (मला आपलं ;-)) वाटतं:

मामु ,सॉल्लीड फॉटू निकाला रे तुने एकदम क्लास :)

मस्त आहे .. हे अवघड असूनही सफाईने जमलं आहे. त्याच वेगाने कॅमेरा पॅन करण्यासाठी खूप उत्तम अंदाज हवा आणि तो परफेक्ट जमला आहे. जवळजवळ सर्व फोटोंमधे मूळ सब्जेक्ट शार्प आलेला आहे.. त्यात गढूळपणा अजिबात नाही..

कौशल्याची गोष्ट आहे.. उत्तम फोटोंसाठी धन्यु. आणि खिडकीत बसूनच त्या फ्रेम ऑफ रेफरन्सने वेगवेगळ्या संदर्भातले फोटो काढणं (छत्री / पाऊस / मौसमाची बदलती रूपं त्याच खिडकीतून / येणारे जाणारे लोक्स / वाहनं) हाही एक सुंदर प्रायोगिक नमुना आहे हे नोंदवू इच्छितो. त्यामुळे समांतर उतरून काढलेले फोटोही उत्तम असतील यात शंकाच नाही पण हेही एक प्रयोग म्हणून चांगलेच आहेत..

बादवे मीही या रस्त्याने नेहमी जात असतो त्यामुळे माझा फोटोही यात झळकण्याच्या शक्यतेने आता टिपटॉप राहून प्रवास करायला हवा ;)

चांगला प्रयोग.
सरावाने अधिक नेमकेपण येईलच

बाणा प्रयोग छान जमून आला आहे. पुढे आणखी उत्तम प्रायोगिक फोटो येऊ दे..

झकासराव's picture

13 Jul 2012 - 10:18 am | झकासराव

जमलय रे हे तंत्र. :)
चला बाणाच्या भात्यात पॅनिंगच अस्त्र समाविष्ट झालं.

अवांतरः सारखं सारखं काय खिडकीतुनच रे. ;)

फोटु काढताना बर्स्ट मोड ऑन होता का?

चौ रा याने दिलेल्या लिन्का मी ही सेव्ह करुन ठेवतोय. धन्यवाद चौकट राजा.. :)

फोटु काढताना बर्स्ट मोड ऑन होता का?
नाही. मॅन्युअल मोड. F/5.6 1/25 Sec. मिटरिंग मोड वेगवेगळे,तसेच फोकसिंग सुद्धा वेगवेगळे.

झकासराव's picture

13 Jul 2012 - 5:27 pm | झकासराव

ओके रे. :)

बर्स्ट मोड ऑन ठेवलास की येणार्‍या चार पाच फोटुत एक तरी चांगला मिळेल अशी शक्यता वाढते..

नाना चेंगट's picture

13 Jul 2012 - 11:22 am | नाना चेंगट

सध्या काय बेंचवर का?

मदनबाण's picture

13 Jul 2012 - 11:30 am | मदनबाण

सध्या काय बेंचवर का?
नाही. एकाच वेळी २ प्रोजेक्टवर काम करतोय... एकात अप्रत्यक्षपणे अ‍ॅमॅझॉनसाठी एसएपी बेसीस सपोर्ट तर दुसरा बोल्टऑन.
फोटोग्राफी हा जॉब म्हणुन करता येतो काय रे नानुडी ? माहिती असेल तर सांगा... खरचं. सिरिअसली विचारतोय ! इथे कोणी मार्गदर्शन करणारा असेल तर मला त्याची इच्छा आहे. :)

किसन शिंदे's picture

13 Jul 2012 - 11:34 am | किसन शिंदे

मस्तच रे बाणा! :)

विनायक प्रभू's picture

13 Jul 2012 - 11:40 am | विनायक प्रभू

मस्त फोटु रे बाणा.
असो.
नान्याला भारी चौकशा.
त्याला काहीही प्रश्न विचारला की लगेच पास म्हणतो.
असो.
बेंच वर असताना आणखी कुठल्या अ‍ॅक्टीविटी करतोस रे बाणा?

बेंच वर असताना आणखी कुठल्या अ‍ॅक्टीविटी करतोस रे बाणा?
हॅहॅहॅ... प्रभुदेवा किती "सरळ" प्रश्न विचारलात हो... ;)
काही वर्षांपूर्वी काही काळ बेंचवर काढलाय,तेव्हा फार्र फार्र कंटाळा आला होता,कारण त्या आधी जवळपास साडे तीन वर्ष उलट्या-सुलट्या शिफ्ट करण्यात गेल्या...(रामदास काकांच्या शब्दात सांगायचे झाले तर ग्रेव्हयार्ड शिफ्ट) काम आणि फक्त काम ( इथे कुठलाही वेगळा अर्थ शोधु नये. ;)) त्यामुळे बेंचवर रिकामे बसणे हा जबरदस्त टॉर्चर होता,शिवाय कंपनी मॅनेजमेंट ही उरावर बसते अशा वेळी... असो.
इतक्या वर्षात कंपनीला करोडो रुपये कमवुन दिले पण मला त्यात यत्किंचितही फायदा झाला नाही.( नेकी कर और दर्या मे डाल ?) आता नविन असे काही करत नाहीये...त्यामुळे आयटी इंड्रस्टीला चक्क कंटाळलोय...फोटोग्राफी मला अत्यंत आनंद देते ! पण पैसा ?
येणार काळ ठरवेल काहीतरी...

जातीवंत भटका's picture

13 Jul 2012 - 12:54 pm | जातीवंत भटका

मस्त फ्रेम्स मिळाल्या आहेत.

चौकटराजा's picture

13 Jul 2012 - 2:29 pm | चौकटराजा

.फोटोग्राफी मला अत्यंत आनंद देते ! पण पैसा ?
येणार काळ ठरवेल काहीतरी...
@ मदनबाण साहेब ,
www.redbubble.com येथे फोटो विकायला ठेवता येतात. मोठ मोठी स्टार हॉटेल्स ते विकत घेतात व लॉबी, फॉयर वा रूममधे लावतात. अशी माहिती पुण्यातील नामवंत कॅमेरा डीलरने दिली आहे.

मोहनराव's picture

13 Jul 2012 - 7:47 pm | मोहनराव

मस्त मदनबाण राव!
माझ्या मित्राने असाच प्रयत्न केला होता. तो फोटो हा त्याच्या संमतीने..

मन१'s picture

13 Jul 2012 - 7:50 pm | मन१

फोटोग्राफीतील काही माती कळत नाही. पण एक सामान्य दर्शक म्हणून नक्कीच सांगू शकतो:-
चित्र मस्त आलीत. अगदि धावत्या नजरेतून काढल्याचा फील येतोय.(वेगानं धावणार्‍या रेल्वेतून डोकावून पहावं तसं काहीसं) पण त्यात इतकी स्पष्टता कशी ह्याचेच कौतुक वाटते.

नितिन थत्ते's picture

13 Jul 2012 - 9:18 pm | नितिन थत्ते

चोराने (सॉरी - चौ रा ने) दिलेल्या लिंका भारी आहेत.

शिकायला सुरुवात करणार आहे.

मुक्त विहारि's picture

13 Jul 2012 - 10:46 pm | मुक्त विहारि

मस्त आले आहेत फोटो

अमितसांगली's picture

14 Jul 2012 - 12:31 pm | अमितसांगली

मस्त फोटो व चांगली माहिती....

अमोघ शिंगोर्णीकर's picture

15 Jul 2012 - 12:21 pm | अमोघ शिंगोर्णीकर

मदनबाण, पॅनिंगचा सुंदर प्रयत्न केलाय.
वर जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे खाली समांतर लेव्हलला जाऊन फोटो काढले तर मजा ही येईलंच शिवाय अजून शिकायला मिळेल. शटरस्पीड २० / ३० यापेक्षा थोडा जास्त ठेऊन जरी पॅनिंग मारलं तरी सुंदर येतं. फक्त त्यासाठी डोळा कॅमेर्‍याच्या व्हू फाईंडरला लावून वाहन त्यात येण्याची वाट बघावी आणि जसे ते वाहन व्हू फाईंडरमधे दिसेल त्याचवेळी नुसतं क्लीक करून न थांबता, कॅमेरा तसाच त्या वाहनाच्या गतीच्या दिशेने पुढे फिरवावा...... धमाल येईल रिझल्ट्स पाहिल्यावर...

पुढील प्रयत्नांसाठी शुभेच्छा..

कलोअ
अमोघ शिंगोर्णीकर

मनोज श्रीनिवास जोशी's picture

15 Jul 2012 - 12:44 pm | मनोज श्रीनिवास जोशी

आपण नव्या तंत्राची ओळख करून दिली . आभार !!
हा जरा लांबचा पल्ला वाटतो आहे . जमेल हळू हळू.

पुश्कर's picture

15 Jul 2012 - 3:44 pm | पुश्कर

हा माझा बेस्ट शूट

पुश्कर's picture

15 Jul 2012 - 3:51 pm | पुश्कर

अजुन एक प्रत्यन.....

पुश्कर's picture

15 Jul 2012 - 9:47 pm | पुश्कर

हा फायनल....

पैसा's picture

15 Jul 2012 - 11:15 pm | पैसा

सगळेच फोटो मस्त बाणा! शिवाय मोहनराव आणि पुष्कर यांचेही फोटो आवडले.

पुष्कर मस्त फोटो काढले आहेस ! :)

सहज's picture

18 Jul 2012 - 7:35 am | सहज

विकांताला करुन पाहीन :-)

जागु's picture

18 Jul 2012 - 11:13 am | जागु

वा छान आहेत फोटो.

अनुरोध's picture

18 Jul 2012 - 12:14 pm | अनुरोध

आपण खिडकी मध्ये उभं राहुन गाडिच्या वेगाशी कसे मॅच केले हे कळत नाहिये...

अनुरोध's picture

18 Jul 2012 - 1:18 pm | अनुरोध

फोटो सुंदर आहेत... :)
पण आपण खिडकी मध्ये उभं राहुन गाडिच्या वेगाशी कसे मॅच केले हे कळत नाहिये...