सरप्राईज टेस्ट आणि गोंधळलेला परिक्षक.

गणपा's picture
गणपा in जनातलं, मनातलं
11 Jul 2012 - 8:19 pm

मधली सुट्टी संपली आणि नव्या तासाचा टोला पडला. विज्ञानाच्या बाई वर्गात शिरल्या तसा पोरांचा कलकलाट थांबला. बाईंनी पुस्तक उघडुन नवा धडा शिकवायला घेतला. आजचा धडा होता 'मुळं'. बाईंनी फळ्यावर जमतील तशी चित्रं काढत वेगवेगळ्या मुळांचे प्रकार सांगीतले. उदाहरणं ही दिली.
लेकीच्या मनात बाईंची परिक्षा घेण्याची लहर आली. उत्तर माहित असतानाही कार्टीन बाईंना प्रश्न टाकला.
"टिचर स्वीट पोटॅटो इज अ स्टेम ऑर रुट?"
कुणी रताळं 'मुळ' की 'खोड' असं विचरल्यावर पटकन बेधडक 'मुळ' उत्तर आलं असतं. पण 'स्वीट पोटॅटो' म्हटल्यावर चटकन गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. झालं बाईंची विकेट उडाली.

आता बरोबर उत्तर माहित असुनही सांगता येत नसल्याने लेकी समोर धर्मसंकट उभं राहिलं. सांगीतल तर आपण बाईंची परिक्षा घेत होतो हे सत्य उघडं झालं असतं. प्रसंगावधान राखुन लेक निमुट खाली बसली. आणि अश्या प्रकारे एकाच बॉल वर दोन विकेट डाऊन झाल्या. ;)

अशी चुकीची माहिती आपल्या मित्रं मैत्रींना मिळु नये असं तिला मना पासुन वाटत होत. मनाला चुटपुट लागुन राहिली. घरी आल्यावर आईला अडचण सांगीतली. बायकोला पण झाल्या प्रकाराची गंमत वाटली. ती म्हणाली की उद्या शाळेत गेल्यावर बाईंना सांग की आईने दुसर्‍या पुस्तकात पाहुन सांगितलं की 'स्वीट पोटॅटो इज अ रुट. वील यु प्लीज कन्फर्म?' आपल्या प्रत्येक अडचणीवर आईकडे उत्तर असतं म्हणुन लेक खुश झाली. आईने धर्म संकाटुन वाचवल्या बद्दल लेकीने एक गालगुच्चा बक्षिस दिला आणि स्वारी 'आज मधहोश हुआ जाये रे..मेरा मन...' गुण गुणत खेळायला पळाली. :)

बालकथाविनोदमुक्तकशिक्षणमौजमजाप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

11 Jul 2012 - 8:25 pm | स्वाती दिनेश

तिच्या बाईंचीच परीक्षा आहे खरी,
'अनोखे' किस्से अजून सांग.
स्वाती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jul 2012 - 8:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगलीच परिक्षा घेतली. मस्त किस्सा.

-दिलीप बिरुटे

अर्धवटराव's picture

11 Jul 2012 - 8:50 pm | अर्धवटराव

लाईफ सदाबहार करणारे किस्से हे :)

अर्धवटराव

मी-सौरभ's picture

11 Jul 2012 - 8:52 pm | मी-सौरभ

मस्त किस्सा...
तुमची स्वारी 'आज मधहोश हुआ जाये रे..मेरा मन...' गाण गुणगुणते हे वाचून अजूनच कौतुक वाटले.

सध्या रात्री झोपण्या पुर्वी ९:३० ते १०:३० एफ एम वर जुनी गाणी ऐकण्याचा नाद लागलाय. त्याचच हे फलीत. :)

स्मिता.'s picture

11 Jul 2012 - 8:54 pm | स्मिता.

हुशार आणि समंजस आहे तुमची कन्या!

शुचि's picture

11 Jul 2012 - 8:54 pm | शुचि

"रीडर्स डायजेस्ट" ला असे किस्से जरूर पाठवा. एक तर छापून तरी येतात व फुकट "सब्स्क्रिप्शन" अथवा पैसे मिळतात किंवा "सब्स्क्रिप्शन" तरी मिळतेच मिळते - अनुभव आहे. मुख्य समाधान मिळते व अनेक लोकांपर्यंत आपला आनंद पोचतो.

जाई.'s picture

11 Jul 2012 - 8:56 pm | जाई.

हा हा हा
किस्सा आवडला

हरिप्रिया_'s picture

11 Jul 2012 - 9:48 pm | हरिप्रिया_

मस्त किस्सा :)

एकदम भारी आहे हा तुमची लेक.

सोत्रि's picture

11 Jul 2012 - 11:30 pm | सोत्रि

एकदम भारी आहे हा तुमची लेक.

सहमत!

पण, गणपाच्या लेकीचे हा आणि आधिचे किस्से वाचून, त्याची लेक तिच्या आईवर गेलीय हे चाणाक्ष मिपाकरांच्या ध्यानात आले असेलच. गणपा यायच्या आत पळतो आता... ;)

- (चाणाक्ष) सोकाजी

चिंतामणी's picture

12 Jul 2012 - 9:38 am | चिंतामणी

सहमत!

(सोक्या- या भारतभेटीत गणपा पुणेवारी नक्की करणार.) ;)

तुमची मुलगी पास होऊन वरच्या वर्गात गेली की तुमच्या पेक्षा तिच्या बाईंनाच अधिक आनंद होत असेल! :)

स्पंदना's picture

12 Jul 2012 - 3:57 am | स्पंदना

मला वाटतय गणपा ऐवजी बाईच पेढे वाटत असणार. आणि वर वरच्या वर्गातल्या बाईंना 'शुभेच्छा' पण देत असणार.

हा हा हा. मजेशीर....दोघींचीही पंचाईत झाली.

लहान मुले अशीच पंचाईत करत असतात आणि हे असे किस्से नेहमीच हहपुवा करुन जातात.

पैसा's picture

11 Jul 2012 - 11:40 pm | पैसा

हे पाणी भयंकर आहे!

प्रचेतस's picture

12 Jul 2012 - 12:00 am | प्रचेतस

जाम भारी किस्सा. :)

स्पंदना's picture

12 Jul 2012 - 4:00 am | स्पंदना

जालिम पोरगी. पण मनान अगदी हळुवार वाटतेय.
ए! गणपा माझा पोरगा पण जुनीच गाणी म्हणतो , नखरेवाली आऽआऽआऽ..हिंदी शब्द तर आम्हाला पण माहित नाहीत त्यात त्याचे फन्नी उच्चार. भारी वाटत.

मराठमोळा's picture

12 Jul 2012 - 5:55 am | मराठमोळा

चांगलीच खोडकर झालीये :)

लीलाधर's picture

12 Jul 2012 - 8:48 am | लीलाधर

किस्सा आवडला गेला हाये.... :)

इरसाल's picture

12 Jul 2012 - 9:11 am | इरसाल

एकंदरीत बाइंचे(शाळेतल्या) काही खरे नाही.

कुंदन's picture

12 Jul 2012 - 9:12 am | कुंदन

मस्त किस्सा !
गंपा तुझी पण विकेट काढत असेल ना ती अधुन मधुन , ते पण किस्से येउ दे की ;-)

sneharani's picture

12 Jul 2012 - 10:40 am | sneharani

तुमची विकेट निघालेले किस्से येऊ देत की!
बाकी, हा किस्सा भारीच.
:)

चिंतामणी's picture

12 Jul 2012 - 5:10 pm | चिंतामणी

तो स्वतःच कसे सांगेल की त्याचा क्लिन बोल्ड झाला म्हणून.

त्यापेक्षा एखादी पाकृ टाकायला सांगा.

ऋषिकेश's picture

12 Jul 2012 - 10:37 am | ऋषिकेश

खिक्

प्यारे१'s picture

12 Jul 2012 - 11:49 am | प्यारे१

मस्त किस्सा!

गणपा तुझी लेक मस्त 'रोटेशन' करवते बाईंना...!

मन१'s picture

12 Jul 2012 - 12:21 pm | मन१

पोरीने शिक्षिकेचा "क्लास" घेतला म्हणायचं....

नाना चेंगट's picture

12 Jul 2012 - 2:17 pm | नाना चेंगट

>>>"टिचर स्वीट पोटॅटो इज अ स्टेम ऑर रुट?"

हे काय वाक्य आहे ते काही कळाले नाही. :(

नक्की काय कळालं नाही? स्टेम = खोड, रूट = मूळ, स्वीट पोटॅटो = रताळे

कुंदन's picture

12 Jul 2012 - 6:23 pm | कुंदन

आज ज्ञानात एक भर पडली....

स्वीट पोटॅटो = रताळे

नाना चेंगट's picture

12 Jul 2012 - 6:28 pm | नाना चेंगट

आयला ! अस्सं होय !
चला ते शब्द वापरुन मी वाक्य करतो. बघा बरे जमते का?

गणपाची किस्से सांगण्याची स्टेम चांगली आहे आणि त्याचा रुट स्वभाव स्टेमकर आहे !

जमतयं ना?

शुचि's picture

12 Jul 2012 - 8:41 pm | शुचि

=)) =)) नाना तुम्ही पण एक अवलिया आहात अगदी ;)

चिगो's picture

12 Jul 2012 - 2:18 pm | चिगो

लैच चुणचुणीत आहे लेक तुमची.. बा इथं मिपावर भल्याभल्यांच्या तोंडात पाणी आणतोय, आणि लेक शाळेत भल्याभल्यांच्या तोंडाचं पाणी पळवतीय.. ;-)

स्पंदना's picture

12 Jul 2012 - 7:02 pm | स्पंदना

जियो चिगो! जियो!
काय वाक्य आहे. पाणी आणणे अन पळवणे..

गणपा साहेब, लेख आवडला.
तुमची लेक खरच तुमच्या सारखी समजुतदार व हुशार व गुणी आहे.

प्रभाकर पेठकर's picture

12 Jul 2012 - 6:28 pm | प्रभाकर पेठकर

उत्तर माहित असतानाही कार्टीन बाईंना प्रश्न टाकला.

श्री. गणपा साहेब, तुमची लेक मराठी संस्थळांवर वावरायला परिपक्व झाली आहे.

अस्वस्थामा's picture

12 Jul 2012 - 10:22 pm | अस्वस्थामा

कंच्या शाळेत जाते म्हणायची तुमची मुलगी..?
बाईना 'बटाटा' कुठे येतो हे जर माहित असेल तर 'गोड बटाटा' कुठे येत असेल याचा अंदाजपंचे तीर तरी मारायला यायला हवे होते ना..

आता बटाटा कुठे येतो हे नसेल माहित तर मग काय बोलायचं ..

कुंदन's picture

12 Jul 2012 - 10:33 pm | कुंदन

तु हाणत जा चिकन तंगड्या , ती बिचारी खातेय रताळी..

नाना चेंगट's picture

13 Jul 2012 - 11:14 am | नाना चेंगट

तुमचेच मित्र..

कुंदन's picture

13 Jul 2012 - 5:24 pm | कुंदन

तो पण आमचा , तु पण आमचाच ... अन ... .... ;-)

स्वारी पण प्रतिसाद काही कळला नाही कुंद्या.
पण त्यावर नानाची मात्र अपेक्षीत प्रतिक्रिया. :)

उपास's picture

13 Jul 2012 - 12:26 pm | उपास

गणपा, लेक हुशार तर आहेच पण धीट तसेच मोठ्यांचा आदर करणारी आहे.. शाबसकी !
पावणे तीन वर्षाचा माझा मुलगा मराठी व्याकरणात असाच गोंधळवतो..
मी - बंड्या, हात धुवू..
बंड्या - धुवले
मी - अरे धुवले नाही रे धुतले
बंड्या - बाबा, हा त कुठून आणता तुम्ही मधे.. धु व ले हेच बरोबर..
मी - बर! ... :)