मैसूर बोंडा

स्वप्ना हसमनीस's picture
स्वप्ना हसमनीस in पाककृती
22 Jun 2008 - 12:23 pm

मैसूर बोंडा

साहित्य : एक वाटी मैदा, एक वाटी दही , जिरे, मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.

कृती : रात्री एक वाटी मैद्यात एक वाटी दही घालून हे मिश्रण चांगले फेटून ठेवावे.
सकाळी त्यात मीठ,जिरे,बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर घालून भज्यांप्रमाणे तळून काढावीत.
हे बोंडे खूप फुगतात व रुचकर लागतात. कोणत्याही पातळ चटणीबरोबर खावेत.

:) वि.सू. : मैदा शक्यतो टाळणार्‍या तात्यांसारख्या व्यक्तिंनी एक किंवा दोन बोंडेच खावेत.
अधाशीपणे खाल्ल्यास पोटाला त्रास होण्याची शक्यता!!!!

प्रतिक्रिया

II राजे II's picture

22 Jun 2008 - 12:34 pm | II राजे II (not verified)

स्वयंपाक घरातलं काही कळत नाय बॉ... पण तुम्ही देत असलेल्या कृतींची नावे मात्र भन्नाट आहेत हे नक्की ;)

राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

विश्वजीत's picture

22 Jun 2008 - 10:02 pm | विश्वजीत

अधाशीपणे खाल्ल्यास पोटाला त्रास होण्याची शक्यता!!!!

हाहाहा

विसोबा खेचर's picture

23 Jun 2008 - 6:34 am | विसोबा खेचर

ही पाकृ बाकी सह्ही आणि रुचकर दिसते आहे!
धन्यवाद स्वप्ना...

वि.सू. : मैदा शक्यतो टाळणार्‍या तात्यांसारख्या व्यक्तिंनी एक किंवा दोन बोंडेच खावेत.
अधाशीपणे खाल्ल्यास पोटाला त्रास होण्याची शक्यता!!!!

हम्म! खरं आहे.

पण एक किंवा दोनच बोंडे कदाचित पुरणार नाहीत, तीन किंवा चार तरी खावे लागतील. मग मात्र थांबेन... :)

आपला,
(मैद्याचे पदार्थ आवडणारा परंतु ते शक्यतोवर टाळणारा) तात्या.

सहज's picture

23 Jun 2008 - 8:06 am | सहज

मागे एका ओळखीच्यांकडे खाल्ला होता हा प्रकार. मला वाटले ही कसली भजी, आता काहीच नाही. नुस्ते पीठ, मीठ, जिरे. ना बटाटा, कांदा ना कुठले पान. पण दोन तीन सुंदर चटण्या केल्या होत्या त्यांनी, त्याबरोबर खाल्ले.

आता कळले की त्याला बोंडा म्हणतात व तो असाच असतो. :-)