मैसूर बोंडा
मैसूर बोंडा
साहित्य : एक वाटी मैदा, एक वाटी दही , जिरे, मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.
कृती : रात्री एक वाटी मैद्यात एक वाटी दही घालून हे मिश्रण चांगले फेटून ठेवावे.
सकाळी त्यात मीठ,जिरे,बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर घालून भज्यांप्रमाणे तळून काढावीत.
हे बोंडे खूप फुगतात व रुचकर लागतात. कोणत्याही पातळ चटणीबरोबर खावेत.
:) वि.सू. : मैदा शक्यतो टाळणार्या तात्यांसारख्या व्यक्तिंनी एक किंवा दोन बोंडेच खावेत.
अधाशीपणे खाल्ल्यास पोटाला त्रास होण्याची शक्यता!!!!
वाचने
3975
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
स्वयंपाक
हाहाहा
वा!
हं आता कळले. :-)