पुन्हा एकदा गॅस बर्नर...

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
25 May 2012 - 5:30 pm

हल्ली शहरात ग्राहक पेठ भरतात्,खरेदीच्या विविध वस्तु यात विक्रीस ठेवलेल्या असतात. अगदी लोणच्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंतं बरेच काही पहावयास मिळते.
अशाच एका बाजार पेठेत माझे तिर्थरुप गेले आणि एक वस्तु त्यांना तिथे दिसली व उपयोगी वाटुन ती त्यांनी खरेदी केली.
ती वस्तु म्हणजे एक जाळी असुन ती गॅस बर्नरवर ठेवतात, त्यावर वांगे,पापड इं. भाजणे सोपे जाते आणि बर्नरही खराब होत नाही.
हाच बर्नर जाळी ठेवल्यावर कसा दिसतो, ते तुम्हाला दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे. :)

१) पहिला फोटु बर्नरचा,त्यावर जाळी ठेवलेली आहे.पण माझे लक्ष फक्त ज्योतींकडे आहे.

२)कॅमेर्‍याच्या सेटींगमधे बदल केला आणि आता फक्त जाळीवर लक्ष केंद्रीत केले,जाळी लगेच तापायला सुरु झाली आहे.

३)तारा अशा मस्त दिसतात...

४)जरा वेगळ्या अँगल मधुन पाहताना.

५)बर्नर आणि जाळी यांच्या मधला भाग कसा दिसतो ते पाहत असताना हा टिपला.

६)आता लवकरच या तापुन लालबुंद होतील.

७)लालेलाल !

७) शेवटचा फोटु त्या तारांचा...

आधीचा भागः--- गॅस बर्नर...
(हौशी फोटुग्राफर) ;)
मदनबाण.....

कॅमेरा:--- निकॉन डी ५१००
*टिप :---- सॉफ्टवेअर वापरुन कोणताही बदल केलेला नाही.

छायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

कुंदन's picture

25 May 2012 - 6:19 pm | कुंदन

मस्त रे बाणा.
कॅमेरा जा जाळीवर ठेवुन पण एक फोटो येउ दे आता. ;-)

मोहनराव's picture

25 May 2012 - 6:21 pm | मोहनराव

फोटु छान आहेत!!
अवांतरः गॅसच्या किमती वाढणार आहेत त्या आधी मजा करुन घ्या, झालंच तर घोट्भर चहा करुन प्या ;)

चौकटराजा's picture

25 May 2012 - 6:24 pm | चौकटराजा

मदनबाण साहेब ,कॅमेरा म्हणजे लेन्स व लेन्स हे मागे कल्पक नजरेचा माणूस नसेल तर पोरक्या पोरासारखे अशी फोटो ग्राफीत म्हण आहे. आपल्या कडचे लेन्स आईबाप असलेले दिसतेय ! मस्त !

*टिप :---- सॉफ्टवेअर वापरुन कोणताही बदल केलेला नाही.
सॉफ्टवेअर अपवादात्मक रित्या वापरणे हे गैर वा कमीपणाचे वाटते काय? कारण सॉफ्टवेअर
हे निकॉन ५१०० च्या देखील आत आहे.
पु फो क शु

बाणा, साध्‍या गॅस बर्नरमधल्या ज्वाळेत तुला जे दिसलं ते सगळ्यांनाच दिसलं असेल की नाही माहित नाही, पण मला ते नक्की दिसलं प्रत्येक फोटो पहाताना खूप मजा वाटली.
कीप इट अप.

सॉफ्टवेअर अपवादात्मक रित्या वापरणे हे गैर वा कमीपणाचे वाटते काय?
अजिबात नाही ! पण त्याचा कमीत कमी /योग्य तेव्हढा वापर जरुर करावा.पण फोटो देखील असे काढण्याचा प्रयत्न करावा की सॉफ्टवेअर वापरण्याची वेळ कमीत कमी वेळा यावी. मी ज्या धाग्यात सॉफ्टवेअरचा वापर केलेले फोटो टाकतो त्यात ही टिप नसते.

नाना चेंगट's picture

25 May 2012 - 7:09 pm | नाना चेंगट

मस्त रे बाणा !!!

विकास's picture

25 May 2012 - 7:11 pm | विकास

फोटो मस्तच!

फक्त शिर्षक वाचून मला वाटले की आता सिलेंडरच्या किंमती पण महागताहेत म्हणून नवीन धागा काढलाय. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

25 May 2012 - 7:32 pm | अत्रुप्त आत्मा

लै लै भारी प्रयोग... :-)

भरत कुलकर्णी's picture

25 May 2012 - 7:38 pm | भरत कुलकर्णी

उत्तम

फोटू चांगले आलेत पण बायकोने स्वयंपाकघरात तुला कामाला जुंपले आहे हे अजाणतेपणाने जाहीर करून बसलास की! ;) त्याशिवाय का कोणी प्रदर्शनातही या गोष्टींकडे वळतं? जाळीबद्दल म्हणशील तर थोड्या वेगळ्या प्रकारची जाळी मी घेऊन आले होते, दोन वर्षांपूर्वी, काही वांगबिंगं भाजलं जात नाही (म्हणजे खूप वेळ लागतो). फुलके मात्र चांगले होतात.

फोटू चांगले आलेत पण बायकोने स्वयंपाकघरात तुला कामाला जुंपले आहे हे अजाणतेपणाने जाहीर करून बसलास की
छ्या छ्या... भलताच गैर समज झाला की वो तुमचा ! माझी बायडी काम करत व्हती,तेव्हा मी फकस्त यंट्री मारली बघा !
कशाला ?
अवं फोटु काढाया ! ;)
अगदी झटपट फोटो काढले ;) गॅस वाया जातोय असं म्हणुन बायडीने चिमटा काढला ! तेव्हा मी फोटो काढणे बंद केले. ;)

नाना चेंगट's picture

26 May 2012 - 10:53 am | नाना चेंगट

>>>>गॅस वाया जातोय असं म्हणुन बायडीने चिमटा काढला

कुठे?

ही ही ही
हे प्रतिसादासाठी होत :)

बाकि फोटोझ अगदि जळजळित आहेत ;)

भिकापाटील's picture

25 May 2012 - 10:48 pm | भिकापाटील

काय आहे हे
निव्वळ वाबळ्त

प्रचेतस's picture

26 May 2012 - 7:59 am | प्रचेतस

मस्त रे बाणा.
फोटू लै झ्याक आलेत.

विनायक प्रभू's picture

26 May 2012 - 12:12 pm | विनायक प्रभू

आरे बाणा,
असे मार खायचे धंदे करायचेच कशाला?

अरे बाणा, त्या तंदूर जाळीचा योग्य वापर करुन फोटू काढ.. हे काय नुसती जाळीच धगधगतेय.. सोबत काहीतरी तंदूर पेटू दे.. ;)

- पिंगू

कसले भारियेत रे फोटु मामु :)
और भी आनेदो !!

कॅमेर्‍याच्या सेटींगमधे बदल केला आणि आता फक्त जाळीवर लक्ष केंद्रीत केले,जाळी लगेच तापायला सुरु झाली आहे.
अरेच्चा.कॅमेरा चा उपयोग असा होऊ शकतो हे म्हैतीच न्व्हते. कॅमेराचा फोकस जाळीवर केला की जाळी तापायला सुर्वात झाली........ युरेका युरेका युरेका

चौकटराजा's picture

27 May 2012 - 2:34 pm | चौकटराजा

आता, सिलिंडरची चिंता नको !

पैसा's picture

27 May 2012 - 6:42 pm | पैसा

फार छान!

सौरभ उप्स's picture

28 May 2012 - 12:28 pm | सौरभ उप्स

फार छान subject आहे फोटोग्राफीसाठी, पहिला फोटो खास आवडला.... बाकी सगळे फोटो ठीक वाटले ते अजून चांगले येऊ शकतील.....

परिकथेतील राजकुमार's picture

28 May 2012 - 2:55 pm | परिकथेतील राजकुमार

फुडल्या टैमाला पेट्रोलच्या टाकीत काडी टाकून त्या ज्वाळांचे पण फटू दाखवावेत अशी विनंती.

फुडल्या टैमाला पेट्रोलच्या टाकीत काडी टाकून त्या ज्वाळांचे पण फटू दाखवावेत अशी विनंती.
गाडी तुझी अन् काडी माझी ! ;)

फोटोवर प्रतिक्रिया देणार्‍या मंडळींना धन्स... :)
अवांतर प्रतिसादांना...पास ;)
प्रतिसाद न देणार्‍यांना... देने वाले का भी भला, न देने वाले का भी भला ! ;)

धन्यवाद ' भला ' चितल्याबद्दल :)

ऋषिकेश's picture

29 May 2012 - 9:10 am | ऋषिकेश

उशीराने बघतोय धागा. स्वारी!
फोटोचा विषय आवडला.
क्यामेरा सेटिग्ज काय ठेवले होते. विषेशतः पाचव्या फोटोसाठी?

क्यामेरा सेटिग्ज काय ठेवले होते. विषेशतः पाचव्या फोटोसाठी?
कॅमेरा सेटींग्स पुढील प्रमाणे होते. :-

फोकल लेन्थ :--- ३०० एम एम
एफ नंबर :--- F/5.6
एक्सपोजर टाईम :- 1/25 Sec
आयएसओ स्पीड :-- आयएसओ-१६००
मिटरिंग मोडः- पॅटर्न
एक्सपोजर प्रोग्रॅम :--- मॅन्युअल
एक्सपोजर कॉपेनसेशन:--- + ५ स्टेप

मस्तच फोटो.

आता त्यावर वांगे भा़जलेला किंवा तंदुरी भाजल्याचा फोटो टाका म्हणजे तोपासु होईल.