अंदोलने

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
4 May 2012 - 1:27 pm

पाहून कंठ दाटे लागे तरंग भंगू
काठांस पापण्यांच्या जळपात पाहि लंघू
हे अस्त्र नयनबाणी शब्दात काय सांगू
घायाळ वृश्चिकाचे नांगीत वीष पंगू

ओठांस माणकांची आलेपणे फिरंगी
गाली गुलाबमाया स्मित रेशमी सुरंगी
काट्यास आकळे ना ममता उलाल अंगी
अंदोलने सुखाची व्यापून अंतरंगी

अस्पर्श गोत न्यारे गेले विरून सारे
चहुओर रजतकांती आनंदघन पसारे
हळव्या सुरात हलके गंधर्वगीत भारे
गंधात जाणिवांच्या अस्तित्व विलय वारे

............................अज्ञात

शृंगारकविता

प्रतिक्रिया

अज्ञातकुल मस्तच..

आंदोलने.. अतिशय समर्पक शीर्षक..
खूप आवडली कविता

ओठांस माणकांची आलेपणे फिरंगी
गाली गुलाबमाया स्मित रेशमी सुरंगी

हे विशेष आवडले

शब्द आंदोलने असा आहे. अंदोलने नव्हे.

बाकी चांगले.