जुळले अजून आहे

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
2 May 2012 - 11:44 am

सरले बरेच काही, उरले अजून आहे
कोठेतरी जरासे, जुळले अजून आहे

वणव्यात पोळलेल्या, राती कितीक सार्‍या
वैशाखस्वप्न हिरवे, जपले अजून आहे

संसार वाळवंटी, मनिषा जरी करपल्या
स्वप्नात चिंब सारे, भिजले अजून आहे

वैधव्य दु:ख गहिरे, लपवून काळजाशी
सौभाग्य चिन्ह भाळी, जपले अजून आहे

वाहून खूप गेले, पाणी पुलावरुनी
सुखचित्र अंतरीचे, सजले अजून आहे

आहेत भोग सारे, जे पूर्व संचिताचे
ते भोगणे जरासे, उरले अजून आहे

उन्मत्त वादळाने, ढळले किती मनोरे
वाळूत बांधलेले, इमले अजून आहे

अजुनी न जाग आली, मजला तशी पुरेशी
दुलईत स्वप्न माझे, निजले अजून आहे

जयश्री

शांतरसगझल

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

2 May 2012 - 1:02 pm | अत्रुप्त आत्मा

@वैधव्य दु:ख गहिरे, लपवून काळजाशी
सौभाग्य चिन्ह भाळी, जपले अजून आहे >>> --^--^--^--

परिकथेतील राजकुमार's picture

2 May 2012 - 2:06 pm | परिकथेतील राजकुमार

भारी लिहिले आहेस गं तै.

मुक्त विहारि's picture

2 May 2012 - 2:10 pm | मुक्त विहारि

छान आहे कविता....

amit_m's picture

2 May 2012 - 2:14 pm | amit_m

वणव्यात पोळलेल्या, राती कितीक सार्‍या
वैशाखस्वप्न हिरवे, जपले अजून आहे

आहेत भोग सारे, जे पूर्व संचिताचे
ते भोगणे जरासे, उरले अजून आहे

हे तर मस्तच....

प्रीत-मोहर's picture

2 May 2012 - 2:17 pm | प्रीत-मोहर

मस्त ग तै.

गझल खुप्पच आवडली आहे.

मनीषा's picture

2 May 2012 - 2:31 pm | मनीषा

आहेत भोग सारे, जे पूर्व संचिताचे
ते भोगणे जरासे, उरले अजून आहे

हे खूप आवडलं

सुरेख गझल ..!

नरेंद्र गोळे's picture

2 May 2012 - 2:38 pm | नरेंद्र गोळे

वा! सुरेख कविता!! आवडली!!!

रुजवून मराठी झाले, फुलवून मराठी झाले, संसार वाळवंटी, सजवून मराठमोळे |
ढळू देत ते मनोरे, सरू देत भोग सारे, दुलईत स्वप्न निजले, ते होऊ देत ताजे ||

गोळेकाका......... अभिप्राय खूपच आवडेश :) शुक्रिया सरजी :)

संजय क्षीरसागर's picture

2 May 2012 - 3:10 pm | संजय क्षीरसागर

लिहीत रहा! प्रत्येक दुसरी ओळ आणखी कल्पक करण्याचा प्रयत्न करा, ती रसिकाची अपेक्षापूर्ती करण्यापेक्षा त्याला नवा अनुभव किंवा जगण्याचा एक नवा अंदाज देणारी हवी.

जयवी's picture

2 May 2012 - 3:53 pm | जयवी

संजय....... तुमचं म्हणणं अगदी पटलं........ अपेक्षापूर्ती पेक्षा नवा अनुभव देता यायला हवा........ नक्की प्रयत्न करेन.

मनापासून आभार दोस्तांनो :)

मदनबाण's picture

2 May 2012 - 6:38 pm | मदनबाण

वैधव्य दु:ख गहिरे, लपवून काळजाशी
सौभाग्य चिन्ह भाळी, जपले अजून आहे
वा...

आहेत भोग सारे, जे पूर्व संचिताचे
ते भोगणे जरासे, उरले अजून आहे
क्या बात है...

उन्मत्त वादळाने, ढळले किती मनोरे
वाळूत बांधलेले, इमले अजून आहे
अप्रतिम... :)

जयवी's picture

3 May 2012 - 12:54 pm | जयवी

शुक्रिया मदनबाणा :)

जयवी जी, अतिशय अप्रतिम कविता आहे.

शैलेन्द्र's picture

3 May 2012 - 6:18 pm | शैलेन्द्र

"आहेत भोग सारे, जे पूर्व संचिताचे
ते भोगणे जरासे, उरले अजून आहे

उन्मत्त वादळाने, ढळले किती मनोरे
वाळूत बांधलेले, इमले अजून आहे

अजुनी न जाग आली, मजला तशी पुरेशी
दुलईत स्वप्न माझे, निजले अजून आहे"

कवितेत नित्य वाहणारा आशावाद फार आवडला.. छान कविता..

जयवी's picture

4 May 2012 - 2:18 pm | जयवी

मनापासून आभार :)

पक पक पक's picture

4 May 2012 - 7:26 pm | पक पक पक

झकास ..मस्त...छान.. :) :)