मित्र- मैत्रिणींनो, जरासं मनोगत देतेय!
काही दिवसांपूर्वी, नॅशनल जियोग्राफीवर बाळाचा जन्म, अगदी बाळ एक आठवड्याचे असल्यापासून ते जन्मापर्यंतची संपुर्ण प्रोसेस दाखवली.. त्या गर्भातल्या बाळाच्या निर्मितीपासून ते जन्मापर्यंतचा प्रवास अदभूत वाटला.. हे पाहू शकतो, समजू शकतो आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे.. त्यानंतर सुचलेलं काही.. सांभाळून घ्या.. ही तुमची माझी कविता!
________________________________________
नाळेपासून वेगळे होताच
सुरू होतो प्रवास,
दोन जीवांचा- एकाच दिशेने?
काही योजनेच..
नंतर माझा रस्ता वेगळा!
स्व सुखाच्या शोधात
अनायसे वृत्तींना चिकटत गेलेला-
स्वार्थ!
पण; सांगू
कधी माझं आभाळंच उणावतं,
तुझ्या गर्भातलं उबदार आयुष्य खुणावतं...
तिथे नव्हता जबाबदारीचा, कर्तव्याचा अंश
नव्हता समाज, परंपरा, अपेक्षांचा दंश..
भाबड्या कल्पना सार्या,
निसर्गचक्राने उलटं फिरावं..
त्या उबेला लपेटून, पुन्हा जगून घ्यावं!
प्रतिक्रिया
19 Mar 2012 - 1:04 pm | पियुशा
मस्त मस्त मस्त :)
19 Mar 2012 - 1:09 pm | पक पक पक
पण; सांगू
कधी माझं आभाळंच उणावतं,
तुझ्या गर्भातलं उबदार आयुष्य खुणावतं...
तिथे नव्हता जबाबदारीचा, कर्तव्याचा अंश
नव्हता समाज, परंपरा, अपेक्षांचा दंश..
रडवलत हो .....छान ..सुंदर्...मस्त अन एक्दम काळजाला हात घालणारं ...
(आभाळ उणावलेला...)
19 Mar 2012 - 1:32 pm | पैसा
छान कविता!
19 Mar 2012 - 1:35 pm | सांजसंध्या
बागेश्री
मस्तच
19 Mar 2012 - 1:56 pm | कवितानागेश
सुंदर अभिव्यक्ती.
19 Mar 2012 - 2:45 pm | वेणू
प्रतिसादासाठी सर्वांची आभारी आहे!
19 Mar 2012 - 8:23 pm | गणेशा
छान !
19 Mar 2012 - 10:24 pm | प्रचेतस
छान लिहिलंय.