केळेपाक

वैशाली हसमनीस's picture
वैशाली हसमनीस in पाककृती
13 Jun 2008 - 7:26 am

साहित्य_तीन पिकलेली केळी,एक वाटी साखर,एक वाटी ओले खोबरे,वेलचीपूड
क्रुति_प्रथम केळ्याचे बारीक तुकडे करावेत,साखरेत थोडे पाणी घालून त्याचा एकतारी पाक करावा.तयार पाकात थोड्या वेळाने केळयाचे तुकडे,खोबरे आणि वेलचीपूड घालावी.सर्व मिश्रण नीट हालवावे.केळेपाक तयार.आयत्या वेळेस पाहूणे आल्यावर गोड पदार्थ झटपट तयार.पाहूंणे व आपण दोघेही खूश.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

14 Jun 2008 - 1:01 am | विसोबा खेचर

वैशाली,

तुमची पाकृ चांगली आहे परंतु केळेपाक/भरली केळी हा प्रकार माझी म्हातारी थोड्या वेगळ्या पद्धतीने करते, लवकरच ती पाकृही येथे देईन..

तात्या.

ईश्वरी's picture

14 Jun 2008 - 1:58 am | ईश्वरी

तुमची पाकृ चांगली आहे परंतु केळेपाक/भरली केळी हा प्रकार माझी म्हातारी थोड्या वेगळ्या पद्धतीने करते, लवकरच ती पाकृही येथे देईन..
हो , आमच्याकडेही थोड्या वेगळ्या पद्धतीने हा पदार्थ करतात. केळीचे तुकडे तूपावर परतून मग त्यात दूध घालायचे. दूध जरा आटत आले की त्यात खोवलेला नारळ + साखर + वेलचीपूड + केशराच्या काड्या वगैरे घालून परतायचे. उपवासाच्या दिवशी माझ्या सासूबाई हा पदार्थ आवर्जून करतात.
तात्या तुमच्या मातोश्रींच्या रेसिपी ची वाट पहात आहे. लकवर येऊ द्यात.

ईश्वरी