गाभा:
७ तारखेला होळी झाली दुसरे दिवशी धुलिवंदन.
सहज विचार करता धुलिवंदन हा शब्द कसा आला असा प्रश्न पडला. जालावर शोध घेतला पण काही चांगली माहिती मिळाली नाही.
धुलिवंदन ह्या शब्दामागे काही लोककथा वगैरे आहे का?
सहज पडलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ना गवसल्याने धुलिवंदनाचा दिवस झाल्यावर हे आमचे वरातीमागून घोडे.
प्रतिक्रिया
10 Mar 2012 - 12:35 pm | कॉमन मॅन
सदर विषयावरील काही माहिती वाचण्यास आम्हीही उत्सुक आहोत.
10 Mar 2012 - 6:12 pm | पैसा
धुळवड असा आहे. होळीच्या दुसर्या दिवशी होळीची राख आणि माती अंगाला लावून घ्यायची काहीतरी पद्धत होती. होळीला बोंबा मारून मनातली किल्मिषं घलवायची, मग ती राख आणि माती घालवून रंगपंचमी खेळायची असा काही प्रतीकात्मक अर्थ असावा. थोडक्यात म्हणजे आधी सगळी घाण काढून टाकायची आणि मग तिथे नवीन रंग भरायचे अशी ही कल्पना आहे, असावी.