सोलमेट

गिरिजा's picture
गिरिजा in जनातलं, मनातलं
10 Jun 2008 - 7:40 pm

२५ वर्ष.. किती पटपट जातात दिवस.. २५ वर्षांचा सहवास.. मेघाचा आणि माझा.. इच्छा खूप होती पण अस खरच घडेल, वाटलच नव्हत..

आज सगळे कौतुक करत होते.. सिद्धू आणि आपली जोडि म्हणजे आदर्श घेण्यासारखी आहे म्हणे.. आणि काय काय.. पण.. २५ वर्ष!

सगळ श्रेय खरतर मेघा, तुझ आहे.. काय कमी होत तुला.. चांगल शिक्षण, नोकरी.. स्वतःच्या पायावर उभी.. खर्या अर्थाने कर्त्रूत्ववान मेघा.. पण माझ्यासारख्या सामान्य मुलाशी लग्नाला तयार झालीस.. मेघा, खरच सगळ श्रेय तुला आहे.. तुझ्या होकाराशिवाय हे कस शक्य होत..

सिद्धू.. हाच का तो ज्याचा मी तेव्हा प्रचंड तिरस्कार करायचे.. त्याच्यासोबत मी २५ वर्ष...! ह...त्या परिस्थितीत मनाविरुद्ध का होइना पण आमच लग्न झाल.. यासाठी देवाचे आभार..

मेघा, खूप आवडायचीस ग तु मला.. पण खर सांगू, आत्ता अजुन जास्त आवडतेस.. तेव्हा तुझी बुद्धीमत्ता, स्वाभिमान, प्रामाणिकपणा या सगळ्यावर भाळलो होतो.. खरतर आपली ओळख अमितमुळे झालेली.. पण तुम्ही एकत्र काम करत असल्यामुळे तुझ्याबद्दल बर्याच वेळा बोलायचो आम्ही.. आपण खरतर मित्र ही नव्हतोच, नाही का ग? मी तुला लग्नाच विचारल, तेसुद्धा अमित खूप वेळाम्हणालेला म्हणुन..

खरच, का तिरस्कार करायचे मी तुझा एव्हढा.. ह.. तुझा स्वभाव.. तु खरोखर "स्थितप्रज्ञ" आणि मी अगदी उलट.. कधी मैत्री वगैरे जमलिच नाही आपली.. कारण मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावुन घेणारी.. आणि
साध्या साध्या गोष्टीन्नी खूप खुश होणारी.. माझ्या अशा टोकाच्या प्रतिक्रियान्वर तुझ भाषण (प्रवचन म्हणायचे, नाही का रे.. :) ) नेहमी ठरलेल असायच.. खरच डोक्यात जायचास तु कधी कधी :).. त्यामुळे मैत्री शक्यच नव्हती.. अमित्मुळे केव्हातरी तुझ्याबद्दल बोलल जायच इतकच..

आणि तेव्हा तु केवढी प्रचंड चिडली होतीस.. खर सांगु, मला तु पहिल्याच भेटीत आवडलिस, अमितला मी तेव्हाच म्हणालो होतो, पण आपल्यामध्ये खूप अंतर होत.. अमित म्हणायचा.. आरे तु बोलुन तर बघ.. विचार तर एकदा.. मी नेहमी टाळायचो.. पण मी नेहमी तुझ्याबद्दल अमितशी बोलायचो.. तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी.. घडुन गेलेल्या आणि घडत असणार्या.. मला कळायच्या.. आणि म्हणुनच तू फार चिडलेलिस... मला अजुन आठवतय..

आणि तू महान.. मैत्रीहि नाही आपली.. आणि आला लग्नाच विचारायला.. :)
आणि मी.. मला लग्न या गोष्टीची चीड होती.. अयुष्यात काही घटना अशा घडुन गेलेल्या की कोणी माझ असु शकत.. मी ही कोणाला आवडु शकते.. विश्वासच बसायचा नाही यावर.. याबद्दल विचार जरी केला तरी वाटायच.. नाही.. हे आपल्यासाठी नाही.. माझ्यासारख्या सामान्य दिसणार्या मुलिला कोण कशासाठी लग्नाच विचारेल.. नक्की काय हेतु असेल.. की पुन्हा एकदा फसवणूक होतेय.. काही कळायच नाही.. पुर्वायुष्यातल्या आठवणी अशा वेळेस दाटून यायच्या.. आणि मग तर माझी खात्रीच पटायची..

अमितकडुन सगळ कळलेल मला.. हे जेव्हा तुला कळल तेव्हा तर तु अमितवरही चिडलेलिस.. अग वेडे, तो तुझा खूप जवळचा मित्र होता ना.. त्याच्यावर अविश्वास दाखवायला लागलेलिस तू.. आणि हे सगळ माझ्या एका विचारण्यामुळे..

माझ मन एकच गोष्ट मला सांगत रहायच.. लग्न तुझ्यासाठी नाही.. तू आणि तुझ करिअर.. बस.. एकदा प्रेमात पडुन चूक केलीस.. आता कशाला पुन्हा त्या वाटेवर.. जे आहे त्यात सुखी आहेस.. मग हे सगळ कशासाठी..
आणि तू मला फारसा आवडायचाही नाहीस.. खरतर अजिबातच आवडायचा नाहीस.. त्यामुळे तू विचारलस याचाच मला जास्त राग आलेला..

अग पण वेडे तु तर जुन्या गोष्टी विसरायला तयारच नव्हतीस.. शेवटी अमितने अगाऊपणा करुन तुझ्या आई-बाबान्ना माझ नाव सुचवल.. त्या अगाऊपणामुळेच खरतर आज आपण २५ वर्ष एकत्र आहोत.. :)

नंतर हे प्रकरण आई-बाबांपर्यन्त गेल.. त्या अमितनेच कीडे केले.. त्यांनी शपथ वगैरे घालून मला लग्न करायला भाग पाडल.. त्यांना लग्न ही आवश्यक गोष्ट का वाटायची, हे तेव्हा मला कधी कळल नाही.. आता २५ वर्ष झाल्यावर कळतय.. :)
मी खूप म्हणजे खूपच रागावले होते सगळ्यांवर.. अमितवर.. आई-बाबांवर..माझ लग्न मनाविरुद्ध करून देतात म्हणजे काय.. आणि तेही तुझ्याशी.. अशा मुलाशी जो मला अजिबात आवडत नाही.. ज्याचा स्वभाव मझ्या अगदी उलट आहे..

पण तूसुद्धा काही कमी नाहिस बर.. :) सुरुवातीला अगदी 'असहकार चळवळ'च पुकारली होतीस.. बोलायची सुद्धा नाहीस दिवसेंदिवस.. पण खर सांगु, तुझ चिडणही मला आवडायच, कारण तु सगळ्याच भावना मनापासुन व्यक्त करायचीस.. मला भावनाच नाहीत म्हणायचीस ना.. तस नव्हत तुझ.. चिडलिस तरी मनापासून..
पण लग्न झाल्यावर तू खूप शांत झालेलीस.. बोलायची नाहीस.. तू आणि तुझ काम.. तेव्हाच मलाही खूप छान संधी चालून आलेली.. मनासारख काम मिळालेल.. तुझ्या माझ्या अयुष्यात येण्यानच मला ही संधी मिळतेय अस समजून मीसुद्धा खुष होतो..

लग्नानंतर काही महिने वाटायच.. हे काय झाल आपल्या अयुष्यात.. लग्न.. नाही मन रमत यात..आणि अशा लग्नला अर्थ तरी काय.. मनाविरुद्ध झालेल्या.. पण मी आता परिस्थिती बदलू शकत नव्हते.. खरतर त्याच काळात तुझी खरी ओळख होत होती मला.. गैरसमज दूर होऊ लागलेले.. तुझ्या स्थितप्रज्ञतेच मला कौतुक वाटायला लागलेल.. मला, माझ्या भावनांना इतक महत्व देणारा तू मला नव्याने माहीत होऊ लागलेलास.. मी अस परक्यासारख वागून्सुद्धा तुझी चिडचिड नसायची कधीच.. मी माझ्या असहकाराचा भाग म्हणून की काय, पण स्वयंपाक, घरातली कामसुद्धा मझ्यापुरतीच करायचे.. तु कधीच या सगळ्याबद्दल काहीच बोलायचा नाहीस.. एकाच घरात लोकांसाठी नवरा-बायको म्हणून राहणारे आपण, हॉस्टेल मधले रूममेट्स ही वागत नसतील इतक्या परकेपणाने वागायचो..

तुझी तगमग मला कळत होती ग मेघा.. पण तु.. तु तर काही बोलायचीच नाहीस.. तुला अजुनही पुर्विच्या आठवणी छळत असतील, मला कल्पना असायची.. वाटायच तुझ्याशी मित्र म्हणुन तरी बोलाव.. पण तू.. तू तोडलेलस मला तुझ्यापासुन.. मी ही ठरवल मग.. वाट बघायची.. तु माझ्यासोबत होतीस.. ठीक होतीस.. तुझ काम छान चालू होत.. हे बघूनच खूप बर वाटायच..

तुझ्याबद्दलच कौतुक, कधी तुझ्याबद्दलच्या आदरामध्ये बदलल.. मला कळलच नाही.. नकळत माझ्या मनात एक तुलना सुरू असायची.. तुझी आणि त्याची.. मला अशी साथ, अस संसार, अस परेम त्याच्याकडून हव होत.. आणि देत होतास तू.. त्यान मला अस समजून घ्याव अस वाटायच आणि हे करत होतास तू.. माझ्या लक्षात येवू लागलेल.. की खरच काही लोक जगात फक्त शारिरीक सौंदर्य बघणारी नसतात.. एखाद्याचा मनावर, स्वभावावर, वेडेपणावरसुद्धा मनापासुन प्रेम करणारीही लोक असतात.. नकळत माझ्या मनात तुझी जागा निर्माण होऊ लागली.. आणि 'असहकार चळवळ' हळू हळू बंद पडू लागली.. :)

त्या दिवशी तू पहिल्यांदा माझ्याशी मनापासून बोललीस.. खूप छान वाटलेल तेव्हा.. त्या दिवशी तुला "बेस्ट पर्फॉर्मर" च ऍवॉर्ड मिळालेल कंपनीत.. तुझ्या चेहर्यावरच्या आनंदाची मी कल्पना करत होतो जेव्हा तु मला ही खुषखबर फोनवर सांगितलीस.. आणि त्यानंतरचा दिवस.. माझ्यासाठी खूप खास होता.. तु चक्क मला ट्रीट दिलेलीस.. आपण पहिल्यांदा बाहेर फिरायला गेलो होतो.. :)

नंतर मला "बेस्ट पर्फॉर्मर" च ऍवॉर्ड मिळाल.. किती खुष होतास तेव्हा तू.. जस काही ऍवॉर्ड तुलाच मिळालय :).. तुला आठवतय.. तेव्हा मी तुला एक पत्र लिहिल होत.. माफी मागितलेली तुझी.. त्या रात्री मला खूप शांत झोप लागलेली.. आणि दुसर्या दिवशी, जेव्हा मी आपल्या दोघांसाठी नाश्ता बनवत होते, तेव्हा तू माझा फोटो काढलेलास.. का, तर म्हणे.. "बेस्ट पर्फॉर्मर ईन अवर होम टू"! मी जळवलेल्या, कडक झालेल्या थालीपीठांवर तू ताव मारलेलास तेव्हा.. वेडा..

तुला मिळालेल्या त्या ऍवॉर्ड मु़ळे खरतर मलाच एक मोठ्ठ बक्षीस मिळाल.. तु माझी मैत्रिण झालेलीस.. मलाही भावना होत्या ग.. तु अमितला म्हणायचीस ना.. सिद्धार्थ पाषाणह्रुदयी आहे.. :) मी अगदीच काही दगड नव्हतो.. खूप छान वाटायच तेव्हा.. तुला नेहमी हसताना बघाव, तुझी प्रगती बघावी म्हणुनच तर तुला लग्नासाठी विचारल होत.. तुझ्यासोबत रहायची मजा आता मी अनुभवत होतो.. :)

सिद्धु, खरतर मला तू आवडायला लागला होतास.. तू बदलला नव्हतास.. माझ्याच मनावरच मळभ दूर झाल होत.. तुझा आधी त्रासदायक वाटणारा स्वभावच आता माझ्या सगळ्यात जास्त आवडीचा झाला होता.. फक्त तुझ्याच नाही तर मी अमित, आई-बाबा..सगळ्यांच्याच पुन्हा जवळ जात होते.. आणि माझ्या स्वतःच्यासुद्धा..

मेघा, तुझ्यातला सुखावह बदल मला खूप आनंदीत करायचा.. तुझ्याशी कोणतीही अपेक्षा न ठेवता मी लग्न केलेल पण लग्नानंतर तु सुखात नाहीस याच वाईट वाटायच.. उगीच केल मी अस.. असही वाटून जायच.. पण आता अस नव्हत.. :)

आणि.. आपली मन जी जुळली ती वीण नंतर अधिकच घट्ट होत गेली.. २५ वर्षात हे नात जास्तच मजबूत बनल.. सगळ तुझ्यामुळे सिद्धु..

तुझ हे बदललेल रूपच मला नवा उत्साह देवून जायच मेघा.. तुझ्यावर अजुन प्रेम करण्यासाठी.. तुला जपण्यासाठी.. मेघा, तु नसतीस तर हे कस शक्य होत..

कथा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

10 Jun 2008 - 10:53 pm | यशोधरा

ए गिरिजा, मस्त लिहिलं आहेस गं!!

संजय अभ्यंकर's picture

10 Jun 2008 - 10:57 pm | संजय अभ्यंकर

फार सुंदर स्वगते!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

भाग्यश्री's picture

10 Jun 2008 - 11:19 pm | भाग्यश्री

आवडली कथा!!

http://bhagyashreee.blogspot.com/

रविराज's picture

11 Jun 2008 - 3:05 am | रविराज

छान जमल आहे. रंगसंगती ही कल्पकपणे वापरली आहे.

सचीन जी's picture

11 Jun 2008 - 9:28 am | सचीन जी

सुरज बड्जत्या ,यश चोप्रा यांच्या सिनेमा सारखी गुडि, गुडि कथा !!!

सचीन जी !

आनंदयात्री's picture

11 Jun 2008 - 10:21 am | आनंदयात्री

लिहलय गिरिजा !!

फटू's picture

11 Jun 2008 - 11:04 am | फटू

गिरीजा, एकदम मस्त लिहिलं आहेस...

आणि कथेचा हा "हटके" फॉर्म आवडला...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

अरुण मनोहर's picture

11 Jun 2008 - 12:17 pm | अरुण मनोहर

वेगळा प्रकार आवडला.
Moral of the story- slow and steady wins the race.

महेश हतोळकर's picture

11 Jun 2008 - 12:25 pm | महेश हतोळकर

सहमत आहे. असेच म्हणतो.
महेश हतोळकर

विसोबा खेचर's picture

11 Jun 2008 - 2:22 pm | विसोबा खेचर

रंगीबेरंगी कथन आवडलं, छान आहे! :)

पद्मश्री चित्रे's picture

11 Jun 2008 - 3:42 pm | पद्मश्री चित्रे

छान लिहिलं आहेस...

मन's picture

11 Jun 2008 - 3:52 pm | मन

अगदि तरल लेखन.
प्रचंड आवडलं;अगदि मनापासुन.

आपलाच,
मनोबा
(हल्ली आतंरजालाच्या अनुपलब्धतेमुळे थोडासाच वेळ जालावर असतो;ते ही वाचनमात्र.
त्याबद्दल सर्वांना एकच सांगणं आहे "माफी असावी,मित्रहो"!)

स्वाती राजेश's picture

11 Jun 2008 - 4:45 pm | स्वाती राजेश

मस्त लेख. आवडला....
अजुनी येऊदेत...

जयवी's picture

11 Jun 2008 - 4:58 pm | जयवी

गिरीजा...... खूप आवडलं गं लि़खाण्........मस्तच !!

प्रभाकर पेठकर's picture

11 Jun 2008 - 7:20 pm | प्रभाकर पेठकर

स्वगतांची कल्पना छान आहे. रंगांचा वापर कल्पक आहे.

खालील काही शब्द खटकले. वाचताना रसभंग झाला...

झालेली, म्हणालेला, आवडलिस, चिडलेलिस, गेलेल्या, कळलेल, लागलेलिस, करायचीस, म्हणायचीस, झालेलीस, आलेली, मिळालेल, लागलेले, लागलेलास, बोललीस, वाटलेल, दिलेलीस, मागितलेली, लागलेली, काढलेलास

खालील शब्द योग्य आहेत असे वाटते.

रागावले होते, पुकारली होतीस, लिहिल होत, मळभ दूर झाल होत ह्या प्रमाणेच वरील शब्दांची रुपे वापरली असती तर वाचायला अजून आवडले असते.

गिरिजा's picture

11 Jun 2008 - 7:39 pm | गिरिजा

हो..

मी पुन्हा वाचुन पाहिल, तेव्हा मलाही अस वाटल, पण स्वगत असल्याने चालतील हे शब्द.. असही एक मनात आल.. :)

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

वरदा's picture

11 Jun 2008 - 7:38 pm | वरदा

छान गं गिरीजा....खूप आवडली ...
पेठकर काका म्हणतात ते पटलं...थोडे बदल आणि अजून छान वाटेल....

मराठी कथालेखक's picture

15 Jun 2016 - 4:43 pm | मराठी कथालेखक

छान रंगबिरंगी कथा :)
"रब ने बना दी जोडी"ची आठवण झाली.

सूड's picture

15 Jun 2016 - 6:56 pm | सूड

ह्या गिर्जा आणि गिर्जाकाकाच्या गिर्जा एकच का?

प्रसाद गोडबोले's picture

16 Jun 2016 - 5:31 pm | प्रसाद गोडबोले

अंहं, ह्या त्या नाहीत.

सतिश गावडे's picture

16 Jun 2016 - 10:27 pm | सतिश गावडे

मलाही वाटले गिर्जाकाकू परत आल्या की काय.