चित्रमय कोकण दर्शन (भाग ४) गुहागर समुद्र दर्शन.

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
7 Jan 2012 - 3:28 pm

समुद्र किनार्‍याचे आकर्षण काही वेगळेच असते. :) त्यातही ते कोकणातले असतील तर मग पहायलाच नको !
अश्याच गुहागरच्या समुद्र किनार्‍यावर केलेल्या भटकंतीचे हे काही क्षण आहेत.
समुद्रकिनार्‍यावर पोहचण्याच्या जरासे आधी काही दुकाने होती,त्यावर आकाशकंदील लावलेला माझ्या नजरेस पडला... फार आवडला,त्याला पाहुन हा विचार देखील केला की सुर्यास्त झाल्यावर हाच कंदील कसा दिसत असेल ? मग याला पहिला टिपला.

समुद्र किनार्‍यालगत घोडागाडीत फिरण्याची मजा अनुभवणारी ही मंडळी.

समुद्राच्या पाण्यावर चालणारा प्रकाशाचा खेळ फार मोहक असतो...

असेच अजुन दोन क्षण !
क्षण १

क्षण २

मग एक नजर सुर्याकडे टाकली... सुर्यास्तास अजुन बराच वेळ होता.

परत एकदा घोडागाडी धावताना दिसली...

सुर्य जरासा खाली झाला...

घराकडे परतणारे पक्षी...आकारात आणि लयीत उडण्याची कला यांनी कुठुन शिकली ? :)

मला आवडणारा रंगाचा खेळ...

लाल लाल गोळा...

माझ्या सौभाग्यवतीने वाळवंटातल्या जहाजावर बसुन एक चक्कर टाकुया अशी इच्छा प्रकट केली. आणि तात्काल मी त्याची पुर्तता केली. ;)

वरच्या फोटतले बादल आणि बादलचे मालक. हो बादल त्या उंटाचे नाव. :)
उंटाची बसण्याची एक वेगळीच बैठक असते,तो जेव्हा खाली बसतोआणि जेव्ह्या उठुन उभा राहतो तेव्हा,त्याचे अंग अत्यंत विचित्र पद्धतीने खालीवर करतो ! ;) त्यामुळे ही उठक बैठक सोप्पी नसते. ;)
आमची सवारी निघाली !

कसा बसा कॅमेरा सांभाळला ! आणि समुद्र किनार्‍यावर नजर टाकली.कॅमेरा बंद करुन टाकला ! ;)
फेरी संपल्यावर मालकासह बादल त्याच्या बैठकीत आरामात बसला.

हल्ली कोणताही प्राणी कितीही क्युट वाटु शकतो,त्यामुळे बादलचा एक सोलो फोटो काढुन ठेवला ! ;)

आता सुर्यास्त जवळ आला होता,त्यातले दोन क्षण मला टिपता आले.
सुर्यास्त क्षण १

सुर्यास्त क्षण २

आता नजर लाटांकडे वळली...

क्षितीजाकडे पाहतच रहावे वाटते... :)

निघायच्या आधी त्या अथांग सागराला शेवटचे पाहिले...

हो,हा तोच पहिल्या फोटोतला कंदील...

पुढच्या भागात...
श्री वॅळणेश्वर दर्शन.
चित्रमय कोकण दर्शन (भाग ३) श्री दुर्गा देवी

कॅमेरा निकॉन पी-१००
मोड:- अ‍ॅप्रेचर प्रायोरिटी
मिटरींग-स्पॉट.

*फोटो फक्त कंप्रेस केले आहेत.सॉफ्टवेअर वापरुन इतर कुठलाही बदल केलेला नाही.
(हौशी फोटुग्राफर) ;)
मदनबाण.....

प्रवासछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

7 Jan 2012 - 3:33 pm | सुहास झेले

सहीच !!

बादल खरंच क्युट दिसतोय ;-)

स्पा's picture

7 Jan 2012 - 3:46 pm | स्पा

भन्नाट....
अद्भुत....
कडक...
चाबूक ..........

पियुशा's picture

8 Jan 2012 - 10:51 am | पियुशा

सॉल्लीड फोटु रे मामु !
विषेशकरुन सुर्यास्ताचे फोटु क्लास्स आले आहेत :)
आपल्याकडे फोटूग्राफीचा क्लास लावावा क्काय ? ;)
सध्या लई शिव्या खात आहे ,फोटु नीट काढायला जमत नाहीत म्हणुन :)
क्या बोलता है मामु ;)

आपल्याकडे फोटूग्राफीचा क्लास लावावा क्काय ?
क्या ट्विटी अपुनकी टांग खिचरेली हय क्या ? ;)
अपुन खुदीच थोडा थोडा सिखरेला हय... बोले तो बेबी स्टेप ले ले के सिखरेला हय भिडु ! ;)
अभी तुम पुछरेला हय तो अपुन तुमको एक साईट का पता देरेला हय्,इधर कु जाके अपुन थोडा कुछ सिखरेला हय क्या समझे ? ;)
http://www.digital-photography-school.com/
तब तक लगे रहो ! ;)

@ बाणा
बोले तो बेबी स्टेप ले ले के सिखरेला हय भिडु

ऐसा क्या , फिर तो अपुन अभी अण्डेंमेच है रे मामु ;)
अभी तु अपुनकी टांग खिचरेला है , मेरेकु येडा मत बना ;)
आजसे अपन तेरे फोटू ग्राफिकी पन्खी (fan) हो गैली है रे मामु ;)

अन्या दातार's picture

7 Jan 2012 - 4:15 pm | अन्या दातार

घोडागाडी, उंट वगैरे गमजा आत्ता-आत्ता आल्यात. पूर्वी संध्याकाळी चिटपाखरुही नसायचे, आणि ऐकू यायची फक्त समुद्राची गाज.
मला आठवतंय, एकदा आमची एसटी उशीराने पोचलेली. उशीर म्हणजे अगदी रात्री १! पौर्णिमेच्या आसपासचा दिवस होता. वाहन वगैरे अर्थातच नव्हते. एसटी स्टँडपासून देवीच्या देवळापर्यंत चालत जाणे भाग होते. संपूर्ण रस्त्यावर आमच्याशिवाय कुणीच नाही. सोबतीला फक्त काही ठिकाणीच असलेले रस्त्यावरचे दिवे, चंद्राचा प्रकाश आणि समुद्राची गाज. तोच समुद्र सकाळी मात्र खूप वेगळा भासतो.

असो, विषयांतर खूप झाले. फोटो सुंदरच आहेत. वादच नाही. क्षण १ चा फोटो उभा घ्यायला हवा होता असे वाटतय.

तुषार काळभोर's picture

8 Jan 2012 - 6:07 pm | तुषार काळभोर

जेथे नसतील, असा स्वच्छ आणि शांत किनारा उरलाय कोठे?
:-(

जागु's picture

7 Jan 2012 - 4:14 pm | जागु

सुंदर.

रेवती's picture

7 Jan 2012 - 4:20 pm | रेवती

ग्रेट फोटू आलेत बाणा!
समुद्राच्या पाण्यावर सूर्य्प्रकाश आणि नंतर गुलाबी आकश्.........भारी सुंदर.
बादल एकदम गोड आहे.
उंट, जिराफ, कोआला क्यूट असतात पण त्यांची दया येते ...... का ते माहीत नाही.:)

गणपा's picture

7 Jan 2012 - 4:20 pm | गणपा

मस्त रे बाणा.

प्रचेतस's picture

7 Jan 2012 - 5:15 pm | प्रचेतस

सुंदर फोटो रे बाणा.

पैसा's picture

7 Jan 2012 - 5:19 pm | पैसा

फार म्हणजे फारच सुंदर फोटो! गुहागरला आता घोडे उंट वगैरे आलेत हे पाहून मजा वाटली!

प्रशांत's picture

7 Jan 2012 - 5:50 pm | प्रशांत

श्री वॅळणेश्वर दर्शनाच्या प्रतिक्षेत.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jan 2012 - 12:26 am | अत्रुप्त आत्मा

मस्तच रे बाणा..! प्रत्येक फोटो म्हणजे शेड्सचा खेळ आहे नुसता... सुर्यनारायणाचे फोटो तर असे सही आलेत की क्या केहेने? पक्ष्यांची लयकारीही अप्रतिम आहे. आणी सर्वात महत्वाचं म्हणजे या धाग्याचं स्टार्ट आणी एंडींग एखाद्या शॉट फिल्म सारखं जमुन आलय ते त्या आकाश कंदिलामुळे..किंबहुना तसा त्याला ठरवुन टिपल्यामुळे... जियो..दोस्त... जियो! :-)

निवेदिता-ताई's picture

7 Jan 2012 - 9:34 pm | निवेदिता-ताई

मस्त ..मस्त........सुंदर आलेत सर्व फ़ोटो

मोदक's picture

7 Jan 2012 - 10:44 pm | मोदक

छान फोटो.. :-)

मोदक.

५० फक्त's picture

7 Jan 2012 - 11:09 pm | ५० फक्त

जबरदस्त फोटो अन अजुन काय जबरदस्तच....

प्रभाकर पेठकर's picture

8 Jan 2012 - 2:28 am | प्रभाकर पेठकर

सर्वच छायाचित्रे झकास आहेत. बाराव्या छायाचित्रात लहानग्या मुलाने जरा विरस केला.

प्राजु's picture

30 Jan 2012 - 6:10 am | प्राजु

काय काका तुम्ही पण! त्या लहानग्या मुलाकडे बरं लक्ष गेलं तुमचं!! :D

प्रभाकर पेठकर's picture

30 Jan 2012 - 3:28 pm | प्रभाकर पेठकर

त्याची निरागसता चुकीच्या ठिकाणी ओसंडून वाहते आहे. त्यामुळे चटकन लक्ष वेधले.

मन१'s picture

8 Jan 2012 - 11:31 am | मन१

मस्त.

स्मिता.'s picture

8 Jan 2012 - 6:30 pm | स्मिता.

सगळेच फोटो आवडले. समुद्र, मावळणारा सूर्य आणि आकाशात होणारा रंगांचा खेळ... सगळेच भन्नाट आहेत!

सुधांशुनूलकर's picture

8 Jan 2012 - 9:56 pm | सुधांशुनूलकर

हा भाग, यापूर्वीचे भाग आणि सर्व फोटो छान.
पाण्यावरची सोनेरी झळाळी, मावळत्या सूर्याच्या रंगछटा अतिशय मोहक.

सुधांशुनूलकर's picture

8 Jan 2012 - 9:57 pm | सुधांशुनूलकर

हा भाग, यापूर्वीचे भाग आणि सर्व फोटो छान.
पाण्यावरची सोनेरी झळाळी, मावळत्या सूर्याच्या रंगछटा अतिशय मोहक.

सुधांशुनूलकर's picture

8 Jan 2012 - 9:59 pm | सुधांशुनूलकर

प्रकाटाआ

सुनिल पाटकर's picture

8 Jan 2012 - 10:11 pm | सुनिल पाटकर

फोटो अप्रतिम आहेत

प्यारे१'s picture

9 Jan 2012 - 9:53 am | प्यारे१

भन्नाट आलेत रे फोटो.

विसोबा खेचर's picture

9 Jan 2012 - 10:41 am | विसोबा खेचर

मस्त फोटो..!

तात्या.

मृत्युन्जय's picture

9 Jan 2012 - 12:20 pm | मृत्युन्जय

सुंदर फटु रे बाणा

माझ्या धाग्यावर येण्याचे कष्ट घेउन प्रतिक्रिया देणार्‍या सर्व मंडळींना थांकु ! :)
धागा पाहुन सुद्धा प्रतिसाद न-देण्याची कंजुषी करणार्‍या चिंगुस मंडळींना ठेंगा ! ;)

मृगनयनी's picture

10 Jan 2012 - 12:29 pm | मृगनयनी

सगळेच्च फोटो... सुन्दर....अप्रतिम!!! डोळ्यान्चे पार्णे फेडणारे!!!!! :)

स्पेशली... ते समुद्रकिनार्‍यावरचे--बेटासारखे की खाडीसारखे भासणारे सूर्यास्ताचे फोटो!!!..आय थिन्क वरुन ६ आणि १० नम्बरचे!!! लवली!!!!!

आणि तुमचा "बादल" सुद्धा आवडला!! :)

मराठमोळा's picture

10 Jan 2012 - 8:18 am | मराठमोळा

मस्त फोटु रे बाणा
समुद्रकिनार्‍यावरची संध्याकाळ नेहमीच भुरळ घालते. :)

अप्रतिम .. निव्वळ अप्रतिम ..

पाहतच रहावेशे वाटत आहे ...

वपाडाव's picture

29 Jan 2012 - 7:16 pm | वपाडाव

खुं खा र !!
का ति ल !!

प्राजु's picture

30 Jan 2012 - 6:11 am | प्राजु

वर्णनातीत फोटोज आहेत..
सुंदर!!

अमोल केळकर's picture

30 Jan 2012 - 12:45 pm | अमोल केळकर

गुलाबी सुर्यास्त आवडला :)

अमोल केळकर

मी-सौरभ's picture

30 Jan 2012 - 12:58 pm | मी-सौरभ

सुंदर फोटो!!
(आता ठेंगा नाही दाखवणार ना??? ;))

विशाल कुलकर्णी's picture

20 Jan 2015 - 4:41 pm | विशाल कुलकर्णी

जबरी...