रोज मरतो

निश's picture
निश in जे न देखे रवी...
29 Dec 2011 - 11:26 am

रोज मरतो रोज मरतो रोज मरतो

सकाळी कामावर निघालो की
कचरा कुनडीवर कचरा वेचणारी
भुकेने रडणारी ति अनाथ मुल बघुन

रोज मरतो रोज मरतो रोज मरतो

स्टेशनवर येतो तिथे दिसत एक म्हातार जोडप
व ते अडचण आहेत नविन घरात अस मानुन
त्याना गावाला पाठवणार तरुण जोडप,ते बघुन
रोज मरतो रोज मरतो रोज मरतो

लोकल येते फलाटावर नेहमिसारखी
डब्ब्यानमध्ये गुरानसारखी घुसलेली मानस बघुन.
रोज मरतो रोज मरतो रोज मरतो

दुपारी जेवणात येणारी आकार लहान झालेलि
वाढणार्‍या महागाईने बिनतेलाची असलेलि
रोजच असलेलि बटाटा भाजी व पोळी ,ते बघुन

रोज मरतो रोज मरतो रोज मरतो

तरी पण ह्या मरण्यातुनच रोज येते नवि उभारी जगण्याची
जेव्हा घरी येतो रात्री , बघतो दारात एकत्र जेवता यावे
म्हणुन वाट बघणारी बायको व आई वडिल,

हो तेव्हा मी रोज जगतो तेहि हसत हसत
रोजच्या मरणातुन वेळ काढुन न रडता
मी रोज जगतो रोज जगतो मी रोज जगतो.

मुक्तक

प्रतिक्रिया

फिझा's picture

29 Dec 2011 - 11:47 am | फिझा

छान ..जमलिये कविता ........!!

RUPALI POYEKAR's picture

29 Dec 2011 - 12:20 pm | RUPALI POYEKAR

छानच

लीलाधर's picture

29 Dec 2011 - 1:11 pm | लीलाधर

जरा आपला संदेश हा ऑप्शन चेक करा निश भाऊ

अप्रतिम मित्रा ...
मस्त कविता

अत्रुप्त आत्मा's picture

29 Dec 2011 - 3:13 pm | अत्रुप्त आत्मा

छान आशादायक कविता आहे.

पाषाणभेद's picture

29 Dec 2011 - 11:21 pm | पाषाणभेद

सुंदर. भावना पोहोचल्या.

तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार.
जेव्हा कविता आवडणार नाहि तेव्हा जरूर आपल परखड मत नोंदवा.

परत एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार व धन्यवाद.