दिपावली विशेष !!!

Primary tabs

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in विशेष
20 Oct 2011 - 12:45 am
दिवाळी २०११

नमस्कार मंडळी,
बघता बघता दिवाळी चार दिवसांवर आली आहे. या निमित्ताने मनात अनेक विचार रुंजी घालत असतील. आपण मायदेशात असा किंवा परदेशात, मागल्या दिवाळीला केलेली मजा, घडलेले (मजेदार) किस्से, नवगृहिणींची उडालेली धांदल, फराळाच्या पदार्थांना मिळालेली दाद, अशा गोष्टी आपल्या मिपाकर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर कराव्यात असे वाटत आहे ना? चला तर मग! हा धागा आपल्याचसाठी आहे. इथे आपण आठवणी लिहू शकता, सध्या तुम्ही दिवाळीची कोणती तयारी करण्यात मग्न आहात तेही नमूद करू शकता. दिवसभराच्या कामातून सवड काढून जेंव्हा या धाग्यावर याल तेंव्हा इथे नवीन मजेदार आठवण, आज कोणी काय केलं यासारख्या बातम्या नक्कीच मनोरंजन करतील आणि चेहर्‍यावर हसू आणतील.

शुभ दिपावली!

प्रतिक्रिया

कुंदन's picture

20 Oct 2011 - 1:09 am | कुंदन

२५ रात्रीचे तिकिट आहे. नक्की तारखा सांगा राव कोणी तरी.

Nile's picture

20 Oct 2011 - 1:20 am | Nile

आमच्या कडे दारू विकेंडला दोन्ही दिवस उडवणार आहोत, या बाटल्या घेऊन तुम्ही पण. हाकानाका.

नावातकायआहे's picture

20 Oct 2011 - 1:16 pm | नावातकायआहे

दारु 'शोभेची' आणु का 'आवाजाची'?

प्रभो's picture

20 Oct 2011 - 1:13 am | प्रभो

नवीन विभागासाठी शुभेच्छा!!!

मस्त मस्त अनुभव वाचायला मिळोत.

मी आज भाजक्या पोह्यांचा चिवडा केलाय. करंजीचे सारणही आजच करून ठेवणार आहे.

पा कृ द्या. विकांताला करुन ठेवीन म्हणजे ऐन वेळी धावपळ नको.

तुम्हाला भाजके पोहे मिळालेत का? नाहीतर साध्या पोह्यांचा तळून किंवा पातळ पोह्यांचा केला तरी चालेल.
धणे पावडर, जिरे पावडर, शेंगदाणे, भाजके डाळे, कढिपत्ता, खोबर्‍याचे काप, पिठीसाखर, मीठ, फोडणीचं सामान तयार आहे ना? पातळ पोह्यांचा चिवडा असेल तर थोडे तीळ असले तर बरे. कोणते पोहे आहेत ते सांगा.

या विकांती बेसनाचे आणि खोबऱ्याचे लाडू करावे म्हणतो.
लेकीला फार आवडतात.

मदनबाण's picture

20 Oct 2011 - 10:06 am | मदनबाण

मस्त कल्पना, मस्त विभाग निर्मीती ! :)

मला तर बॉ कडबोळी फार फार आवडतात... खायची इच्छा झाली आहे. ;)
अनारसेही आवडतात... तेही चापायला मिळायला हवे अशी सुद्धा इच्छा झाली आहे... ;)

(नानकटाई प्रेमी) ;)

कालच चकली झाली. आज शंकरपाळी करायच्या विचारात आहे.

नरेश_'s picture

21 Oct 2011 - 3:29 pm | नरेश_

बोलावण्याच्या विचारात असशीलच ;)

करंज्या बनता बनताच त्या पळवायच्या आणि मटकवायच्या अशी माझी पद्धत होती. काही वर्षांनी मला सर्व पदार्थ बनेपर्यंत फिरकू न देण्याचं धोरण निघालं. मग सर्व करंज्या झाल्यावर मी एक तोंडात टाकली. प्रत्येक चाव्यासोबत दात जबडा यात कचक कचक असे आवाज येऊ लागले. पुन्हापुन्हा वेगवेगळे नमुने घेऊन पाहिले तरी किचकिचाट चालूच. कान वाजायला लागले. मग मी कामधाम सोडून फोरेन्सिक तपासणी केली.

आजीने चुकून (वयोमानानुसार दृष्टीवर परिणाम) करंज्यांच्या सारणात पिठीसाखरेऐवजी रांगोळी पूड घातली होती. सर्व फेकून द्यावे लागले. मला वेळीच खाऊ दिले असते तर??

हा हा हा. जबर्‍या किस्सा गवी.

सोत्रि's picture

21 Oct 2011 - 9:32 am | सोत्रि

मस्त किस्सा! :)

मला वेळीच खाऊ दिले असते तर??

हे तर एकदम मस्त.

- (करंजीप्रेमी) सोकाजी

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Oct 2011 - 7:03 pm | बिपिन कार्यकर्ते

=)) लै भारी... माझ्या आजीने एकदा बेसनाच्या लाडवात पिठीसाखर म्हणून सोडा घातला होता. आणि काकाला, तो नको नको म्हणत असतानाही प्रेमाने आग्रहाने खायला घातला. पहिल्याच घासात तो आडवा झाला! ;)

मला अनारसे खुप आवडतात अन तेही शुद्ध तुपातले.... थंड झालेल्या अनारशांना जर डालड्यात तळलेले असल्यास टाळुला चिकटण्याचा आण्भव आहे.... (टार्‍या तुझी आठौण येउ घातली आहे)
आमच्या घरी पुरणाचा घाट असतो....
पाच दिस खंप्लिट पुरण एके पुरणच....
कुणी साध्या चपातीचे नावही काढायचे नाही....

आणी लक्ष्मीपुजनाच्या दिशी सकसक्काळी महावीर निर्वाण चढवुन मग सिताफळाच्या डालीवर ताव मारण्याचा प्रोग्राम असतो....
ही डाली २००-२५० सीताफळांची असते.... त्यानंतर वर्षभर काही सीताफळांकडॅ ढुंकुन पहायचे नाही.....

माझी काकु अन आज्जी चकल्या एक नं बनौतात....
आई अन आत्या (वर रेवतीआज्जींनी सांगितलेला) पोह्याचा चिवडा खसखशीचे दाणे अन दाळ्वं टाकुन बनौतात....

एक वैदर्भीय प्रकार आहे गुण्या....
कुणाला माहिती आहे का? (कॉलिंग मी ॠचा )....
हा गुळाचा अन कणकीचा मिक्स बनतो....

गवि's picture

20 Oct 2011 - 1:07 pm | गवि

चिरोटे हा सर्वोत्तम फराळप्रकारांपैकी एक आहे याविषयी बरेचजण एकमत होतील.

सांगली मिरज मधल्या आपटे यांचे चिरोटे आत्तापर्यंत खाल्लेल्यांत सर्वात उत्कृष्ट आहेत. एक्सीड्स एस्क्पेक्टेशन टाईपचे.

सर्वांना सांगली मिरजला जाणे शक्य नाही पण आपल्या आसपास कुठे मिळतात का पहा कारण हे सांगली मिरजेहून अन्यत्रही डिस्ट्रिब्यूट होतात.

चांगले ब्रँडेड आहेत. सील्ड बॅग आणि वरुन बॉक्स अशा पॅकिंगमधे असल्याने खुसखुशीत आणि अखंड (चुरा न होता) राहतात.

पुण्याकडून मुंबईकडे येतानाचा पहिला सोडून दुसरा फूडमॉल, जिथे दत्त स्नॅक्स म्हणून खाण्याची जागा आहे. त्याच दत्त स्नॅक्सच्या आत एक दुकान आहे तिथे हे वर उल्लेखलेले आपटे यांचे चिरोटे मिळतात. गुलाबी रंगाचे बॉक्स..

एकदम रेकमेंडेड. आमच्याकडे सर्वजण त्याचे अ‍ॅडिक्टच झालेत.

बादवे .. दत्त स्नॅक्सचे सर्व पदार्थही झकास चविष्ट असतात...

अमोल केळकर's picture

21 Oct 2011 - 9:25 am | अमोल केळकर

अरेच्चा २५ वर्षे सांगलीत गेली. पण हे आपट्यांचे चिरोटे पहिल्यांदाच ऐकत आहे. नुकतेच चालू झले असावेत का?
का पिकते तिथे खपत नाही ?? :)

अमोल केळकर

हे पहा. आत्ताच आणले आहेत. मला घंटाळी रोड ठाणे इथल्या दुकानात मिळाले. ए १ असतात. ठाणे, पुणे, सांगली, मिरज आणि मुख्य शहरांत लोकांनी जरुर आणून खावेत.

अमोल खाली आत्ता आणलेल्या बॉक्सचा ताजा फोटो आहे. बॉक्सवरचा निर्मात्याचा पत्ता बघः

आपटे फूड्स
विनायक बिल्डिंग
शंकर तत्वज्ञान मंदिरामागे
१ क्रमांक शालेजवळ,
मिरज पिन ४१६४१०

जिल्हा सांगली.

फोन ०२३३ २२२२५२१ / २२२२२२१

आता हे चिरोटे आम्हाला (कोल्हा असल्याने) आंबट वाटणार म्हणून एक दुरुस्ती आहे.
शांकर तत्वज्ञान मंदीरामागे असे आहे.
अनेकजण शंकर लिहितात तरी पत्ता सापडतो पण हे आपलं उगाच!;)

मिसळ's picture

25 Oct 2011 - 10:07 pm | मिसळ

गवि, ठाण्यातल्या त्या दुकानाचा पत्ता देऊ शकाल का?

श्रद्धा सर्व्हिसेस.

2,Radha, Ghantali Mandir Road, Ghantali,
Thane - 400602, Maharashtra , India

फोन 25395351

पाषाणभेद's picture

20 Oct 2011 - 2:58 pm | पाषाणभेद

दिवाळीच्या फटाक्यांमध्ये फुलझाड (अनार किंवा कोठी) हा प्रकार असतो. एके दिवाळी आम्ही सारे भावडं गावी गेलो होतो. तेव्हा चुलत्यांनी फटाके आणले होते. त्यात फुलझाडाचा नविन प्रकार होता. नेहमीचे फुलझाड हे शंकूच्या आकाराचे असते. हे फुलझाड सिलींड्रिकल आकारात होते. त्यातच ते निमूळतेही होते. (बेस कमी होता.) आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फुलझाड संपत आले की त्याचा बार होवून तो अ‍ॅटमबॉम्बसारखा फुटत असे. तसेच नेहमीप्रमाणे वरील बाजूस वात नव्हती तर ती मधल्या भागात होती.

व्हायचे काय की हि असली फुलझाडे संपायच्या वेळी त्यातील बिल्टइन फटाक्यामुळे कलंडत असे. पहिल्या दिवशी एखाद दोन लावल्यानंतर लगेचच तसे समजले. दुसर्‍या दिवशी मात्र पहिल्याच फुलझाडाने दगा दिला. फुटण्याच्या वेळी ते कलंडले व त्याचा बार व त्यातील जाळ शेजारच्या लहान मुलीच्या अंगावर आदळला. त्यातील आगीमुळे तिचा फ्रॉक जळू लागला. लगेचच आम्ही धावलो व ती आग विझवली. थोडे भाजले पण निभावले.

आम्ही सरळ उरलेले असले फुलझाडे कचर्‍यात फेकून दिली. नंतर कानाला खडा लावला की आपले पारंपरिक फटाकेच आणायचे म्हणून.

आगगाडीचे ही तसेच. दोरा तुटला की सरळ कुठेतरी घुसत असे.

अग्निबाणाचे किस्से तर बर्‍याच जणांच्या बाबतीत घडतात. त्यामुळे लिहीत नाही. आम्ही अग्निबाण आणतच नाही.

मदनबाण's picture

20 Oct 2011 - 3:54 pm | मदनबाण

लहानपणी फुलबाज्या,भुईचक्र्,पाउस्,लवंग्यांची माळ,साप /नाग (जे काय असेल ते) इं प्रकार त्यावर भर असायचा!
जसा मोठा झालो तशी शिंग फुटली आणि चॉईस बदलला... ;) फक्त सुतळी बॉम्ब फोडायचा बाकी काय बी नाय !
पहाटे पहाटे एका हातातल्या पिशवीत बरेचसे सुतळी बॉम्ब घेउन दुसर्‍या हातात उदबत्ती धरुन लोकांना जागे करण्याचा माझ्या उद्योग चालु व्ह्यायचा ! ;) थोड्या थोड्या अंतराने सुतळी बॉम्ब ठेवायचे आणि एक एक करत पेटवत जायचे...
गाढ झोपलेली लोक लयं वैतागायची च्यामारी...आणि माझ्या सारख्या अतरंगी कार्ट्याला याची लयं मज्जा वाटायची ! ;)
इतर सुद्धा अनेक प्रकार मी सुतळी बॉम्ब ने केले ते इथे टंकत नाही... ;)
पण गेली काही वर्षे मी फटाके अजीबात उडवत नाहीये... कारण ? शिंपल ज्या ग्रहावर राहतो त्या ग्रहाचा इचार ! इतर आकाशात धुर सोडुन मजा लुटत आहे... मी त्यात भर न घालण्याचे ठरवले ! फटाके वाजवायचे सोडले ते सोडलेच्.सध्या इतरांनी फटाके उडवताने ते टिपण्याचा प्रयत्न करतोय... मागच्या वर्षी एक असाच प्रयोग केला होता.
पण या वर्षी फटाके उडवावेच लागणार ! ;)

फोटू देण्यासाठी वेगळा धागा सुरु केलाय रे!

मदनबाण's picture

22 Oct 2011 - 2:35 pm | मदनबाण

ओक्के...आज्जी बाई ;)
काय गं आज्जे यंदा तुझा इस्पेश्यल पदार्थ काय हाय बरं ? ;)

आमच्याकडे नेहमिचेच पदार्थ आहेत.
पण तुला कश्याला पडलिये आमचे काळजी?
तुमचा दिवाळसण आणि कौतुक यातच रमलायस ते दिसतय की!;)

सुतळी बाँबची वात काढुन त्यात उदबत्ती पेटवून त्याचा टाईम बाँब बनवणे.
सुतळी बाँब अंगणातल्या एखाद्या रिकाम्या (लोखंडी) पिंपात टाकणे.
पींप मिळाल नाही तर पत्र्याचा चौकोनी डबा अगदी तोही नाही तर गेला बाजार डालड्याचा डबा असायचाच.
पेटुन गेलेल्या किंवा फुसक्या निघालेल्या सगळ्या फटाक्यांतली दारु एखाद्या कागदावर गोळाकरुन मग अनेकांचे डोळे 'दिपवणे'.
केपा/टिकल्या फोडायला दंबुक किंवा रॉकेट मिळायच अस नाही त्यामुळे हातोडी, तिही नसेल तर सरळ दगड घेउन केपा/टिकल्या फोडता फोडता फरश्यासुद्धा फोडणे. (नंतर चामडी लोळत असे ते वेगळ.)
नागाच्या/सापाच्या गोळ्यांनी अंगणातल्या फरशीवर 'नक्षी' उमटवुन आई बहीणीला रांगोळीत मदत करणे.
असे नानाविध उपद्व्याप करुनच लहानपणी आमची दिवाळी साजरी होत असे.
हे सगळ करत असताना काही गमती जमती, करामती पण केल्यात त्यापण नंतर येतीलच.

सुतळी बाँबची वात काढुन त्यात उदबत्ती पेटवून त्याचा टाईम बाँब बनवणे.
सुतळी बाँब अंगणातल्या एखाद्या रिकाम्या (लोखंडी) पिंपात टाकणे.

वरच्या प्रतिसाद जे टंकले नव्हते ते गणपासेठच्या या प्रतिसाद वाचल्याने बाहेर येत आहे... कॄपया सांभाळुन घेणे ! ;)
तर...

१)सुतळी बाँम्ब घ्यावा,त्याच्यावर वाण्याकडुन / घरातुन आणलेले पीठ टाकावे,वात पेटवली की मस्त आगीचा लोळ दिसतो.
२)प्लास्टीकचा,पत्र्याचा आयटम गणपासेठ ने सांगितला आहेच !
३)हल्ली नविन इमारतीचे डक्ट बंद असतात,म्हणजे आतल्या बाजुला असतात ! चौकोनी किंवा तत्सम आकाराचा डक्ट (टॉलेट्/बाथरुमची बाहेरची जागा) असतो...भरपुर जागाही असते... मग माझ्यातली अचाट कल्पना शक्ती ने नविन उद्योग केला ! ;) डक्ट मधे आवाज झाल्यास घुमतो... गच्चीवरुन तो डक्ट पाहता येतो. मग काय गच्चीत जाउन सुतळी बॉब्म डक्टच्या कट्यावर पेटवुन ठेवायचा आणि कलटी मारायची (किंवा तिथेच राहुन गंमत ऐकायची) ! जितके लोक टमरेल घेउन गहन अश्या चिंतनात बसलेले असायचे त्यांच्या चिंतन साधनेत मी सुतळी बाँम्बच्या आवाजाने विघ्न आणायचो ! ए कोन है बे? साला इधर भी शांतीसे बैठने नय देगा क्या ?... तेरी तो ! असा आवाज कुठल्याश्या खिडकीतुन आला की लगेच माझी जिन्यावरुन खाली कलटी !!! ;)

(सु त ळी बॉ म्ब प्रे मी. . .) ;)

वपाडाव's picture

20 Oct 2011 - 4:52 pm | वपाडाव

गणपा अन मदनबाणाच्या प्रतिसादाने हुरळुन झाल्या गेले आहे....
लै चिक्कार आठौणी ताज्या झाल्या आहेत.....
धन्यवाद संमं....
असा धागा काढल्याबद्दल.....

सोत्रि's picture

21 Oct 2011 - 10:00 am | सोत्रि

चिक्कार आणी बेक्कार सहमत !

- (सुतळ'बॉम्ब'प्रेमी ) सोकाजी

बाण हे माझं दिवाळीतलं अत्यंत आवडतं आयुध होतं/आहे. मग एकाच वेळी दोन तीन बाण सोडणे, बाणाखाली इतर आवाजाचे फटाके लाउन टू-इन-वन फटाका बनवणे इ. चिक्कार उद्योग आमची गल्लीतली गँग करायची. कालांतराने आजूबाजूला उंच इमारती उभ्या राहिल्या आणि आमच्या आनंदाला मुकावं लागलं. काही महिन्यांनी मग त्या इमारतींमधे राहणारी नविन मुलं आमच्या ग्यांगमधे सामिल झाली. त्यांच्या गच्चीवरून बाण उडवायला परवानगी मिळाली. फटाके उडवून झाल्यानंतर मग कोणाच्यातरी गच्चीवर सगळी जणं भेंड्या किंवा डम्ब-शराड्स सारखे खेळ खेळायचे....
सगळं सगळं आठवलं... नोकरी लागल्यापासून हळू हळू सगळे मित्र दूर गेले.. गेल्या दहा बारा वर्षांमधे मी दिवाळी साजरी केलीच नाही..:( मात्र गेल्या वर्षी (आणि ह्या वर्षी सुद्धा) पोराला घेऊन मस्त फटाके उडवण्याचा आनंद घेतला.. पण इथे परक्या देशात 'ती' मजा नाहीच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Oct 2011 - 7:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>पेटुन गेलेल्या किंवा फुसक्या निघालेल्या सगळ्या फटाक्यांतली दारु एखाद्या कागदावर गोळाकरुन मग अनेकांचे डोळे 'दिपवणे'

गंपा काय आठवण काढली राव. दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी सकाळीच लोकांच्या दारासमोर फुसके फटाके आम्ही शोधायचो. आम्ही दोघा तिघांनी एका दिवाळीला असेच फुसके फटाके जमा केले. संध्याकाळचा बेत ठरला. ठरल्याप्रमाणे मोठ्यांच्या नजरा चुकवून कागदावर फटाक्यातील दारु ओतली. मी आणि माझा मित्र अजूनही फूसके फटाक्यातील दारु ओतत होतो तेव्हाच एकाने लावली ना भो काडी. असा मोठा जाळ झाला. आमचे दोघांचे डोळे दिपलेच. डोळ्यासमोरचा अंधार संपून थोडे थोडे दिसायला लागल्यावर पाहतो तर एकही जाग्यावर नाही सर्व पसार. मी आणि माझ्या मित्रानं हाताचे अंगठे भाजून घेतले. तात्पूर्ता उपाय म्हणून मीठपाणी एकत्र करुन लावल्याचे आठवते. च्यायला, काय काय प्रताप करुन ठेवल्याचे आठवले. धन्स रे गणपा.

माझे वडीलही फटाके वाजवायचे शौकीन. अनार हातात धरुन उडवायच्या नादात एक अनार त्यांच्या हातातच फूटला होता. किरकोळ जखम झाली होती. मात्र धसका कायम आहे. आता फटाके फोडायला लागल्यावर. दूर व्हा. वात शिलून घ्या. मोठ्या आवाजाचे फटाके आणू नका. अशा सुचना दर दिवाळीला असतात. अर्थात सुचना चांगल्याच असतात यात काही वाद नाही. आता फॅन्सी फटाके उडवत असलो तरी वडील मला हळू आवाजात आजही तीच सुचना देतात आणि आता तीच सुचना मी माझ्या लेकरांना देतो.

-दिलीप बिरुटे

मोहनराव's picture

20 Oct 2011 - 8:17 pm | मोहनराव

आम्ही पण हे सगळे उद्योग करत असु. माझ्या दादाचा हातखंडा मोठा असायचा यामधे. पण एकदा काय झाले आम्ही सगळे टीव्हीवर दिवाळीचे कार्यक्रम बघत बसलो होतो आणी दादा गॅलरीमध्ये जमवलेल्या फटाकाच्या दारुचा उद्योग करत बसला होता.. दारुच्या ढिगाला त्याने वात लावली आणि पेटवले पण ते काही पेटत नव्हते..मग तो तोंड जवळ नेत बघु लागला..तोपर्यंत दारुने एकदम पेट घेतला.. आणि तो पळत हॉलमधे आला तेव्हा त्याचा चेहरा पुर्ण दारुने चमकत होता. पुर्ण निग्रो दिसु लागला होता..त्याला भाजले नव्हते पण श्वास घेता येत नव्हता...त्या ध्यानामधे तो जोरात ओरडु लागला.. ते पाहुन आम्हाला हसावे कि रडावे तेच कळत नव्हते..पण डॉक्टरकडे नेल्यावर जरा बरे वाटु लागले त्याला.. वडिलांचा मार बसला तो वेगळाच!! त्यानंतर तसले उद्योग बंद करुन टाकले..
शाळेतपण दिवाळीच्या सुट्टीनंतर कोणाचा हात कोणाचा पाय भाजलेली पोरं दरवर्षी दिसायचीच!!

दिवाळी साजरी करा पण जरा जपुन.. दिपावलीच्या सर्वांना शुभेछ्छा!!

वपाडाव's picture

21 Oct 2011 - 10:32 am | वपाडाव

अशाच एका प्रक्रियेत एकदा आम्ही काही जणांनी दारु गोळा करुन आणली....
आणी शांततेत तिला जाळ लावला...
तेवढ्यात एका कार्यकर्त्याच्या पायाला मुंगळा चावला त्याने मान खाली वाकवली....
अन त्याचे केस तांबुस-तपकिरी-सोनेरी अन काय काय नि काय काय....
अन तो केस जळाल्याचा वास येउन बाकीचे आम्ही बेशुद्ध.....

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Oct 2011 - 4:30 pm | बिपिन कार्यकर्ते

वा!

हा प्रतिसाद शंकरपाळे खात खात देत आहे! :)

पैसा's picture

20 Oct 2011 - 6:36 pm | पैसा

मला शिल्लक ठेव!

बापरे! मी फुलबाज्या किंवा भूईनळे यांच्याशिवाय काही दारूकाम करत नसे.;) एकदा काका काकूकडे दिवाळीत जायचे ठरले होते. त्यांच्याकडे नवीन कुत्रा पाळला होता. आम्ही पहाटे पोहोचल्या पोहोचल्या काकूनं मोठ्यासाठी चहा तर मुलांसाठी दूध दिले. बशीत ओतून पिताना बाहेर फटाका वाजला की श्वानमहाराज भूंकत असत आणि दचकून थोडं थोडं दूध बशीतून सांडत असे. आणि हे सगळं तालासुरात चाललं होतं. ते पाहून सगळेजण हसायला लागले होते.
याशिवाय काही गंमत नाही बुवा आठवत.

किसन शिंदे's picture

20 Oct 2011 - 6:30 pm | किसन शिंदे

दिवाळीशी निगडीत लहानपणाच्या बर्‍याचश्या आठवणी आहेत. :) दिवाळी सुरू होण्याच्या आसपास मला आणी मोठ्या भावाला टिकल्या वाजवण्यासाठी एक एक बंदुक मिळत असे, त्या घेऊन मित्रमंडळीसोबत दुपारच्या वेळी आमचा चोर-पोलीसाचा खेळ जोरात रंगायचा. ट्रक किंवा तसल्याच मोठ्या वाहनासाठी लागणारे मोठे मोठे नट बोल्ट आम्ही गोळा करायचो आणी या नटामध्ये दोन बोल्टच्या मध्ये टिकली ठेऊन त्याचा उपयोग ग्रेनेड बाँम्ब म्हणून करत असू. दाताने क्लिप काढायची अ‍ॅक्शन करत तो ग्रेनेड चोरावर फेकायचा कि लागलीच ते दोन नट एकमेकांवर आपटून ती टिकली फुटत असे आणी आम्हालाही बाँम्ब फोडल्याचा आंनद मिळत असे. :)

अशाच एका दिवाळीला केलेला उद्योग चांगलाच अंगाशी आला. मित्र मिळून एकत्रितपणे सुतळी बॉंम्ब फोडायचा कार्यक्रम सुरू होता. तिथे न फुटलेला सुतळी बाँम्ब मित्राला "ऐ ऐ ऐ उल्हासनगरचा माल, उल्हासनगरचा माल" ;) असे चिडवत तिथुन उचलून सरळ घरी आणला आणी दाराजवळ असलेल्या दिव्यावर त्याला उपडा करून डोळे दिपवण्याचं काम चालु केलं त्याच वेळेला त्या अचानक झालेल्या जाळाने हातात धरलेला सुतळी बॉम्ब मोठ्याने ठोssss!! करून हातातच फुटला आणी जे काय हाताची आग व्हायला लागली कि ज्याचं नाव तेच..! डोळ्यातुन घळाघळा अश्रु वाहू लागलेले!! मग तसाच भाजलेला हात घेऊन घरात शिरल्यावर आईबरोबर बहिणीचाही जोरदार ओरडा मिळाला.

या आमच्या गेल्या दिवाळीच्या काही आठवणी...

दमदार प्रतिसाद रे किसना.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Oct 2011 - 7:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त रे किसना.

चला मिपावर दमदार दिवाळी सुरु झाली. मस्त किस्से.

अवांतर : सहजराव, दिवाळीचे किस्से सांगा बरं काही तरी !!!!

-दिलीप बिरुटे

गेल्या वर्षी फराळाचे बाकीचे पदार्थ करून झाल्यावर मी सगळ्यात शेवट बेसन लाडू करूया म्हणून बेसन भाजायला ठेवलं. एकीकडे मिसळपाववर काहीतरी टैमपास करत होते बहुतेक, कारण बेसन भाजल्याचा वास आला म्हणून घाईघाईने गॅस बंद केला आणि ते थंड होताहोता पिठीसाखर घातली, एक लाडू वळताना लक्षात आलं, हरे राम बेसन कच्चं राहिलं होतं. मग मी आणखी एक गोंधळ केला, मिश्रण परत गॅसवर ठेवलं. बर्‍यापैकी भाजलं, पण आता त्यातल्या पिठीसाखरेने सूड घ्यायचा ठरवला. साखरेचा बहुधा पक्का पाक झाला.

पुढे काय झालं ते कोणाला सांगायला नकोच. कसेतरी २/४ लाडू केले. ते खटखट्या लाडूंपेक्षा घट्ट्मुट्ट तब्ब्येतीचे झाले. उरलेलं रासायनिक मिश्रण कढईसकट फ्रीजमधे ठेवून दिलं, आणि नवर्‍याला यातलं काही न सांगता बाजारात जाऊन पुरोहितकडचे लाडू आणले.

बेसनलाडूंबद्दल खरं तर असं म्हणतात की "ज्याला दात कमी त्याला बेसन लाडू नामी." पण दिवाळीच्या दिवशी मी केलेले लाडू खाताना दात गळून पडतात की काय असं वाटायला लागलं. शेवटच्या अध्यायात कढईला चिकटलेलं रसायन निघायचं नाव काढीना. आमची मोलकरीण ८ दिवस त्या कढईकडे काणाडोळा करत होती. आता कढईचा बळी जातो की काय अशी परिस्थिती उद्भवली. पण चिकाटीने रोज थोडी थोडी घासून ती कढई मी कशीबशी रिकव्हर केली.

यंदा पक्क्या पाकाचे लाडू करणार आहे, येताय ना सगळे?

दिवाळीचा नाही पण लाडवांशी संबंधीत आहे म्हणुन हा एक किस्सा.
लहान पणी गोरेगावच्या चाळवजा ईमारतीत रहात होतो. संक्रांतीचे दिवस होते. आमच्या समोरच्या कुळकर्णी काकुंनी तीळाचे लाडू केले होते. त्यांनी कुठेली शिक्रेट रेशीपी वापरली माहित नाही. रीती-भाती नुसार सगळ्यांच्या घरचे लाडू जमा झाले होते.
एके संध्याकळी कुळकर्णी काकांच्या घरातुन ठोका ठोकीचे आवाज येत होते. चाळच ती अडीनडीला लोकं तेव्हा धावुन जायची. कसल काम काढल म्हणुन सहज काकांच्या घरात डोकावुन पाहिलं. काका हातात हातोडी घेउन काकूंनी केलेल्या लाडवावर नेम धरत होते. तो लाडू पण कसला बिलंदर हातोडी पडली की निसटुन समोरच्या भिंतीवर आपटुन परत काकांकडे रीबाउंड व्हायचा. =))

आमच गुडलक बलवत्तर होत बहुतेक की त्या प्रसंगा पुर्वी त्यांनी दिलेले लाडू आमच्या घरात कुणीच तोंडी लावले नव्हते. 'सबसे तेज' वाहिनी सारख धावत जाऊन घरी झाल्या प्रसंगाच घरी रिपोर्टींग दिल. आणि बाबांचा दंतवैद्याचा खर्च वाचवला.

वपाडाव's picture

21 Oct 2011 - 10:46 am | वपाडाव

म्हणुन सहज काकांच्या घरात डोकावुन पाहिलं.

कळालं का बिरुटे सहेब 'सहज'काका दिवाळीचे किस्से का नाही सांगत आहेत ते???

त्या लाडवात कँलरीच प्रमाण किती असेल पैसातै ;)

शंकरपाळ्या करंज्या हे माझे फेवरीट पदार्थ आहेत

चित्रा's picture

21 Oct 2011 - 12:50 am | चित्रा

आठवणी आवडत आहेत.

दिवाळीची तयारी उद्या ऑफिशियली सुरु करेन असे म्हणते आहे.

वर पैसाताईनी आठवण सांगितली आहेत त्याच्याशी जुळणारी आठवण म्हणजे, माझ्या जाऊबाईंनी एका दिवाळीला नवीन नॉनस्टीक कढई हौसेनं विकत आणली (त्यावेळी बाजारात तो नवीन प्रकार आला होता). त्यावेळप्रमाणे ३०० रूपये म्हणजे जास्त किमतीला आणली होती. कामाच्या बाईनं काम संपल्यावर वहिनींना सांगितलं की आज दिवाळीची लई भांडी होती. ती कढई तर लई कळकट झाल्याली, आज थोडी निघालिये, उद्या बाकीची स्वच्छ करते. गडबडीनं जाऊन बघितलं तर बाईनं ती जळकट समजून जोरजोरात घासलेली आणि एका बाजूनं नॉनस्टीक थर निघालेला.
तसंच एका मैत्रिणीनं बरेच वर्षापूर्वी दिवाळीला वॉशिंग मशीन घ्यायचं ठरवलं तर तिच्या कामाच्या बाईनं अट सांगितली की अमूक एका कंपनीचं घ्या, नाहीतर कामाला येणार नाही.;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

21 Oct 2011 - 2:01 am | निनाद मुक्काम प...

दिवाळी म्हटले की की आठवते .दिवाळी पहाट.
नरकचतुर्दशीला पहाटे डोंबिवली मधील फडके रोड वर जत्रा भरली असते.
माझी दिवाळीची आठवण इथलीच आहे.
ग्रामदेवतेच्या भव्य मंदिरातून देवांचे दर्शन घेऊन रस्त्यावर घोळका करून हिंडणे हा आवडता उद्योग.
दहावी नंतर मुंबईत आलो . आणी डोंबिवालीशी संपर्क साफ सुटला. आणी ३ वर्षात मुंबईने मला पार बदलुने टाकले. मराठी भाषा आणी संस्कृती माझ्याभोवती दुर्मिळ झाली होती.

मग चौथ्या वर्षी मनाचा हिय्या करून डोंबिवलीत गेलो.
गेल्या ३ वषात गर्दी वाढली होती .माझ्यासाठी अनेक अनोळखी चेहरे होते. मी माझ्यात जन्म भूमीत परक्या सारखा फिरत होतो. (मनात शान चे तनहा दिल ,तनहा सफर गाण्याच्या ओळी रुंजी घालायला लागल्या होत्या.)
अचानक गर्दीतून खांद्यावर हात पडला.
शाळेतील मित्र अवचित भेटल्याने अवर्णनीय आनंद झाला.त्याने मला गर्दीतून वाट काढत एका घोळक्यात नेले .आणी माझ्या वर्गातील आमचा कंपू पाहून मला जो आनंद झाला ..........
मग थोडक्यात कोण काय करतो ह्याची उकल झाली आणी मग ''अरे ती ...... वर्गातील ,साडीत काय ....
कुठे आहे ? अरे देवळात शिरतांना पहिले.
मग वर्ग मैत्रिणींना भेटण्याचा सोहळा पार पडला.
त्या दिवसापासून आजतागायत आमच्या वर्गातील ३२ व आमच्या इतर वर्गातील किमान २० जण आम्ही संपर्कात आहोत.
ओर्कुट वर आमच्या वर्गाची कम्युनिटी आहे .( आता सगळे चेपुवर आले आहेत आणी जवळ जवळ सर्व वर्ग चेपुवर आहे.)
ज्याला जमते तो फडके रोड वर दिवाळी ला नक्की जातो ( मग इतरांजी जळवतो)
आता गुगल + वर आमच्या( १० अ १९९६ ) च्या वर्गाचे इ - स्नेह संमेलन ह्याच दिवशी करण्याचा घाट घालत आहोत.( ह्या आधी सुद्धा शाळेत त्याच वर्षी आम्ही संपूर्ण वर्गाचे संमेलन केले होते.)
दिवाळीचा तो दिवस आणी ती दिवाळी माझ्यासाठी अस्मरणीय होती.

ह भ प's picture

5 Nov 2013 - 9:22 pm | ह भ प

अगदी असंच फीलिंग असतं आजकाल कुरणेश्वराच्या मंदिरात गेलं की.. कॉलेजात असताना जेव्हा पहिली आंघोळ झाली की जायचो तेव्हा बोगद्यापासूनच मित्र भेटायला लागायचे.. आताशा फक्त रस्ता अन देव ओळखीचा राहिला आहे.. आता नजर ओळखीचे चेहेरे शोधत असते..त्यातपण आमच्या सारखे भुलेबिसरे दिसतातच दिसतात.. ओळखी पटतात.. एक खूप जुना मित्र भेटल्याचं समाधान चेहर्‍यावरून ओसंडत असतं.. यंदातर जाताही नाही आलं.. :(

शाहिर's picture

21 Oct 2011 - 9:40 am | शाहिर

आमचा छोटे शहर असल्याने दगड - माती भरपूर असते...
त्यामुळे छान छान किल्ले तयार करायचो ..त्यावर हळीव, मेथि, धने पेरून जंगल बनवायचो..

आमच्या शाळेने किल्ले बनवा स्पर्धा ठेवली .. वेगळे कहीतरी करयचे म्हणुन आम्ही "बुरूज आणि तट्बंदी " करायची ठरवली..
त्या साठी अर्धवर्तुळाकार कौले हवी होती...
शोधता शोधता ती शाळेवरच मिळाली... मग मी आणली... मी आणली म्हणून पक्याने ..संत्याने ...अशी आमची शाळा भुंडी झाली..

सुट्टीमधे शाळेची कौले चोरीला गेली असा बोभाटा झाला..
पण बच्चे कंपनीला याचा पत्ताच नव्हता...
मुख्याध्यापक आणि एक गुरुजी जेव्हा परीक्षणासाठी घरी आले तेव्हा त्यांना कौलांचा पत्ता लागला..

पुढे काय ...नुसते बार् !!!!!!

फोटो : आंतर जाला वरून साभार

किसन शिंदे's picture

21 Oct 2011 - 10:13 am | किसन शिंदे

दिवाळी म्हटलं कि नविन कपडे, फटाके, दिव्यांची आरास, रांगोळ्या, गोड फराळ या सर्वांसोबत आणखी एक गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे मातीचा किल्ला!! लहानपणापासून दिवाळीच्या दरम्यान आजुबाजूला बरेच मातीचे किल्ले मावळे न वापरता लष्करातील सोल्जरच्या सहाय्याने सजवलेले पाहिलेत. पण तेव्हापासून ते आजतागयत मला नेहमी प्रश्न पडतो तो म्हणजे दिवाळीला मातीचे किल्ले बनवण्याची प्रथा केव्हापासून आणी कशी सुरू झाली असावी??

मिपावरील जुनी-जाणती मंडळी यावर अधिक प्रकाश टाकतील काय??

फार पुरातन काळातली गोष्ट आहे. दिवाळीचे दिवस होते. यशोदामाता दिवाळसणाचे पदार्थ बनवत होती. किसनदेवांनी तेव्हा एके दिवशी लोणी चोरले. यशोदेने त्याला एका खोलीत कोंडले व त्या खोलीला कुलूप लावले व ती कामाला गेली.

नंतर किसनदेवाने खिडकीतून चोरून पेंद्या वैगेरेंना आवाज दिला व ओरडले की, 'अरे ए पेंद्या अरे कि ला' , 'अरे ए पेंद्या अरे कि ला', 'अरे ए पेंद्या अरे कि ला', 'अरे भाग, कि ला'. पण बाकीची पोरे त्या आरोळीने हरकली. आधीच दिवाळीच्या सुट्या अन त्यात किसनदेव कि ला कि ला ओरडतो. झाले. सगळी पोरे एकत्र आली व त्यांनी किसनाच्या घराच्या अंगणात एक किल्ला बनविला. तिकडे किसनदेवाने डोक्याला हात लावला. नंतर बाहेर आल्यानंतर त्याने त्या किल्याचे उद्घाटन यथोचित केले. पण तेव्हापासून दिवाळीच्या सुट्यांत किल्ला बनवणे जे चालू झाले ते आजतागायत.

चला आता झोपायची तयारी करा बरं मुलांनो.

किसन शिंदे's picture

21 Oct 2011 - 10:11 am | किसन शिंदे

प्र.का.टा.आ

मोहनराव's picture

21 Oct 2011 - 5:53 pm | मोहनराव

लहानपणी गावाकडे असताना आमच्या गल्लीत आम्ही एकत्र मोठा किल्ला करायचो. सगळे मिळुन सैन्य आणी बाकी लागणारा माल विकत आणायचो. एका वर्षी आम्ही एक मस्त देखणी शिवाजी महाराजांची मुर्ती आणली होती. लगतच्या गल्लीच्या पोरांची नजर पडली त्यावर!! आणी एका दुपारी त्यांनी तो पळवला!! नंतर आम्हाला कळाल्यावर शेजारच्या गल्लीच्या पोरांवर आपसुकच डाउट घेतला गेला. हे आमच्या घरच्यांना कळाल्यावर सगळे आमच्यावरच ओरडु लागले. बस्स मग मावळे खवळुन शेजारच्या गल्लीच्या पोरांवर हल्ला पुकारला व शिवाजी महाराजांना परत किल्यावर स्थानापन्न केले. त्यानंतर मातीच्या मावळांबरोबर आमचे काही मावळे पहारा द्यायला असायचे. ;)

विजुभाऊ's picture

21 Oct 2011 - 5:06 pm | विजुभाऊ

दिवाळीच्या शेवटच्या दिवशी किल्ल्यातील भुयारात लावण्यासाठी म्हणून सुतळी अ‍ॅटमबाँब शिल्लक ठेवायचो.
गल्लीतील सर्व मुले एकत्र येवून प्रत्येकाकडे किल्ल्याचे पाडकाम उत्साहाने करायचो

आत्मशून्य's picture

21 Oct 2011 - 6:21 pm | आत्मशून्य

पूर्वीच्याकाळी पितळ्याची बॉलपेन्स मिळायची तीचा वापर बंदूकीची नळी व सायकलच्या चेनची एक कडी, व स्प्रिंग याचा वापर त्याच्या खटक्यासाठीकरून (मूलांची) छर्‍यांची गावठी बंदूक तयार करायचो (आजही करता येते). फटाक्यांतील दारू नळीत अत्यंत ठासून भरायची त्यावरती छर्रा ठासायचा... आणी बास खटका सोढला भ्ट्ट असा अवाज करून सूसाट वेगाने छर्रा ४-६ फूटावरील लक्षाच्या आरपार व्हायचा आणी बंदूक चटका बसेल इतकावेळ गरम रहायची. पून्हा ३-४ मिनटे नवीन गोळी भरायला व शिकार हूडकायला... वरती आपणच जखमी केलेल्या चिमणीला पून्हा दया दाखवून पाणी पाजायचे.... व भूतदयेचा आव आणायचा.. शौर्य शौर्य म्हणतात ते हेच समजायचो... मलाच लांब पल्याची बंदूक तयार करता यायची म्हणून फार भाव मारायचो, स्वतःला न्यूटन समजायचो.... सगळाच गाढवपणा....

बाकी किल्ला तोडणे वगैरे मज्या असायची. लाल मातीच्या मोठ्या व खर्‍याखूर्‍या पैलवान लोकांत वात पेटवलेला लक्ष्मी बॉम्ब हाताच्या मूठीत दाबून धरून त्यातच फोडायची जी मस्ती चालायची ती फार कूतूहूल व विस्मयचकीत नजरेने बघत रहायचो.... व हे कधीतरी मलाही जमेल अशी अशा वाटत रहायची... गेले ते दीवस राहील्या त्या आठवणी :)

आम्ही केलेला किल्ला तोडताना त्याच्या आत सापाने कात टाकलेली दिसली. त्यादिवसापासून मी किल्ला करणे बंद केले. तसेही मला काही जमायचे नाही. उगीच मोहरी नाहीतर अळीव पेरत बसायचे.

स्मिता.'s picture

21 Oct 2011 - 7:15 pm | स्मिता.

सगळ्यांची दिवाळीची तयारी आणि गमतीदार किस्से वाचून छान वाटत आहे.
मीसुद्धा आजाच सगळा किराणा करून आणलाय आणि या विकांतात फराळ बनवणार आहे. प्रिया ब यांनी दिलेला आकाशकंदिलही बनवायला घेतलाय.

दिवाळीचे वेध लागल्यापासून माझ्या मनात हुरहूर चालू आहे. पहिल्यांदाच परदेशात, घरच्यांपासून दूर दिवाळी करणार आहे. त्यामुळे रोजच दिवाळीच्या आठवणी मनात रुंजी घालत आहेत.

दिवाळीची खरेदी म्हणजे बारिकसारीक पण भरपूर गोष्टी. नवीन कपडे, फटाके, पणत्या, रांगोळीचे वेगवेगळे रंग, मेंदी अश्या कितीतरी गोष्टींची तयारी व्हायची. मी लहान होते तेव्हा आई, आजी फराळ बनवत असताना आणि आई रांगोळी काढत असताना तिच्या हाताखाली लुडबूड करायचे. नंतर मी जरा मोठी झाल्यावर रांगोळीचं खातं माझ्याकडे आलं. दिवाळीच्या दिवसात रोज कोणती रांगोळी काढायची हे ठरवणं, त्यातली रंगसंगती ठरवणं आणि भावाला माझ्या रांगोळीजवळ फिरकू न देणं, हे करता करताच संध्याकाळ व्हायची. मग घाईघाईत आवरून देवासमोर दिवा आणि अंगणात पणत्या लावायच्या.

रात्री पुजा झाली की माझ्या आणि भावाच्या फटाक्यांची वाटणी व्हायची. मग त्या दिवसाचा वाटा संपेपर्यंत आम्ही धूम फटाके फोडायचो. तेव्हाचे फटाके म्हणजे अनार, चक्र, फुलबाज्या, टॉर्च, अग्निबाण, सुटे लवंगी फटाके, त्यांच्या लळी आणि सुतळी बॉम्ब.

एकदा मी एका खोक्यात काही सुटे लवंगी फटाके घेवून अगरबत्तीवर पेटवून घराच्या दारासमोर फेकून फोडत होते. एक फटाका फेकायच्या आधीच हातात फुटला आणि तो माझ्या हातातून खाली खोक्यात पडला. त्याने खोक्यातले बरेच फटाके पेटले आणि ते दारासमोरच असल्याने बरेच घरात उडून गेले. घरात सगळ्या फटाक्यांची एक टोपली होती. पण त्यातले सगळे फटाके खोक्यांमध्ये असल्याने घरात आतिष्बाजी व्हायची राहिली.

माझा लहान भाऊ ३ वर्षांचा असताना आमच्या नकळत दोन्ही हातात १-१ सुतळी बॉम्ब घेवून समोरच्या काकांच्या अंगणातल्या पणतीवर पेटवत होता. तेव्हा नशीब की त्या काकांचं वेळेवर लक्ष गेलं आणि त्यांनी त्याच्याकडून ते बॉम्ब काढून घेतलेत.

आठवणी तर भरपूर आहेत. आणखी आठवतील तशी भर घालत जाईन.

विवेक वि's picture

22 Oct 2011 - 1:12 pm | विवेक वि

नवीन विभागासाठी शुभेच्छा!!!

मस्त मस्त अनुभव वाचायला मिळोत.

पैसा's picture

23 Oct 2011 - 7:50 pm | पैसा

ऐन दिवाळीच्या तोंडावर कामवाल्या म्याडम कालपासून गायब झाल्या आहेत. :( बहुतेक दिवाळी करूनच येणार. त्यामुळे मी अजून काहीच केलं नाही. उद्या परवा हापिसला दांडी मारून काही फराळाचं करायला जमतय का पहाते.

रेवती's picture

26 Oct 2011 - 5:59 am | रेवती

काय गं, आली का बाई?
उद्यापर्यंत आली नाही म्हणजे आता दिवाळी झाल्यावरच!
आणि फराळाचं आण विकत, एकटी किती करणार?
तसेही लाडू तुम्हाला पुरोहितचे आवडतात ना?;)
तुझी कढईही घाबरून थरथर कापतिये.;)

पैसा's picture

26 Oct 2011 - 6:59 am | पैसा

आली आली!! यावेळेला मी बेसनाचे लाडू यशस्वीरीत्या केलेत, सोबत शंकरपाळे. बाकी विकतचं आणण्यापेक्षा गोव्याच्या पद्धतीचं, म्हणजे पोह्यांचे २/३ प्रकार करणार आता, अंबाड्याचं सासव (रायतं एक प्रकारचं). बस. मुख्य खाणारा मेंबर माझा मुलगा काश्मिरला गेलाय, आणि आम्हीही थोड्या वेळाने सांगलीला जायला निघतोय, त्यामुळे एवढंच!

सर्वाना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा!

प्रीत-मोहर's picture

25 Oct 2011 - 5:26 pm | प्रीत-मोहर

आमच्या प्रतिक्रिया अजुन दोन दिवसांनी.. नरकासुर दहन आणी पोहे खाउन झाल्यावर ;)

साबु's picture

25 Oct 2011 - 6:02 pm | साबु

लहान असताना.. सुतळी/चौकोनी वाजवायची खुप हौस.. पण आवाज सहन नाहि व्हायचा..मग वात पेटवुन उदबत्ती धरलेल्या हातानेच कान झाकायचो... आणि नवीन शर्टाला भोक पडायची उद्बत्तीने...
:)

हे उगा आपलं धागा वर काढायला. सविस्तर प्रतिसाद नंतर लिहूच !!