पत्तेबाज..

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
22 Sep 2011 - 8:39 pm
गाभा: 

खरे तर पत्ते खेळला नसेल असा एखादाच माणुस असेल..लहान पणी उन्हाळ्याची सुटी लागल्यावर पत्यांचा डाव कायम पडायचा.
पण पत्त्यांचा नाद असणे हि काहि वेळा फार काळजीची बाब हि ठरु शकते.
कष्टकरी ..कामगार..मध्यम वा उच्चभ्रु सा~या वर्गात रमी व ३ पत्ति खेळ लोकप्रिय आहे...व ब~याच वेळा हा खेळ नुसता वा पैसे लावुन खेळला जातो.
पत्ते खेळणा~यांचे ग्रुप असतात..
मी ज्या वेळी डेक्कन ने पुणे मुंबई करीत असे त्या वेळी असाच एक ग्रुप होता..गाडी सुरु खाली कि ते व्ही.टी येईपर्यंत रमी खेळत असत.. व्ही टी वर देखिल गाडी थांबली तरी डाव संपल्यावर ते बाहेर येत असत..
आमचा एक मित्र व त्याचा पत्तेबाज ग्रुप होता..डाव रंगला कि जेवण खाण तिथेच..रात्र रात्र डाव चालायचे..
पत्यांच्या नादापायी करीयर उद्ध्व्स्त झालेली माणसे पण आपण पाहिलि असतिलच
उच्चभ्रु वर्गात क्लब मधे पत्ते खेळण्याचा नाद बरेच महिलाना पण असतो..त्यांचे हि रमी ग्रुप असतात..
क्लब मधे जवुन पैसे लावुन जुगार खेळणारी अनेक महाभाग आहेत..
सिनेमा बनवणा~यांना पत्यांचा मोह सुटला नाहि..
तकदिर से बिगडी हुई तकदीर बना ले..हे गाणे कोण विसरेल?
देवानंदने तर गॅंबलर नावाचा जुगा~याच्या जिवनावर सिनेमाच काढला होता....
आजहि बैठ्या खेळात पत्ते खेळणारा फार मोठा वर्ग आहे..
मुंबईच्या लोकल मधे हे दृष्य कायमच बघायला मिळते...
माणसाच्या आत कुठेतरी नशिब.जिंकणे जोखिम घेणे अश्या सुप्त भावना वसत असतात..पत्ते खेळुन मनोरंजना बरोबर त्याचा ही निचरा होत असेल..कदाचित

प्रतिक्रिया

प्रास's picture

22 Sep 2011 - 9:02 pm | प्रास

माणसाच्या आत कुठेतरी नशिब.जिंकणे जोखिम घेणे अश्या सुप्त भावना वसत असतात..पत्ते खेळुन मनोरंजना बरोबर त्याचा ही निचरा होत असेल..

असेल असेल नक्की असेल.....

पण पत्ते खेळलो असलो तरी मला तो खेळ मनापासून आवडत नसल्याने याउपर अधिक काही सांगता येणार नाही.

आत्मशून्य's picture

22 Sep 2011 - 9:12 pm | आत्मशून्य

माणसाच्या आत कुठेतरी नशिब.जिंकणे जोखिम घेणे अश्या सुप्त भावना वसत असतात..पत्ते खेळुन मनोरंजना बरोबर त्याचा ही निचरा होत असेल..कदाचित

होयं..... थोडफार तसच आहे.

रामदास's picture

22 Sep 2011 - 9:47 pm | रामदास

दुनीया से जीते और तुमसे हारे

या ओळीची आठवण करून दिल्याबद्दल आभारी आहे

घरची श्रीमंती असल्यामुळे पोटापाण्यासाठी कसलाही उद्योग न करता दिवसाला बारा तास पत्ते खेळत बसणारे महाभाग मुंबईमध्ये दादर क्लबमध्ये अनेक वर्षे पाहीले आहेत. ते पैसे लावून पत्यांचा जुगारच खेळत असत. अशा माणसांची मलातरी किळस येत असे. लहान असताना म्हणजे शाळा संपेपर्यंत, लॅडीस किंवा बिझिक नाहीतर झब्बू असे पत्यांचे खेळ खेळत असू. पण तासचे तास रमी किंवा तीन पानी खेळणारे वीर निर्बुद्ध आणि निरुद्योगीच असतात. डेक्कन क्वीनमध्ये असा पत्ते खेळणारा कंपू वार्‍यासाठी खिडकी उघडल्यावर पत्ते उडतात म्हणून मारामारी करू पहाण्याइतका हिंसक झालेलादेखील पाहीला आहे. असो....

खुसपट ( राव )

पिवळा डांबिस's picture

22 Sep 2011 - 11:13 pm | पिवळा डांबिस

मला वाटतं की इथे लेखकाने पत्ते खेळणे आणि पैजा लावणे या दोन गोष्टींची गल्लत केली आहे.
पत्ते हे एक करमणूक करण्याचे साधन आहे. जसं ल्यूडो, सापशिडी ही साधने आहेत. ते खेळण्यात चांगलं/ वाईट असं काहीही नाही.
पैजेला पैसे लावण्याबद्दल (सट्टा) म्हणायचं झालं तर ते करण्यासाठी पत्त्यांचीच गरज असते असं नाही. पैज कशावरही लावली जाऊ शकते..
कुठला घोडा जिंकेल यावर...
निवडणुकीत कुठला उमेदवार/ पक्ष जिंकेल यावर....
क्रिकेटवर....
समोरून येणार्‍या मोटारीच नंबर/ मॉडेल काय असेल यावर....
कुठला आकडा फुटेल यावर...
शेयरबाजारात...
महाराष्ट्र राज्य लॉटरीवर...
इत्यादि इत्यादि...
किंबहुना ल्यूडो/ सापशिडीचा डाव कोण जिंकणार यावरही पैजा लावल्या जाऊ शकतात!!!
:)

ज्यांना जिंकायची एक्साईटमेंट हवी असते ते मुख्यत्वे लोकं पैजा लावतात. हां, खिशात पैसे असणं ही एक बारिकशी अटही असते!! ;)
माझ्या मते ज्यांना पैजा माराव्याश्या वाटतात त्यांनी माराव्यात. ज्यांना पैजा माराव्याश्या वाटत नाहीत त्यांनी मारू नयेत. पण त्यात चूक/ बरोबर, नैतिक/ अनैतिक, योग्य/ अयोग्य असं काही नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Sep 2011 - 12:09 am | अत्रुप्त आत्मा

@---माझ्या मते ज्यांना पैजा माराव्याश्या वाटतात त्यांनी माराव्यात. ज्यांना पैजा माराव्याश्या वाटत नाहीत त्यांनी मारू नयेत. पण त्यात चूक/ बरोबर, नैतिक/ अनैतिक, योग्य/ अयोग्य असं काही नाही.... हेच म्हणतो...+ १०१ सहमत

राजेश घासकडवी's picture

23 Sep 2011 - 6:30 am | राजेश घासकडवी

माझ्या मते ज्यांना पैजा माराव्याश्या वाटतात त्यांनी माराव्यात. ज्यांना पैजा माराव्याश्या वाटत नाहीत त्यांनी मारू नयेत. पण त्यात चूक/ बरोबर, नैतिक/ अनैतिक, योग्य/ अयोग्य असं काही नाही.

१००% पटलं. मात्र अशा पैजा मारण्याची हौस असलेल्या लोकांनी भरलेल्या स्टॉक मार्केटात आपले पैसे गुंतवावे का हेही ठरवावं...

जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर परी आम्ही राजे

(डांबिसकाका, तुम्ही मला एकदा सहमत झालात, मी तुम्हाला झालो. वी आर इव्हन नाऊ. आता नवीन डाव.)

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2011 - 11:18 am | पिवळा डांबिस

मात्र अशा पैजा मारण्याची हौस असलेल्या लोकांनी भरलेल्या स्टॉक मार्केटात आपले पैसे गुंतवावे का हेही ठरवावं...
हे सुद्धा ज्याचं त्याने ठरवायचं! मात्र त्यात चूक/ बरोबर, नैतिक/ अनैतिक, योग्य/ अयोग्य असं काही नाही.
आमच्याबद्दल विचाराल तर आम्ही गेली २२ वर्षे ती गुंतवणूक करत आलेलो आहोत. लॉन्ग टर्म आणि ट्रेडिंग दोन्ही!!!
:)

डांबिसकाका, तुम्ही मला एकदा सहमत झालात, मी तुम्हाला झालो. वी आर इव्हन नाऊ. आता नवीन डाव.
यू विश!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
:)

ऋषिकेश's picture

23 Sep 2011 - 9:08 am | ऋषिकेश

मला पत्ते खेळायला आवडतात नव्हे भरपूर आवडतात. बर्‍याचशा पत्त्यांच्या खेळात मी पारंगत असलो-नसलो तरी चुकीचा कमी खेळतो. अजूनही आमच्याकडे नातेवाईक जमले की प्रसंगी चांगले ३-४ कॅट वापरून रात्र रात्र पत्यांचे डाव रंगतात. मला पत्यांची दिक्षा तर माझ्या तमाम आज्यांनी दिली आहे. माझ्या नात्यांतील (सख्ख्या वा अ-सख्ख्या) यच्चयावत आज्या व आजोबा उत्तम पत्ते खेळतात/खेळत असत. कौटुंबिक सहलीत/प्रवासात/पर्यटनस्थळी तर पत्ते हा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक वयोगटाला, मोठ्या संख्येने समावून घेऊन खेळता येणार्‍या मोजक्या खेळांपैकी हा एक खेळ / करमणूकीचे साधन आहे.

वर पिडां म्हणतात त्या प्रमाणे पत्त्यांच्या माध्यमातून खेळला जाणारा जुगार व पत्ते हा खेळ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पत्त्यांचा जुगार व पत्ते या खेळात घोडेस्वारी व रेस वरील बेटिंग, किंवा क्रिकेट व क्रिकेटवरील बेटिंग अश्याच स्वरूपाचा फरक म्हणता येईल.

मी काय म्हंटो: एकदा दोन चार रमीचे डाव टाकाच मग कळेल काय मजा येते ते ;)

पत्ते म्हणा नायतर जुगार.. दोन्ही गोष्टी वाईटच. त्यामुळे मला ह्या गोष्टींची खूप चीड आहे.

- (रागीट) पिंगू

आपल्याला तर बुआ पत्ते, कॅरम खेळायला भरपूर आवडतं. माझी पण या दोन्ही खेळातली गॉड्मदर म्हणजे माझी ग्रॅण्डमदर ;) . उन्हाळ्यात दुपार दुपारभर पत्ते आणि पत्ते झाले की कॅरम. त्यामुळे जुगार बिगाराचं माहिती नाय पण पत्ते आप्ले फेवरिट.

उपास's picture

23 Sep 2011 - 3:13 pm | उपास

पिडा काका म्हणतात तसं जुगार कशावरही खेळला जाउ शकतो.. तॉ लावणार्‍याला एकवेळ दोष ठीक.. पण लहानपणापासून ज्या बावन्न (जोकर धरता चौप्प्न) पानांनी साथ दिली त्यांन दोष का द्या..
ब्रीज आणि त्याला इनहरीट करुन बनवलेली मुमरी माझे अतिशय आवडते खेळ पत्त्यातले.. तीनशे चार आणि मँढीकोट त्यानंतर.. आणि ज्या काळात व्हीडीयो गेम्स आणि टीव्ही नव्हते तेव्हा एकटा गुपचूप पत्त्यांचा डाव लावताना, इतकेच काय बंगला करताना जी मजा असायची ती वेगळीच.. :)

जुगारात पुष्कळ मजा आहे. हरलो किंवा जिंकलो तरी थ्रिल जबरी आहे.

अ‍ॅडिक्टिव्ह पोटेन्शियल असलेल्या जुगारातला मुख्य प्रॉब्लेम एवढाच की जुगारातच हरलेला पैसा परत मिळवायचं साधन म्हणून जुगाराला वापरायला लागलो की आपण खलास होत जातो..

>>अ‍ॅडिक्टिव्ह पोटेन्शियल असलेल्या जुगारातला मुख्य प्रॉब्लेम एवढाच की जुगारातच हरलेला पैसा परत मिळवायचं साधन म्हणून जुगाराला वापरायला लागलो की आपण खलास होत जातो..

सुपर्ब. वेल सेड गवि!