सक्त मजुरी

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
1 Sep 2011 - 10:45 pm
गाभा: 

जन्म ठेप/सक्त मजुरीची जास्तित जास्त शिक्षा १४ वर्षे असते असे ऐकुन आहे..हे खरे आहे का?
जास्तित जास्त किति वर्षे शिक्षा होवु शकते??
अशी जास्तित जास्त वर्षे शिक्षा भोगल्याची उदाहरणे आहेत का>
सक्त मजुरी म्हणजे नेमके काय??
अश्या कैद्याना तुरुंगातच काम दिले जाते का? असेल तर काय स्वरुपाचे??व त्याला मोबदला दिला जातो का? व किति??
नेमके काय काम असते?
जन्म ठेप व सक्त मजुरी यात नेमका फरक काय आहे?
आज महा नगरे व शहरे व जिल्हा यांची स्थिति पाहिली तर शहरातल्या बर्याच भागात घाणीचे साम्राज्य असते..
सक्त मजुरीची शिक्षा झालेल्यांना सरकार सफाइ कामगार म्हणुन वापरु शकते का? का ते मानव अधिकाराचे उल्लंघन होईल??
आज फाशीची शिक्षा रद्द व्हावी म्हणुन बरेच विचार वंत पुढे सरसावले आहेत..व कदाचित फाशीची शिक्षा रद्द हि होवु शकेल..
अश्या परीस्थितित जर जन्म ठेपीची जास्तित जास्त शिक्षा १४ वर्षे असेल तर देश द्रोह..खुन..बलात्कार काहि करा १४ वर्षे शिक्षा भोगा व मोकळे व्हा असे होइल का?

या संबंधि माहिति असण्यार्यांनी खुलासा करावा,, व माहितित भर टाकावि हि विनंति

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

1 Sep 2011 - 11:09 pm | अर्धवटराव

भाऊ,
काय विचार आहे? कोणाला टपकवायला बघताय कि काय?

अर्धवटराव

पहील्यांदा चुकून जन्मठेप अशी धारणा झाली शीर्षक वाचून आणि लेख उघडायच्या आधीच वाटले "लग्ना" वरचा लेख आहे की काय ;)

आशु जोग's picture

2 Sep 2011 - 12:20 am | आशु जोग

>> खुन..बलात्कार काहि करा १४ वर्षे शिक्षा भोगा व मोकळे व्हा असे होइल का?

१४ वर्षे कमी असतात का

स्पंदना's picture

2 Sep 2011 - 6:46 am | स्पंदना

हो कमीच! जो व्हिक्टीम आहे त्याला जन्मातुन उठ्वुन फक्त चौदा वर्ष ?

मृत्युन्जय's picture

2 Sep 2011 - 11:13 am | मृत्युन्जय

खुन..बलात्कार काहि करा १४ वर्षे शिक्षा भोगा व मोकळे व्हा असे होइल का?

बलात्काराला कमाल शिक्षा ७ किंवा १० वर्षे असते. बलात्कारासाठी भारतीय कायद्यात जन्मठेपेची तरतूद नाही.

(माझ्या) उपलब्ध माहितीनुसार तुरुंगातील १४ वर्षे म्हणजे आपली बाहेरील ७ वर्षे.
तुरुंगात दिवस+रात्र मिळून २ दिवस धरले जातात.
माहितगारांनी ब्याटऱ्या चालू कराव्यात.

सुहास झेले's picture

2 Sep 2011 - 1:42 pm | सुहास झेले

परकीय ब्रिटीश साम्राज्यसत्तेविरुद्ध बंड पुकारल्याच्या आरोपावरून श्री. वि. दा. सावरकरांना दोन जन्मठेपींची (२५+२५=५० वर्षांची) शिक्षा दिली होती....

भारतीय दंडविधानाच्या अनुच्छेद क्र. ३०२ आणि १०९ प्रमाणे, ही काळ्यापाण्याची शिक्षा अनुक्रमे १० सप्टेंबर १९१० आणि ३० जानेवारी १९११ सुनावली होती...

स्वानंद वागळे's picture

23 May 2012 - 3:45 pm | स्वानंद वागळे

एका वेळी २-३ जन्माठेपा होवू शकतात आणि होतातच. साधारण बलात्कारी ला बलात्कार + अपहरण + शारीरिक व मानसिक छळ अशी कलमे लागून किमान २ तरी जन्माठेपा लागतात म्हणजेच २८ वर्ष....................

पिवळा डांबिस's picture

23 May 2012 - 10:35 pm | पिवळा डांबिस

सक्त मजुरीची शिक्षा झालेल्यांना सरकार सफाइ कामगार म्हणुन वापरु शकते का? का ते मानव अधिकाराचे उल्लंघन होईल??
अमेरिकेतील दक्षिणेकडच्या काही राज्यांत कैद्यांना हायवे सफाई (गवत काढणे, अडचण येणार्‍या झाडांच्या फांद्या कापणे इत्यादि) कामासाठी नेण्याची पद्धत आहे. त्या वेळेस कैदी मोकळेच असतात, त्यांच्या बेड्या वगैरे काढलेल्या असतात....
कैदी पळून जाण्याची तशी जास्त काळजी नसते कारण त्यांच्यावर नजर ठेवायला लांब पल्ल्यांच्या लोडेड रायफली घेतलेले घोडेस्वार पहारेकरी असतात. कुणी पळून जायचा प्रयत्न केला तर त्याला सरळ गोळी घालायचा त्यांना अधिकार असतो जो ते कारणपरत्वे वापरतातही.
बाकी भारतातही बंगलोरचा विधानसौध हा कैद्यानीच बांधला आहे असे ऐकून आहे. खरेखोटे माहिती नाही.....