भाषाशुद्धी, शुद्धलेखन, मते-मतांतरे वगैरे वगैरे...

ॐकार's picture
ॐकार in काथ्याकूट
28 May 2008 - 2:37 pm
गाभा: 

शुद्धलेखन, भाषाशुद्धी इ. इ. संदर्भात मिसळपाव वर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा लक्षात घेता बरीचशी मते पूर्वग्रहदूषित आहेत हे मला जाणवते. एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून खालील काही प्रश्न्नांची उत्तरे स्वतःशी पडताळून पहावीत.
१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का?
२) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का?
३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का?
४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का?
५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का?
६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? )
७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय?
८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का?
९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का?
१०) तुम्ही काल घरी फोन केला होता का?
११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का?
१२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ'

उपहासात्मक प्रश्नांची सरबत्ती करायची झाल्यास अनेक प्रश्न आहेत. वव्यवहार म्हटल्यास कमी प्रश्न आहेत. कळीचा मुद्दा हा की तुम्ही मांडलेल्या मतांशी तुम्ही कितपत प्रामाणिक आहात याचा.

प्रतिक्रिया

केले आहेत साहेब आपण.
म्या पामराची यथाशक्ती उत्तरे:-

१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का?

"केवळ" शब्द खटकतो.संस्कृतचा प्रभाव नक्किच आहे. त्याशिवाय अतिप्रचंड प्रमाणात तत्सम आणि तद्भव (संस्कृत मधुन आलेले)
शब्द दिसले नसते.
उदा:- "केवळ्,शब्द्,प्रभाव्,आहे, दिसणे,प्रचंड्,अति" हे सगळेच संस्कृतातुन आलेले शब्द आहेत.

२) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का?

नाय बुवा. नेहमीच्या वापरातील खिडकी,कुर्ता ह्या आणी अशा अनेक शब्दांचा काय बी तरास होत नाय.
पण रझिया-सुलतान चित्रपटासरखं "शहीद्-ए-उल्फत, उल्फत -ई- अमानत" वगैरे सरळ बाउन्सर जातात राव.
मम्हंजे असल हाय फंडु उर्दु येत नाय.

३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का?
अजिबात नाही.खुशाल बोलत सुटतो. मनाला वाआटेल ते, मनाला पटेल ते.
भावना अचुक व्यक्त होणं महत्वाचं.


४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का?

हो.पण क्वचितच.
उबळ येते भाषा-शुद्धी वगैरेची;पण ती तात्कालिक असते.

५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का?
अजुन तरी असले शब्द सुचवण्याची भरीव कामगिरी केली नाय.

६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? )
ही लेखी भाषा वाटते.मी तासन्तास टी व्ही वर कार्यक्रम पाहतो.
(मराठि शब्द वापरणे म्हण्जे अवघडच वापरावेत असं काही नाही.)

७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय?

जन्मात नाय. ते "पंक्चर"च झाले आहे.

८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का?
नक्की कळ्ळं नाय.

९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का?

हो.

१०) तुम्ही काल घरी फोन केला होता का?
हो. फोन केला होता.

११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का?
हो.

१२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ'

व्यवहारचतुर मराठी प्राध्यापकांनी नाव मोठं होण्याची हौस म्हणुन जगासमोर आपले विचार
कळकळ म्हणुन मांडले आणि त्यांची मौज जाहली.

"स्वान्त सुखाय" कळ्ळ नाय.
ह्ये "स्वांत सुखाय" अस नाय लिवता येनार का?
का म्हणुन नाही लिहिता येणार?

आपलेच,
जन सामान्यांचे मन

राजे's picture

28 May 2008 - 4:49 pm | राजे (not verified)

अजिबात नाही.खुशाल बोलत सुटतो. मनाला वाआटेल ते, मनाला पटेल ते.
भावना अचुक व्यक्त होणं महत्वाचं.

हेच म्हणतो व असाच विचार करतो :)

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विजुभाऊ's picture

28 May 2008 - 3:02 pm | विजुभाऊ

बरे झाले हे या संस्थळावर मांडले

विजुभाऊ's picture

28 May 2008 - 3:11 pm | विजुभाऊ

बर्‍याच फारसी शब्दांचा अर्थ मराठीत येताना अर्थ बदललेला असतो.
उदा : हौस /हौशी हे शब्द फारसी हवस या शब्दावरुन आले आहेत.
("आता हा अर्थ माहीत झाल्यावर अमुकतमुक बाई फार हौशी आहेत हो .........")
धमु किंवा अन्द्या याना फार हौस आहे. ही वाक्ये कशी वाटतील.
असे अनेक शब्द आहेत . उदा "वकुब" हा ही अर्थ बदलुन आलेला शब्द मूळ अर्थ :शिक्षण. "विलायत" मुळ अर्थ :स्वतःचा देश.
अशा शब्दांचे काय करायचे?

ऋचा's picture

28 May 2008 - 3:27 pm | ऋचा

कागद हा शब्द अरबी आहे तो "कागज" ह्या शब्दावरुन आलाय

प्रियाली's picture

28 May 2008 - 3:56 pm | प्रियाली

भल्या मोठ्या प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे. ;) सावकाश देते.

हर्षद बर्वे's picture

28 May 2008 - 4:47 pm | हर्षद बर्वे

आत्मपरीक्षण करून प्रश्न्नांची उत्तरे देउच...पण तात्काळ द्यावेसे वाटलेले प्रश्न रूपी ऊत्तर....

१०) तुम्ही काल घरी फोन केला होता का?

ऊ.: कोणाच्या ?
हे १०) तुम्ही काल तुमच्या स्वतःच्या घरी फोन केला होता का?....असे विचारावयास पाहीजे होते....!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 May 2008 - 4:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? नाही
२) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? नाही
३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? नाही
४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? नाही
५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का?होय
६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) तीन वेळेस
७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? पंक्चरच होते.
८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? होय
९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? होय
१०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? दुरध्वनी करत नाही, शक्यतो फोनच करतो.
११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? तिकीटच काढावे लागते.
१२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' = व्यवहारचातुर्य

यावरुन आपण कोणत्या निष्कर्षावर पोहचणार आहात याची आम्हाला प्रचंड उत्सुकता आहे. :)

-दिलीप बिरुटे

प्रियाली's picture

28 May 2008 - 5:52 pm | प्रियाली

शुद्धलेखन, भाषाशुद्धी इ. इ. संदर्भात मिसळपाव वर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा लक्षात घेता बरीचशी मते पूर्वग्रहदूषित आहेत हे मला जाणवते. एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो.

स्स्सही!! आपला तो बाब्या आणि दुसर्‍यांचे ते कार्टे हा मराठी बाणा येथेही दिसला.

१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का?

मुद्दा पहिला:

केवळ संस्कृत भाषेचा आहे असे वाटत नाही. मराठी भाषा हे अनेक संस्कृत, प्राकृत आणि परदेशी भाषांचे मिश्रण असावे. तसे म्हणायला गेले तर संस्कृत भाषा तरी स्वदेशी का म्हणावी? अफगाणिस्तान आणि त्याही पलीकडील प्रदेशातून अवेस्तासदृश भाषा तथाकथित आर्यांनी भारतात आणली असावी. तिला संस्कृत म्हणण्याचे धाडस करणे मला अयोग्य वाटते. आता, या भटक्या लोकांची मानसिकता बघू किंवा त्या आधी तिथून पुढे वसलेल्या लोकांची मानसिकता बघा. द. आशियात आणि भारताच्या पूर्व किनार्‍यावर येथिल लोक वसल्याचे सांगितले जाते. उदा. ख्मेर घराणे किंवा पल्लव राजघराणे. दोघांचा इतिहास असा की येथे स्थलांतरित झालेले हे तथाकथित आर्य/ ब्राह्मण इ. मूळ लोकांत मिसळून गेले. त्यांनी स्थानिक बायकांशी लग्न केले आणि स्थानिक राजकारणात-समाजकारणात भाग घेऊ लागले. भाषा, कला, साहित्य यांना त्यांनी आपलेसे केले. त्यानंतर हजारो वर्षांनी आलेल्या पारशांनी स्थानिक बायकांशी लग्न केले नसले तरी ते येथील संस्कृतीत मिसळून गेले. भाषा शिकले.

याच प्रमाणे आर्यांच्या टोळ्याही भारतात येऊन वसल्या आणि येथील लोकांत मिसळल्या. कोठेही घनघोर युद्ध इ. झालेले दिसत नाही. दौपदी, तात्यांचे लाडके कृष्णद्वैपायन व्यास ;), कृष्ण इ. यामुळेच रंगाने सावळे आहेत. हा फाफटपसारा सोडून पुढे पाहिले तर त्यांनी आणलेली भाषा येथील स्थानिक भाषेशी मिळून संस्कृत भाषेची निर्मिती झाली असावी असे मला वाटते आणि हा निष्कर्ष खरा मानला तर संस्कृत ही भाषा स्वदेशी म्हणता यावी पण मग प्राकृत तिची आई असे म्हणणे अयोग्य ठरू नये. असो, मला मराठी ही भाषा केवळ संस्कृत भाषेतून जन्मली हे पटत नाही. प्राकृत भाषांचा प्रभाव मराठी आणि संस्कृत दोहोंवर असावा.

मुद्दा दुसरा:

मध्ययुगीन काळात सैन्यात असणे ही एक महत्त्वाची नोकरी गणली जाई. भाषांचे संकर सैन्याच्या छावणीत झाले असे म्हणणे अयोग्य ठरू नये. मराठी भाषेत फारसी, उर्दू, अरबी शब्द येण्यास येथे सुरूवात झाली असावी.

मुद्दा तिसरा:

ब्रिटिश येऊन काही शे वर्षे झाली. परंतु, मराठी भाषेत मिसळलेले इंग्रजी शब्द पाहता आणखी हजार वर्षांनी मराठी भाषा ही आंग्लोत्भव आहे असा आडाखा बांधणे अशक्य ठरणार नाही आणि जर कोणी तसा आडाखा बांधू इच्छित नसेल त्यांनी संस्कृत आपली आपली म्हणून घोष का करावा?

२) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का?

हो असे जाणवते. उदा. परवाच एका स्नेह्यांनी प्रत्युत्त्पन्नमती या (मराठी?) शब्दाचा अर्थ विचारला. वाक्य वाचले असता त्याचा अर्थ मला हजरजबाबी असा वाटला. माझ्यामते प्रत्युत्त्पन्नमती या टंगट्विस्टरपेक्षा हजरजबाबी हा शब्द वापरणे मला आवडेल.

३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का?

नेहमीच नाही आणि बोलताना नाही पण कधीतरी लिहिताना ध्यानात येते.

४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का?

अजिबात नाही आणि तसे करणार्‍या महाभागांवर मला नेहमी हसू येते. जो शब्द मुळात भाषेत नाहीच, तो संस्कृतातून हुडकून आणण्याची कला मला नाही आणि शिकायचीही नाही.

५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का?

जर ते शब्द सोपे सुटसुटीत असतील तर हो. मागे एका महाशयांनी सिगरेटला श्वेतवर्णीधूम्रकंडिका असा शब्द सुचवला होता, तर दुसर्‍या एका ठिकाणी कॉजवे साठी काजवाट हा शब्द सुचवला होता. मला काजवाट हा शब्द आवडला.

६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? )
एकदाच वाचला. कुडोस टू मराठी वेबसाईट्स! मी टीव्हीवर अर्ध्या तासाची सिरिअल पाहते.

७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय?

हो! मागच्या हिवाळ्यात बाहेर ४ डी फॅ. असताना टायर बदलले आहे.

८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का?
नाही.
९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का?
नाही
१०) तुम्ही काल घरी फोन केला होता का?
नाही पण माझ्या डॉक्टर भाचीला जी इथे टुरिस्ट विसावर आली आहे तिला सेलफोन वरून लॉग डिस्टन्स कॉल केला होता.

११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का?
नाही आता मी स्वत्:ची कार वापरते.

१२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ'

स्वतःच्या करमणुकीसाठी

अवांतरः माझ्या उत्तरांत जे मराठी आहे तेच मराठी मी ही चार संकेतस्थळे सोडून सहसा बोलते.

विकास's picture

28 May 2008 - 9:13 pm | विकास

याच प्रमाणे आर्यांच्या टोळ्याही भारतात येऊन वसल्या आणि येथील लोकांत मिसळल्या. कोठेही घनघोर युद्ध इ. झालेले दिसत नाही.

या संदर्भात दोन बाजूने बोलणारे आहेत - आर्य भारतात बाहेरून आले असे आणि ते खोटे असे. बाहेरून आलेल्यांचा मूळ मुद्दा हा मॅक्समुल्लरच्या मूट तत्वावर आधारीत आहे - भारतीय भाषा ह्या स्वतःच्या जीवावर नेटीव्ह लोकं समृद्ध करू शकणार नाहीत असा. मग त्यात द्वारका, "नसलेल्या" सरस्वती नदीचा उल्लेख वगैरे घातले. पण आता उपग्रहांनी(का मी सॅटेलाईट म्हणले पाहीजे?:-)) घेतलेल्या छायाचित्रांप्रमाणे बरेच काही सांगीतले गेले आहे.

त्यामुळे आधी "आर्यन इन्व्हेजन" (त्यामुळे आर्य/अनार्य अशी भिंत तयार करणे - त्यातून इतर राजकारण) होते ते आता, "आर्यन मायग्रेशन" झाले. मग त्याला "थियरी" असे म्हणू लागले.

थोडक्यात आर्य भारतात बाहेरून आले हा केवळ एक तात्विक सिद्धांत मानला जाऊ लागला, निरीक्षण नाही.

प्रियाली's picture

28 May 2008 - 9:25 pm | प्रियाली

मॅक्समुल्लरला सध्या बाजूला ठेवू.

मध्य आशियातून अनेक ठीकाणी, तुर्कस्थान, आफ्रिका, द. आशिया इ. कडे स्थलांतर झाले हा इतिहास आहे, त्या अनुषंगाने त्यांचे भारतात स्थलांतर करणे मला शक्य वाटते. अर्थातच, भूकंप झाला किंवा पूर आला म्हणून झालेले हे स्थलांतर नव्हे. टप्प्याटप्प्याने झालेले स्थलांतर आहे.

थिअरी का निरिक्षण का सिद्धांत हे ज्याने त्याने ठरवावे.

विकास's picture

28 May 2008 - 9:55 pm | विकास

थिअरी का निरिक्षण का सिद्धांत हे ज्याने त्याने ठरवावे.

इतकेच मला म्हणावेसे वाटत होते. आपली लिहीण्याच्या ओघात त्या संदर्भात केलेली विधाने होती, ज्याचा अर्थ, तसेच नक्की आहे असा होऊ शकतो पण "नाण्याची दुसरी बाजू"असू शकते असे दाखवले, इतकेच..

मन's picture

28 May 2008 - 5:27 pm | मन

आणखी एक नव्या (शुद्ध?) मराठी शब्दाची आम्हाला उबळ आलिये.

स्चूटरचं टायर पंक्चर होतं. = वाहनाचं चाक छिद्रित झालं.
कसा काय वाटला हा वापर?

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

प्रियाली's picture

28 May 2008 - 5:31 pm | प्रियाली

चाक म्हणजे व्हील रे टायर नव्हे!

मनस्वी's picture

28 May 2008 - 6:12 pm | मनस्वी

चाकनळी / चाकनलिका / चाकथर / चाकाच्छादन ...??

चाकथर / चाकाच्छादन योग्य वाटते म्हणजे टायर ट्युबला चाकथर-नळी म्हणता येईल.

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

llपुण्याचे पेशवेll's picture

28 May 2008 - 9:08 pm | llपुण्याचे पेशवेll

टायर = वायूयुक्त धाव
कसे वाटते? कारण बैलगाडीच्या चाकावर नाही का लोखंडी धाव बसवत? तशी ही वायूयुक्त धाव. :)

पुण्याचे पेशवे

मन's picture

28 May 2008 - 6:08 pm | मन

व्हायला काय हरकत आहे?
आपल्या सोयीनं इंग्लिश मध्ये नाय का जुन्या शब्दाचे नवे अर्थ बनतात.(जुन्या अर्थाच्या जवळ जाणारे)
जसे की "I'll fly tommorrow" म्हणजे " मी उद्या पंख लावुन पक्ष्याप्रमाणे उडेन" असा शब्दशः अर्थ न घेता
"मी उद्या विमानात चढेन्/बसेन आणि ते विमान उडेल." असा अर्थ घेणं अपेक्षित आहे.
असे अनेकानेक उपयोग इम्ग्लिश मध्ये आहेत, नवनवीन रोज पडताहेत, म्हणुनच तर तिचा तथाकथित झपाट्याने
प्रसार वगैरे होतोय.
केलं तसच मराठित बिघडलं कुठं बॉस?

आपलेच,
जनसामान्यांचे मन,

प्रियाली's picture

28 May 2008 - 6:13 pm | प्रियाली

केलं तसच मराठित बिघडलं कुठं बॉस?

नाही बिघडलं, चालून जाईल. :)

आर्य's picture

28 May 2008 - 6:08 pm | आर्य

१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? - नाही हे पृथःकरण केवळ कठीणच
२) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? नाही - आपण त्यांना आपल्या प्रमाणे बदलून घेतो.
३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? नाही
४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? फारसा नाही
५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? प्रयत्न करतो पण जमतेच असे नाही
६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? )
७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? नाही
८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही
९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? होय, सांगाना काय पाहिजे ते सरळ असं
१०) तुम्ही काल घरी फोन केला होता का?
११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? हो रोज
१२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ'

दृक/ श्राव्य /भाष्य किंवा लिखीत स्वरुपातील दुसर्‍याला समजावण्या साठी वापलेली ऐक सांकेतीक पद्धत आहे भाषा म्हणजे. हे माध्यम सर्वजण आपली मते / भावना / विचार प्रभावी पणे दुसर्‍या पर्यंत पोहचवण्या करीता वापरात, मग यात अन्य भाषेतील शब्द आल्यास बिधडलं कुठे.
समजा समोरचाच जर दुसरी भाषा जणत (चांभाराच्या देवाला चपलीची पुजा) असेल तर आपण आपली भाषा बदलतोच ना ? शेवटी गरज आपल्याला पण आहे, आणि बर्‍याच लोकांना भाषेचा अडसर नसतोच.
आता बोली भाषेत प्रांत, समाज, व्यवसाय, व्यवहार, काळ, आणि विचार याप्रमाणे भाषेत फरक पडणारच.
अन्या भाषेतील शब्द, आपले भाषा ज्ञान संमृद्ध करायला आणि वाङमय सौंदर्य वाढवायला केले पाहीजे.

भाषा शास्त्राचा तांत्रिक आणि तर्कशुद्ध पद्धतीने अभ्यास, प्रथम संस्कृत भाषेत पाणीनीने - अष्टाध्यायी मधे केला.
आता मला सांगा कॉम्पुटरचा शोधच आत्त लागला मग हा शब्द तुमच्या जुन्या कोशात कसा असेल?
ईतिहासात जाऊन अकबरा विचारा बोर्डींग पास / लॉग ईन म्हणजे काय?

बहुभाषीक (आर्य)

कोणतिही भाषा ही इतर भाषांतील शब्द आत्मसात करुन समृद्ध बनते.
आज इंग्रजीतही बरेचसे परभाषीक शब्द आहेत. फिनीश भाषेत बर्फाला २३ प्रकारचे शब्द आहेत. तेव्हढे मराठीत असणे शक्य नाही. कारण भौगोलीक आहे.
तसेच नव्या तंत्रज्ञानामुळे नवे शब्द जसे च्या तसे येतात उदा : बिट्स / बाईट्स / हर्ट्झ /व्होल्टेज गिग्या मेग्या ई. यासाठी योग्य प्रतिशब्द असणार नाही. फ्रिजर फ्रिज आणि शितकपाट हे वेगवेगळे आहेत.
मराठी भाषेत मिसळलेले इंग्रजी शब्द पाहता आणखी हजार वर्षांनी मराठी भाषा ही आंग्लोत्भव आहे असा आडाखा बांधणे अशक्य ठरणार
हेच इंग्रजीबद्दल ही म्हणता येईल तसेच इतर कोणत्याही भाषेबद्दल म्हणता येईल.
हिंदी भाषेत तर कितितरी शब्द इतर भाशेतील आहेत.
तकनीक / त्रासदी (टेक्नीक / ट्रॅजेडी ) हे शब्द हिंदी वाटत नाहीत हे म्हणणे अवघड आहे.
कोनतीही भाषा ही केवळ एक दोन भाषासंकरातुन जन्म घेत नाही.
भाषा ही जिवंत रहावी म्हणुन ती प्रवाही असावी लागते.नवे शब्द येणे, नवे संस्कार आले नाहीत तर ती मृत होते.
कपाट हा मराठी शब्द नाही ( कबर्ड) त्या ऐवजी फडताळ हा शब्द कोण वापरतो आता.
भाषेत नवे शब्द येत रहाणार जुने शब्द कालबाह्य होत रहणार. आजच्या जागतीक खेड्याच्या जमान्यात स्थलकालाच्या मर्यादा / भाषेच्या मर्यादा रहाणार नाहीत.
मध्ययुगीन काळात सैन्यात असणे ही एक महत्त्वाची नोकरी गणली जाई. भाषांचे संकर सैन्याच्या छावणीत झाले असे म्हणणे अयोग्य ठरू नये. मराठी भाषेत फारसी, उर्दू, अरबी शब्द येण्यास येथे सुरूवात झाली असावी.
हे अर्ध सत्य आहे. समाज भाषेची गरज ही राज्यकर्त्यांवरुन ठरवतो.
इंग्रजी ही चलनी भाषा आहे म्हणुन आपण इंग्रजी शिकतो.
दुसर्‍या महायुद्धात हिटलरची सरशी झाली असती तर आज आपल्या मराठीवर जर्मन भाषेच पगडा असता.
जयंत नारळीकरांच्या म्हणण्यानुसार पानिपताच्या महायुद्धात जर विश्वासराव भाऊ मारला/बेपत्ता झाला नसता तर इतिहासाला कलाटणी मिळुन इंग्रजीवर आज मराठीचा पगडा असता.
( अवांतर :एके काळी इंग्रजी भाषेवर फ्रेंच चे आक्रमण होतेय म्हणुन इंग्रज रडत असत)

विजुभाऊ's picture

28 May 2008 - 6:52 pm | विजुभाऊ

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास या शब्दाचे काय.
::::::एक नापास विजुभाऊ

मन's picture

28 May 2008 - 6:55 pm | मन

उत्तिर्ण आणि अनुत्तिर्ण वापरा.
स्वगतः- पन शिंच त्ये तर लैच पुस्तकी भाषेतलं वाटायलय.

आपलाच,
मनोबा

आंबोळी's picture

28 May 2008 - 6:59 pm | आंबोळी

नापास या शब्दाचे काय.

नापास No Pass चा अपभ्रंश ! :>
(तिरड्या उचलून दमलेला)आंबोळी

धनंजय's picture

28 May 2008 - 8:00 pm | धनंजय

१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? "केवळ" नाही. अनेक भाषांचा प्रभाव आहे, आणि स्वतःचे बदल करण्याची अंगची लकब मराठीत आहे.
२) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? जाणवत नाही. रुळलेले शब्द सहज समजले, उच्चारले तरच त्यांना "रुळलेले" म्हणतो.
३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? ९९% असा विचार करत नाही. क्वचित करतो. काव्यात एकापाठोपाठ एक उच्चार एकाच स्रोतातले असल्यास जिभेला सोपे जाते. "हावभावातला डौल" (दोन्ही मराठमोळे शब्द); "हरकतीतली नजाकत" (दोन्ही अरबीतून आलेलेसंस्कृत)"कटाक्षातील कमनीयता" (दोन्ही जवळजवळ संस्कृत) असे वापरतो. "हरकतीतील कमनीयता" किंवा "कटाक्षातील नजाकत" असे मिश्रण कानाला खटकते, म्हणून वापरत नाही. असे प्रसंग क्वचितच येतात.
४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? माझ्या मते रुळलेला कुठलाच शब्द अशुद्ध नसतो. न रुळलेल्या शब्दाला प्रतिशब्द सुचवायचा मोह कधीकधी होतो. परंतु चपखल प्रतिशब्द सुचवायची माझी प्रतिभा नसल्यामुळे मी तो मोह टाळतो.
५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? मी सहसा असे शब्द सुचवत नाही. पण लोकांनी सुचवलेले शब्द आवडल्यास ते वापरतो. उदाहरणार्थ : "संकेतस्थळ" आणि "विदागार".
६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) ० तास. (एकदा वाचला.)
७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? माझ्या गाडीचे टायर "पंचर" होते ("पंक्चर" नव्हे) इतकाच फरक. "टायर"चा "वाल" बदलताना कधीकधी "पान्ह्या"चा उपयोग करतो. (ठायर, व्हॅल्व्ह आणि स्पॅनर नव्हे.) जर एखाद्या इंग्रजी शब्दाचा मराठमोळा उच्चार रुळलेला असेल, तर मराठी बोलताना तो मराठमोळा उच्चार मी वापरतो, इंग्रजीत बोलताना इंग्रजी उच्चार वापरतो.
८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही.
९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही. "शुद्ध"लेखन नामक काही कल्पनाच मला मान्य नाही. "शुद्ध"लेखन हा शब्द "प्रमाणलेखन" या अर्थी काही लोक वापरतात."व्यापारात आणि वर्तमानपत्रांत प्रमाणलेखन सोयीचे आहे," अशा प्रकारात मी मोडतो. पण हा पर्याय दिलेला नाही.
१०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? होय.
११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? होय. (पण टिकेट काढले नाही.)
१२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' व्यवहारचातुर्य.

शेखस्पिअर's picture

28 May 2008 - 8:39 pm | शेखस्पिअर

हेमंतराये सुत्ताले करवियले....
हे आता आपण वापरू शकतो का???
भावना पोचणे महत्वाचे...

विकास's picture

28 May 2008 - 9:52 pm | विकास

मला एक मूलभूत प्रश्न आहे:

आपण बर्‍याचदा भाषाशुद्धी करत असतो का भाषाविकास?

जर भाषाविकास करायच नसता तर "गमभन" सारखी टंकलेखन व्यवस्था का बरं तयार करावीशी वाटली असती? संकेतस्थळपरवलीचा शब्द, खरडवही , वगैरे शब्द तयार करताना तुम्ही आम्ही काय सकाळी शुचिर्भूत होऊन सोवळ्यात बसून शब्द तयार करत असतो का आणि मग पाणि शिंपडून म्हणतो की हां आता भाषेचा हा भाग शुद्ध केला!

मग तेंव्हा आपण म्हणतो का की नेट म्हणले तर काय बिघडले? व्य. नि. काय प्रकार आहे? वगैरे? आपण "नेटा"ने मराठी लिहीण्याचा प्रयत्न करतो. सुचले नाहीत तर येथील मित्रमंडळींना प्रतिशब्द सुचवायला सांगतो. हे सर्व आपण म्हणता त्यात म्हणजे, "'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ"" यातील कशात धराल?

आपण वरील शब्दात वर्गीकरण करत असताना एक वर्गीकरण करायला विसरलात - ते म्हणजे "प्रेमापोटी" (जे कळकळीपेक्षा वेगळे असू शकते).

मला माझी भाषा आवडते. त्या भाषेचा विकास व्हावा असे मला वाटते. त्या अर्थाने नित्यनूतन शब्द जर तयार झाले तर कुठे बिघडले? आज जर "गुगल" हा शब्द इंग्रजीत तयार झाला असे समजून ऑक्सफर्ड डिक्शनरीत (शब्दकोशात) घातला जातो तर आपण नवीन शब्द केले आणि हो ते संस्कृतप्रचूर अथवा संस्कृतोद्भव असले म्हणून बिघडले कोठे? शेवटी भाषा ही वापरण्याने मोठी होते.

विलक्षणः शब्दकोशः विद्यते तव भारती | व्ययेन वर्धते नित्यम क्षयं गच्छती संग्रहात ||

हे सरस्वती देवी तुझा शब्दकोश हा (धनकोशापेक्षा) वेगळाच आहे! कारण तो वापरल्याने मोठा होतो आणि नुसताच ठेवून दिला तर त्याचा र्‍ह्सा स होतो.

थोडक्यात जे काही शब्द आहेत ते जर लोकांना आवडले तर ते तगतील नाहीतर दुसरे आहेतच. आता शब्दाच्या इष्टाईल मुळे मला "दुग्धशर्करायुक्तघनघट्टगोल" खायला आवडतो असे म्हणायला आवडते. पण काय करणार लोकांना नुसतेच "पेढा" म्हणलेले आवडते म्हणून तोच शब्द रूढ झाला! असो.

बाकी भाषा, संस्कृती ह्यातील नाविन्य विचित्र वाटणे हा कधीकधी सवयीचा परीणाम असतो. अमेरिकेत (कुठल्याही परभागात) येतो तेंव्हा अनेक गोष्टी/शब्द (अर्थात इंग्रजी) नवीन वाटायच्या, विचित्र वाटायच्या, पण नंतर त्यातील अर्थ समजणे आणि पचनी पडणे सहज होऊन जाते. पण त्याच बरोबर काही गोष्टी भारताळलेल्या ह्या अमेरीकेत जास्त करू लागलो (मुद्दाम नाही, पण सवयीने).

उ.दा: मराठी माणसाशी फोनवर बोलताना आपोआप "नमस्कार मी विकास बोलतोय" असेच तोंडातून बाहेर येते. (आणि बोलणार्‍याला पण आश्चर्य वाटत नाही). तर अमराठी भारतीय माणसांशी बोलताना आपसूक "नमस्ते" येते. येथे अनेक विद्यापिठातील तरूण भारतीय पिढी (अमेरिकेत जन्मलेली) अनुभवली - ते लगेच नमस्ते म्हणतात. मधे एकदा बॉस्टनला उतरल्यावर कस्टमचा अधिकारी पण सुअहास्यवदनाने हात जोडून "नमस्ते, वेलकम होम" असे म्हणाला आणि समजले की बघता बघता "नमस्ते" किती सहज सर्वत्र पसरलेला शब्द झाला ते!

प्रियाली's picture

28 May 2008 - 9:56 pm | प्रियाली

शेवटी भाषा ही वापरण्याने मोठी होते.

हेच सत्य असेल आणि इंग्रजी भाषा इतर भाषीक शब्द सामावून घेत असेल तर ते नवे शब्द आपणही सामावून न घेता संस्कृतप्रचूर आणि संस्कृतोद्भव शब्द "नव्याने" तयार करण्याचा अट्टहास का ते कळेल का?

कोलबेर's picture

28 May 2008 - 9:59 pm | कोलबेर

'आमचा सन इन लॉ येत्या विकेंडला स्टेट्स ला फ्याय करणार आहे'. असले धेडगुजरी मराठी कानाला खटकते उच्छाद आणते हे नक्की. पण हे सुधारण्यासाठी प्रत्येक शब्दाला प्रतिशब्द सुचवत राहणे हा उपाय मलाही पटत नाही. इतर भाषांमधुन (इंग्रजी,संस्कृत,अरबी,फारसी,पाली, इ.इ.)आलेले जे शब्द बर्‍यापै़की रुळले आहेत त्यांच्यासाठी प्रतिशब्द नको असे मला वाटते.

अवांतर : प्रतिशब्द वाले जसे 'प्रतिशब्द सुचवा' अश्या याद्या तयार करतात तशीच एक 'प्रतिशब्द नको' अशी यादी देखिल बनवावी आणि त्यात खालील शब्द टाकत जावे

उदा.
पेन
टेबल
सिगरेट
टायर

प्रियाली's picture

28 May 2008 - 10:15 pm | प्रियाली

वायर, प्लग, खुर्ची, कपाट, बायको, बटाटा, पास्ता, बर्गर इ. इ.

विकास's picture

28 May 2008 - 10:23 pm | विकास

हेच सत्य असेल आणि इंग्रजी भाषा इतर भाषीक शब्द सामावून घेत असेल तर ते नवे शब्द आपणही सामावून न घेता संस्कृतप्रचूर आणि संस्कृतोद्भव शब्द "नव्याने" तयार करण्याचा अट्टहास का ते कळेल का?

अट्टहास कुठूनही होऊ शकतो. जर संस्कृतप्रचूर शब्दच वापरावे हा कोणी अट्टहास धरला (मी तसा धरत नाही, पण!) तर जसे अयोग्य तसे केवळ संस्कॄतप्रचूर शब्द म्हणून सातत्याने विरोध करणे हा पण अट्टहासच आणि म्हणून अयोग्यच असतो, असे वाटत नाही का?

बाकी प्रश्नाचे (नवीन शब्दांची गरज) उत्तर माझ्याच वरील प्रतिसादात मिळेलः आपण वरील शब्दात वर्गीकरण करत असताना एक वर्गीकरण करायला विसरलात - ते म्हणजे "प्रेमापोटी" (जे कळकळीपेक्षा वेगळे असू शकते).

संस्कृतप्रचूर शब्द हे मुद्दामून संस्कृत म्हणून केले जात नाहीत तर तो तुम्हाला आवडो-न-आवडो, पटो - न पटो, मराठी आणि भारतीय भाषांतील मूळ भाग आहे. मग ते आपल्या नावात आहे आणि इतरत्रही आहे. जेंव्हा वेबसाईटला संकेतस्थळ शब्द ज्याने कोणी सुचवला त्याला काही मुद्दाम संस्कॄत आठवावे लागले नाही. त्याचबरोबर व्यक्तिगत निरोप म्हणताना त्यात संस्कृतप्रचूर असावे असा अट्टहासपण कोणी धरला नाही...

म्हणून वाटते की संस्कृत असण्याच्या अट्टहासापेक्षा (तो करणारे आहेतच पण) उगाच नसण्याचाच जास्त अट्टहास होत असल्यासारखे दिसते.

कोलबेर's picture

28 May 2008 - 10:31 pm | कोलबेर

संस्कृत हवे/नको असा दोन्हीही अट्टहास नको हे मान्य पण,

संस्कृत असण्याच्या अट्टहासापेक्षा (तो करणारे आहेतच पण) उगाच नसण्याचाच जास्त अट्टहास होत असल्यासारखे दिसते.

हे मात्र पटले नाही. मूळ मुद्दा आहे इतर भाषेतील शब्द मराठीत येण्याचा. ते शब्द इतर संस्कृत सोडून इतर कुठल्याही भाषेतील असले तर लगेच बर्‍याच जणांचा झिनोफोबीया बळावतो आणि तेच जर संस्कृतमधले असले तर मात्र लगेच 'संस्कृत ही मराठीची जननी' असा युक्तिवाद करुन स्विकारण्याकडे कल असतो. त्यामूळे 'संस्कृत हवे' हा अट्टहास (मला तरी) अधिक वाटतो.

प्रियाली's picture

28 May 2008 - 10:32 pm | प्रियाली

जर संस्कृतप्रचूर शब्दच वापरावे हा कोणी अट्टहास धरला (मी तसा धरत नाही, पण!) तर जसे अयोग्य तसे केवळ संस्कॄतप्रचूर शब्द म्हणून सातत्याने विरोध करणे हा पण अट्टहासच आणि म्हणून अयोग्यच असतो, असे वाटत नाही का?

जर कोणी प्रतिशब्द द्या म्हटल्यावर लगेच संस्कृतप्रचुर शब्द पोतडीतून काढत असेल तर त्याला विरोध अजिबात अयोग्य नाही. वरील उदाहरण पहा, टायरला चाकनळी पासून सर्व शब्द सुचवले आहेत त्यात मराठी भाषेत वापरले जाणारे नळीपासून वायूपर्यंत अनेक शब्द आहेत. जेव्हा प्रतिशब्द दिला जातो आणि तो संस्कृतातून चटकन काढला जातो तेव्हा मायमराठीवर अन्याय करताय असे वाटत नाही का? मराठमोळ्या भाषेत तसा पर्याय नसावा असे का वाटते.

सिगरेटला धूरकांडी शब्द न सुचता श्वेतवर्णीधूर्मकंडिका का सुचतो?

संस्कृतप्रचूर शब्द हे मुद्दामून संस्कृत म्हणून केले जात नाहीत तर तो तुम्हाला आवडो-न-आवडो, पटो - न पटो, मराठी आणि भारतीय भाषांतील मूळ भाग आहे.

हे शब्द का आले? लक्षात घ्या, संस्कृताशी आणि संस्कृत शब्दांशी मला काहीही वाकडे नाही परंतु साधे मराठी शब्द मिळत असता संस्कृतातून अवजड शब्द शोधणे, प्रचलीत आणि नव्याने आलेल्या इंग्रजी शब्दांना संस्कृतच वाचवू शकते असा ग्रह करणे (करून ठेवणे) हे अयोग्य वाटते.

म्हणून वाटते की संस्कृत असण्याच्या अट्टहासापेक्षा (तो करणारे आहेतच पण) उगाच नसण्याचाच जास्त अट्टहास होत असल्यासारखे दिसते.

दुर्दैवाने, आपल्याला असे वाटते म्हणजे इतर काय म्हणतात याकडे आपले दुर्लक्ष होऊन फक्त चर्चा भरकटली, इतरांनी विरोध केला याकडेच आपले लक्ष केंद्रित झालेले वाटले.

विजुभाऊ's picture

29 May 2008 - 9:47 am | विजुभाऊ

सिगारेट ला विडी हा शब्द आहे.
उगाच नवे शब्द करण्याच्या उत्साहात पर्यायी (जुने) शब्द नाहीतच असे समजणे योग्य नव्हे

कोलबेर's picture

29 May 2008 - 9:52 am | कोलबेर

विडी आणि सिगरेट मधला फरक कळत नसेल तर जवळच्या पानटपरीला भेट द्या एकदा. तिथला मालक तुम्हाला सोदाहरण स्पष्ट करुन सांगेल.

विडी आणि सिगरेट मधला फरक खाकी प्यान्ट आणी सफेद पायजम्यातील फरका इतका स्वच्छ आहे.
फार तर सिगारेटला इंग्रजी विडी म्हणुयात.बाकी सफेद घोळदार प्यान्ट ही पायजम्यासारखीच दिसते.

प्रभाकर पेठकर's picture

28 May 2008 - 10:09 pm | प्रभाकर पेठकर

वरील प्रतिसादाशी सहमत आहे.
शब्द शुद्ध मराठी आहे, संस्कृतोद्भव आहे की फारसी, अरबीतून आलेला आहे ह्या पेक्षा बोलण्यास सोपा आहे हाच निकष टीकून राहतो.
'भय' हा शब्द साहित्यात आहे. कथा कादंबर्‍यांमधून, कविता, गाण्यातून वाचनात येतो तो जितका आपला वाटतो तितकाच 'भिती' हा बोली शब्दही जास्त वापरला जातो.
पण म्हणून पर्यायी मराठी शब्द शोधूच नये का? तर उत्तर आहे, 'नाही, जरूर शोधावेत. सहज, सोपे असतील तर आवर्जून वापरावेत.'
विजार, सदरा आदी शब्द उच्चारायला, समजायला कठीण होते म्हणून मागे नाही पडले. 'पँट्-शर्ट' हे शब्द वापरण्याची 'फॅशन' आली, हे शब्द 'पुढारलेपणाचे' द्योतक बनले म्हणून विजार, सदरा हे मराठी शब्द मागे पडले. ठीक आहे. काहीही कारणाने मागे पडले तर पडू देत. आता एवढीच काळजी घ्यायची की अशा प्रकार हळूहळू जास्तीतजास्त मराठी शब्द मागे पडून 'इंग्रजी' किंवा इतर शब्द विनाकारण आपल्या भाषेत लुडबुड करणार नाहीत.

विसोबा खेचर's picture

29 May 2008 - 12:43 am | विसोबा खेचर

अरे काय रे ही भाषेची ट्यांव ट्यांव लावली आहे रे तुम्ही लोकांनी! कसल्या रे लेको वांझोट्या चर्चा करत बसता? :)

अरे काही उतम कथा, काव्य, रसग्रहण, व्यक्तिचित्रण, एखादा उत्तम अनुवाद असं काहीतरी लिहा रे! का उगाच मिपाची जागा फुकट घालवताय? :))

नायतर जा वेलणकरकडे! तिथे सगळे तुटून पडतील भाषा व व्याकरणविषयक चर्चांवर! 'आम्हाला तात्याने तुझ्याकडे पाठवलंय!' असं सांगा हवं तर वेलणकरला! :))

साला ज्याला ज्या भाषेत बोलायचं असेल, जसं बोलायचं असेल तसं तो बोलेल!! भाषा ही कुणाच्या मालकीची नाही! ती प्रत्येकाची आहे! च्यामारी आमच्या बहिणाबाईं जळ्ळ्या कुठे गेल्या होत्या हो भाषाविषयक भसाभसा चर्चा करायला? भाषाविषयक आणि शुद्धलेखनाबाबत त्या वाळिंब्यासारख्या वांझोट्या चर्चा न करता किती सुंदर काव्यनिर्मिती केली त्यांनी! :)

आमची भांडीवाली बाई सीताबाई, दारुड्या नवर्‍याच्या कथाकहाण्या आणि कप्प्लेन्टी आमच्या मातोश्रीस अगदी चोख व खणखणीत भाषेत कथन करत असते! त्या बिचारीला लिहिता-वाचता येत नसून ती पक्की आंगठेबहाद्दर आहे. पण कुठलिही चर्चा न करता तिचंदेखील मराठी भाषेवर अगदी उत्तम प्रभूत्व आहे असं मी म्हणेन! आणि तुम्ही लेको लांब चेहेरे करून कसल्या चर्चा करत बसलाहात रे?!

छ्या! :)

असो, आज बुधवार असल्यामुळे मी अंमळ कलम १८५ च्या अमलाखाली आहे. उद्या बघतो एकेकाला! :))

आपला,
(भाषाप्रभू) तात्या वाळिंबे.

विकास's picture

29 May 2008 - 12:55 am | विकास

:T अरे काही उतम कथा, काव्य, रसग्रहण, व्यक्तिचित्रण, एखादा उत्तम अनुवाद असं काहीतरी लिहा रे!

L) एकदा कुठल्या भाषेत, कुठले शब्द वापरून, व्याकरण नावाचे प्रकरण कसे वापरावे, संस्कृत प्रचूर शब्द की फारसे नसलेले फार्सी शब्द वापरून अथवा त्यांची पाळेमुळे ठरवून कसे लिहावे हे ठरले की मग आपण सुचवत असलेल्या संदर्भात लिहू... ;)

प्रियाली's picture

29 May 2008 - 1:11 am | प्रियाली

नायतर जा वेलणकरकडे! तिथे सगळे तुटून पडतील भाषा व व्याकरणविषयक चर्चांवर! 'आम्हाला तात्याने तुझ्याकडे पाठवलंय!' असं सांगा हवं तर वेलणकरला

अहो मिसळपावावरचे छुपे मनोगती कोण हे शोधण्यासाठीच अशा चर्चा करत होतो =)) कधी हाकलपट्टी करायची सांगा.

साला ज्याला ज्या भाषेत बोलायचं असेल, जसं बोलायचं असेल तसं तो बोलेल!! भाषा ही कुणाच्या मालकीची नाही! ती प्रत्येकाची आहे! च्यामारी आमच्या बहिणाबाईं जळ्ळ्या कुठे गेल्या होत्या हो भाषाविषयक भसाभसा चर्चा करायला?

हो ना आणि कधी संस्कृतप्रचुर प्रतिशब्द शोधत होत्या असेही ऐकलेले नाही :P

:))

विजुभाऊ's picture

29 May 2008 - 10:41 am | विजुभाऊ

:)) "मिसळपावावरचे छुपे मनोगती " हे कोण नवे नगरवधुसुत आहेत आता? :))

विसोबा खेचर's picture

29 May 2008 - 10:56 am | विसोबा खेचर

एकीकडे शुद्धलेखनाचा आग्रह नको म्हणताना दुसरीकडे मात्र रुळलेल्या फारसी, इंग्रजी शब्दांऐवजी मात्र सहज वापरता न येण्याजोगे शब्द सुचवणे असा विरोधाभास इथे दिसतो.

अहो मालक! हे कदाचित आपणही कबूल कराल की इथे मंडळींनी आपल्या नेहमीच्या सहजसोप्या मराठी भाषेत(मग त्यात काही रुळलेले विंग्रजी शब्द आले तरी चालतील), भाषाशास्त्र, भाषाशुद्धी, व्याकरणाचा कुठलाही आव न आणता, मराठी भाषेची काय ती जबाबदारी आपल्याच डोक्यावर आहे या भ्रमात न राहता लेखन करावं हेच धोरंण पहिल्यापासून अवलंबलं गेलं आहे. यात आपल्याला कुठलाही विरोधाभास दिसत असेल तर ती इतर संस्थळांची लागण समजावी. कृपया मिसळपावच्या माथी असे आरोप करू नयेत..!

१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का?

छ्या! मुळीच नाही!

२) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का?

नाही.

३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का?

नाही, ही मला वेडझवेगिरी वाटते आणि मी ती करत नाही! :)

४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का?

आज्याबात नाय!

५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का?

मी कुठलेही मराठी शब्द सुचवत नाही. जे लहानपणापासून शाळेत, आईबापाकडून, व इतरत्र ऐकत आलेलो आहे तेच मीही वापरतो.

६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? )

एखाद तास. हा प्रश्न मी एकदाच वाचला.

७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय?

नाही! :)

८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का?

शुद्धलेखन? ते काय असतं बॉ? :)

९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का?

शुद्धलेखन? ते काय असतं बॉ? :)

१०) तुम्ही काल घरी फोन केला होता का?

हो! :)

११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का?

हो. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (म्हण्जे आपली येष्टी हो!) माझ्या 'बा'ची नाही! :)

भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल -

भाषाशुद्धी आणि शुद्धलेखन? ते काय असतं बॉ? :)

आपला,
(कातकरी समाजाच्या भाषेत रमणारा!) तात्या.

ॐकार's picture

29 May 2008 - 1:20 pm | ॐकार

उपहासात्मक प्रश्न आपल्याला कळले नसतील असे मला वाटत नाही. मराठी शब्द सुचवा अथवा सावरकरांनी सुचवले म्हणून डोळे बंद करून ते मराठी शब्द वापरा हे दोन्ही उपद्व्याप माझ्या दृष्टीने हास्यास्पदच आहेत.

केवळ सावरकर होते म्हणून आमचा त्यांना पाठिंबा अशी एकंदर पॉलिसी दिसते
हो! काय म्हणणं आहे मग?
तात्या.

ह्या तुमच्या विधानात तुम्ही आत्ता मांडलेल्या मतांशी सुसंगती आहे काय? पूर्वग्रहदूषित वृत्ती आणि नजर सगळ्याच वेबसाईट्स वरच्या सदस्यांत आहे. मिपाही त्याला अपवाद नाही. इतर ठिकाणी विरोधाभास नाही तर अट्टाहास आहे इतकाच काय तो फरक. पूर्वग्रहदूषित वृत्ती नाकारता येत नाही. पण किमान त्यात सुधारणा तरी करता येऊ शकते. मला सावरकरांबद्दल आदर नसता तर मी हे सारे प्रतिसाद तिथेच देऊन विचका करू शकलो असतो. दिलेल्या प्रश्नांतून किमान प्रत्येकाने स्वतःचे मत काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला तरी फार आहे. बिनबुडाचे आरोप करायची मला हौस नाही.

विकास's picture

29 May 2008 - 4:49 pm | विकास

मला सावरकरांबद्दल आदर नसता तर मी हे सारे प्रतिसाद तिथेच देऊन विचका करू शकलो असतो.

हे वाक्य एकदम भावले. :-)

चित्रा's picture

30 May 2008 - 5:23 pm | चित्रा

बराच धुरळा उडून गेलेला दिसतोय. तरी मत नोंदवते!

१) मराठी शब्दांवर केवळ संस्कृत भाषेचाच प्रभाव आहे असे वाटते का? - नाही, फारसी शब्द अनेक आहेत (कदाचित शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीच्या सुमारास वापरात आले असावेत).
२) फारसी किंवा इतर भाषेतील रुळलेल्या शब्दांमुळे अर्थ न समजणे, उच्चार करण्यास न जमणे असे जाणवते का? - नाही. जे शब्द माहिती आहेत त्यामुळे नाही.
३) नेहमीच्या वापरातील कुठला शब्द संस्कृतातून आला, कुठला फारसीतून अथवा कोण्या अन्य भाषेतून आला याचा विचार आपण लिहिता बोलताना करता का? - कधीतरी करते. आवड म्हणून. एकदा बसवर लिहीलेला ___ साबण वापरो असा वाक्यप्रयोग वाचून दचकायला झाले होते!

४) रुळलेल्या शब्दांना ( मग ते शुद्ध असोत अथवा अशुद्ध, स्वभाषेतील असोत अथवा इतर भाषेतून आलेले, मूळ स्वरूपात असोत अथवा अपभ्रंश झालेले) बदलण्याचा 'मोह' खरेच होतो का? - नाही. पण एखाद्या अर्थाच्या जवळपास जाणारे दोन तीन शब्द माहिती असावेत असे वाटते.

५) तुम्ही सुचवलेले अथवा तुम्हाला वाटलेले 'योग्य मराठी शब्द' तुम्ही स्वतः लिहिता बोलताना वापरता का? - हो, वापरते.

६) तुम्ही दररोज किती तास दूरदर्शनसंचावर चलचित्रफिती पाहता? (हा प्रश्न तुम्ही कितीवेळा वाचलात? ) " शून्य तास". एकदाच वाचला.

७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? नाही, पण त्याचे विशेष काही वाटतही नाही. पण दुसर्‍या संदर्भात टायर फुटला असा शब्दप्रयोग ऐकलेला आहे.

८) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय आणि मला शीतकपाटातील (रेफ्रिजरेटर-फ्रिजर- फ्रिज.) गारगार पाणीही नको' या प्रकारात तुम्ही मोडता का? शीतकपाट हा शब्द फ्रीजला प्रतिशब्द म्हणून योग्य नाही . मला इथे सर्किट यांनी सोप्या प्रतिशब्दांचे गुणधर्म सांगणारा एक मस्त लेख लिहीला होता त्याची आठवण झाली. (हल्ली सर्किट कुठे असतात?).

९) 'मला शुद्धलेखनाचा जाच नकोय पण मला फ्रिजमधलं गारगार पाणी हवे आहे' या प्रकारात तुम्ही मोडता का? नाही . शुद्धलेखनाला "शुद्ध" म्हणण्याची गरज नाही, पण काही एक प्रमाण असावे या मताची मी आहे. नियम तोडणे हा स्थायीभाव बनू नये. आणि एकदा नियम तोडणे मान्य केले की मग कुठचेही नियम तोडले तरी चालले पाहिजेत. मग हे चालेल आणि ते नाही असा दुजाभाव नको.

१०) तुम्ही काल घरी फोन केला होता का? होय.

११) तुम्हाला बसचे तिकीट काढावे लागते का? होय.

१२) भाषाशुद्धी आणि शुद्धलेखनाच्या तुमच्या मतांना आणि प्रयत्नांना तुम्ही पुढीलपैकी कुठल्या वर्गात धराल - 'स्वान्तसुखाय', 'हौस' , 'मौज' ,'व्यवहारचातुर्य', 'कळकळ' व्यवहारचातुर्य. मी असे समजते की मी लिहीलेले लोकांना त्रास न होता वाचता आले पाहिजे. तसे झाल्यास मला जे सांगायचे आहे ते ज्यांना वाचता येते अशा जास्तीत जास्त लोकांपर्यंत सहज पोचेल.

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Jun 2008 - 8:08 pm | llपुण्याचे पेशवेll

७) तुमच्या गाडीचे टायर कधी 'योग्य मराठीत' पंक्चर झाले आहे काय? नाही, पण त्याचे विशेष काही वाटतही नाही. पण दुसर्‍या संदर्भात टायर फुटला असा शब्दप्रयोग ऐकलेला आहे.

मी देखील एकदा या संदर्भात टायर भ्रष्ट झाला असे ऐकले होते. त्यावर त्या पोर्‍याला मालकाने सांगितले भ्रष्ट नाही बरष्ट झाला असे म्हणतात.
=))

पुण्याचे पेशवे

गणा मास्तर's picture

2 Jun 2008 - 11:50 am | गणा मास्तर

खुप चर्चा झालीये पण राहवत नाही.
शब्द शुद्ध मराठी आहे, संस्कृतोद्भव आहे की फारसी, अरबीतून आलेला आहे ह्या पेक्षा बोलण्यास सोपा आहे हाच निकष टीकून राहतो.
'भय' हा शब्द साहित्यात आहे. कथा कादंबर्‍यांमधून, कविता, गाण्यातून वाचनात येतो तो जितका आपला वाटतो तितकाच 'भिती' हा बोली शब्दही जास्त वापरला जातो.
पण म्हणून पर्यायी मराठी शब्द शोधूच नये का? तर उत्तर आहे, 'नाही, जरूर शोधावेत. सहज, सोपे असतील तर आवर्जून वापरावेत.'
विजार, सदरा आदी शब्द उच्चारायला, समजायला कठीण होते म्हणून मागे नाही पडले. 'पँट्-शर्ट' हे शब्द वापरण्याची 'फॅशन' आली, हे शब्द 'पुढारलेपणाचे' द्योतक बनले म्हणून विजार, सदरा हे मराठी शब्द मागे पडले. ठीक आहे. काहीही कारणाने मागे पडले तर पडू देत. आता एवढीच काळजी घ्यायची की अशा प्रकार हळूहळू जास्तीतजास्त मराठी शब्द मागे पडून 'इंग्रजी' किंवा इतर शब्द विनाकारण आपल्या भाषेत लुडबुड करणार नाहीत.

या पेठकर काकांच्या मताशी सहमत.
मी पायरीवर बसलो होतो.
नशिबानी इथपर्यंत आलो.
असे सहज बोलता येत असताना उगीच
मी स्टेअरवर बसलो होतो.
डेस्टिनीने इथपर्यंत आलो.
असली विचित्र भाषा वापरणे चुकीचे वाटते.

तळेकर's picture

2 Jun 2008 - 1:58 pm | तळेकर

.

आणि तेही मूळ लेखक/कवी ह्यांच्या नावाचा उल्लेख न करता देणे मिपाच्या धोरणात बसत नाही.
सदरहू लिखाण काढून टाकण्यात येत आहे.
चतुरंग