संपत असताना सारं काही...

फटू's picture
फटू in जे न देखे रवी...
23 May 2008 - 9:45 am

तसं खालील चित्रात विशेष अस काही नाही... गणपतीपुळेच्या समुद्र किना~यावरील हा सूर्यास्त आहे... समुद्र किनारा आणि सूर्यास्त हे दोन्ही आमचे कमकुवत बिंदू असल्यामुळे आम्हाला राहवलं नाही... बास चढवून टाकलं ते चित्र इथे....

कलाआस्वाद

प्रतिक्रिया

ऋचा's picture

23 May 2008 - 9:51 am | ऋचा

अप्रतीम चित्र!!!

चेतन's picture

23 May 2008 - 9:54 am | चेतन

चित्र आणी त्यावर लिहलेल्या ओळीही

धमाल मुलगा's picture

23 May 2008 - 10:19 am | धमाल मुलगा

सतिश भाऊ,

एकदम फर्मास फोटू...

आणि चारोळी पण झकास हो :)

"कुठुन आणली ही स्थितप्रज्ञता
हे तुला विचारायचं राहिलं होतं"

:) छान!

एक (अगाऊ) सुचना: शेवटल्या ओळीत तुला विचारायचंच राहिलं होतं असं जास्त नीट बसु शकेल काय? म्हणजे विचारायला विसरण्याचा इफेक्ट जास्त ठळक दाखवता येइल, नाही?

विसोबा खेचर's picture

23 May 2008 - 1:04 pm | विसोबा खेचर

अप्रतीम चित्र!

'तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देई वचन तुला' या गाण्याची आठवण झाली....!

तात्या.

प्राजु's picture

23 May 2008 - 7:54 pm | प्राजु

सुंदर फोटो. नुकतीच गणपतीपुळ्याची ट्रीप झाली. हा सुर्यास्त पाहिला.. पण तो पाहण्याच्या नादात फोटो काढायचे राहून गेले. आणि जेव्हा लक्षात आले तेव्हा नारयणराव.. आपल्या घरी पोहोचले होते.. त्यांच्या रथाची दोरीच राहिली होती. मग तो फोटो टिपला.
कोई बात नही.. लेट इज बेटर दॅन नेव्हर...

आवांतर : तात्यानी, माझ्या प्रोफाईलमधल्या फोटोचं कॅप्शन ढापलं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

24 May 2008 - 2:16 am | विसोबा खेचर

प्राजू,

तात्यानी, माझ्या प्रोफाईलमधल्या फोटोचं कॅप्शन ढापलं..

मी तुझ्या प्रोफाईलमधलं कॅप्शन खरंच ढापलं नाही. सतीशने टाकलेला फोटू पाहून मलाही याच ओळी सुचल्या म्हणून मी त्या लिहिल्या आहेत. तुझ्या प्रोफाईलमधलं कॅप्शन मी ढापलं असतं तर तुझ्या नावाचा तसा उल्लेख जरूर केला असता, व तिच गोष्ट इथेही कबूल केली असती!

जमल्यास विश्वास ठेव, नायतर राहिलं!

अवांतर - बाय द वे, असा एखादा सुरेख फोटू पाहून "तिन्ही सांजा सखे मिळाल्या" या ओळींची आठवण फक्त तुलाच होते असा जर तुझा दावा असेल तर मग प्रश्नच मिटला!

तात्या.

शितल's picture

24 May 2008 - 2:30 am | शितल

चारोळी आणि फोटो मस्तच.