दोन कविता

अरूण म्हात्रे's picture
अरूण म्हात्रे in जे न देखे रवी...
25 Jul 2011 - 8:50 pm

मज ठाऊक नव्हते

दार कोणते

तुझ्या घराचे

उन्हे वेचण्यासाठी....

मी खूप श्रमाने

दिवस फोडूनी

असाच येतो

लटकत भटकत

उन्ह होउनी

तुझ्या घराच्या काठी......

________________________________

तू पहिल्यांदा भेटलीस

ते दिवसच पावसाळी

की स्वतःबरोबर

आकाश रितं करणारा

हा पाऊस सोबत घेऊन यायची

तुझी जुनी सवय !

काहीच आठवत नाही---

----इतकंच लख्ख जाणवतं

की

कुठूनतरी वीज कोसळली

नि

पागोळ्यांबरोबर खेळण्याचं

माझं वय

जळून गेलं ......

(या माझ्या दोन कविता आधी इतरत्र प्रसिध्द झाल्या आहेत. माझे मित्र रामदास यांनी पदार्पणासाठी काही लिहा अशी सूचना केली तेव्हा ज्या कविता त्या क्षणी आठवल्या त्या लिहून दिल्या .)

कविता

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

25 Jul 2011 - 8:59 pm | श्रावण मोडक

स्वागत!
या दोन कविता मानाव्यात का? कवीनं रचना दोन वेगवेगळ्या वेळेस केल्या, दोन वेगळ्या मनस्थितीत केल्या, दोन वेगळ्या अनुभवांसंदर्भात केल्या... ठीकच. तसं अस्तित्व रचनांचं असू शकतंच. तरीही त्यात सांगड आहे असं का वाटतंय?

अतिशय सुंदर कविता.. खुप खुप मनापासुन आवडल्या.
पुन्हा पुन्हा वाचल्या कविता.
साध्या शब्दात ही खुप उच्च भाव सांगुन जाणारे शब्द.

पहिली कविता विषेश आवडली...
उन्ह वेचण्यासाठी येणारी आवडती मुलगी, दिवस फोडुन येणारे उन (सूर्यकिरण) ह्या कल्पना नविन अआणि तितक्याच लोभस.

असेच लिहित रहा.. वाचत आहे.
आणि हा, दमदार पदार्पण ..

प्राजु's picture

25 Jul 2011 - 11:19 pm | प्राजु

मस्त!! दुसरी खूपच आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jul 2011 - 9:33 am | अत्रुप्त आत्मा

कसं शांत वाटलं...कविता वाचुन,अप्रतिम रचना...