आपले प्रोसेस्सेड पदार्थांचे वाढलेले सेवन आणि दिवसंदिवस कमी खाण्यात येणारा पारंपारिक स्वयंपाक- ह्यानी, हल्ली बऱ्याच व्यक्तींना जीवन सत्व बी १२ च्या डेफिश्यन्सी चा त्रास होतो. ह्या डेफिश्यन्सी ची सगळ्यात आधी आढळून येणारी लक्षणं म्हणजे दम लागणं, छातीत धड धड्ण, चेहरा निस्तेज होणं, अकारण थकवा, चिडचिड होणं इ. बरेचदा अगदी व्यवस्थित सकाळ संध्याकाळ पोळी भाजी आमटी भात- असा आहार असलेल्या व्यक्तींना पण अशी बी १२ ची उणीव होऊ शकते. हे असं का होतं? तेच आज जाणून घेऊया.
आहारात बी १२ ची मात्रा कमी असणे किंवा शरीरात बी १२ कमी शोषले जाण्यानी त्याची उणीव होते. ही उणीव एक गंभीर स्वरूप घेऊन आपल्या शरीरातल्या लाल रक्त पेशींचे प्रमाण कमी करते. परिणामाने बी १२ डेफिश्यन्सी अनिमिया किंवा पर्नीशिय्स अनिमिया होऊ शकतो. ह्या व्यतिरिक्त, बी १२ आपल्या त्वचा, केस, रक्तपेशी, मज्जातंतू आणि बाकी स्वास्थ्यासाठी पण गरजेचे असते.
बी १२ जीवनसत्वाची उणीव एवढी सहजासहजी कशी होऊ शकते? सर्व बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व विद्राव्य असल्यामुळे, रोज शरीरातले अतिरिक्त बी १२ मूत्र मार्गे काढून टाकले जाते. म्हणून रोज आपल्या आहारात हे जीवन सत्व असणे गरजेचे असते. दुसरं कारण म्हणजे, बी १२ जीवनसत्वाचे स्त्रोत. हे जीवनसत्व आपल्याल्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस/ चिकन, अंडी आणि सी फूड (मासे) ह्यातून मिळतं. म्हणून मांसाहारी मंडळींना ह्याची डेफिश्यन्सी सहज होत नाही. शाकाहारी आहारात जर दूध, दही, तक ह्याचे प्रमाण खूप कमी असेल तर बी १२ ची उणीव होऊ शकते. आणि जे विगन आहार( मांस/अंडी/दूध असे कुठलेच पदार्थ नाही) घेतात त्यांना तर फोर्टिफायीड पीठ किंवा विटामिन सप्लीमेन्ट ची गरज असते. शिवाय, ज्यांना सिलीयेक डिसीज किंवा क्रोह्न्स डिसीज झालेला असतो त्यांच्यात पण बी १२ ची उणीव आढळते.
आपल्या शरीरात थोड्या प्रमाणात जीवन सत्व बी १२ साठवून ठेवलेले असते. पण जेव्हा दीर्घ काळ, आहारातून हे जीवनसत्व मिळत नाही, तेव्हा त्याच्या डेफिश्यन्सी ची लक्षणं दिसायला लागतात. ह्यावर उपचार म्हणजे बी १२ जीवनसत्वाची इंजेक्शन घ्यावी लागतात. पण एकदा ही इंजेक्शन घेतली म्हणजे काम झालं- असं नसतं. हा उपचार झाल्यानंतर, रोज कमीतकमी २ ग्लास दूध किंवा त्यापासून बनलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं असतं. म्हणजे पुन्हा अशी उणीव उदभवत नाही.
वाचने
28232
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख
वेळोवेळी
माहितीपूर्ण
नुसत्या मांसाहाराने 'वाट'
In reply to माहितीपूर्ण by चिरोटा
+१
In reply to नुसत्या मांसाहाराने 'वाट' by गवि
माहितीपूर्ण लेख !!
साय ..
In reply to माहितीपूर्ण लेख !! by सूड
साहेब वाटीभर साय .... म्हणजे
In reply to माहितीपूर्ण लेख !! by सूड
अर्थात साखर घालून !!
In reply to साहेब वाटीभर साय .... म्हणजे by इरसाल
हम्म...... चांगली माहिती.
एक शंका
शक्यतो कोणतीही फुड सप्लीमेंट
In reply to एक शंका by सन्जोप राव
याच्या भोगातुन गेलेलो आहे, ५
अमिता, महत्वाचा विषय घेतला
अतिशय चांगली माहिती
अतिशय चांगली माहिती
कोयला चिकन खाल्ले तर
उपयुक्त माहिती
?
बरोबर माहिती आहे
लिव्हर.
In reply to बरोबर माहिती आहे by किशोरअहिरे
उपयुक्त लेख वर आल्याने बरे