प्रथमस्थानात शुक्राचे फलादेश

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in जनातलं, मनातलं
12 Oct 2007 - 10:59 am

लोकहो !!

शुक्रासारखा सौंदर्याचा आणि जगतातील तमाम भौतिक सौख्याचा कारक ग्रह जर कुंडलीत प्रथमस्थानात असेल काय फलादेश मिळतील यासंबंधी हा लेख आहे.

प्रथमातील शुक्र व्यक्तिला उत्तम सौंदर्य देतो. हे लोक दिसायला फार सुंदर असतात. चेहर्‍यावर आकर्षक असे तेज असते. नेहमी आनंदी, हौशी, हसतमुख, खेळकर अशा प्रकारचे यांचे व्यक्तिमत्व असते. कपड्यांची, दागिन्यांची, फॅशनची आवड असते.

ललितकला, गायन, वादन, नृत्य, सिनेमा, नाटके, करमणुकीचे कार्यक्रम ह्या गोष्टी त्यांना फार आवडतात. मुख्य म्हणजे हे लोक या गोष्टींचा उत्तम रसास्वाद घेऊ शकतात. त्यांचे बोलणे गोड आणि लाघवी असते. त्यामुळे त्यांना लोकप्रियता खूप मिळते.

त्यातून ती व्यक्ति एखादी मुलगी असेल तर तिच्यासमोर पायघड्या अंथरणारे किती ’आशिक’ असतील त्याची गणती करता येणार नाही. असे दिवाणे लोक तहानभूक विसरून, तिच्या सेवेत स्वत:ला वाहून घेत असतात.

या लोकांना मित्र उत्तम मिळतात. भाग्याच्या दृष्टीने, वैवाहिक सुखाच्या दृष्टीने हा प्रथमस्थानातला शुक्र चांगली फळे देतो. प्रथमात शुक्र असता विवाह लवकर होतो.

कर्क, वृश्चिक, मीन या जलराशीत शुक्र असेल तर तो व्यक्तिला बोजड करतो. स्त्रियांच्या कुंडलीत प्रथमस्थानात शुक्र चंद्र युती जर जलराशीत असेल तर तो मादक सौंदर्य देतो.

सात्विक सौंदर्य आणि मादक सौंदर्य यात फरक आहे. हेमामालिनी, माधुरी दिक्षितचे सौंदर्य सात्विक आहे तर बिपाशा बसू, मल्लिका शेरावतचे सौंदर्य मादक आहे.

या स्थानातला शुक्र हा मंगळ, हर्षल या ग्रहांच्या युतीत असेल तर तो व्यक्तीला अती कामी व विषयासक्त बनवतो. या लोकांची लैंगिक वासना जबरदस्त असते.

त्याचप्रमाणे मंगळ हर्षल युतीमधील शुक्र विवाहाबद्दल समस्या निर्माण करतो. परजातीत विवाह, आईवडिलांच्या संमती शिवाय विवाह असे काही ना काही वैगुण्य त्या विवाहात असते.

चंद्र, गुरु, आणि रवी या ग्रहांच्या युतीत असलेला शुक्र प्रकर्षाने चांगली फळे देतो.

प्रथमात राहु शुक्र युती ही वयाने मोठ्या असलेल्या, विधवा स्त्रीशी किंवा परजातीय स्त्रीशी विवाह दाखवते. पत्नीला दीर्घ मुदतीचा एखादा आजार असतो.

शुक्र वृषभ, मिथुन, तुला, कुंभ आणि मीनेत असेल तर उत्तम फळे मिळतात. मेष, कन्या, वृश्चिक व मकर राशीत साधारण मध्यम फळे मिळतात. कर्क आणि वृश्चिकेत प्रथमात शुक्र असता व्यभिचाराकडे कल असतो. वाईट व्यसने असतात.

हा शुक्र कलाकौशल्याची कामे, सुंदर वस्तू, लोकांच्या मनोरंजनाची साधने, सौंदर्यप्रसाधने, गायन, वादन, नाटक, सिनेमा या व्यवसायात यश देतो. या शुक्राशी नेपच्यूनचा शुभयोग होत असल्यास दुधात साखर समजावी.

अग्निराशीचा म्हणजे मेष, सिंह, धनु या राशीचा शुक्र नोकरीधंदा सुरळीत चालवतो पण फार कष्टाने पुढे यावे लागते. मकरेतील शुक्र स्थिर नोकरी देतो. कर्क, वृश्चिक राशीत शुक्र असणारे लोक वारंवार धंदे बदलतात. कन्येचा शुक्र असता विवाहानंतर भाग्योदय होतो.

लग्नी मीनेचा शुक्र असता, २/३ विवाह होतात. ते झाले तर पैसा चांगला हाती येतो. अन्यथा एकच विवाह झाला तर खाऊनपिऊन सुखी अशी स्थिती असते. लग्नी गुरू शुक्र युती भाग्योदयास विलंब लावते.

प्रथमस्थानी मकर, कर्क, सिंह राशीचा शुक्र असता पत्नी चांगली मिळते. नवर्‍याला अडीअडचणीला साथ देणारी, आपत्तीविपत्तीला टिकणारी असते. तिचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. पण मकरेतील शुक्र बायको काळीसावळी देतो.

स्त्रियांचे कुंडलीत लग्नी शुक्र राहु युती असून त्यावर मंगळ, हर्षल यांचा अशुभ योग होत असेल तर विवाहापूर्वी प्रेमसंबंध जुळून प्रियकराबरोबर पळून जाण्याचा योग येतो. विवाह धार्मिक अगर कायदेशीर होणार नाही.

याच स्थितीत मंगळ हर्षल ऐवजी रवीचा अशुभ योग असेल तर स्त्री पळून जरी गेली तरी कायदेशीर अगर धर्मशास्त्राप्रमाणे विवाह होईल.

अग्निराशीचा शुक्र असता ( मेष, सिंह, धनु) विवाहयोग उशीरा असतो. स्त्री चांगली मिळून नवराबायकोत प्रेमळपणा असतो.

कन्येत शुक्र असता स्त्री कशीही मिळाली तरी चालते. तिच्याशी जमवून घेतात. हे लोक परस्त्रीकडे न पाहणारे असतात. स्त्रियांचा विचार यांच्या मनात कमी असतो. अविवाहित राहण्याकडे कल अगर प्रपंच सोडण्याची भाषा करणारे असतात.

मकरेत शुक्र असता विवाहापूर्वी पुष्कळ मुली पाहतात व या ना त्या कारणाने नावे ठेवित बसतात. पुष्कळ सुंदर मुली सोडतात आणि मग मुली सांगून येणे कमी झाले म्हणजे मिळेल त्या चिचुंद्रीशी लग्न करतात. मकरेचा शुक्र असलेल्यांना काळीसावळी बायको मिळते हे वर सांगितले आहेच.

मिथुन, तुळ आणि कुंभेचा शुक्र असता स्त्री चांगली मिळते. प्रेमळ, बुध्दीवान, हुषार, विद्वान असते. पण द्विभार्या योगाचा संभव अधिक.

मीनेत शुक्र असता २/३ विवाह होतात हे पूर्वी सांगितले आहेच. या लोकांचे बायकोवर प्रेम असते पण तिच्याबरोबर घटका, दोन घटका गप्पा मारत बसणारे हे लोक नव्हेत. बाहेरून आल्यावर मुलांच्या बरोबर गप्पा मारतील किंवा घरात आजूबाजूचे रिकामटेकडे लोक जमवून करमणूक करीत बसतील. त्यामुळे घरात धुसफूस असते.

मीनेचा शुक्र असलेल्या पुरूषाला बायकोकडून धन मिळविण्याची अपेक्षा असते. बायकोवर वर्चस्व ठेवणारे हे लोक असतात.

स्त्री कुंडलीत प्रथमात मीनेचा शुक्र असता ती नवर्‍याला आपल्या ताब्यात ठेवणारी, रतिसुखाचा पूर्णपणे उपभोग घेणारी, नवर्‍याला बिछान्यात भयंकर खेळवणारी, संभोगात स्वत: होऊन पुढाकार घेणारी, निरनिराळी आसने उपयोगात आणणारी, वैषयिक सौख्यात परब्रह्म मानणारी, लैंगिक वाङ्मय वाचण्याची आवड असलेली, प्रवासात लाभ करून घेणारी, वाहनांची शौकीन, तल्लख बुध्दी असणारी असते.

या व्यक्तींना जोडीदाराचे खौख्य भरपूर मिळते. पण यांचा जोडिदार अतिशय बडबड्या म्हणजे ज्याला "नॉनस्टॉप नॉनसेन्स" म्हणता येईल असा व अतिचिकित्सक वृत्तीचा असतो. त्यामुळे क्वचितप्रसंगी प्रेमाचे खटके उडण्याची शक्यता असते.

कन्येचा शुक्र लग्नी असता कुटुंब भरभराटीस आलेले असते पण एकमेकांचे न पटण्याचे योग येतात. कर्तबगारीला कुटुंबातील माणसांचाच अडथळा होतो. पण शेवटी यश मिळते. भाग्याला चढउतार असल्याने घाबरेपणा असतो. आकस्मिक संकटे, पति किंवा पत्नी दुखण्याने पीडित, पैशाची अब्रू जाते की काय ही भीति, कोणाला जामिन राहिले असतील तर तेथे फसण्याची शक्यता असे योग वरचेवर येतात. पण अखेरच्या क्षणी बचाव होतो.

स्वत:पेक्षा विद्वान व मुत्सद्दी जोडीदार मिळण्याचा योग व त्याच्या तंत्रानुसार पुढील आयुष्य जगण्याची शक्यता. या लोकांना वैषयिक सौख्य मनाप्रमाणे मिळत नाही.

या लोकांना वीर्यदोष असण्याची दाट शक्यता असते. त्याचप्रमाणे कान, नाक, डोळे यांची दुखणी असतात. कन्या लग्नाला शुक्र योगकारक असल्याने तो नीचेचा होऊनही हे लोक बचावतात. धार्मिक मते आपल्या मनाप्रमाणे फिरवणारी ही माणसे असतात. शरीराची ठेवण ओबडधोबड असते.

हे लोक कायम अशांत असतात. प्रत्येक गोष्टीत त्यांना अडथळे येतात, स्वप्ने फार पडतात. वडिलार्जित इस्टेट असूनही त्याचा लाभ यांना मिळण्यासाठी फार झगडावे लागते. मेंदूची दुखणी होण्याची शक्यता खूप असते.

लग्नात वृषभ, तूळ, मीन, मेष, वृश्चिक राशीचा शुक्र असता दीर्घायू योग होतो. लग्नी शुक्र असता वयाच्या ३ किंवा १५ व्या वर्षी घरातल्या जबाबदार व्यक्तिचा मृत्यूयोग येतो.

प्रथमस्थानच्या शुक्राबद्दल अजूनही लिहीण्यासारखे खूप आहे. पण हा लेख फारच मोठा झाल्या असल्याने इथेच थांबतो.

आपला,
(ज्योतिर्भास्कर) धोंडोपंत

(वरील लेखनासाठी फलज्योतिषातील विविध मान्यताप्राप्त ग्रंथांचा आधार घेण्यात आला आहे.)

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

गुंडोपंत's picture

12 Oct 2007 - 12:31 pm | गुंडोपंत

लेख आवडला!
शुक्रासारख्या तेजस्वी ग्रहाचे वर्चस्व असलेल्या लोकांबरोबर असणे म्हणजे
कला नि आस्वाद यांचे तेज सदैव मिळते असे वाटते.

शुक्राचा एकुण आवाका खरंच मोठा आहे पण
आपण उत्कृष्ठरित्या बरेचसे भाग यात समावले आहेत असे वाटते.

पुढील लेखा साठी उत्सुक आहे.
आपला
गुंडोपंत

सर्किट's picture

12 Oct 2007 - 12:34 pm | सर्किट (not verified)

शुक्रासारख्या तेजस्वी ग्रहाचे वर्चस्व असलेल्या लोकांबरोबर असणे म्हणजे
कला नि आस्वाद यांचे तेज सदैव मिळते असे वाटते.

तरीच माझ्या मिसळ्पावावरील सहवासाने तुम्ही तेजःपुंज झाला आहात, गुंडोपंत !!

आणि हो, पहिल्या स्थानात शुक्र असल्याने मी मादकही आहे, असे लोक म्हणतात ;-)

- सर्किट

गुंडोपंत's picture

12 Oct 2007 - 3:54 pm | गुंडोपंत

तरीच माझ्या मिसळ्पावावरील सहवासाने तुम्ही तेजःपुंज झाला आहात, गुंडोपंत !!

म्हणजे तुम्ही शुक्र आहात तर... :))

आणि हो, पहिल्या स्थानात शुक्र असल्याने मी मादकही आहे, असे लोक म्हणतात ;-)

नुसता पहिल्या स्थानात शुक्र आहे म्हणून मादक? वर वाचा की शुक्र मादक कधी होतो ते!
शिवाय शुक्र बिघडला तर व्यसनीपणा व इतर 'छंदफंदही' देतो हे लक्षात असू देत.

आपला
गुंडोपंत

सर्किट's picture

12 Oct 2007 - 10:26 pm | सर्किट (not verified)

अगदी बरोबर ! मग आमचा शुक्र बिघडलाच आहे असे दिसते :-) (पण इतका नसावा. कारण अजून 'छंदफंदांची' वेळ आली नाही. आता ह्या वयात येईल असेही वाटत नाही.)
पण ह्या शुक्राला ताळ्यावर आणणे अत्यावश्यक आहे.

- सर्किट

विसोबा खेचर's picture

12 Oct 2007 - 4:14 pm | विसोबा खेचर

चांगला लेख लिहिला आहेस रे..

औरभी जरूर लिख्खो...

तुझा,
तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

12 Oct 2007 - 4:33 pm | प्रकाश घाटपांडे

लेखकाचे मनोगत

''तू ज्योतिषाचा कोर्स कुठं केला?`` असा एक प्रश्न मला हमखास विचारला जातो. पण मी कुठंही कोर्स केला नाही. हे सांगितलं तर त्यांना पटत नाही. या विषयातले ग्रंथ,लेख, व्याख्यानं, चर्चासत्र, अधिवेशन आणि आपली शिकण्याची इच्छा हेच आमचे गुरु. या विषयांत मी जातक, विद्यार्थी, अभ्यासक, समर्थक, ज्योतिषी, चिकित्सक अशा सर्व पातळयांवर अनुभव घेतले.
भविष्याविषयी उत्कंठा असणं ही अत्यंत स्वाभाविक आहे. केवळ उत्कंठे साठी ज्योतिषाकडे येणारी माणसे कमी व अडचणीत आहे, संकटात आहे म्हणून मार्गदर्शनासाठी येणारी माणसेच जास्त. मनुष्य अडचणीत असला की चिकित्सा वगैरे असल्या भानगडीत तो पडत नाही. साहजिकच श्रद्धा हाच भाग मग जोपासला जातो. आपल्या धर्मामध्ये चिकित्सेला मोठी परंपरा आहे. फलज्योतिषात विविध मतप्रवाह आहेत. पण तरीही ज्योतिष विषयाला एक गूढ वलय प्राप्त झालेले आहे. तोडगे,यंत्र, मंत्रतंत्र, दैवी उपाय, सिद्धी, उपासना या गोष्टी ज्योतिषापासून वेगळया करता आलेल्या नाहीत.
ज्योतिषी आणि जातक यांच नातं हे आपल्याकडे डॉक्टर आणि रुग्णा सारखं आहे. तिथ अपेक्षा असते समीक्षा नसते. ज्योतिषाविषयी विविध क्षेत्रातल्या लोकांची मते अजमावण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. परिवर्तनवादी चळवळीतल्या लोकांना जेव्हा आपला ज्योतिषावर विश्वास आहे का? असा प्रश्न विचारतो तेव्हा तो त्यांना अडचणीचा वाटतो. '' आमचा तसा विश्वास नाही. पण .......`` '' आपला त्यातला काही अभ्यास नाही.`` पण त्या विषयाच्या अंतरंगात डोकवावे असे काही वाटत नाही. ज्योतिष हा विषय सोपा करुन सांगावा असं खूप दिवस मनात होतं. पण कितीही सोपं केलं तरी ते लोकांना अवघडच वाटत राहीलं. मग हा विषय लोकांच्याच मनातल्या प्रश्नांमधून मांडला तर? असं मनात आल्यावर त्या चष्म्यातून उत्तरे शोधू लागलो आणि या पुस्तकाचा जन्म झाला.
माझे जेष्ठ स्नेही श्री. माधव रिसबूड यांचेशी वेळोवेळी होणारी अनौपचारीक चर्चा हा तर या पुस्तकाचा पाया आहे. ग्रहांकित मासिकाचे संपादक मा. चंद्रकांतजी शेवाळे उर्फ दादा यांचेशी गप्पा मारताना त्यांनी मर्मावर अचूक बोट ठेवले. ते म्हणाले, '' सर्वसामान्य माणसाला ज्योतिषाकडे जावंस वाटाव अशीच इथली सामाजिक परिस्थिती आहे. ती जेव्हा बदलेल त्या वेळी ज्योतिषाकडे जाणारा वर्ग आपोआप कमी होईल.``
हे पुस्तक चिकित्सकांनी सर्वसामान्य माणसांच्या चष्म्यातून वाचावे, सर्वसामान्य माणसांनी चिकित्सकांच्या चष्म्यातून वाचावे आणि ज्योतिषांनी अंतर्मुख होउन वाचावे असं अपेक्षित आहे.

प्रकाश घाटपांडे

abhijit deshpande's picture

12 Oct 2007 - 4:44 pm | abhijit deshpande

आपला लेख वाचला. त्यातुन मला पन माझ्या राशि विशयी जानन्याचि इछा आहे. माझि रास व्रुशभ आहे. तर आपन त्याव्इशयी काहि सान्गु शकाल का?

धोंडोपंत's picture

14 Oct 2007 - 2:23 pm | धोंडोपंत

प्रतिक्रिया / अभिप्राय दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार.

आपला,
(आभारी) धोंडोपंत

घाटपांडेसाहेब,

आपले मनोगत खूप चांगले आहे, योग्य आहे. मानवी जीवनातील आजचे बिकट आणि जाचक अनुभव माणसाला ज्योतिष विषयाकडे / ज्योतिषाकडे नेतात.

रस्त्यात खड्ड्यात पडलेल्या माणसाला चालते करणे हे ज्योतिषाचे काम आहे, त्याला नको ते वाईट सांगून चालत्या माणसाला खड्ड्यात घालणे नव्हे, हे सर्व ज्योतिषांनी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.

या दृष्टीने याचा वापर केला तर ज्योतिषाच्या माध्यमातून positive reinforcement and motivation या दोन गोष्टींमुळे माणसाचे जीवन समृद्ध करण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करणे हे किमान मी तरी माझे ज्योतिषविषयातील कर्तव्य मानतो.

चेहरा रौशन हुआ तो क्या हासिल ?
दिल हो रौशन तो कोई बात भी है ||

आपला,
(दीप्तिमान) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

गुंडोपंत's picture

9 Dec 2010 - 5:07 am | गुंडोपंत

अचानक हा जुना चांगला लेख हाती लागला.
वाचायला मजा आली!
अजून असे लेख आणि चर्चा याव्यात!

कवितानागेश's picture

9 Dec 2010 - 10:14 am | कवितानागेश

या लेखात अतिशय ठोक (म्हणूनच चुकी्ची!)अनुमाने आहेत.
या अशा अनुमानांमुळेच ज्योतिषशास्त्राचे नुकसान होते.
प्रथम स्थानात शुक्र असूनही लग्नातून हाल होऊ शकतात, किंवा माणसे रडकी/चिडकी असू शकतात.
साधारणतः कुठलाही ग्रह आपल्या 'उच्च' राशीत आपले 'चांगले' (म्हणजे उपकारक) गुण प्रकट करतो ( कुणाच्याही दृष्टीत नसताना ).
मीन ही गुरुची रास असल्याने तिथे शुक्र 'दन्गा' करत नाहे, उलट आपले अध्यत्मिक रंग दाखवतो.
मीनेच्या शुक्राची जी 'लक्षणे' सांगितली अहेत ती वस्तविक, तूळ्/वृषभेच्या बिघडलेल्या शुक्राला लागू पडतात.
पण अनेक शतकांपसून अनेक ज्योतिषी या गुंतागुंतीच्या विषयाचा नीट अभ्यास न करता काही 'ठोकताळे' तयार करून या शास्त्राचा जोक बनवत आहेत.

गुंडोपंत's picture

9 Dec 2010 - 10:40 am | गुंडोपंत

मतांतरे:

तुम्ही म्हणता ते खरे आहे.
या शिवाय शुक्र केंद्रात असेल तर त्याला केंद्राधिपत्य दोषही लघु पाराशरी सांगते. (जो गुरू ला ही लागू आहे असेही म्हंटले आहे.)
श्लोक -
केंद्राधिपत्यदोषस्तु बलवान गूरूशुक्रयो:
मारकत्वेपिच तयोर्मारकस्थान्संस्थिति: ||१०||

पण त्याच वेळी केंद्राधीपति आणि त्रिकोणाधिपति परस्पर संबंधाने विशेष शुभ फलदायी होतात असेही म्हंटले आहे. (श्लोक ||१४||) ही विधाने एकमेकांचे खंडन करतात.
त्यामुळे नक्की काय मानावे यात तफावत ही कायमचीच आहे.
तनुस्थानी शुक्र आणि सप्तमात मंगळ यावर अधिक चर्चा करायला आवडेल.

विजुभाऊ's picture

8 Mar 2011 - 4:32 pm | विजुभाऊ

काही समजले नाही

गुंडोपंत's picture

9 Mar 2011 - 8:28 am | गुंडोपंत

ठीक! वेळ येताच समजेल.

योगप्रभू's picture

9 Dec 2010 - 11:34 am | योगप्रभू

पत्रिकेत कोणत्याही स्थानी मंगळ-शुक्र युती असेल तरी जातकाला भिन्नलिंगिय जोडीदाराचे प्रबळ आकर्षण असते. जर या दोन्ही ग्रहांवर चंद्र आणि गुरुसारख्या शुभ ग्रहांची दृष्टी असेल किंवा युतीस्थानीच शुभग्रह असेल तर अशा जातकावर भावनिक व नैतिक नियंत्रण राहते. अन्यथा घरातून पळून जाऊन लग्न करण्यापासून ते विवाहबाह्य संबंधांपर्यंत अनेक लक्षणे अनुभवास येतात.

एकटा असेल तर शुक्र शुभग्रह आहे. पण त्याच्या संगतीत पापग्रह आले, की त्याचे एक एक रंगढंग दिसायला सुरवात होते. शुक्र हा कला, रसिकत्व, हौसमौज, विलासीपणा, विषयसुख यांचे निदर्शक आहे. प्रसाधने व त्यांचा व्यापार करणार्‍यांवर शुक्राचा अंमल असतो. शुक्रप्रधान व्यक्तीला प्रसाधनांची आवड व सखोल माहिती असतेच, पण त्यातही सुगंधांचे (सेंट) आकर्षण व नियमित वापर करण्याची सवय असते. बिघडलेला शुक्र मद्यपानाचे अतिरिक्त व्यसन, शरीर संबंधांतून निर्माण होणारे रोग यांची देणगी देतो. शिवाय अशा व्यक्ती 'कामातुराणां न भयं, न लज्जा' अशा गटातील असतात.

शुक्र हा रुपाने गूढ ग्रह आहे. त्यावर वायूचे धुक्यासम दाट आवरण आहे. शुक्रप्रधान व्यक्तीच्या जीवनातील अनेक गूढ पदर सहजपणे उलगडून येत नाहीत. शुक्राशी नेपच्यूनची युती म्हणजे गूढतेत भर. नेपच्यून (वरुण) हा जलग्रह असून समुद्राचा अधिपती आहे. त्यामुळे शुक्र-नेपच्यून युती म्हणजे जणू समुद्रातील दाट धुके. अशी युती पत्रिकेत असेल तर जातकाला स्वप्नसंदेश मिळतात. आगामी घटनांचे पूर्वसंकेत मिळतात. पण युतीच्या गुणधर्मानुसार स्वप्नेही गूढ असतात व त्यातही विशेषकरुन पाणी, जलाशय हमखास दिसतात.

लग्नस्थानी शुक्र असेल तर त्याची दृष्टी सातव्या स्थानावर पडल्याने जोडीदारही दिसायला सुरेख असतो. हे दांपत्य समाजात छाप पाडते.

(थोडा पांचटपणा. आधीच माफी मागतो)
मंगळ आणि शुक्र यांच्यात नैसर्गिक आकर्षण असते. सुखी संसार, प्रणय आणि चिरंतन उत्कट प्रेमासाठी ते चांगलेच असते. बलवान मंगळाला निर्दोष शुक्राची साथ असली की मग रसिकतेला बहरच येतो. अशी जोडी सकाळी उठणारच मुळी दहानंतर :डोमा:

मी ऐकलेल्या माहिती नुसार मंगळ असलेल्या मुली सेक्षुअली डॉमिनेटिंग असतात अ‍ॅग्रेसिव्ह असतात पझेसिव्ह असतात त्यामुळे त्यांना मुलगाही मंगळावरचा लागतो. हे खरे आहे काय ?

कॄपया समाधान करावे.

बाकी ग्रहतारे एवढ्या करोडो - अरबो मणुष्यांचा डेटाबेस मेंटेन करुन कशा प्रकारे सगळ्यांचा स्वभाव नियंत्रित करतात हे मला आजवर न उकललेले कोडे आहे.

योगप्रभू's picture

9 Dec 2010 - 1:15 pm | योगप्रभू

खरे तर धागा प्रथमस्थानातील शुक्रासंदर्भात असताना मंगळाच्या फलाबाबत चर्चा वेगळ्या वळणाकडे नेणारी ठरु शकेल. म्हणून लेखकाची प्रथमच माफी मागतो.

टारझन,
मंगळ असलेली प्रत्येक व्यक्ती सेक्शुअली डॉमिनेटिंग असतेच असे नाही. याबाबतीत एकच एक ढोबळ विचार करुन चालत नाही, तर पत्रिकेतील ग्रहांची स्थाने व अंशात्मक युत्या यांचाही सूक्ष्म विचार करावा लागतो. तरी काही ठोकताळे नमूद करतो.

पत्रिकेत मंगळ हा स्वतःच्या मेष व वृश्चिक या राशीत असेल तर तो तेथे बलवान असतो. अशा व्यक्तींची वासना प्रबळ असते आणि ती नि:संशय डॉमिनेटिंग असते. पण मंगळासोबत कोणत्या ग्रहाची युती आहे यावरही लैंगिक वर्तन अवलंबून असते. चंद्र व गुरु असे शुभ ग्रह असतील तर अशी व्यक्ती बेफाम आणि वासनापीडित होत नाही. त्यांच्यावर नैतिक अंकुश राहतो. जोडीदाराबाबत समानतेची भूमिका असते. (यात चंद्रापेक्षा गुरू महत्त्वाची भूमिका बजावतो.) मंगळाबरोबर शुक्र असेल तर सतत प्रणय व उपभोगाचे विचार मनात असतात, पण तिथेच रवीसारखा उग्र ग्रह असेल तर अशा व्यक्ती बलात्काराने सुख मिळवायलाही मागे पुढे पाहात नाहीत. वृश्चिक राशीत चंद्र नीचेचा होत असल्याने तेथे तो मंगळासमवेत असेल तर विषयविचार खालच्या दर्जाचे असतात. बुध हा नपुंसक आणि शनी म्हातारा असल्याने ते मंगळासोबत असतील तर अशी व्यक्ती केवळ बोलण्यातच अश्लील असते. प्रत्यक्ष कृती हातून होत नाही.

जाणकार मंगळावरच्या धाग्यात अधिक मार्गदर्शन करतीलच.

टारझन's picture

9 Dec 2010 - 1:35 pm | टारझन

धन्यवाद योगप्रभु !! भविष्यावर माझा दृढ विश्वास नसला तरी ह्या विषयात कुतुहल फार आहे ;) म्हणुन शंका विचारली होती. तशी शंका ही आमच्या राशीलाच आहे :)

समांतर : वृष्चिक राशीत चंद्र मंगळाजवळ असलेले ३-४ जालिय चेहरे डोळ्यांनमोर तरळुन गेले ;)

शैलेन्द्र's picture

9 Dec 2010 - 1:44 pm | शैलेन्द्र

"कॄपया समाधान करावे."

बाप्पो

गुंडोपंत's picture

10 Dec 2010 - 3:30 am | गुंडोपंत

मस्त विवेचन केलेत.

लग्नस्थानी शुक्र असेल तर त्याची दृष्टी सातव्या स्थानावर पडल्याने जोडीदारही दिसायला सुरेख असतो. हे दांपत्य समाजात छाप पाडते.
यामध्ये नक्षत्र विचारही व्हावा. अन्यथा असे दिसत नाही.

योगप्रभू's picture

10 Dec 2010 - 11:10 am | योगप्रभू

गुंडोपंतांच्या मुद्याशी सहमत आहे.
अधोरेखित विधान हा शुक्रप्रभावाचा एक ढोबळ ठोकताळा आहे. तो प्रत्येक वेळी १०० टक्के सिद्धच होईल असे नाही. ती फळे सूक्ष्मात समजून घेण्यासाठी केवळ नक्षत्रच नव्हे, तर लग्नराशी, ग्रहांच्या दृष्ट्या, अंशात्मक युत्या हेही पाहावे लागते.

शुचि's picture

9 Feb 2013 - 4:24 am | शुचि

शुक्र-नेपच्यून युती म्हणजे जणू समुद्रातील दाट धुके. अशी युती पत्रिकेत असेल तर जातकाला स्वप्नसंदेश मिळतात. आगामी घटनांचे पूर्वसंकेत मिळतात. पण युतीच्या गुणधर्मानुसार स्वप्नेही गूढ असतात व त्यातही विशेषकरुन पाणी, जलाशय हमखास दिसतात.

वा! सुरेख योगप्रभू!!! हे अगदी १००% खरे आहे.

अमोल केळकर's picture

9 Dec 2010 - 11:43 am | अमोल केळकर

अरे वा जुन्या, नव्या जोतिषांकडून असेच मार्गदर्शन मिळत राहो हिच या निमित्याने इच्छा व्यक्त करतो. :)

अमोल केळकर

ओ धोंडोपंत, मकरेचा शुक्र अष्टमात असेल तर काय फळ आहे हो ??

मलाही याचे उत्तर हवे आहे. जवळच्या एका व्यक्तीच्या कुंडलीत असा शुक्र आहे.

शैलेन्द्र's picture

9 Dec 2010 - 1:47 pm | शैलेन्द्र

कुठला ग्रह कुठे असेल तर डाळींब फळ देतो? डाळींब जाम महाग झालीत हल्ली.........

मिसळभोक्ता's picture

10 Dec 2010 - 2:27 pm | मिसळभोक्ता

साला टार्‍या परत आला, आता धोंडोपंतांनीच काय घोडे मारले, म्हणतो मी ! येऊ दे त्यांना पण, मजा येईल.

मस्त. धोंडोपंतांचे लेख मिस करते :(

योगप्रभूंनी खूप मार्गदर्शन केले आहे की या धाग्यावर. बरं झालं हा धागा परत वाचला.

लग्नी शुक्र व्यक्ति :छांदिष्ट असते आणि व्यवहारी नसते ?इमानी असते .शिवणकाम .बागकाम करेल.देवधर्म कर्मकांडापासून दूर .शिक्षक ,अधिकारी यांच्याशी फटकून तर कलाकारा कारागिरांशी मैत्री .

हा तुमच्या जाहीराती चा एक भाग आहे का ?

हा तुमच्या जाहीराती चा एक भाग आहे का ?