लेख आवडला!
शुक्रासारख्या तेजस्वी ग्रहाचे वर्चस्व असलेल्या लोकांबरोबर असणे म्हणजे
कला नि आस्वाद यांचे तेज सदैव मिळते असे वाटते.
शुक्राचा एकुण आवाका खरंच मोठा आहे पण
आपण उत्कृष्ठरित्या बरेचसे भाग यात समावले आहेत असे वाटते.
पुढील लेखा साठी उत्सुक आहे.
आपला
गुंडोपंत
शुक्रासारख्या तेजस्वी ग्रहाचे वर्चस्व असलेल्या लोकांबरोबर असणे म्हणजे
कला नि आस्वाद यांचे तेज सदैव मिळते असे वाटते.
तरीच माझ्या मिसळ्पावावरील सहवासाने तुम्ही तेजःपुंज झाला आहात, गुंडोपंत !!
आणि हो, पहिल्या स्थानात शुक्र असल्याने मी मादकही आहे, असे लोक म्हणतात ;-)
- सर्किट
तरीच माझ्या मिसळ्पावावरील सहवासाने तुम्ही तेजःपुंज झाला आहात, गुंडोपंत !!
म्हणजे तुम्ही शुक्र आहात तर... :))
आणि हो, पहिल्या स्थानात शुक्र असल्याने मी मादकही आहे, असे लोक म्हणतात ;-)
नुसता पहिल्या स्थानात शुक्र आहे म्हणून मादक? वर वाचा की शुक्र मादक कधी होतो ते!
शिवाय शुक्र बिघडला तर व्यसनीपणा व इतर 'छंदफंदही' देतो हे लक्षात असू देत.
आपला
गुंडोपंत
अगदी बरोबर ! मग आमचा शुक्र बिघडलाच आहे असे दिसते :-) (पण इतका नसावा. कारण अजून 'छंदफंदांची' वेळ आली नाही. आता ह्या वयात येईल असेही वाटत नाही.)
पण ह्या शुक्राला ताळ्यावर आणणे अत्यावश्यक आहे.
- सर्किट
लेखकाचे मनोगत
''तू ज्योतिषाचा कोर्स कुठं केला?`` असा एक प्रश्न मला हमखास विचारला जातो. पण मी कुठंही कोर्स केला नाही. हे सांगितलं तर त्यांना पटत नाही. या विषयातले ग्रंथ,लेख, व्याख्यानं, चर्चासत्र, अधिवेशन आणि आपली शिकण्याची इच्छा हेच आमचे गुरु. या विषयांत मी जातक, विद्यार्थी, अभ्यासक, समर्थक, ज्योतिषी, चिकित्सक अशा सर्व पातळयांवर अनुभव घेतले.
भविष्याविषयी उत्कंठा असणं ही अत्यंत स्वाभाविक आहे. केवळ उत्कंठे साठी ज्योतिषाकडे येणारी माणसे कमी व अडचणीत आहे, संकटात आहे म्हणून मार्गदर्शनासाठी येणारी माणसेच जास्त. मनुष्य अडचणीत असला की चिकित्सा वगैरे असल्या भानगडीत तो पडत नाही. साहजिकच श्रद्धा हाच भाग मग जोपासला जातो. आपल्या धर्मामध्ये चिकित्सेला मोठी परंपरा आहे. फलज्योतिषात विविध मतप्रवाह आहेत. पण तरीही ज्योतिष विषयाला एक गूढ वलय प्राप्त झालेले आहे. तोडगे,यंत्र, मंत्रतंत्र, दैवी उपाय, सिद्धी, उपासना या गोष्टी ज्योतिषापासून वेगळया करता आलेल्या नाहीत.
ज्योतिषी आणि जातक यांच नातं हे आपल्याकडे डॉक्टर आणि रुग्णा सारखं आहे. तिथ अपेक्षा असते समीक्षा नसते. ज्योतिषाविषयी विविध क्षेत्रातल्या लोकांची मते अजमावण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. परिवर्तनवादी चळवळीतल्या लोकांना जेव्हा आपला ज्योतिषावर विश्वास आहे का? असा प्रश्न विचारतो तेव्हा तो त्यांना अडचणीचा वाटतो. '' आमचा तसा विश्वास नाही. पण .......`` '' आपला त्यातला काही अभ्यास नाही.`` पण त्या विषयाच्या अंतरंगात डोकवावे असे काही वाटत नाही. ज्योतिष हा विषय सोपा करुन सांगावा असं खूप दिवस मनात होतं. पण कितीही सोपं केलं तरी ते लोकांना अवघडच वाटत राहीलं. मग हा विषय लोकांच्याच मनातल्या प्रश्नांमधून मांडला तर? असं मनात आल्यावर त्या चष्म्यातून उत्तरे शोधू लागलो आणि या पुस्तकाचा जन्म झाला.
माझे जेष्ठ स्नेही श्री. माधव रिसबूड यांचेशी वेळोवेळी होणारी अनौपचारीक चर्चा हा तर या पुस्तकाचा पाया आहे. ग्रहांकित मासिकाचे संपादक मा. चंद्रकांतजी शेवाळे उर्फ दादा यांचेशी गप्पा मारताना त्यांनी मर्मावर अचूक बोट ठेवले. ते म्हणाले, '' सर्वसामान्य माणसाला ज्योतिषाकडे जावंस वाटाव अशीच इथली सामाजिक परिस्थिती आहे. ती जेव्हा बदलेल त्या वेळी ज्योतिषाकडे जाणारा वर्ग आपोआप कमी होईल.``
हे पुस्तक चिकित्सकांनी सर्वसामान्य माणसांच्या चष्म्यातून वाचावे, सर्वसामान्य माणसांनी चिकित्सकांच्या चष्म्यातून वाचावे आणि ज्योतिषांनी अंतर्मुख होउन वाचावे असं अपेक्षित आहे.
प्रकाश घाटपांडे
प्रतिक्रिया / अभिप्राय दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार.
आपला,
(आभारी) धोंडोपंत
घाटपांडेसाहेब,
आपले मनोगत खूप चांगले आहे, योग्य आहे. मानवी जीवनातील आजचे बिकट आणि जाचक अनुभव माणसाला ज्योतिष विषयाकडे / ज्योतिषाकडे नेतात.
रस्त्यात खड्ड्यात पडलेल्या माणसाला चालते करणे हे ज्योतिषाचे काम आहे, त्याला नको ते वाईट सांगून चालत्या माणसाला खड्ड्यात घालणे नव्हे, हे सर्व ज्योतिषांनी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.
या दृष्टीने याचा वापर केला तर ज्योतिषाच्या माध्यमातून positive reinforcement and motivation या दोन गोष्टींमुळे माणसाचे जीवन समृद्ध करण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करणे हे किमान मी तरी माझे ज्योतिषविषयातील कर्तव्य मानतो.
चेहरा रौशन हुआ तो क्या हासिल ?
दिल हो रौशन तो कोई बात भी है ||
आपला,
(दीप्तिमान) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
या लेखात अतिशय ठोक (म्हणूनच चुकी्ची!)अनुमाने आहेत.
या अशा अनुमानांमुळेच ज्योतिषशास्त्राचे नुकसान होते.
प्रथम स्थानात शुक्र असूनही लग्नातून हाल होऊ शकतात, किंवा माणसे रडकी/चिडकी असू शकतात.
साधारणतः कुठलाही ग्रह आपल्या 'उच्च' राशीत आपले 'चांगले' (म्हणजे उपकारक) गुण प्रकट करतो ( कुणाच्याही दृष्टीत नसताना ).
मीन ही गुरुची रास असल्याने तिथे शुक्र 'दन्गा' करत नाहे, उलट आपले अध्यत्मिक रंग दाखवतो.
मीनेच्या शुक्राची जी 'लक्षणे' सांगितली अहेत ती वस्तविक, तूळ्/वृषभेच्या बिघडलेल्या शुक्राला लागू पडतात.
पण अनेक शतकांपसून अनेक ज्योतिषी या गुंतागुंतीच्या विषयाचा नीट अभ्यास न करता काही 'ठोकताळे' तयार करून या शास्त्राचा जोक बनवत आहेत.
मतांतरे:
तुम्ही म्हणता ते खरे आहे.
या शिवाय शुक्र केंद्रात असेल तर त्याला केंद्राधिपत्य दोषही लघु पाराशरी सांगते. (जो गुरू ला ही लागू आहे असेही म्हंटले आहे.)
श्लोक -
केंद्राधिपत्यदोषस्तु बलवान गूरूशुक्रयो:
मारकत्वेपिच तयोर्मारकस्थान्संस्थिति: ||१०||
पण त्याच वेळी केंद्राधीपति आणि त्रिकोणाधिपति परस्पर संबंधाने विशेष शुभ फलदायी होतात असेही म्हंटले आहे. (श्लोक ||१४||) ही विधाने एकमेकांचे खंडन करतात.
त्यामुळे नक्की काय मानावे यात तफावत ही कायमचीच आहे.
तनुस्थानी शुक्र आणि सप्तमात मंगळ यावर अधिक चर्चा करायला आवडेल.
पत्रिकेत कोणत्याही स्थानी मंगळ-शुक्र युती असेल तरी जातकाला भिन्नलिंगिय जोडीदाराचे प्रबळ आकर्षण असते. जर या दोन्ही ग्रहांवर चंद्र आणि गुरुसारख्या शुभ ग्रहांची दृष्टी असेल किंवा युतीस्थानीच शुभग्रह असेल तर अशा जातकावर भावनिक व नैतिक नियंत्रण राहते. अन्यथा घरातून पळून जाऊन लग्न करण्यापासून ते विवाहबाह्य संबंधांपर्यंत अनेक लक्षणे अनुभवास येतात.
एकटा असेल तर शुक्र शुभग्रह आहे. पण त्याच्या संगतीत पापग्रह आले, की त्याचे एक एक रंगढंग दिसायला सुरवात होते. शुक्र हा कला, रसिकत्व, हौसमौज, विलासीपणा, विषयसुख यांचे निदर्शक आहे. प्रसाधने व त्यांचा व्यापार करणार्यांवर शुक्राचा अंमल असतो. शुक्रप्रधान व्यक्तीला प्रसाधनांची आवड व सखोल माहिती असतेच, पण त्यातही सुगंधांचे (सेंट) आकर्षण व नियमित वापर करण्याची सवय असते. बिघडलेला शुक्र मद्यपानाचे अतिरिक्त व्यसन, शरीर संबंधांतून निर्माण होणारे रोग यांची देणगी देतो. शिवाय अशा व्यक्ती 'कामातुराणां न भयं, न लज्जा' अशा गटातील असतात.
शुक्र हा रुपाने गूढ ग्रह आहे. त्यावर वायूचे धुक्यासम दाट आवरण आहे. शुक्रप्रधान व्यक्तीच्या जीवनातील अनेक गूढ पदर सहजपणे उलगडून येत नाहीत. शुक्राशी नेपच्यूनची युती म्हणजे गूढतेत भर. नेपच्यून (वरुण) हा जलग्रह असून समुद्राचा अधिपती आहे. त्यामुळे शुक्र-नेपच्यून युती म्हणजे जणू समुद्रातील दाट धुके. अशी युती पत्रिकेत असेल तर जातकाला स्वप्नसंदेश मिळतात. आगामी घटनांचे पूर्वसंकेत मिळतात. पण युतीच्या गुणधर्मानुसार स्वप्नेही गूढ असतात व त्यातही विशेषकरुन पाणी, जलाशय हमखास दिसतात.
लग्नस्थानी शुक्र असेल तर त्याची दृष्टी सातव्या स्थानावर पडल्याने जोडीदारही दिसायला सुरेख असतो. हे दांपत्य समाजात छाप पाडते.
(थोडा पांचटपणा. आधीच माफी मागतो)
मंगळ आणि शुक्र यांच्यात नैसर्गिक आकर्षण असते. सुखी संसार, प्रणय आणि चिरंतन उत्कट प्रेमासाठी ते चांगलेच असते. बलवान मंगळाला निर्दोष शुक्राची साथ असली की मग रसिकतेला बहरच येतो. अशी जोडी सकाळी उठणारच मुळी दहानंतर :डोमा:
मी ऐकलेल्या माहिती नुसार मंगळ असलेल्या मुली सेक्षुअली डॉमिनेटिंग असतात अॅग्रेसिव्ह असतात पझेसिव्ह असतात त्यामुळे त्यांना मुलगाही मंगळावरचा लागतो. हे खरे आहे काय ?
कॄपया समाधान करावे.
बाकी ग्रहतारे एवढ्या करोडो - अरबो मणुष्यांचा डेटाबेस मेंटेन करुन कशा प्रकारे सगळ्यांचा स्वभाव नियंत्रित करतात हे मला आजवर न उकललेले कोडे आहे.
खरे तर धागा प्रथमस्थानातील शुक्रासंदर्भात असताना मंगळाच्या फलाबाबत चर्चा वेगळ्या वळणाकडे नेणारी ठरु शकेल. म्हणून लेखकाची प्रथमच माफी मागतो.
टारझन,
मंगळ असलेली प्रत्येक व्यक्ती सेक्शुअली डॉमिनेटिंग असतेच असे नाही. याबाबतीत एकच एक ढोबळ विचार करुन चालत नाही, तर पत्रिकेतील ग्रहांची स्थाने व अंशात्मक युत्या यांचाही सूक्ष्म विचार करावा लागतो. तरी काही ठोकताळे नमूद करतो.
पत्रिकेत मंगळ हा स्वतःच्या मेष व वृश्चिक या राशीत असेल तर तो तेथे बलवान असतो. अशा व्यक्तींची वासना प्रबळ असते आणि ती नि:संशय डॉमिनेटिंग असते. पण मंगळासोबत कोणत्या ग्रहाची युती आहे यावरही लैंगिक वर्तन अवलंबून असते. चंद्र व गुरु असे शुभ ग्रह असतील तर अशी व्यक्ती बेफाम आणि वासनापीडित होत नाही. त्यांच्यावर नैतिक अंकुश राहतो. जोडीदाराबाबत समानतेची भूमिका असते. (यात चंद्रापेक्षा गुरू महत्त्वाची भूमिका बजावतो.) मंगळाबरोबर शुक्र असेल तर सतत प्रणय व उपभोगाचे विचार मनात असतात, पण तिथेच रवीसारखा उग्र ग्रह असेल तर अशा व्यक्ती बलात्काराने सुख मिळवायलाही मागे पुढे पाहात नाहीत. वृश्चिक राशीत चंद्र नीचेचा होत असल्याने तेथे तो मंगळासमवेत असेल तर विषयविचार खालच्या दर्जाचे असतात. बुध हा नपुंसक आणि शनी म्हातारा असल्याने ते मंगळासोबत असतील तर अशी व्यक्ती केवळ बोलण्यातच अश्लील असते. प्रत्यक्ष कृती हातून होत नाही.
जाणकार मंगळावरच्या धाग्यात अधिक मार्गदर्शन करतीलच.
धन्यवाद योगप्रभु !! भविष्यावर माझा दृढ विश्वास नसला तरी ह्या विषयात कुतुहल फार आहे ;) म्हणुन शंका विचारली होती. तशी शंका ही आमच्या राशीलाच आहे :)
समांतर : वृष्चिक राशीत चंद्र मंगळाजवळ असलेले ३-४ जालिय चेहरे डोळ्यांनमोर तरळुन गेले ;)
मस्त विवेचन केलेत.
लग्नस्थानी शुक्र असेल तर त्याची दृष्टी सातव्या स्थानावर पडल्याने जोडीदारही दिसायला सुरेख असतो. हे दांपत्य समाजात छाप पाडते.
यामध्ये नक्षत्र विचारही व्हावा. अन्यथा असे दिसत नाही.
गुंडोपंतांच्या मुद्याशी सहमत आहे.
अधोरेखित विधान हा शुक्रप्रभावाचा एक ढोबळ ठोकताळा आहे. तो प्रत्येक वेळी १०० टक्के सिद्धच होईल असे नाही. ती फळे सूक्ष्मात समजून घेण्यासाठी केवळ नक्षत्रच नव्हे, तर लग्नराशी, ग्रहांच्या दृष्ट्या, अंशात्मक युत्या हेही पाहावे लागते.
शुक्र-नेपच्यून युती म्हणजे जणू समुद्रातील दाट धुके. अशी युती पत्रिकेत असेल तर जातकाला स्वप्नसंदेश मिळतात. आगामी घटनांचे पूर्वसंकेत मिळतात. पण युतीच्या गुणधर्मानुसार स्वप्नेही गूढ असतात व त्यातही विशेषकरुन पाणी, जलाशय हमखास दिसतात.
लग्नी शुक्र व्यक्ति :छांदिष्ट असते आणि व्यवहारी नसते ?इमानी असते .शिवणकाम .बागकाम करेल.देवधर्म कर्मकांडापासून दूर .शिक्षक ,अधिकारी यांच्याशी फटकून तर कलाकारा कारागिरांशी मैत्री .
प्रतिक्रिया
लेख आवडला
तरीच
म्हणजे
बिघडलेला शुक्र
वा धोंड्या..
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी ....- मनोगत
षुक्र विशयी थोदेसे
धन्यवाद
हल्ली
ठोक अनुमाने
हे
काही समजले नाही
ठीक
आमचीही आपली लुडबुड...
मी ऐकलेल्या माहिती नुसार मंगळ
धागा लेखकांची माफी मागून..
धन्यवाद योगप्रभु !!
"कॄपया समाधान करावे." बाप्पो
नक्षत्र विचारही व्हावा
स्थूलाकडून सूक्ष्माकडे..
१००% सत्य!!!!
अरे वा जुन्या, नव्या
ओ धोंडोपंत, मकरेचा शुक्र
मलाही याचे उत्तर हवे आहे.
कुठला ग्रह कुठे असेल तर
साला टार्या
मस्त. धोंडोपंतांचे लेख मिस
योगप्रभूंनी खूप मार्गदर्शन
लग्नी शुक्र व्यक्ति :छांदिष्ट
हा तुमच्या जाहीराती चा एक भाग
हा तुमच्या जाहीराती चा एक भाग