दोन लार्ज -एक सिमॉल ..

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
9 May 2011 - 8:59 pm

मी ज्या बारचा आश्रयदाता आहे त्या बारला फिफ्टी प्लस बार म्हणायला हरकत नाही.
इथे फारशी गर्दी नसते.माझ्या वयाची माणसं फक्त दारु पिण्यासाठीच येतात.
गप्पा नाहीत- बिझीनेस डील्स नाहीत.दारु पिणे आणि रिघणे.
वेटर दोन पेगचा कोटा एकदाच काय तो टेबलवर आणून ठेवतो आणि टिव्ही बघत बसतो.
संभाषणही फारसं काही नसतं .आठवड्यातून एकदाच एक प्रश्न विचारतो. उत्तर मिळालं की दुसर्‍या दिवशी शंका विचारतो.
पावणेअकराला चखण्याची डिश न विचारता उचलून ठेवतो.
अकराला दहा मिनीटे असताना बिल गोळा करतो .
अकरा वाजता रीक्षा बोलावतो.
अगदी घरच्यासारखं वातावरण आहे.
**************************************************
गेले काही दिवस मला वाटत होतं की वेटरला काहीतरी चर्चा करायची आहे .
घरच्या अनुभवानी मी इतकं नक्कीच शिकलो आहे की ज्याला चर्चा करायची असते त्यालाच सुरुवात करू द्यावी.
आपणच खोदून खोदून काही विचारणं म्हणजे नैतीक जबाबदारी वाढवण्यासारखं आहे.
शिवाय त्यामुळे बिलाच्या रकमेवर काहीच फरक पडणार नसतो.
काल नेहेमीपेक्षा एक स्मॉल जास्त मागवला तेव्हा त्यानी संधी साधून हळूच विचारलं ?
"साहेब ,न्यु नॉर्मल म्हणजे काय ?"
आता हा प्रश्न त्याच्याकडून अपेक्षीत नव्हताच . पण आजकाल कोण कुठलं चॅनेल बघून शाळेबाहेरचे शिक्षण घेतं हे काही कळत नाही. पण मी काही ताबडतोब दाद नाही दिली .
फक्त सांगीतलं "नविन ब्रँड असेल तर फुकटपण नको आहे."
अर्थात हे आपलं पन्नाशीनंतचं शहाणपण आहे.
"साहेब आय अ‍ॅम सिरीयस ."असं म्हटल्यावर मी त्याला विचारलं "तू हे ऐकलं कुठे ते सांग बाबा"
"आज नाही काही दिवसांपूर्वी एक रिझर्व बँकेच्या गवर्नर बाई महागाई बद्दल म्हणत होत्या की महागाईचा हा न्यु नॉर्मल आहे."
माझा हा एक्स्ट्रा स्मॉल होता. मी म्हटलं "महागाईचा न्यु नॉर्मल म्हणजे ज्याची अजून सवय झाली नाही असा. "
"मग तो नॉर्मल कसा ?"
"आता त्याच्याच सोबत रहायचं आहे म्हणून नॉर्मल."
"हे बघ नविन बनीयन घातल्यावर त्याचं लेबल कसं पाठीला टोचतं आणि काही धुण्यांनंतर नंतर त्याची सवय होते तसंच हे न्यु नॉर्मल."
खरं म्हणजे त्याला अगदी सगळं समजलं .त्यानी मान पण डोलावली.
आणि म्हणाला "गेल्या बुधवारी पण एक एक्स्ट्रा स्मॉल घेतला होता आजही घेतला म्हणजे आता ही तुमची न्यु नॉर्मलची सुरुवात म्हणायची का ?"
आता घरच्यासारखाच बार म्हणजे थोडा अगाऊपण सहन करावाच लागतो नाही का ?
***********************************************************
बर्‍याच वेळा सोप्या गोष्टी उगाचच कठीण करून लिहील्या जातात असं वाटल्यामुळे एक प्रयोग करावासा वाटला. प्रयोग म्हणून वाचून बघा. काही सूचना करा.

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

आम्हाला हे ज्ञान इथे बसल्या बसल्या मिळालं हे आमचं केवढं भाग्य. :)

पण तरी सुद्धा तुमच्या सोबत एकदा(तरी) 'बसायची' विच्छा आहे . :)

पिवळा डांबिस's picture

10 May 2011 - 4:20 am | पिवळा डांबिस

पण तरी सुद्धा तुमच्या सोबत एकदा(तरी) 'बसायची' विच्छा आहे .
अरे गणपा, पण सकाळी की संध्याकाळी हे तरी क्लियर कर!!!!!
:)

अलख निरंजन's picture

10 May 2011 - 6:16 am | अलख निरंजन

हसुन हसुन मेलो!

गणपा's picture

10 May 2011 - 10:41 am | गणपा

=)) =)) =))

माझीही शॅम्पेन's picture

9 May 2011 - 9:14 pm | माझीही शॅम्पेन

न्यु नॉर्मल
तुमची व्याख्या मस्त आहे आवडली !

कालच एक कार्यक्रम पहिला त्यात हा शब्द कमीत कमी १० वेळा होता. त्याचा मला कळलेला (खरा अर्थ माहीत नाही) मतितर्थ असा होता की एखाद्या भागात १० वादळे जून महिन्यात येतात , पण गेल्या ३ वर्षा पासून १५ वादळे येत आहेत , तर १५ हा न्यु नॉर्मल झाला.
महागाई , हवामानबदल, व्याजदर प्रत्येकच गोष्टीत हा शब्द हल्ली ऐकू येतो.

आनंदयात्री's picture

9 May 2011 - 9:16 pm | आनंदयात्री

मिपाकरांना ज्या फ्रिक्वेन्सीने तुमचे नवनवीन लेखन वाचायला मिळतेय ते त्यांच्यासाठी न्यु नॉर्मल ठरो :)

प्राजु's picture

9 May 2011 - 9:28 pm | प्राजु

:)

अलख निरंजन's picture

10 May 2011 - 6:17 am | अलख निरंजन

फ्रिक्वेन्सी बरोबर दर्जाही घसरतो. कमी लेख आले तरी चालतील पण रामदास ह्यांचा दबदबा टीकुन राहावा.

चिगो's picture

9 May 2011 - 9:25 pm | चिगो

रेंज-रेंज म्हणतात ती ह्यालाच..

रेवती's picture

9 May 2011 - 9:34 pm | रेवती

छान!

श्रावण मोडक's picture

9 May 2011 - 9:34 pm | श्रावण मोडक

प्रयोग चांगला आहे. चालू राहू द्या.
अशा बऱ्याच गोष्टी प्रत्यक्षही विचारण्यासाठी आणि ऐकण्यासाठी तुमच्यासोबत बसायचं आहे एकदा. त्याच बारमध्ये जाऊया. फिफ्टी प्लस असला तरी हरकत नाही. ;)

प्रास's picture

9 May 2011 - 10:42 pm | प्रास

आमचा आणि फिफ्टी प्लस चा काहीच संबंध आलेला नाही पण हे असलं काही शिकण्यासाठी तुम्ही दुसरीकडे कुठे वर्ग घेत नसाल तर तिथेही यायची तयारी आहे.

बाकी चिगो म्हणतायत त्या रेंज प्रकाराशी तंतोतंत सहमत आहे.....

मेघवेडा's picture

9 May 2011 - 10:43 pm | मेघवेडा

झकास! :)

प्रयोग चांगला आहे.
बाकी तुमचे ओल्ड नॉर्मल काय म्हणताहेत. सध्या त्यांचा पत्ता लापता म्हणूनही सापडत नाहिय्ये.

पिवळा डांबिस's picture

10 May 2011 - 4:17 am | पिवळा डांबिस

आता मात्र यिन्-यांगची जोडी परफेक्ट जमली!!!

यिन क्रिप्टिक गोष्टी सोप्या करून सांगतो...
आणि यांग सोप्या गोष्टींचं क्रिप्टिक करतो...

आणि दोघे मिळून आम्हां मिपाकरांच्या मेंदूचं वाटोळं करतात!!!!
:)

-अ‍ॅबनॉर्मल यल्लोनॉटी

संभाषणही फारसं काही नसतं .आठवड्यातून एकदाच एक प्रश्न विचारतो. उत्तर मिळालं की दुसर्‍या दिवशी शंका विचारतो.

इंग्रज लोकांच्या बारमध्ये-क्लबांमध्ये असे संभाषण असते, असे ऐकले होते!

गमतीदार चुटका!
(एक्स्ट्रास्मॉलबाबत "न्यू नॉर्मल" काटेकोरपणे बरोबरही असावा. बनियनबाबत काटेकोरपणे बरोबर नसावा... म्हणजे वेटरने रामदासांच्या पात्रापेक्षा मुद्दा चांगला आणि काटेकोरपणे अमजावून सांगितलेला आहे काय? - अर्थात वेटर आणि तिरसट-काका दोन्ही आपल्या रामदासांनी बनवलेलीच पात्रे आहेत!)

डॉ.श्रीराम दिवटे's picture

10 May 2011 - 5:48 am | डॉ.श्रीराम दिवटे

प्रयोग उत्तम आहे, रंगमंचावरील 'खेळ' पाहतोय...चालू द्या.

अलख निरंजन's picture

10 May 2011 - 6:15 am | अलख निरंजन

उगीचच पाल्हाळ लावल्यासारखे वाटले. नेहमीचा रामदास टच नाही. बनियनचे उदाहरण चुकले आहे ह्या धनंजय ह्यांच्या मताशी सहमत आहे.

५० फक्त's picture

10 May 2011 - 7:33 am | ५० फक्त

आवडलं, पण एवढा हुशार वेटर कल्पना करवत नाही, आणि बनियनचे उदाहरण पुर्ण गंडले आहे.

हे एक रुपक आहे. अशी जनता ज्यांना सगळेच जण गृहीत धरून चालतात.
बनीयनचे लेबल हा खुपणारा बदल.
वेटरच्या हुशारीबद्दल म्हणाल तर बेहेरामजीचा बोल्शॉय त्याच्यापेक्षाही हुशार होता.

ऋषिकेश's picture

10 May 2011 - 9:29 am | ऋषिकेश

प्रयोग म्हणून चांगला आहे. आवडला

रामदासकाकांना काहि सांगायची पत (खरंतर लायकी) नाही पण ते त्या निमित्ताने अधिक स्पष्ट करतील या स्वार्थाने एक टिपणी:
जरा आटोपते घेतल्यासारखे वाटले एखाद्या लेखात दोन तीन अश्या उगाच कठीण केलेल्या गोष्टी घेतल्या असत्या तर अधिक मजा आली असती असे वाटले.

अजुन एक न्यु नॉर्मल आठवला =)) पण तो ऑर्थोडॉक्स मिपाकरांसाठी न्यु नॉर्मल नाही म्हणुन सांगणे टाळल्या आहे . :)

बाकी शैली रामदासी आहेच !

- (वाइफ्स ब्रदर & ) एग मार्बल

तंबी दुराईंच्या जवळ जाणारा प्रयोग आवडला.

परिकथेतील राजकुमार's picture

10 May 2011 - 12:48 pm | परिकथेतील राजकुमार

एकदम आवडेश.

सुहास..'s picture

10 May 2011 - 6:40 pm | सुहास..

भाव वाढलेत सध्या ..पण होईल सवय हळुहळु !! न्यु नॉर्म्स ;)

दत्ता काळे's picture

11 May 2011 - 11:13 am | दत्ता काळे

छान.

बदलाची जाणीव करून देणारा आणि बदलाची स्वतः कडे नोंद करुन ठेवणारा वेटरही तसा 'न्यू नॉर्मल' मध्येच मोडतो. त्याचा आगाऊपणा हळू हळू सहन करण्याची सवय करून घ्यायला लागणारच आहे.

प्रयोग आवडला.

NAKSHATRA's picture

23 Jan 2021 - 9:23 am | NAKSHATRA

आजकाल कोण कुठलं चॅनेल बघून शाळेबाहेरचे शिक्षण घेतं हे काही कळत नाही

Rajesh188's picture

24 Jan 2021 - 12:24 am | Rajesh188

छान लेख