नायाग्रा चित्रदर्शन

कोलबेर's picture
कोलबेर in जनातलं, मनातलं
14 May 2008 - 10:33 pm

अमेरिकेला जाणार्‍या भारतियांना सगळ्यात मोठे आकर्षण असते ते नायाग्रा धबधबा बघण्याचे आणि त्यामुळेच कधीही इथे गेले तरी भारतीय लोकांची प्रचंड गर्दी बघायला मिळते. (ह्याचा फायदा असा की इथे अगदी ढाब्या पासून गाड्यांपर्यंत भारतीय खाण्याची रेलचेल असते. :) ) मागच्या वर्षी ह्याच सुमारास नायाग्राला भेट देऊन आलो होतो. अमेरिका आणि कॅनडा अश्या दोन देशांच्या सिमेवर बसलेला हा प्रचंड धबधबा. व्हिसाच्या कटकटी मूळे त्यावेळेस फक्त अमेरिकेच्या बाजुने जेवढे बघता आले तेवढे बघीतले ह्यावर्षी योगायोगाने बरोबर त्याच सुमारास कॅनडातील टोरांटोला गेल्याने कॅनडाच्या बाजूने हा धबधबा पहायला मिळाले.

कॅनडाच्या बाजूने धबधबा अधिक सुंदर दिसतो असे बरेच ऐकून असल्याने खूप आशा ठेवून भाड्याने गाडी घेऊन २ तास ड्राइव्ह करुन दर्शनाला गेलो..पण हाय त्या दिवशी नेमका इतका पाऊस पडला की ढगाळ वातावरणातुन आणि गडद धुक्यातुन मनसोक्त दर्शन घेता आले नाही. तरीही अधुन मधुन थोडेसे उघडलेले पाहून काही प्रकाश चित्रे टिपली ती इथे चिकटवत आहे. रसिक चोखंदळ मिसळप्रेमींना ती आवडतील अशी आशा करतो.

-(निसर्गाच्या कारागिरी समोर नतमस्तक) कोलबेर

हेच लिखाण इथेही उपलब्ध आहे

प्रवास

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

14 May 2008 - 10:43 pm | प्रभाकर पेठकर

फार अप्रतिम छायाचित्रे.
शेवटचे चित्र तर एकदम क्यूऽऽऽट आहे.

प्राजु's picture

15 May 2008 - 4:07 pm | प्राजु

शेवटचे चित्र तर एकदम क्यूऽऽऽट आहे.
हेच म्हणते.

खूप खूप छान.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वरदा's picture

14 May 2008 - 10:56 pm | वरदा

तुमचा कॅमेरा कोणता आहे? माझ्याकडेही खूप फोटो आहेत ३ वेळा जाऊन आले मी आत्तापर्यंत...दोन्ही बाजूनी खूप फोटो काढलेत पण तुमच्या इतके सुंदर नाही आले...:(

भाग्यश्री's picture

14 May 2008 - 11:00 pm | भाग्यश्री

शेवटचा फोटो भन्नाट आहे !!! ३रा पण खूप आवडला!

देवदत्त's picture

14 May 2008 - 11:15 pm | देवदत्त

सुंदर... अप्रतिम :)

चतुरंग's picture

14 May 2008 - 11:16 pm | चतुरंग

सर्वच प्रकाशचित्रे अप्रतिम आहेत. शेवटच्या चित्रातला पक्षी तर जणूकाही एखादा गाईड असावा अशा थाटात निवांत बसून कॅमेर्‍याकडे बघतोय :)

(अवांतर - हा प्रपात तीन वेळा बघूनही माझे समाधान झालेले नाही. ह्या उन्हाळ्यात पुन्हा एकदा जाणार आहे. निसर्गाचा चमत्कार बघून आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान मिळते!)

चतुरंग

स्वाती दिनेश's picture

14 May 2008 - 11:41 pm | स्वाती दिनेश

धबाबा तोय कोसळे...
शब्द जिथे तोकडे पडतात त्यातली ही एक सृष्टीची करामत, कॅमेर्‍यात बंद करण्याचा अगदी यशस्वी प्रयत्न!
फोटो अप्रतिमच!
स्वाती

चतुरंग's picture

15 May 2008 - 12:01 am | चतुरंग

शिवथरच्या धबधब्याला बघून रामदासस्वामी म्हणतात

गिरीचें मस्तकी गंगा
तेथुनी चालिल्या बळे
धबाबा लोटती धारा
धबाबा तोय आदळे

विश्रांती वाटते तेथे
जावया पुण्य पाहिजे
शास्त्रे, निरुपणे, चर्चा
सार्थके काळ जातसे

चतुरंग

स्वाती दिनेश's picture

15 May 2008 - 12:00 pm | स्वाती दिनेश

चतुरंग,
मला हेच हवे होते,काल ओळी मनात जरा इकडे तिकडे होत होत्या,म्हणून कोट केले नाही.(एक ओळ कोट केली त्यातही चूक केली, आदळण्याऐवजी कोसळवला त्या धबाब्याला,:))बरे झाले तुम्ही लिहिलेत,धन्यवाद.
स्वाती

चतुरंग's picture

15 May 2008 - 4:53 pm | चतुरंग

अहो आदळवला काय किंवा कोसळवला काय, बिघडत नाही, शेवटी धबधब्यातून उडणार्‍या पाण्याचे तुषार अंगावर मनसोक्त घेऊन त्यात सचैल स्नान केले की आपण भरुन पावतो, आणखी काय हवे असते आपल्याला? :)

चतुरंग

स्वाती दिनेश's picture

15 May 2008 - 5:10 pm | स्वाती दिनेश

++१
ते तर खरेच.. पण कालपासून त्या ओळी छळत होत्या आणि अजिबात नीट आठवत नव्हत्या,त्याच तुम्ही लिहिल्यात म्हणून एकदम छान वाटले,शब्दकोड्यातला एखादा शब्द आठवत नसला आणि आत्ता जीभेवर होता असे वाटत रहाते ना तसे फिलिंग होते त्या समोर
येईपर्यंत,:)

विसोबा खेचर's picture

15 May 2008 - 12:10 am | विसोबा खेचर

वरूणदेवा,

प्रकाशचित्रे केवळ अप्रतीम!

मला पहिले आणि पाचवे प्रकाशचित्र सर्वाधिक आवडले. क्लास...!

तात्या.

गणपा's picture

15 May 2008 - 12:29 am | गणपा

वाह.. कोलबेरशेठ... एकदम हायक्लास.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. बरोब्बर १० वर्षांपुर्वी पाहिला होता नायाग्रा. (कॅनडाच्या बाजूने )

(जुन्या आठवणींत रमलेला) गणपा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 May 2008 - 8:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलबेरा,
सर्वच प्रकाशचित्र झकास.....!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनस्वी's picture

15 May 2008 - 9:42 am | मनस्वी

ढग आल्यामुळे रंगछटांमध्ये आणखीनच भर पडली आहे.

शेवटच्या चित्रातला पक्षी तर जणूकाही एखादा गाईड असावा अशा थाटात निवांत बसून कॅमेर्‍याकडे बघतोय

हो.. खरंच :)

धनंजय's picture

15 May 2008 - 10:36 am | धनंजय

पक्षी टिपण्याची कल्पकता आवडली.

कॅनडाच्या किनार्‍यावरून चित्रांचे अँगल जास्त चांगले मिळतात. यूएस किनार्‍यावरून हे असे दिसते :
हा कनेडियन फॉल्स
Canadian Falls

हा अमेरिकन फॉल्स
American Falls

(नावाचा अमेरिकन फॉल्स असला तरी याचेसुद्धा चित्र कॅनडाच्या किनार्‍यावरूनच सुंदर दिसते. कोलबेर, त्याबाजूने तुम्ही त्याचा फोटो काढला असेल तर द्यावा.)

ऋचा's picture

15 May 2008 - 10:41 am | ऋचा

ultimate!!!!!!!!!!!!!!!!!

झकासराव's picture

15 May 2008 - 10:48 am | झकासराव

सगळेच फोटो छान आहेत.
अगदी मोठी फ्रेम करुन घरी लावावे असे आहेत :)
अवांतर : नायगारा किआ नायाग्रा???
कोणत बरोबर? मी आजवर नायगारा अस वाचलय म्हणुन विचारतोय.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

प्रगती's picture

15 May 2008 - 11:56 am | प्रगती

ह्या धबधब्याचे फोटो इतके सुरेख आहेत तर तो प्रत्यक्षात किती सुंदर असेल? :? :?

ईश्वरी's picture

15 May 2008 - 12:02 pm | ईश्वरी

फारच सुन्दर आले आहेत फोटोज. ३, ४, ५ तर खासच. ४थ्या फोटो मध्ये फोरग्राउंड ला गवत आणि फुले कॅमेर्‍यामधे कल्पकतेने टिपली आहेत. नाहितर जनरली झूम करुन नुसत्या धबधब्याचा फोटो काढण्याकडे कल असतो.

ईश्वरी

लिखाळ's picture

15 May 2008 - 4:36 pm | लिखाळ

चित्रे मस्त आहेत. काळया रंगाच्या जाड चौकटीमुळे चित्रे उठावदार झाली आहेत.

४थ्या फोटो मध्ये फोरग्राउंड ला गवत आणि फुले कॅमेर्‍यामधे कल्पकतेने टिपली आहेत.
सहमत आहे.
पुढील हिरव्या गवताने आणि मागील हिरव्या धबधब्याने चित्राची दोन टोके संवादी झाली आहेत. आणि त्यामुळे चित्र अजूनच सुंदर प्रेक्षणीय झाले आहे. या निवडीबद्दल अभिनंदन.
--लिखाळ.

राजे's picture

15 May 2008 - 4:42 pm | राजे (not verified)

छान फोटो.

पण तुम्ही फोटोशॉप मध्ये ईडीट केले आहेत का ? काही लेयर दिले आहेत असे वाटत आहे ... नसेल तर छान !
खरं तर एखाद्या प्रणालीची मदत घेतली नसेल तर छान ! कारण जे जसे आहे तसेच उत्तम आहे ह्या मताचा मी !
धनंजय ने जी फोटो दिले आहेत त्यात व तुमच्या फोटोत खुपच अंतर आहे व त्याचे कारण शक्यतो फोटोशॉप प्रणालीचा वापर आहे असे वाटते.

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

लिखाळ's picture

15 May 2008 - 5:47 pm | लिखाळ

राजे साहेब,
आपले मत वाचून http://mr.upakram.org/node/1138 ही चर्चा आठवली.

खरं तर एखाद्या प्रणालीची मदत घेतली नसेल तर छान ! कारण जे जसे आहे तसेच उत्तम आहे ह्या मताचा मी !
मी आपल्याशी तत्वतः सहमत आहे पण....

चित्र काढताना समोर दिसलेला निसर्ग जसा आहे तसाच तो चित्रात यावा यासाठी संगणक प्रणालीची मदत घेणे तसेच आणि चित्रातली वस्तूंची मांडणी इत्यादी आकर्षक होण्यासाठी चित्र कापणे, त्याला चौकट करणे, रंग-तीव्रता बदलणे इत्यादी सोपस्कार केले तर ते मला व्यक्तिशः पटते. कारण हे सर्व सोपस्कार प्रिंटींग च्या वेळी कुशल प्रिंटर करतच असतो. डोळ्यांना दिसलेला निसर्ग जसाच्या तसा कागदावर-संगणक पडद्यावर येण्यासाठी थोडा व्याप करणे भागच असते. त्यात कलेची अथवा कलाकृतीची हानी होते वा प्रत कमी होते असे मला स्वतःला वाटत नाही. असो.

--लिखाळ.

राजे's picture

15 May 2008 - 6:27 pm | राजे (not verified)

त्यात कलेची अथवा कलाकृतीची हानी होते वा प्रत कमी होते असे मला स्वतःला वाटत नाही
बरोबर आहे मी ही सहमत आहे, पण जेथे निसर्ग चित्र हा विभाग येतो तेव्हा मात्र संगणक प्रणालीचा वापर नसावा ह्याच मताचा मी आहे, पण आग्रहाने तुम्ही आपले मत मांडले ह्या बदल आपले आभार.

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

कोलबेर's picture

15 May 2008 - 7:12 pm | कोलबेर

राजे,
फोटोशॉप अथवा कोणतेही सॉफ्टवेअर हे 'पोस्ट प्रोसेसिंग' आणि 'मॅन्युपलेशन' अश्या दोन गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते. 'पोस्ट प्रोसेसिंग' ह्या प्रकारात लिखाळ रावांनी दिलेल्या गोष्टी येतात. कोणत्याही व्यावसायीक प्रकाशचित्रकाराला विचाराल तर तो देखिल हेच सांगेल. ह्या दुव्यावर ह्या विषयी वाचा. मी पोस्ट प्रोसेसिंग इथल्या सुचनांनुसार करतो. इथे नमुद केलेले कोणतेही मॅन्युपलेशन वरील चित्रांमध्ये वापरलेले नाही.

पूर्वी हिच कामे लॅबमध्ये विविध क्लुप्त्या वापरुन केली जायची त्यासाठी आता संगणक आला आहे. जसेकी पुर्वी फिल्म कॅमरा होता आता डिजीटल कॅमेरा आहे तसेच आता नेहेमीचि डार्करुम देखिल डिजीटल डार्करुम संबोधली जाते.

-कोलबेर

शितल's picture

15 May 2008 - 5:57 pm | शितल

सुद॑र फोटोग्राफी, आमचा ग्रुप ही २३ला नायाग्राला चालला आहे, पण आम्ही जुलैला जाणार आहोत, हॅलिक्फ्टर राईड देखिल आहे, साधारण ६० ते ७० डॉलर पर हेड, वरून पाहिले तर काय आणखी अप्रतिमच दिसेल.

वरदा's picture

15 May 2008 - 10:26 pm | वरदा

वर्थ आहे ती राईड एकदा घे नक्की...
प्रगती
ह्या धबधब्याचे फोटो इतके सुरेख आहेत तर तो प्रत्यक्षात किती सुंदर असेल?
अगं खरय्...कीतीही कॅमेरात बंदिस्त केला तरी प्रत्यक्ष पहाण्यासारखं सुख नाही...मी गेले होते तेव्हा ऊन पडलं होतं छान आणि एका वेळी ३ इंद्रधनुष्य दिसत होती...कॅमेरात २ आली ३ रं फोटो काढेपर्यंत निघून पण गेलं....

बेसनलाडू's picture

16 May 2008 - 7:28 am | बेसनलाडू

डोळ्यांचे पारणे फिटले.
(आस्वादक)बेसनलाडू

कोलबेर's picture

16 May 2008 - 7:37 am | कोलबेर

प्रोत्साहना बद्दल सर्वांचे अनेक आभार!!

मदनबाण's picture

16 May 2008 - 7:49 am | मदनबाण

सर्वच चित्रे फार सुरेख आहेत.....

मदनबाण.....

एकलव्य's picture

16 May 2008 - 6:54 pm | एकलव्य

दिवसाची सुंदर सुरुवात! धन्यवाद!! चित्रे सुरेख आहेत.

(४ जुलैच्या अलिकडे/पलिकडे नायगर्‍याला जायचे आमचे नक्की झालेले आहे.... )