बीन सॅलेड

वरदा's picture
वरदा in पाककृती
14 May 2008 - 2:56 am

ही पा. क्रु. तुम्ही वाचलीच आहे आधी मी इथे फक्त नंतर सापडावी म्हणून टाकतेय
बीन सॅलेड
१०-१५ फरसबीच्या शेंगा
२ चमचे डिजॉन मस्टर्ड (मोहोरी पेस्ट + मध) हे तयार पण मिळतं वास खूप छान येतो ह्याने
१/२ कप इ व्ही ओ ओ (एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल बेस्ट)
१/४ कप रेड व्हिनेगर
१ कॅन साधारण (२००-२५० ग्रॅ. असेल ) राजमा (उकडलेला)
तेवढेच छोले (उकडलेले)
पिंटो बिन्स, ब्लॅक बिन्स, वाटाणे अशा हव्या त्या बिन्स सगळ्या उकडून
त्यात टॉमेटो, किंचित साखर, मीठ, कांदा, कोथंबीर, मिरपूड, थोडी कैरी
सगळं मिक्स करा आणि खा....मस्त लंच होतो..

चु. भु. द्या. घ्या.

प्रतिक्रिया

चकली's picture

14 May 2008 - 5:53 am | चकली

मस्त आहे कृती
मी डिजॉन मस्टर्ड ऐवजी हॉट सॉस(पेपर सॉस) वापरते. तो फ्लेवर पण ट्राय करून बघ.
बाकी हे चवीला छानच लागेल.
चकली
http://chakali.blogspot.com

वरदा's picture

14 May 2008 - 6:53 am | वरदा

ट्राय करुन पाहीन...हो गं रोज कॅलरी न वाढवणारं काय मिळेल ते शोधत असते....म्हणून हे उद्योग

स्वाती दिनेश's picture

14 May 2008 - 11:55 am | स्वाती दिनेश

वरदा,तुझं बीन्स सॅलड आवडलं ग..करून पाहतेच.
अवांतर-रोज कॅलरी न वाढवणारं काय मिळेल ते शोधत असते....म्हणून हे उद्योग
म्हणून तर म्हटलं,करून पाहतेच..

प्राजु's picture

14 May 2008 - 2:42 pm | प्राजु

वरदा,
आता ईस्ट कोस्ट स्पेशल कट्ट्याला हा मेनू कर.. नक्की.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वरदा's picture

14 May 2008 - 5:09 pm | वरदा

१५ मिनटाचं काम... सोप्पं काम दिलंस....

विसोबा खेचर's picture

14 May 2008 - 5:21 pm | विसोबा खेचर

ही पाकृ वाचल्याचे आठवत आहे....

आपला,
(कोशिंबिरप्रेमी) तात्या.

वरदा's picture

14 May 2008 - 5:27 pm | वरदा

मी काल स्वातीच्या संडे स्पेशल सॅलेड मधे दिली होती. ती म्हणाली नंतर शोधायला सोप्पी जाईल वेगळी टाक म्हणून इथे टाकली...

शितल's picture

14 May 2008 - 5:48 pm | शितल

वरदा
एकदम कॅलरीजवर लक्ष ठेवलेली छान पाककृती सा॑गितलीस.
करून पहातेच.

वरदा's picture

14 May 2008 - 5:58 pm | वरदा

तुला सगळे बीन्स मिळतील शॉप राईट मधे..पण ते कॅन मधले बिन्स आणलेस ना तर चक्क चाळणीत टाकून धुवुन घे कारण ते जरा चिकट असतात...

युगंधरा's picture

14 May 2008 - 10:02 pm | युगंधरा

व्हाईट व्हिनेगर आणि रेड व्हिनेगर च्या चवीत काही फरक आहे का?

प्रभाकर पेठकर's picture

14 May 2008 - 10:45 pm | प्रभाकर पेठकर

व्हाईट व्हिनेगर आणि रेड व्हिनेगर च्या चवीत काही फरक आहे का?

चव घेऊन तुम्हीच आम्हाला सांगा.

वरदा's picture

14 May 2008 - 10:49 pm | वरदा

पण व्हाईट व्हिनेगार सुद्धा छान लागतं सगळ्या सॅलेड मधे..त्याच्या टेस्ट मधे कींचित आंबटपणा असतो तो रेड व्हीनेगार मधे नसतो.
ह्या सॅलेड मधे कैरी, टॉमेटो असल्याने आंबट चवीची गरज नाही लागत म्हणून रेड घालत असतील...
जनरली चायनीज मधे वगैरे व्हाईट टाकतात...साधं सॅलेड किंवा सब्ज बनवायचे असतील तर सुधा तेच छान लागतं..

बाकी एक्सपर्ट सांगतीलच

कुठलंही व्हीनेगार हाताला लागेल ते टाकून पहायचं हे मला बापडीला माहित..सायन्सची विद्यार्थिनी ..त्यामुळे काहीही दिसलं तरी 'आपण प्रयोग करुन पाहु' हेच चालु असतं.......

प्रभाकर पेठकर's picture

15 May 2008 - 5:28 pm | प्रभाकर पेठकर

..त्यामुळे काहीही दिसलं तरी 'आपण प्रयोग करुन पाहु' हेच चालु असतं.......

हे महत्त्वाचे. स्वयंपाकघर ही एक 'प्रयोगशाळा'च असते.

मनस्वी's picture

15 May 2008 - 5:30 pm | मनस्वी

स्वयंपाकघर ही एक 'प्रयोगशाळा'च असते.

सुंदर वाक्य.

वरदा's picture

15 May 2008 - 6:00 pm | वरदा

मस्त वाटलं हो मी ह्यावर अगदी १०१% विश्वास ठेवते. फक्त त्यामुळे नवर्‍याचा गिनिपीग बनवते इतकच...:))